औषध
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
औषध (अनेकवचन: औषधे ; इंग्लिश: Pharmaceutical drug/ Medication, फार्मास्यूटिकल ड्रग / मेडिकेशन) म्हणजे स्थूलमानाने वैद्यकीय निदान, तोडगा, उपचार व रोगप्रतिबंधक म्हणून वापरावयाचा रासायनिक पदार्थ होय. औषधे ही वैद्यकशास्त्राच्या महत्त्वपूर्ण संसाधनांपैकी एक आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्सा पद्धतींमध्ये यांचा उपयोग झालेला आढळतो.
औषधांचे वर्गीकरण करण्याच्या अनेक तर्हा आहेत: रासायनिक गुणधर्म, औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार, औषधाचा प्रभाव दिसणाऱ्या शरीरसंस्थेनुसार, औषधयोजनेचे परिणाम इत्यादी अनेकविध तर्हांनी औषधांची वर्गवारी करता येऊ शकते. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी त्याचा नियंत्रित वापर होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य औषधे, योग्य रुग्णास, योग्य मात्रेत दिल्यानंतर ती योग्य मार्गाने, योग्य कालावधीसाठी वापरणे अपेक्षित असते.
[संपादन] बाह्य दुवे
- औषधे. मराठी कुमार विश्वकोश. २६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
- औषधांचे वर्गीकरण. आरोग्यविद्या.नेट. २६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||