Jump to content

दमाल कृष्णस्वामी पट्टम्माल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
D. K. Pattammal (es); ডি কে পট্টম্মল (bn); D. K. Pattammal (fr); ડી. કે. પટ્ટમાંલ (gu); Д. К. Паттаммал (ru); दमाल कृष्णस्वामी पट्टम्माल (mr); D. K. Pattammal (de); D. K. Pattammal (sq); D. K. Pattammal (ga); D. K. Pattammal (da); D.K. Pattammal (sl); D・K・パッタマル (ja); ഡി.കെ. പട്ടമ്മാൾ (ml); డి.కె.పట్టమ్మాళ్ (te); D. K. Pattammal (sv); Damal Krishnaswamy Pattammal (nn); D. K. Pattammal (nb); D.K. Pattammal (nl); डि. के. पट्टम्माळ् (sa); डी के पट्टम्माल (hi); ಡಿ. ಕೆ. ಪಟ್ಟಮ್ಮಾಳ್ (kn); D. K. Pattammal (cy); D. K. Pattammal (en); D. K. Pattammal (id); D. K. Pattammal (ca); தா. கி. பட்டம்மாள் (ta) cantante india (es); indiai énekes (hu); ભારતીય ગાયક (gu); abeslari indiarra (eu); cantante india (1919–2009) (ast); cantant índia (ca); indische Sängerin (de); Indian singer (en-gb); خواننده هندی (fa); panyanyi (mad); cântăreață indiană (ro); זמרת הודית (he); ureueng meujangeun asai India (ace); भारतीय गायक (hi); భారతీయ గాయిని (te); ভাৰতীয় কণ্ঠশিল্পী (as); Indian singer (en-ca); பாடகர் (ta); cantante indiana (it); ভারতীয় গায়িকা (bn); chanteuse indienne (fr); India laulja (et); Indian singer (en); cantora indiana (pt); penyanyi asal India (id); Indiaas zangeres (1919-2009) (nl); Indian singer (en); amhránaí Indiach (ga); këngëtare indiane (sq); индийская певица (ru); cantante india (gl); مغنية هندية (ar); baaŋa ŋun nyɛ paɣa (dag); індійська співачка (uk) দামল কৃষ্ণস্বামী পট্টম্মল (bn); Damal Krishnaswamy Pattammal (id); DK Pattammal, D.K. Pattammal (nn); പട്ടമ്മാൾ, D.K. Pattammal, ദാമൽ കൃഷ്ണസ്വാമി പട്ടമ്മാൾ (ml); D. K. Pattammal (nl); Дамал Кришнасвами Паттаммал (ru); ಡಿ ಕೆ ಪಟ್ಟಮ್ಮಾಳ್ (kn); Damal Krishnaswamy Pattammal (en); Damal Krishnaswamy Pattammal, Damal Krishna Pattamal, Pattammal (de); டி.கே.பட்டம்மாள், தா.கி.பட்டம்மாள், டி. கே. பட்டம்மாள் (ta)
दमाल कृष्णस्वामी पट्टम्माल 
Indian singer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावD.K. Pattammal
जन्म तारीखमार्च २८, इ.स. १९१९
कांचीपुरम
मृत्यू तारीखजुलै १६, इ.स. २००९
चेन्नई
मृत्युचे कारण
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९२९
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

दमाल कृष्णस्वामी पट्टम्माल (१९ मार्च १९१९[] - १६ जुलै २००९)[] एक भारतीय कर्नाटक संगीतकार आणि तामिळ चित्रपटातील गायिका होत्या. त्यांच्या समकालीन एमएस सुब्बुलक्ष्मी आणि एम.एल. वसंतकुमारी यांना एकत्रितपणे अजूनही "कर्नाटिक संगीताची त्रिमुर्ती " म्हणून ओळखले जाते. या त्रिकुटाने कर्नाटक संगीतच्या मुख्य प्रवाहात महिलांच्या प्रवेशास सुरुवात केली. जगभरातल्या कर्नाटक संगीत प्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे.[][] त्यांना सरकार तर्फे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत जसे; संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६१), पद्मभूषण पुरस्कार (१९७१), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (१९९२), पद्मविभूषण पुरस्कार (१९९८) आणि कालिदास सन्मान पुरस्कार (१९९८-९९).

