नारळ
माड किंवा नारळ (शास्त्रीय नाव: Cocos nucifera, कोकोस नुसिफेरा ; इंग्लिश: Coconut, कोकोनट ;) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळनारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुऱ्यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाचे अनेक उपयोग आहेत.
ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते.
अनुक्रमणिका |
सांस्कृतिक महत्त्व [संपादन]
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात.
एकाक्ष नारळ [संपादन]
बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास एकाक्ष नारळ म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजला जातो.
मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यात येतो, त्याच्या मागे बलिदानाचा भाव आहे. मनुष्य किंवा पशू यांच्या ऐवजी नारळाचे बलिदान हे ईश्वरोपासनेचे एक रूप समजले जाते. प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्रीफळाचे बलिदान दिले जाते.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- लोकसत्ता (३१ ऑगस्ट, इ.स. २००९) - परसबागेतील नारळ (मराठी मजकूर)