Jump to content

बिरजू महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिरजू महाराज
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावबिरजू महाराज संपादन
जन्म तारीख४ फेब्रुवारी 1938 संपादन
जन्मस्थानलखनौ संपादन
मृत्यू तारीख१६ जानेवारी 2022, १७ जानेवारी 2022 संपादन
मृत्यूस्थानदिल्ली संपादन
व्यवसायनर्तक / नर्तकी, नृत्यदिग्दर्शक, गायक, संगीतकार संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1951 संपादन
कार्य कालावधी (अंत)2016 संपादन
गट-प्रकारहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत संपादन
पुरस्कारसंगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.birjumaharaj-kalashram.com संपादन

पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखले जाणारे ब्रिजमोहन मिश्रा, (४ फेब्रुवारी १९३८, १७ जानेवारी २०२२, दिल्ली[१]), हे कथक नृत्याच्या अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे निपुण नर्तक होते.[२] ते कथक नर्तकांच्या महाराज घराण्यातील वंशज आहेत, ज्यात त्यांचे दोन काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज आणि त्यांचे वडील आणि गुरू, अचन महाराज यांचा समावेश आहे. नृत्य हे त्यांचे पहिले प्रेम असले तरी ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आणि गायकसुद्धा होते.

वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली.भारतीय कला केंद्र, संगीत नाटक अकादमीचे कथ्थक केंद्र या ठिकाणी ते शिकवत असत. निवृत्तीनंतर त्यांनी 'कलाश्रम' ही नृत्य/नाट्य संस्था सुरू केली .

शतरंज के खिलाडी, देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी इत्यादी चित्रपटात नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Pandit Birju Maharaj, Legendary Kathak Dancer, Dies At 83". NDTV.com. 2022-01-17 रोजी पाहिले.
  2. ↑ "जानें- कत्थक सम्राट बिरजू महाराज के बारें में ये खास बातें." ४ फेब्रुवारी २०१८.