जीवन आणि पार्श्वभूमी

[संपादन]

पट्टम्माल यांचा जन्म भारताच्या तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील ब्राह्मण कुटुंबात झाला होता.[] त्यांचे नाव अलामेलु असे ठेवले गेले, परंतु प्रेमाने त्यांना “पट्टा” म्हणले जात असे.[][] त्यांचे वडील दमाल कृष्णस्वामी दीक्षितर यांना संगीताची आवड होती व कर्नाटक संगीत शिकण्याची प्रेरणा त्यांच्या कडून मिळाली. त्यांची आई कांतीमती (राजम्माल) स्वतः एक गायक असूनही कठोर रूढीवादी परंपरांमुळे मित्रपरिवारा साठी सुद्धा त्यांना गायला परवानगी नव्हती. अशी पार्श्वभूमी असूनही, पट्टम्माल यांनी लहान वयातच गायन सुरू केले आणि संगीतात बऱ्यापैकी प्रतिभा दर्शविली.[]

त्यांना गुरुकुलाचे औपचारिक प्रशिक्षण नव्हते.[] लहानपणी, पट्टम्माल एखाद्या मैफिलींमध्ये बसत आणि घरी परततांना ऐकलेल्या गाण्याचे व रागांचे मुख्य भाग लक्षात घेत. त्यांचे भाऊ डीके रंगनाथन, डीके नागराजन आणि डीके जयरामन तिला या कार्यात मदत करत असे. त्यांनी वडिलांनी शिकवलेले साधे भक्तिगीत पण गायली आहेत. नंतर, त्यांला तेलगू भाषिक संगीतकारांकडून शिक्षण मिळाले, ज्यांना त्या "तेलगू वडियार" किंवा "तेलगू शिक्षक" असे म्हणत. त्यांती पट्टम्मालला तेलगू आणि संस्कृत शिकवले.[]

गायन

[संपादन]
भाऊ डीके जयरामन यांच्या सोबत मैफिलीत पट्टम्माल (उजवीकडे); १९४० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात.

वयाच्या आठव्या वर्षी पट्टम्माल यांनी भैरवीतले त्यागराजांचे "रक्षा बेट्टरे" गाण्यासाठी एका स्पर्धेत प्रथम पुरस्कार जिंकला.[]

१९२९ मध्ये, वयाच्या दहाव्या वर्षी, पट्टमाल यांनी मद्रास कॉर्पोरेशन रेडिओसाठी (ज्याला आता आकाशवाणी म्हणून ओळखले जाते) प्रथम रेडिओवर गीत सादर केले. ३ वर्षांनंतर १९३२ मध्ये मद्रास रसिक रंजनी सभेमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक मैफिलीत गीत प्रस्तुत केले.[] एका वर्षा नंतर, त्या मैफिलीत नियमित कलाकार म्हणून चेन्नईला स्थायिक झाल्या. १९३९ मध्ये पट्टम्मालने आर. ईश्वरनशी लग्न केले.

संगीताची ही शैली सार्वजनिकपणे सादर करणारी ती पहिली ब्राह्मण महिला होती.[]

मृत्यू

[संपादन]

१६ जुलै २००९ रोजी दुपारी दीड वाजता पट्टम्मलचे चेन्नई येथे नैसर्गिक कारणांमुळे निधन झाले.[] त्यांचे पती आर. इस्वरन यांचे वयाच्या ९५व्या वर्षी, २ एप्रिल २०१० रोजी, निधन झाले.

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Janani Sampath (15 March 2018). "Year-long celebrations to mark DK Pattammal's birth centenary". www.dtnext.in. 27 March 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 March 2018 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Front page: Pattammal passes away". The Hindu. 17 July 2009. 2009-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 April 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Smt. D.K.Pattammal. Chennai Online. Archived 6 October 2006 at the Wayback Machine.
  4. ^ "Chords and Notes". The Hindu. 4 August 2003. 30 August 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 April 2015 रोजी पाहिले.
  5. ^ a b c Lakshmi Ramakrishnan (April 1998), "Music with feeling", Frontline, The Hindu Group, 15 (8), 25 June 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित
  6. ^ a b c D Ram Raj (18 July 2009). "Enough if I get 100 discerning listeners". Daily News and Analysis. 11 April 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "Pattammal passes away". Deccan Chronicle. 16 July 2009. 11 April 2015 रोजी पाहिले.
  8. ^ Gowri Ramnarayan (17 July 2009). "Elegance, not flamboyance, was her forte". The Hindu. 2011-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 April 2015 रोजी पाहिले.
  9. ^ Gowri Ramnarayan (August 2009), "Matriarch of music", Frontline, The Hindu Group, 26 (16)