कालिदास सन्मान पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कालिदास सन्मान पुरस्कार (हिंदी: कालिदास सम्मान) हा भारतातील मध्य प्रदेश राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी देण्यात येणारा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव संस्कृत भाषेमधील अभिजात महाकवी कालिदास याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हा पुरस्कार १९८० सालापासून देण्यात येऊ लागला. आरंभी हा पुरस्कार अभिजात संगीत, अभिजात नृत्य, नाटक व मूर्तिकला या क्षेत्रांसाठी दर दोन वर्षांतून एकदा जाहीर करण्यात येत असे. परंतु इ.स. १९८६-८७ सालापासून दर वर्षी चारी क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार देण्यात येऊ लागले.

याशिवाय, संस्कृत दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे ’कविकुलगुरू कालिदास संस्कृत पुरस्कार’ दरवर्षी देण्यात येतो. २०११ साली हा पुरस्कार मराठवाड्यातील औरंगाबाद येथील विनायक हरिभाऊ मुरकुटे यांना देण्यात आला.

कालिदास सन्मान पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती[संपादन]

हेही पहा[संपादन]