सिक्किम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सिक्किम
भारताच्या नकाशावरील चे स्थान.
राजधानी
 - अक्षांश-रेखांश
गंगटोक
 - २७.३३° उ. ८८.६२° पू.


सर्वात मोठे शहर गंगटोक
लोकसंख्या ()
 - लोकसंख्या घनता
५,४०,४९३ (२८)
 - ७६.१७/किमी²
क्षेत्रफळ
 - जिल्हे
७,०९६ कि.मी.² ([[List of states of India by area|]])
 - ४
प्रमाण वेळ भारतीय प्रमाण वेळ (IST) (UTC +५:३०)
स्थापना
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - कायदेमंडळ (जागा)

 - व्ही. रामा राव
 - पवनकुमार चामलिंग
 - विधानसभा (३२)
राज्यभाषा नेपाळी
राज्य संकेतनाम (ISO) IN-SK
संकेतस्थळ: sikkim.nic.in/

इतिहास [संपादन]

भूगोल [संपादन]

जिल्हे [संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - सिक्किममधील जिल्हे

सिक्किम राज्यात ४ जिल्हे आहेत.

गुरु रिनपोचे यांची ३५ मी. उंच मूर्ती सिक्किम

एकीकडे कांचनगंगासारखी बर्फाच्छादित हिमशिखरं आणि दुसरीकडे वसंतात डोळ्यांचे पारणे फेडायला लावणारी फुलणारी विविध प्रकारची फुलं अशा दोन्ही टोकांवर झुलत राहणारं सिक्कीम.. तिथल्या स्थानिक संस्कृतीचा, खाद्यपदार्थाचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी सिक्कीमला गेलंच पाहिजे.नेपाळ, तिबेट, भूतान आणि बंगाल असे चारही दिशांनी बंदिस्त असे सिक्कीम हे हिमालयाच्या कुशीत असलेले एक छोटेसे राज्य आहे. सिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. राजा तेनसिंग नामग्यालने युकसोम येथून राजधानी हलवून रबदानसे येथे स्थापित केली. पण नेपाळ व भूतान यांच्याकडून सतत होणाऱ्या स्वाऱ्यांनी या छोटय़ाशा राज्याची, रबदानसेची वाताहात होऊन गेली. ब्रिटिश काळात सिक्कीमचे तत्कालीन इंडियाच्या मदतीने नेपाळशी युद्ध झाले. त्या वेळी सिक्कीमने ब्रिटिश इंडिया व नेपाळशी अनुक्रमे सुगौली, तितालीया करार करून हस्तगत केलेला भाग परत मिळवला. पुढे सिक्कीमने स्वतंत्र भारताशी मदतीसाठी हस्तांदोलन केले. दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. भारतातर्फे त्यांचे राजकीय व्यवहार पार पडू लागले, तर १९७५ मध्ये पंतप्रधान कै. इंदिरा गांधींच्या राजवटीत सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झाले. तद्नंतर सिक्कीम हे भारतातील एक राज्य म्हणून गणले जाऊ लागले. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे भारतीय लष्कराचे तेथे वर्चस्व आहे. डोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे, अलीकडेच झालेला भूकंप वगैरे आपत्तींना सिक्कीम येथील रहिवाशांना सामोरे जावे लागतेच. त्यातून मार्ग काढणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी आपल्या सैन्याचीच शाखा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहेच. तेथील सर्व रस्त्यांची व्यवस्था पाहणे हे त्यांचेच काम. डोंगराळ भागामुळे सिक्कीममध्ये रेल्वेची व्यवस्था होणे दुरापास्त आहे. राजधानी गंगटोक येथे बागडोगराहून कारने किंवा हेलिकॉप्टरने जाता येते, पण हेलिकॉप्टरची सेवा दिवसातून एकदाच असते. शिवाय एका वेळेला फक्त चारच माणसे जाऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीज, बसेस यांची भरपूर वर्दळ असते. कोलकाता येथून सिलीगुडी किंवा जलपायगुडीपर्यंत रेल्वेने जाऊ शकतो. पुढे बस किंवा टॅक्सी आहेच. म्हणजे ते कसोशीने पाळले जातात. मोठय़ा अवजड वाहनांना, शिवाय दुसऱ्या राज्यातील टुरिस्ट वाहनांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गंगटोकमधे अजिबात प्रवेश नसतो. सिक्कीमच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातली अनुक्रमे गंगटोक, गेझिंग, मंगन, नामची ही प्रमुख शहरे आहेत. गंगटोक ही राजधानी असल्याने जास्त वहिवाटीची दाटीवाटीची, शिवाय प्रमुख कचेऱ्या, शाळा, कॉलेजेस, इत्यादी आहेतच. डोंगराळ भागामुळे रस्ते खूपच अरुंद आणि चढ-उताराचे, त्यामुळे ट्रॅफिकचे नियम अगदी कडक आहेत, पण आश्चर्य कसोशीने पाळले जातात. मोठय़ा अवजड वाहनांना, शिवाय दुसऱ्या राज्यातील टुरिस्ट वाहनांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गंगटोकमधे अजिबात प्रवेश नसतो. उत्तर तिबेटमधील तिबेटी, शिवाय नेपाळी लोक फार पूर्वीपासून येथे वास्तव्य करून आहेत. इंग्लिश, हिंदी, लेपचा, लिंबू नेपाळी, भूतिया या भाषा प्रामुख्याने व्यवहारात वापरल्या जातात. व्यापाराची बहुतेक धुरा आपल्याकडील मारवाडी लोकांनी सांभाळली आहे. हिंदू व बौद्ध धर्म प्रामुख्याने अस्तित्वात आहे. ख्रिश्चन धर्म फारच थोडय़ा प्रमाणात आहे. रुमटेक ही सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे. नव्या रुमटेकला सोन्याचा स्तूप आहे. पश्चिमेस रुमटेकप्रमाणे पेमियांगत्से मोनेस्ट्री त्याच काळातली आहे. येथे झाडाच्या ढोलीतून कोरलेले धम्मचक्र नक्कीच पाहण्यासारखे आहे. लहान मुले लामा होण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोनेस्ट्रीमध्येच राहतात. ज्याला आपण कांचनगंगा म्हणून ओळखतो ते जगप्रसिद्ध कांग चेन जुंगा हे हिमशिखर पश्चिम भागात आहे. ८४५० मी. उंचीचे हे शिखर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. तिथले रहिवासी कांचनगंगाला पवित्र मानतात. सोने, चांदी, विविध रत्ने, शिवाय धान्य, पवित्र ग्रंथ यांचा खजिना म्हणजे कांचनगंगा मानतात. येथे गिर्यारोहणाची क्वचितच परवानगी दिली जाते. गंगटोक येथून त्याचे छानपैकी दर्शन होते, पण ती अवाढव्य बर्फाची भिंत वाटते. पश्चिमेस पेलिंग गावापासून कांचनगंगा अवघ्या ५० किमी. अंतरावर असल्याने आपल्याला संपूर्ण पर्वताचे दर्शन दिवसभर hote.नजीक जाऊन पाहिल्यास शिखरापर्यंत नजर ठरूच शकत नाही. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस बर्फाच्छादित पर्वतावर पडणारी कोवळी किरणे कांचनगंगा हे नाव सार्थ ठरवतात.दिवसभर आपल्याला कांचनगंगाचे सौंदर्य वेगवेगळ्या अंगाने अनुभवता येते. सूर्योदयावेळी कोवळ्या किरणांमुळे वेगळीच सोनेरी छटा संपूर्ण डोंगरच सोन्याचा करते, तर दुपारी धारदार तलवारीप्रमाणे संपूर्ण डोंगर चमकत असतो आणि रात्री लखलखत्या ताऱ्यांच्या मंदमंद प्रकाशात पांढऱ्याशुभ्र क्षीरसागरासारखा अगदी अवर्णनीय. असे हे वेगवेगळे रूप दिवसभर पाहत राहिलो तरी मनाचे समाधान होत नाही. थोडय़ा उंच जागेवरून कांचनगंगाच्या आसपास असणारी काब्रू, सिमवो, कुंभकर्ण, पांडीम अशी काही शिखरेही नजरेस पडतात. पेलिंगपासून गंगटोकला जाताना वाटेत मार्तम हे छोटेसे गाव लागते. युनेस्कोने हे गाव दत्तक घेतले आहे. डोंगराळ भागामुळे उंच-सखल जमिनीवर टेरेस फार्मिंगची प्रथा आहे. गाइड आपल्याला संध्याकाळच्या वेळेस गावात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जातात. येथे काही ठरावीक घरांमध्य े हेरिटेज म्हणून अजूनही पूर्वीचीच मांडणी असल्याचे दिसून येते. बटाटा, विविध प्रकारचे बांबू आणि आल्याच्या शेतीतून फिरताना बऱ्याच औषधी वनस्पतींचीही लागवड केलेली दिसते. गाइड आपल्याला त्याबद्दल माहिती करून देतात. वेलचीच्या लागवडीसाठी सिक्कीम फार प्रसिद्ध आहे. त्या निसर्गरम्य वातावरणात सकाळी पक्ष्यांच्या मधुर गुंजारवाने सुरू झालेला दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी पार भरून गेलेला असतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तेथे विजेची सोय नव्हती. परंतु त्या रम्य आसमंतात आमचे चार टीव्ही, वर्तमानपत्र याशिवाय कसे गेले ते कळलेच नाही. पुढे उत्तरेकडे चुंगथान येथे रस्त्याचे दोन फाटे फुटतात. एक लाचेन येथे तर दुसरा लाचुंगला जातो. लाचेन येथूनच तिस्ता नदीचा उगम होतो.

