लसूण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते.
प्राचीन काळापासून लसणाचा उपयोग स्वयंपाकात व औषधोपचारासाठी केला गेला आहे. लसणाचे असंख्य गुणकारी गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत.
एकूण लसूण उत्पादनात जगामध्ये चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.