नेपाळी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


नेपाळी
नेपाली
भाषिक देश नेपाळ, भारत, भूतान, तिबेट, म्यानमार
भाषिक प्रदेश दक्षिण आशिया
लिपी देवनागरी लिपी
भाषिक लोकसंख्या १,७०,००,०००
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
६६
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय


* इंडो-इराणी
 * इंडो-आर्य
  * उत्तर इंडो-आर्य
   * पूर्व पहाडी
    * नेपाळी

अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर नेपाळ ध्वज नेपाळ
सिक्किम (भारत)
पश्चिम बंगाल (भारत)
भाषा संकेत
ISO 639-1 ne
ISO 639-2 nep
ISO 639-3 nep

नेपाळी भाषा (नेपाळी: नेपाली भाषा; अन्य नावे: खास्कुरा, गोरखाली) ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील इंडो-आर्य शाखेतील भाषा आहे. ती नेपाळाची अधिकृत भाषा असून, तेथे बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. नेपाळाबाहेर ती भूतान, भारतम्यानमार या जवळच्या देशांमध्येही काही प्रमाणात वापरली जाते. भारतातदेखील तिला अधिकृत भाषेचा घटनात्मक दर्जा आहे. पूर्वी सार्वभौम राष्ट्र असलेल्या व वर्तमानात भारतीय प्रजासत्ताकातील घटक राज्य असलेल्या सिक्किमात नेपाळीला अधिकृत भाषेचे स्थान आहे.

[संपादन] लिपी

सध्या नेपाळी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. ऐतिहासिक काळातील जुन्या नेपाळी दस्तऐवजांमध्ये ताकरी, भुजिमोल, रंजना या लिप्यादेखील वापरल्याचे आढळते.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी