अल्क धातू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियमसीझियम या अल्क धातूंचे प्रयोगशाळेतील नमुने

अल्क धातू[१] (अन्य नामभेद: अल्कली धातू ; इंग्लिश: Alkali metal , अल्कली मेटल ;) हे आवर्त सारणीमधील एकसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो. त्यामुळे हे धातू अतिशय विक्रियाशील असतात. आवर्त सारणीमधील इतर मूलद्रव्यांप्रमाणे या गटातील मूलद्रव्येही एकमेकांसारखे गुणधर्म दाखवतात.

या गटातील धातू खालीलप्रमाणे व वाढत्या अणुभाराप्रमाणे त्यांच्या गुणधर्मांत होणारा बदल खालील तत्क्यात दाखवला आहे :

Z मूलद्रव्य इलेक्ट्रॉन रचना
हायड्रोजन
लिथियम २,१
११ सोडियम २,८,१
१९ पोटॅशियम २,८,८,१
३७ रुबिडियम २,८,१८,८,१
५५ सीझियम २,८,१८,१८,८,१
८७ फ्रान्सियम २,८,१८,३२,१८,८,१

अल्कली धातू वाढत्या अणुक्रमांकाप्रमाणे गुणधर्मात बदल दाखवतात. उदाहरणार्थ, त्यांची विद्युतऋणता कमी होत जाते; विक्रियाशीलता वाढत जाते; विलयबिंदूउकळणबिंदू वाढत जातो; घनता वाढत जाते. पोटॅशियम व फ्रांसियम हे धातू याला अपवाद आहेत; त्यांची घनता अनुक्रमे सोडियम व सीशियम यांपेक्षा कमी असते.

अल्क धातू अणुभार विलयबिंदू (के) उकळणबिंदू (के) घनता (ग्रा·सेंमी−३) विद्युतऋणता (पॉलिंग)
लिथियम ६.९४१ ४५३ १६१५ ०.५३४ ०.९८
सोडियम २२.९९० ३७० ११५६ ०.९६८ ०.९३
पोटॅशियम ३९.०९८ ३३६ १०३२ ०.८९ ०.८२
रुबिडियम ८५.४६८ ३१२ ९६१ १.५३२ ०.८२
सीझियम १३२.९०५ ३०१ ९४४ १.९३ ०.७९
फ्रान्सियम (२२३) २९५ ९५० १.८७ ०.७०

संदर्भ[संपादन]

  1. ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. १०.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत