बहामनी सल्तनत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बहामनी सल्तनत (मराठी लेखनभेद: बहमनी सल्तनत) ही इ.स.च्या १४व्या व १५व्या शतकांत अस्तित्वात असलेली दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील गुलबर्गा आणि बिदर येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती.
मूळच्या बादाख्शान येथील ताजिक वंशात जन्मलेल्या अल्लाउद्दीन हसन बहामनी याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. इ.स. १५१८नंतर हिचे तुकडे पडून अहमदनगराची निजामशाही, वर्हाडातील इमादशाही, बीदर येथील बरीदशाही, विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अश्या पाच सल्तनती उदयास आल्या.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |