मकबूल फिदा हुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मकबूल फिदा हुसेन
MFHussain.jpg
मकबूल फिदा हुसेन
पूर्ण नाव मकबूल फिदा हुसेन
जन्म सप्टेंबर १७, इ.स. १९१५
पंढरपूर, महाराष्ट्र
मृत्यू जून ९, इ.स. २०११
लंडन, युनायटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg, कतारी
कार्यक्षेत्र चित्रकला
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
चळवळ प्रोग्रसिव आर्ट ग्रुप
प्रसिद्ध कलाकृती मदर इंडिया, इलस्ट्रेशन ऑफ रामायण, महाभारत
पुरस्कार पद्मश्री(१९५५), पद्मभूषण(१९७३), पद्मविभूषण(१९९१)
वडील फिदा हुसेन
आई झुनैब हुसेन

मकबूल फिदा हुसेन, अर्थात एम.एफ. हुसेन, (१७ सप्टेंबर, इ.स. १९१५ ; पंढरपूर, महाराष्ट्र - ९ जून, इ.स. २०११ ; लंडन, युनायटेड किंग्डम) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी चित्रकार होते.

भारतातील आधुनिक चित्रकलेच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणार्‍या कलावंतांमध्ये गणला जाणारे हुसेन इ.स. १९४०च्या दशकापासून चित्रकार म्हणून नावारूपास येऊ लागले. फ्रान्सिस न्यूटन सूझा याने मुंबईत स्थापलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप या समूहात हुसेन इ.स. १९४७ साली दाखल झाले. तत्कालीन भारतीय कलाक्षेत्रात बंगाल स्कूल म्हणून ओळखल्या गेलेल्या कलापरंपरेतील राष्ट्रवादी मर्यादा उल्लंघून आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रातील प्रवाहांशी संवाद साधू पाहणार्‍या कलाकारांचा या समूहात समावेश होता. इ.स. १९५२ साली झुरिच येथे एम.एफ.हुसेन यांचे पहिले एकल चित्रप्रदर्शन भरले. काही वर्षांतच युरोप व अमेरिकेतही त्याच्या कलेची ख्याती पसरली. इ.स. १९५५ साली भारतीय केंद्र शासनाने त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवले.

वादग्रस्त[संपादन]

  • जून १९७५ दुर्गा आणि उधळलेले घोडे यांच्याभोवती मतमतांतरे व्यक्त झाली. तत्कालीन वादग्रस्त पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाच त्यांनी दुर्गेच्या रूपात साकारले आहे.
  • २००६ मध्ये हुसेन यांनी काढलेल्या सरस्वती व अन्य हिंदू देवतांच्या नग्न चित्रांविरोधात खटल्यांचा सिलसिला चालू झाला.
  • फेब्रुवारी २००६मध्येच इंडियाटुडे या पाक्षिकातील 'आर्ट फॉर मिशन कश्मिर' या शीर्षकाच्या या जाहिरातीत भारतमाता म्हणून एका विवस्त्र स्त्रीचे चित्र भारताच्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर चितारले होते आणि भारतातील विविध राज्यांची नावे तिच्या शरीरावर ठिकठिकाणी लिहिली होती. विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जनजागृती समितीने याविरोधात निदर्शने केली. हुसेन यांना माफी मागून चित्र काढून टाकावे लागले.(महाराष्ट्र टाइम्स...हुसेनचे वाद)

चित्रपट निर्मिती[संपादन]

  • थ्रू आइज ऑफ अ पेंटर1
  • गजगामिनी
  • मीनाक्षी- अ टेल ऑफ थ्री सिटीज 3

बाह्य दुवे[संपादन]