बर्किलियम (चिन्ह: Bk ; रोमन लिपी: Berkelium ; अणुक्रमांक: ९७ ) हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे. इ.स. १९४९ साली कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या किरणोत्सारण प्रयोगशाळेत बर्किलियमाचा शोध लागला. ही प्रयोगशाळा ज्या शहरात वसलेली आहे, त्या कॅलिफोर्नियातील बर्कली शहरावरून य मूलद्रव्याला नाव देण्यात आले.