लाचेन येथे गुरू दोंगमार हा पवित्र लेक आहे. या लेकचे वैशिष्टय असे की, अगदी कडक थंडीतही लेकचा विशिष्ट भाग मुळीच गोठत नाही. १२००० फूट उंचीवर हिमशिखरांनी वेढलेले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रंगीबेरंगी ऱ्होडोडेंड्रान व पांढरे मॅग्नोलिया (कवठीचाफा) यामुळे लातूंग हे नेहमीच नटलेले असते. तेथूनच पुढे आपण युमथान, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे जातो. सिक्कीमच्या भौगोलिक स्थानामुळे आपल्याला उंचावर पांडा, जंगली मांजर, याक असे प्राणी, तर रॉबीन, फ्लाय कॅचर, सँडपायपर असे पक्षी दिसतात. झाडांच्या बाबत पाइन, जुनीपर, फर, सायप्रस वगैरे झाडे आढळतात. ऱ्होडेडेंड्रान हा ‘स्टेट ट्री’ मानला जातो. खास त्या भागातील जंगलात मिळणारे विशिष्ट प्रकारचे कोवळे फर्नचे कोंब ‘फिड्ल हेडेड फर्न’ यांची याकचे चीज घालून केलेली भाजी अतिशय चवदार असते. कॉटन ट्री, वेलची, विविध बांबू, बटाटे आलं यांच्या लागवडीबरोबर रंगीबेरंगी ऑर्किस्, गुलाब, झेंडू, हिरव्यागार भाज्यांचे मळे इथे पाहायला मिळतात. येथील तपमान शक्यतो २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली उतरत नसल्याने हवा नेहमीच छान, त्यामुळे फळफळावळ, फुलांना तोटा नाही. दरवर्षी गंगटोक येथे ऑर्किसच्या फुलांचे प्रदर्शन भरते. परदेशाप्रमाणे आपल्याकडेही एवढय़ा प्रकाराची ऑर्किस् असतात याची कल्पना नव्हती. फळा-फुलांप्रमाणेच इथले लोक तब्येतीने चांगले दिसतात. तिस्ता नदी म्हणजे सिक्कीमची लाईफ लाईन मानली जाते. डोंगराळ भागातल्या लहान लहान उपनद्या मिळून ‘रंगीत’ नदी बनते व तिस्तामध्ये सामावते. सिक्कीममध्ये दसरा, दिवाळीसारखे हिंदू सण, तर तिबेटियन लोसार, लुसांग शिवाय फेब्रुवारीत येणारे नवीन वर्ष जोमाने साजरे केले जाते. त्यादिवशी तिबेटी लोक रंगीत पोषाखात ‘ताशी डिलेक’ अशी आरोळी देत याक डान्स करतात. कांचनगंगाचीही पूजा केली जाते. जसे वेगवेगळे सण तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थासाठीदेखील सिक्कीम प्रसिद्ध आहे. तेथे मोमो, थेंटुक, ठुपकाशिवाय विविध लोणची, मासे यांची चव नक्कीच घेतली पाहिजे. रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग अशा वेगवेगळ्या स्पोर्ट्सचा अनुभव घेऊ शकतो. पण सिक्कीमला भेट दिल्याविना हे सर्व कळणार कसे?