प्लॅटिनम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Platinum.svg

(Pt) (अणुक्रमांक ७८) रासायनिक पदार्थ.

प्लॅटिनम


Pt

Pt-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक प्लॅटिनम, Pt,
दृश्यरूप


अणुभार  ग्रॅ·मोल−१

१६ व १७ व्या शतकात स्पॅनिश लोकांनी ऍझटेक आणि इंका लोकांकडून टनावारी सोने, चांदी आणि हिरेमाणके जहाजात भरभरून आपल्या देशात नेले. त्यातच रुपेरी धातूचे काही कणही होते. त्यांचा वितळणबिंदू फारच उच्च असल्याने ते कण निरूपयोगी ठरले, सोने मिळविण्यास अडचणीचे ठरले. स्पॅनिश लोकांनी त्यास तिरस्काराने प्लॅटिनो म्हणजे हलक्या प्रतिची चांदी असे संबोधण्यास सुरूवात केली.

पुढे १८ व्या शतकाच्या अखेरीस रशियन रसायनशास्त्रज्ञ व सेंट पीटर्सबर्गच्या खनिकर्म महाविद्यालयाचे उपाध्यक्ष आपोलस म्युसिन-पुश्किन यांनी प्लॅटिनमच्या अभ्यासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे प्लॅटिनमसह निसर्गात:च येणाऱ्या अनेक धातूंचा शोध लागला, सर्वांना मिळून प्लॅटिनम वर्गीय धातू असे नाव दिले गेले. यात १८०३ मध्ये पॅलॅडियमर्‍होडियम, १८०४ मध्ये ओस्मियमइरिडियम तर १८४४ च्या सुमारास रूदेनियमचा शोध लागला. टंग्स्टनचा शोध लागेपर्यंत प्लॅटिनम-पोलाद हे सगळ्यात कठीण संयुग समजण्यात येई, त्यास डायमंड-स्टील असे म्हणत.

प्लॅटिनमच्या अंगी रासायनिक रोधकता आहे. तीव्र सल्फ्युरिक आम्लाचाही यावर परिणाम होत नाही म्हणून औद्योगिक क्षेत्रात प्लॅटिनमच्या मुशी, भांडी, चाळण्या, नळ्या वगैरे वापरतात. काचेवर प्लॅटिनमचा अत्यंत पातळ थर देऊन तयार केलेला आरसा दारा-खिडक्यांना लावतात त्यामुळे घरातील व्यक्तीला बाहेरचे नीट पाहता येते पण बाहेरील व्यक्तीला या काचेतून घरातील काहीही दिसत नाही.

१८८३ साली प्लॅटिनमच्या सहाय्याने प्रमाणित मानके (किलोग्रॅम, मीटर वगैरे) तयार करण्यात आली. या मानकांचे वेळोवेळी परीक्षण केले असता लक्षात आले की १२५ पेक्षा जास्त वर्षे होऊनही यांच्यात काहीच फरक पडलेला नाही, त्यांची झीज झालेली नाही.

प्लॅटिनमची नाणी पाडली जातात, त्यापासून दागिने, शोभेच्या वस्तु, कलाकुसरीचे साहित्य घडविले जातात.

प्लॅटिनम सोन्यापेक्षा कितीतरी महाग धातू असून याच्या किमती स्थिर राहत नसल्याने अनेक क्षेत्रातून वापर कमी जास्त होत असतो पण उच्च वितळणबिंदू व रासायनिक रोधकता या गुणांमुळे वैद्यकीय क्षेत्रासह अनेक क्षेत्रात प्लॅटिनमचा उपयोग होतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.