हिमालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिमालय (IPA pronunciation: [hɪ'mɑlijə], [ˌhɪmə'leɪjə]) ही जगातील सर्वात उंचपर्वतरांग आहे व आशिया खंडात स्थित आहे. संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान (अलय). हिमालय पर्वतरांग भारतीय उपखंडाला मुख्य अशिया खंडापासून म्हणजे तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८००० मीटर पेक्षा असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ८८४८ मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के२कांचनगंगाचा नंबर लागतो. ही पर्वतरांग लांबीतही प्रचंड लांब असून एकूण लांबी २,४०० किमी पेक्षाही जास्त आहे. भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन,भूतान या देशांमधून जाते. या पर्वताची उंचीमुळे हा पर्वत एकूणच भारतीय उपखंडाचे हवामानावर नियंत्रण राखतो. हिमालयाच्याच प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पावसाची कृपा आहे तर त्याच्या उंचीमुळे उत्तरेकडील अतिथंड वारे रोखले जाउन भारतीय उपखंड सर्वकाळ उष्ण/उबदार रहाण्यास मदत होते. हिमालयात अनेक नद्या उगम पावतात ह्या नद्या भारत पाकिस्तान बांग्लादेश व चीनमधील जवळपास १५० कोटी हून अधिक लोकसंख्या म्हणजे ३०-३५ टक्के मानवतेच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. गंगा, ब्रम्हपुत्रा, सिंधू, या हिमालयातील महत्वाच्या नद्या आहेत. त्यामुळेच जगातील सर्वात म्हत्वाच्या पर्वत रांगांमध्ये हिमालयाचा समावेश होतो.


अनुक्रमणिका

[संपादन] भौगोलिक

[संपादन] जडणघडण

हिमालयाची जडणघडण

हिमालय पर्वत हा मुख्यत्वे गाळाने बनलेला पर्वत आहे व जगातील सर्वात तरुण पर्वत असल्याचे मानण्यात येते. याची उत्पत्ती साधारणपणे १ कोटी ते ७० लाख वर्षांदरम्यान झाली. भारतीय द्विपकल्प हा मूळतः गोंडवन हा महाखंडाचा भाग होता व साधारणपणे आजच्या दक्षिण अफ्रिकेनजीक स्थित होता. भारतीय द्विपकल्पाने व ऑस्ट्रेलियाच्या प्रस्तराने उत्तरेकडे वेगाने वाटचाल केली. भारतीय द्विपकल्पाचा वर्षाला १५ सेमी उत्तरेकडे हलत होता. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा वेग खूप प्रचंड आहे. द्विपकल्पयुरेशिया प्रस्तरामध्ये त्यावेळेस टेथिस नावाचा समुद्र अस्तित्वात होता. साधारणपणे १ कोटी वर्षांपूर्वी मुख्य अशियन खंडाशी धडक झाली व मधील टेथिस समुद्राचे अस्तित्व नष्ट झाले परंतु यामुळे मध्ये समुद्राने तयार झालेला गाळाचा भाग हलका असल्याने दबण्याऐवजी उंचावला गेला, जसजसे भारतीय उपखंड अजून आत येत गेले तसतसे हा भाग अजून उंचावला व हिमालयाची निर्मिती झाली. अजूनही भारतीय द्विपकल्पीय प्रस्तराची वाटचाल तिबेटच्या खालील भागातून उत्तरेकडे होत आहे, त्यामुळे हिमालय अजूनही उंचावत आहे. या भौगोलिय घटनेमुळे ब्रम्हदेशातील पर्वतरांगा तसेच अंदमान निकोबार हे द्विपसमूह देखील तयार झाले.

भारतीय द्विपकल्प व ऑस्ट्रेलियन प्रस्तर हे वार्षिक ६७ मीमी ह्या गतीने सरकत आहेत. पुढील १ कोटी वर्षात भारतीय द्विपकल्प अशिया खंडात अजून अंदाजे १५०० किमी इतके आत गेलेले असेल. यातील जवळपास २० मीमी अंतर हे हिमालयात समाविष्ट होउन जाते, ज्यामुळे हिमालयाची उंची अजूनही वाढत आहे. हिमालय साधारणपणे वार्षिक ५ मीमी इतक्या वेगाने उंच होत आहे. या जडण घडणी मुळे हिमालयाचा भाग हा भौगोलिक दृष्ट्या अतिशय नाजूक मानला जातो. दर वर्षाला भूकंपाचे अनेक झटके हिमालयीन क्षेत्रात बसत असतात.

[संपादन] हिमनद्या व नद्या

Glaciers near by K2 in Pakistan.

