रामगंगा
Appearance
रामगंगा, गगन चिडी (इंग्लिश:Indian Grey Tit; हिंदी: रामगंगरा, सलेटी रामगंगरा) हा एक चिमणीच्या आकाराएवढा पक्षी आहे.
ओळख
[संपादन]या पक्ष्याचे डोके काळे, कंठ, छातीचा मध्य भाग व गळ पांढरे असतात. काळ्या रेषा असलेला खालील भाग पांढरा व वरील भागाचा वर्ण राखट असतो.
वितरण
[संपादन]हे पक्षी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व ओरिसा या भागात स्थलांतर करतात.
निवासस्थाने
[संपादन]हे पक्षी पानगळीची विरळ जंगले, गवताळी राया आणि फळबागा यामध्ये आढळतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली