युरेनियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Uranium.svg

(U) (अणुक्रमांक ९२) रासायनिक पदार्थ. युरेनियम हे एक प्रकारचे खनिज आहे. याच्या अणू स्फोटातून मोठ्या प्रमाणात उर्जा उत्सर्जन होते, म्हणून अणू पासून वीज निर्मीती मध्ये याचा जगभर उपयोग केला जातो.

युरेनियम
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक , ,
दृश्यरूप


अणुभार  ग्रॅ·मोल−१

१७८९ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन क्लॅपरॉथ यांनी एका नव्या मूलद्रव्याचा शोध लावला. त्याच्या काही वर्षे आधी सर विल्यम हर्षल यांनी दि. मार्च १३ १७८१ या दिवशी युरेनस ग्रहाचा शोध लावला होता. हे नाव ग्रीक देवता युरेनसच्या नावावरून ठेवले गेले. क्लॅपरॉथ या ग्रहाच्या सापडण्याने फार प्रभावित झाले होते, त्यांनी त्यावरूनच नव्या मूलद्रव्यास युरेनियम असे नाव दिले.

युरेनियम खनिज

१८४१ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ युजेन पेलिगॉट यांना पहिल्यांदा धातूरूप युरेनियम मिळविता आले. १८९६ साली फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आंत्वान हेन्री बेकरेल यांनी युरेनियम क्षार (पोटॅशियम युरेनिल डबल सल्फेट) वापरून धातूच्या पत्र्यावर ते सपाट पसरून ठेवले व नंतर ते काळ्या कागदात गुंडाळून ठेवले. काही वेळाने त्यांनी पाहिले की पत्र्यावर जसे क्षार पसरले होते अगदी तशीच आकृती काचेवर उमटली आहे. यावरून त्यांनी असे जाहीर केले की युरेनियम हे पहिले धातूवर्गीय मूलद्रव्य आहे की जे अदृष्य प्रकाश देते (प्रस्फूरणासारखा गुणधर्म असलेले) यावरूनच पुढे युरेनियमचा उपयोग करून उर्जा मिळविता येत असल्याबातचा शोध लागला.

अणु मधील शक्ती वापरून अणुशस्त्र तयार करता येऊ शकेल असे शास्त्रज्ञांना १९३० च्या सुमारास वाटू लागले. नाझींचा पाडाव करण्यासाठी असे शस्त्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने अल्बर्ट आइनस्टाइन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट यांना भेटले आणि त्यांनी परवानगी दिल्यावर मग शास्त्रज्ञांनी प्रयत्न करून अणुशस्त्र (बॉम्ब) तयार केले.

युरेनियम बॉम्ब टाकल्यानंतर हिरोशिमावर पसरलेले दाट ढग

डिसेंबर २ १९४२ या दिवशी युरेनियमचे किरणोत्सारी विघटन साखळी प्रक्रिया मार्गाने घडवून आणले गेले. यावरून अतिशय शिस्तीने युरेनियमचा अणुगर्भ विघटीत करून त्यापासून उर्जा मिळविता येते हे सिद्ध झाले. दि. ऑगस्ट ६ १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा आणि दि. ऑगस्ट ९ १९४५ रोजी नागासाकी या दोन शहरांवर युरेनियम बॉम्ब टाकण्यात आले, यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर विनाश घडून आला.

या घटनेमुळे सगळे जग हादरले, युरेनियमचा वापर युद्धासाठी न करता केवळ शांततेसाठी व्हावा अशी मागणी होऊ लागली. रशियन शास्त्रज्ञ इगोर कुर्चातोव यांनी त्या दिशेने प्रयत्न करत जून २७ १९५४ रोजी युरेनियमचा उपयोग करून विद्युत निर्मितीचा पहिला प्रयोग सोवियेत संघात यशस्वीपणे पार पाडला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.