वर नमूद केल्याप्रमाणे हिमालय हे जगातील जवळपास १५० कोटी लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. हिमालयात साधारणपणे जवळपास १५,००० विविध हिमनद्या आहेत ज्यात १२,००० वर्ग किमी इतके पाणी समावले आहे. ७० किमी लांबीची सियाचीन हिमनदी ही अध्रुवीय प्रदेशातील दुसरी सर्वात मोठी हिमनदी आहे. उत्तरांचलमधील गंगोत्री, यमुनोत्री, पिंडारी, काफनी, नेपाळ मधील एव्हरेस्टच्या सानिध्यातील खूंबू ह्या काही प्रसिद्ध हिमनद्या आहेत.

हिमालयातील वरच्या भागातील नद्यांना हिम वितळून पाणी मिळत असल्याने या नद्या बारामाही वाहाणार्‍या नद्या आहेत. या भागातील उंची खूप असल्याने विषववृताजवळ असूनही या भागात कायम बर्फ असते. या सर्व नद्या मुख्यत्वे २ मोठ्या नद्यांना जाउन मिळतात.

This image shows the termini of the glaciers in the Bhutan-Himalaya. Glacial lakes have been forming rapidly on the surface of the debris-covered glaciers in this region during the last few decades.
  • पश्चिम वाहीनी नद्या या सर्व सप्त सिंधूच्या खोर्‍यात जाउन मिळतात. यातील सिंधू नदी सर्वात लांब असून ती तिबेटच्या पठारावरील कैलास पर्वतानजीक उगम पावते. उत्तरेकडे लढढाक च्या पर्वत रांगांमधून पाकव्याप्त काश्मीरमधून प्रवास करते. असे मानतात की सिंधू नदी फार पूर्वी मध्य अशियात जात होती. काराकोरम पर्वत अजून उंचावल्यावर सिंधु नदीचे पात्र अरबी समुद्राकडे वळाले. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या सर्व नद्या मिळून सप्त सिंधू खोरे बनवतात. या सर्व नद्या सिंधू नदीत मिळून अरबी समुद्रात मिळतात.
  • हिमालयातील बहुतांशी नद्या गंगा ब्रम्हपुत्रा खोर्‍याचा हिस्सा बनतात. गंगाब्रम्हपुत्रा ह्या यातील मुख्य नद्या आहेत. गंगा नदी उत्तराखंडमधील गोमुख येथे उगम पावते तर ब्रम्हपुत्रा ही सिंधू नदी प्रमाणेच कैलास पर्वताजवळ उगम पावते. तिबेटच्या पठारावर प्रवास करत ती अरुणाचल प्रदेशात भारतात प्रवेश करते. गंगा व ब्रम्हपुत्रा बांग्लादेशात एकत्र येतात व पद्मा नदी बनून बंगालच्या उपसागराला मिळतात. दोन्ही नद्यांचे खोरे प्रचंड असल्याने त्यांनी आणलेला गाळही प्रचंड असतो. त्यामुळे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश गंगा ब्रम्हपुत्रेच्या मुखापाशी तयार झाला आहे. यमुना, अलकनंदा, शरयू, कोसी, गंडकी या गंगा नदीच्या मुख्य उपनद्या आहेत.

[संपादन] वन्यजीवसृष्टी

[संपादन] धार्मिक महत्व

हिमालयाची उंची व भव्यता यामुळे प्राचीन कालापासून हिमालय भारतीयांना आकर्षित करत आला आहे. हिमालयाची अनेक वर्णने वेदांमध्ये आढळतात व त्याच्या स्तुतीपर अनेक रचने लिहीली आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात हिमालयाला देवासमान स्थान् आहे. महाभारतातील अख्यायिकेप्रमाणे स्वर्गाला मार्ग हिमालयातून जातो म्हणून पांडवांनी शेवटची यात्रा हिमालयात केली. देवांचे वसती स्थान म्हणून हिमालयाला मानण्यात येते. कैलास पर्वतावर शिव पार्वतीचे निवास करतात असा समज आहे. मानस सरोवर व ॐ पर्वत हिंदूसाठी अतिशय पवित्र स्थळे आहेत. हिमालयातील उगम पावलेल्या नद्यांपाशी प्राचीन भारतीय संस्कृती विकसित झाली त्यामुळे देखील हिमालयाला आदरयुक्त स्थान आहे. अमरनाथ, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ तसेच नेपाळ मधील अनेक स्थळे हिंदूंसाठी अतिशय पवित्र आहेत. दरवर्षी हजारो लाखोच्या संख्येने भाविक याठिकाणांना भेट देण्यास जातात.

बौद्ध धर्मियांमध्येही हिमालयाला अनोखे महत्व आहे. हिंदू धर्मियांप्रमाणेच तेही कैलास पर्वताला पवित्र मानतात.

[संपादन] गिर्यारोहण

[संपादन] बाह्यदुवे

[संपादन] हे ही पहा

[संपादन] संदर्भ व टिपा