देवनागरी
देवनागरी लिपी बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. संस्कृत, पाली, हिंदी , मराठी, कोकणी, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमानी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात.
अनुक्रमणिका |
देवनागरी ओळख [संपादन]
मराठी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, काश्मिरी, सिंधी, नेपाळी आणि रोमानीसारख्या काही भारतीय मुळांच्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा (रोमन, अरबी, चिनी इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे.
- जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो.
यात एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.
भारत तसेच आशिया मधील अनेक लिप्यांचे( उर्दू सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.
देवनागरी : नांवाचा अर्थ [संपादन]
भाषा आणि लिपी [संपादन]
तत्त्वतः कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणाऱ्या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते.
- मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द देवनागरी लिपीत `संगणक' असा तर रोमन लिपीत 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरीत्या वाचलाही जाऊ शकतो.
देवनागरी स्वर [संपादन]
अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡ ए ऐ ओ औ अं अः
मराठीतील विशेष स्वर : ॲ | ऑ
हिंदीतील विशेष स्वर : ऍ | ऑ
देवनागरीतील काना-मात्रा चिन्हे [संपादन]
ा ि ी ु ू ृ ॄ ॢ ॣ े ै ो ौ ं ः ॅ ॉ ँ ्
देवनागरी व्यंजने [संपादन]
- क ख ग घ ङ
- च छ ज झ ञ
- ट ठ ड ढ ण
- त थ द ध न
- प फ ब भ म
- य र ल व श
- स ष ह ळ क्ष ज्ञ
देवनागरी अंक [संपादन]
० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९
देवनागरी युनिकोड [संपादन]
- मूळ लेख : युनिकोड
| देवनागरी युनिकोड | 0 | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | A | B | C | D | E | F |
| U+090x | ऀ | ँ | ं | ः | ऄ | अ | आ | इ | ई | उ | ऊ | ऋ | ऌ | ऍ | ऎ | ए |
| U+091x | ऐ | ऑ | ऒ | ओ | औ | क | ख | ग | घ | ङ | ङ | च | छ | ज | झ | ञ |
| U+092x | ट | ठ | ड | ढ | ण | त | थ | द | न | ऩ | प | फ | ब | भ | म | य |
| U+093x | र | ऱ | ल | ळ | ऴ | व | श | ष | स | ह | ऻ | ऽ | ा | ि | ी | ु |
| U+094x | ू | ृ | ॄ | ॅ | ॆ | े | ै | ॉ | ॊ | ो | ौ | ् | ॎ | ॏ | ॐ | ॒ |
| U+095x | ॓ | ॔ | ॕ | ॖ | ॗ | क़ | ॖ | ॗ | क़ | ख़ | ग़ | ज़ | ड़ | ढ़ | फ़ | य़ |
| U+096x | ॠ | ॡ | ॢ | ॣ | । | ॥ | ० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
| U+097x | ॰ | ॱ | ॲ | ॳ | ॴ | ॵ | ॶ | ॷ | ॸ | ॹ | ॺ | ॻ | ॼ | ॽ | ॾ | ॿ |
संगणक-मराठी संबंधाविषयी [संपादन]
- संगणकाचा वापर इंग्रजी भाषेतून किंवा अधिक अचूक सांगावयाचे झाल्यास रोमन लिपीतून सुरू झाला आणि नंतर जगभर पसरला. आजमितीला तरी जगाची ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा म्हणून इंग्रजी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचा शोध आणि प्रगती इंग्रजी भाषेतून झाली. यात संगणकाचा देखील समावेश होतो. संगणकाशी निगडित प्रगती झपाट्याने होण्यामागचे एक महत्त्वाचे पण अप्रत्यक्ष कारण रोमन लिपी हे देखील आहे. ही बाब संगणकअभियंत्याना सहज समजेल. यासंबधीची अधिक माहिती संगणक टंक हा लेख देईल. या बाबीचा अप्रत्यक्ष फायदा जर्मनी, स्पेन, रशिया वगैरे देशांना (किंवा त्यांच्या भाषांना वा लिप्यांना) झाला.
