मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी (रोमन लिपी: Mir Qamar-ud-din Khan Siddiqi) ऊर्फ पहिला आसफ जाह (२० ऑगस्ट, इ.स. १६७१ - १ जून, इ.स. १७४८) हा मुघल साम्राज्यातील मनसबदार व आस जाही घराण्याचा संस्थापक होता. त्याला दिलेल्या चिनकिल्च खान (औरंगजेबाने इ.स. १६९०-९१मध्ये दिलेला किताब), निझाम-उल-मुल्क (फरुखशियार याने इ.स. १७१३मध्ये दिलेला किताब), आसफ जाह (मुहम्मदशाहाने इ.स. १७२५ साली दिलेला किताब) या किताबांनीही तो ओळखला जातो.
मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी मुघलांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार, अर्थात निझाम-उल-मुल्क, म्हणून नेमला गेला. त्याच्यापासून हैदराबादच्या निजामांची राजवट सुरु झाली.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |