विजया मेहता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विजया मेहता 
Indian actress
Vijaya mehta.jpg
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखनोव्हेंबर ४, इ.स. १९३४
वडोदरा
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
अपत्य
 • Anahita Uberoi
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Vijaya Mehta (es); Vijaya Mehta (hu); Vijaya Mehta (ast); Виджая Мехта (ru); Vijaya Mehta (de); Vijaya Mehta (ga); Vijaya Mehta (da); Vijaya Mehta (tet); Vijaya Mehta (mg); ڤيچايا ميهتا (arz); Vijaya Mehta (ace); विजया मेहता (hi); విజయ మెహతా (te); Vijaya Mehta (map-bms); বিজয়া মেহতা (bn); Vijaya Mehta (fr); Vijaya Mehta (jv); विजया मेहता (mr); ବିଜୟା ମେହେଟା (or); Vijaya Mehta (bjn); Vijaya Mehta (sl); Vijaya Mehta (su); Vijaya Mehta (bug); Vijaya Mehta (id); Vijaya Mehta (nn); Vijaya Mehta (nb); Vijaya Mehta (nl); Vijaya Mehta (min); Vijaya Mehta (gor); ವಿಜಯಾ ಮೆಹ್ತಾ (kn); വിജയ മേത്ത (ml); Vijaya Mehta (en); Vijaya Mehta (sq); Vijaya Mehta (ca); Vijaya Mehta (sv) actriz india (es); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); actriu índia (ca); Indian actress (en); indische Schauspielerin und Regisseurin am Theater und im Film (de); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر و کارگردان هندی (fa); actriță indiană (ro); pemeran asal India (id); Indian actress (en-ca); שחקנית הודית (he); Indiaas actrice (nl); actriz india (gl); индийская актриса (ru); భారతీయ నటి (te); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indian actress (en); ممثلة هندية (ar); індійська акторка (uk); Indian actress (en-gb) Мехта, Виджая (ru)
Disambig-dark.svg
विजया मेहता

विजया मेहता (४ नोव्हेंबर, इ.स. १९३४ - ) या भारतीय रंगभूमीवरील अभिनेत्री, दिग्दर्शिका आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया जयवंत होते.[१] त्या आधुनिक मराठी रंगभूमीच्या आघाडीच्या प्रवर्तक असून 'रंगायन' चळवळीच्या अध्वर्यू आहेत.[२] आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासीयत आहे.[३]

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

विजया यांचा पहिला विवाह अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी झाला होता. हरीन यांचे अल्पवयात निधन झाले. यावेळी त्यांना दोन लहान मुले होती. नंतर त्यांनी फारुख मेहता यांच्याशी विवाह केला.[४]

कारकीर्द[संपादन]

१९६० च्या दशकात त्यांनी विजय तेंडूलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत रंगायन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली.[५] पार्टी या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली. त्यांनी दिग्दर्शित केलेले पेस्तनजी व रावसाहेब हे चित्रपट विशेष मानले जातात.

विजया मेहता यांची गाजलेली नाटके[संपादन]

 • अजब न्याय वर्तुळाचा
 • एक शून्य बाजीराव
 • एका घरात होती
 • कलियुग (चित्रपट)
 • क्वेस्ट (इंग्रजी चित्रपट)
 • जास्वंदी
 • पुरुष
 • पेस्तनजी (हिंदी चित्रपट)
 • बॅरिस्टर
 • मला उत्तर हवंय
 • मादी
 • रायडिंग द बस विथ माय सिस्टर (इंग्रजी चित्रपट)
 • रावसाहेब (चित्रपट)
 • लाईफलाईन (इंग्रजी चित्रवाणी मालिका)
 • वाडा चिरेबंदी
 • शाकुंतलम (चित्रवाणी चित्रपट)
 • श्रीमंत
 • स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणी मालिका)
 • हयवदन
 • हमिदाबाईची कोठी (नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका)
 • हवेली बुलंद थी (हिंदी चित्रपट)

पुरस्कार[संपादन]

 • रत्‍नागिरीच्या आर्ट सर्कल, आशय सांस्कृतिकतर्फे पुलोत्सव सन्मान पुरस्कार
 • 'एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून डॉक्टरेट
 • कालिदास सम्मान
 • चतुरंग प्रतिष्ठानचा २०१२ सालचा जीवनगौरव पुरस्कार
 • नाट्यदर्पण पुरस्कार
 • पद्मश्री
 • महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार नावाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
 • 'झिम्मा'ला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार
 • रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान हा पुरस्कारही मिळाला आहे.
 • 'झिम्मा'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार
 • विष्णुदास भावे सुर्वणपदक
 • संगीत नाटक अकादमी पुरस्कार

आत्मचरित्र[संपादन]

 • विजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे.
 • विजया मेहता यांच्या नाट्य-कारकिर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ नावाचे पुस्तक आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ नेवगी, उमेश विनायक (१० नोव्हेंबर २०१३). "विजया मेहता ... एक मनस्वी-तपस्वी रंगयात्री!". सकाळ (मराठी मजकूर). (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ५ मार्च २०१६ रोजी मिळविली). ३१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले. 
 2. ^ गेही, रीमा. "Shantata! Awishkar Chalu Aahe". mumbaitheatreguide.com. १७ मार्च २०१९ रोजी पाहिले. 
 3. ^ वर्दे, अभिजित (१९९७). "Daughters of Maharashtra: Portraits of Women who are Building Maharashtra : Interviews and Photographs". books.google.co.in. १७ मार्च २०१९ रोजी पाहिले. 
 4. ^ गोखले, शांता (२६ नोव्हेंबर २०१२). "Life at play". पुणे मिरर. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १७ फेब्रुवारी २०१३ रोजी मिळविली). १७ मार्च २०१९ रोजी पाहिले. 
 5. ^ जसोधरा बागची, विजया मेहता (२००५). "A space of her own : personal narratives of twelve women". १७ मार्च २०१९ रोजी पाहिले.