- रोमन लिपी ही वर्णलिपी आहे. त्यामध्ये शब्द लिहिताना एकासमोर एक वर्ण लिहितात. वेलांटी, काना, मात्रा, उकार, अनुस्वार, जोडशब्द वगैरे गुंतागुंतीच्या रचना तेथे अपवादानेच आढळतात. मूळाक्षरांना लिपीचिन्हे जॊडून असलेल्या लिपीवर्गामध्ये देवनागरी, उर्दू, अरबी, मोडी,ब्राह्मी, इत्यादी तर नसलेल्या लिपीवर्गामध्ये इंग्लिश भाषा,लॅटिन, जपानी,चिनी,रशियन,जर्मन, इ. लिपी येतात. यातील प्रत्येक गोष्टीची व्यापक माहिती भाषाशास्त्र व लिपीशास्त्र या लेखांमध्ये मिळू शकेल. 'Complex Text Layout' किंवा 'क्लिष्ट पाठ्य मांडणी' या तांत्रिक संज्ञेप्रमाणे चिनी लिपिकुटुंबातील (ज्यामध्ये चिनी, जपानी, कोरिअन येतात), देवनागरी लिपीकुटुंबातील (देवनागरी, गुरुमुखी, गुजराती, बंगाली) आणि द्रवीड कुटुंबातील (जसे तेलुगु, कन्नड, तामिळ, मल्याळम) लिपी येतात. इंग्रजी लिपीसाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय मानक संस्थेने पुढाकार घेऊन American Standards Code for Information Interchange (ASCII) या संकेतांकांची योजना केली ज्यामध्ये इंग्रजी लिपीतील पहिली व दुसरी बाराखडी, अंक आणि काही नेहमीच्या वापरातील चिन्हे (उदा. @, #, $,&, वगैरे) येतात.
- युनिकोडचा वापर करून संगणकावर मराठी वापरता येते.
- संगणक आणि मराठी या लेखात संगणकावरील मराठीचा इतिहास तसेच भविष्य याची माहिती मिळू शकते.
- महाजाल आणि मराठी या लेखात महाजालावरील मराठीचा इतिहास तसेच भविष्य याची माहिती मिळू शकते.
देवनागरी लिपी वैशिष्ट्ये आणि इतिहास [संपादन]
- डावीकडून उजवीकडे
- बहुतेक ध्वनींकरिता एक स्वतंत्र वर्ण/ अक्षरचिन्ह /जोडाक्षर
- ध्वनी
| ब्राह्मी लिपीपासून तयार झालेल्या लिप्या |
|---|
|
उत्तर ब्राह्मी पासून दक्षिणी ब्राह्मी |
देवनागरी सॉफ्टवेर [संपादन]
- बॉस ऑपरेटिंग सिस्टिम आणि आग ऑपरेटिंग सिस्टिम या भारतीय संचालन प्रणाली मराठी भाषेतून आहेत.
- 'थंडरबर्ड' हे ईमेल सॉफ्टवेर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेर मोझीला.ऑर्ग ह्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.
- वॉशिंग्टन विद्यापीठकडून देवनागरीसाठी कळपाटाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपींग) सॉफ्टवेर उपलब्ध आहे. ह्या जुळणीचा उपयोग करून वर्डपॅड किंवा तत्सम युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणाऱ्या सॉफ्टवेरमध्ये रचलेला मजकूर आपण विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करु शकता.
- आपल्याकडे अक्षरमाला सॉफ्टवेर अक्षरमाला उपलब्ध असेल तर आपण त्यातच विकिपीडिआची पाने बदलू शकता, नाहीतर आय् ट्रान्स् ह्या सॉफ्टवेरचाही उपयोग करता येऊ शकतो.
- याशिवाय युडिट एडिटरही वापरता येऊ शकतो.
- अन्यथा आपण बरहा येथे उपलब्ध असलेल्या देवनागरी सॉफ्टवेरचाही वापर करू शकता.
- देवनागरी लिपीत लिहिण्यासाठी तख़्ती या सॉफ्टवेरचाही उपयोग करता येतो.
हेसुद्धा पाहा [संपादन]
- देवनागरी,देवनागरी लिपी,मराठी
- देवनागरीवरील लेख (इंग्रजी आवृत्ती)
बाह्य दुवे [संपादन]
- नितिन सावंत यांनी बनवलेले मराठी की-बोर्ड(कळपट) सॉफ्टवेर
-
अक्षरमाला(विनामूल्य उतरवून/डाउनलोड करा)