गन्धक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गंधक या पानावरून पुनर्निर्देशित)
१६ गंधक (सल्फर)


S

S-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक गंधक (सल्फर), S, १६
दृश्यरूप पिवळ्या रंगाचा स्फटिकी पदार्थ
Sulfur-sample.jpg
रासायनिक श्रेणी अधातू
अणुभार ३२.०६५ ग्रॅ·मोल−१
भौतिक गुणधर्म
रंग फिकट पिवळा
स्थिती घन
विलयबिंदू ३८८.३६ के
(११५.२१ °से, {{{विलयबिंदू फारनहाइट}}} °फा)
उत्कलनबिंदू (क्वथनबिंदू) ७१७.८ के
(४४४.६ °से, {{{उत्कलनबिंदू फारनहाइट}}} °फा)

(S) (अणुक्रमांक १६) अधातु रासायनिक पदार्थ. सल्फर यास गंधक असेही संबोधले जाते. रसायनशास्त्राने गंधकाचा मूलद्रव्यात समावेश केलेला आहे. गंधक पिवळ्या रंगाचा असतो. गंधकाला वास येत नाही. घासला तर त्याला घर्षणाने विशिष्ट वास येतो. गंधकाला उष्णता देऊन पातळ केला तर खूप वास दरवळतो आणि ज्वलनाने घाण वास येतो.

गंधक पाण्यामध्ये विरघळत नाही. हवेत जाळला असता निळ्या ज्योतीने जळतो. गंधक ज्वालामुखीच्या प्रदेशात सापडतो. गरम पाण्याच्या झऱ्यांमध्येही गंधकाचा अंश असतो. अशा झऱ्याच्या आसपास निरनिराळ्या धातूंबरोबर संयोग पावलेल्या स्वरूपातही गंधक सापडतो. भारतात बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान वगैरे ठिकाणी गंधक सापडतो. हा गंधक त्या त्या धातूच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वेगळा केला जातो.

दूध, अंडी वगैरे प्राणिज अन्न-द्रव्यांमध्ये तसेच लसूण, मोहरी, कांदा वगैरे वनस्पतीं मध्येही गंधक असतो.


बहुउपयोगित्वामुळे आयुर्वेदातील अनेक औषधांत त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदात उल्लेखलेली सुवर्णमाक्षिक, हिराकस, मोरचूद, मनःशीळ, हरताळ वगैरे द्रव्ये गंधकसंयोगाने बनलेली असतात.

वापराआधी याची वेगवेगळ्या प्रकारे शुद्धी केली जाते.