शिसे
| सामान्य गुणधर्म | ||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| साधारण अणुभार (Ar, standard) | ग्रॅ/मोल | |||||||
| - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
| अणुक्रमांक (Z) | ८२ | |||||||
| गण | अज्ञात गण | |||||||
| भौतिक गुणधर्म | ||||||||
| घनता (at STP) | ग्रॅ/लि | |||||||
| आण्विक गुणधर्म | ||||||||
| इतर माहिती | ||||||||
शिसे (चिन्ह: Pb ; इंग्लिश: Lead, लेड ; अणुक्रमांक: ८२) हे एक मृदू, वजनदार व उष्णतारोधक खनिज आहे. हा एक गंजरोधक, जड, लवचीक आणि ठोकून आकार देण्याजोगा असा निळा-राखाडी रंगाचा धातू आहे.
अनुक्रमणिका
इतिहास[संपादन]
हा धातू किमान ५ हजार वर्षांपासून मानवास माहीत आहे.
वापर[संपादन]
शिशाचा वापर यापूर्वी इमारतींचे बांधकाम साहित्यात, सॉल्डरिंग करण्यासाठी, चिनी मातीच्या वस्तू चमकविण्यासाठी, रंगकामात आणि पाणी वाहून नेणार्या नळांमध्ये मध्ये केला जात असे. सध्या त्याचा प्रमुख वापर शिसे व अल्क प्रकारच्या विद्युतघट संचात केला जातो. वाहने, जहाजे आणि विमाने यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टम या संचांवर चालतात आणि अवलंबून असतात. काही वेळा तर संचातूनच प्रत्यक्ष ऊर्जेचा पुरवठा होतो. कार्यालयीन इमारती, शाळा इत्यादींना यांना ध्वनिरोधक करण्यासाठीही याचा वापर होतो. इस्पितळामध्ये एक्स-रे आणि गामा-किरण रोखण्यासाठी शिसाचे पत्रे उपयोगी पडतात. किरणोत्सर्ग रोखण्यासाठी कायमस्वरूपी म्हणून तसेच अण्वस्त्र साहित्याची वाहतूक करताना शिसे वापरतात. दारूगोळा, रंग, काच, रबर, पोलाद इत्यादी उत्पादनांमध्ये या खनिजाचा उपयोग होतो.
आढळ[संपादन]
भारत[संपादन]
भारतात प्रामुख्याने राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत शिशाच्या खाणी आहेत. याशिवाय गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा इत्यादी राज्यांत काही प्रमाणात शिसे सापडते.
पुनर्वापर[संपादन]
भारतात शिशाच्या साठ्यांची कमतरता असल्याने येथे शिशाची आयात आणि शिशाचा पुनर्वापर करावा लागतो.
बाह्य दुवे[संपादन]
- "एमसीएक्स बाजाराच्या संकेतस्थळावरील शिश्याच्या मालव्यापारासंबंधीचे पान" (मराठी मजकूर). एमसीएक्स बाजार अधिकृत संकेतस्थळ.
| कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| H | He | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
| Li | Be | B | C | N | O | F | Ne | |||||||||||||||||||||||||||||||||
| Na | Mg | Al | Si | P | S | Cl | Ar | |||||||||||||||||||||||||||||||||
| K | Ca | Sc | Ti | V | Cr | Mn | Fe | Co | Ni | Cu | Zn | Ga | Ge | As | Se | Br | Kr | |||||||||||||||||||||||
| Rb | Sr | Y | Zr | Nb | Mo | Tc | Ru | Rh | Pd | Ag | Cd | In | Sn | Sb | Te | I | Xe | |||||||||||||||||||||||
| Cs | Ba | La | Ce | Pr | Nd | Pm | Sm | Eu | Gd | Tb | Dy | Ho | Er | Tm | Yb | Lu | Hf | Ta | W | Re | Os | Ir | Pt | Au | Hg | Tl | Pb | Bi | Po | At | Rn | |||||||||
| Fr | Ra | Ac | Th | Pa | U | Np | Pu | Am | Cm | Bk | Cf | Es | Fm | Md | No | Lr | Rf | Db | Sg | Bh | Hs | Mt | Ds | Rg | Cn | Uut | Uuq | Uup | Uuh | Uus | Uuo | |||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||