विलयबिंदू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या तापमानास दिलेल्या पदार्थाचे घनावस्थेतून द्रवावस्थेत रूपांतरण होते, त्या तापमानास त्या पदार्थाचा विलयबिंदू असे म्हणतात. विलयबिंदूला पदार्थाची घनावस्था आणि द्रवावस्था equilibrium[मराठी शब्द सुचवा]मध्ये असतात. विलयबिंदू पदार्थावर असणाऱ्या दाबावर अवलंबून असतो. याकारणाने सहसा विलयबिंदू "सामान्य दाबावर" दिला जातो. जेव्हा पदार्थ द्रवावस्थेतून घनावस्थेत रूपांतरण करतो, त्या तापमानाला गोठणबिंदू म्हणतात. सहसा पदार्थाचे विलयबिंदू आणि गोठनबिंदू सारखे असतात, पण ते विभिन्नही असू शकतात.