Jump to content

सितारा देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सितारा देवी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वब्रिटिश भारत, भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावSitara संपादन
आडनावदेवी संपादन
जन्म तारीख८ नोव्हेंबर 1920 संपादन
जन्मस्थानकोलकाता संपादन
मृत्यू तारीख२५ नोव्हेंबर 2014 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
वैवाहिक जोडीदारके. आसिफ, Nazir Ahmed Khan संपादन
अपत्यरणजित बारोट संपादन
व्यवसायनृत्यदिग्दर्शक, अभिनेता संपादन
पुरस्कारसंगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, कलांमध्ये पद्मश्री, संगीत नाटक अकादमी फेलोशिप संपादन

सितारा देवी (८ नोव्हेंबर, १९२०:कोलकाता, ब्रिटिश भारत - २५ नोव्हेंबर, २०१४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या एक भारतीय कथक नर्तिका होत्या. या सोळा वर्षाच्या असतानाच रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवींच्या नृत्य अभिनयासाठी नृत्यसम्राज्ञी असे नामाभिधान केले.

मे १३ १९७० रोजी सितारादेवींनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात सतत अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला.[ संदर्भ हवा ]

डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या वतीने पुणे शहरात उभारल्या गेलेल्या कला संग्रहालयाला कथकक्वीन सितारादेवी कला संग्रहालय असे नाव देण्यात आले आहे..

यांचे मूळ नाव धनलक्ष्मी होते.

यांचा मुलगा रणजित बारोट संगीतकार आहे.