भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे
Iiserpunelogo.jpg
ब्रीदवाक्य Where Tomorrow’s Science Begins Today
Director क्रिष्णा एन. गणेश
कर्मचारी २२७[१]
पदवी ५९५[१]
स्नातकोत्तर ८६[१]
पी.एच.डी. ३१२[१]
स्थान पुणे, महाराष्ट्र, भारत


भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे (इंग्रजी: Indian Institute of Science Education and Research, Pune) (किंवा आयसर पुणे) ही पुणे, महाराष्ट्र येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत पाच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना केली. आयसर पुणे त्यापैकी एक आहे. आयसर पुणेची स्थापना २००६ साली झाली. २०१२ साली संसदेतील कायद्यानुसार आयसर पुणेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था घोषित करण्यात आले.[२]

आयसर पुणेचा कॅम्पस ९८ एकरात पसरला असून तो पुण्यातील पाषाण येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या शेजारी आहे. डॉ. क्रिष्णा एन. गणेश हे आयसरचे संचालक आहेत.

शैक्षणिक कार्यक्रम[संपादन]

आयसर पुणेमध्ये तीन प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध आहेत.

 • ५ वर्षांचा विज्ञान स्नातक (Bachelor of Science) आणि विज्ञानाधी स्नातक (Master of Science) दुहेरी पदवी कार्यक्रम
 • विज्ञानाधी स्नातक आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी एकत्रित पदवी कार्यक्रम
 • डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी कार्यक्रम

शैक्षणिक विभाग आणि केंद्रे[संपादन]

 • जीवशास्त्र विभाग
 • रसायनशास्त्र विभाग
 • भौतिकशास्त्र विभाग
 • गणित विभाग
 • हवामान आणि पृथ्वी विज्ञान विभाग

विद्यार्थ्यांचे उपक्रम[संपादन]

आयसर पुणे येथील विद्यार्थ्यांचे उपक्रम विविध क्लब मार्फत आयोजित केल्या जातात. आयसर पुणेतील विविध क्लबची यादी पुढीलप्रमाणे:

 • ड्रामा क्लब
 • आरोह (संगीत क्लब)
 • कला (कला क्लब)
 • विज्ञान क्लब
 • ॲस्ट्रॉनॉमी क्लब
 • पृथा
 • दिशा
 • डान्स क्लब
 • स्पोर्ट्स क्लब

कारवा हा आयसर पुणेचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आहे.

आयसर पुणेचा विज्ञान क्लब दरवर्षी मीमांसा ही विज्ञानावर आधारित आंतर-महाविद्यालयीन प्रश्नमंजुषेची स्पर्धा आयोजित करतो. ही स्पर्धा दोन स्तरावर घेतली जाते. पहिल्या स्तरात भारतातील विविध परीक्षाकेंद्रांमध्ये लेखी परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये विज्ञानाच्या सर्व शाखांमधील ६० प्रश्न विचारले जातात. त्यातील पहिल्या चार संघांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाते, जी आयसर पुणे येथे होते.

हेही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
 1. a b c d "आयसर पुणे विद्यार्थी आणि कर्मचारी संख्या" (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "आयसर पुणे संस्था" (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)