इंडियानापोलिस (इंग्रजी: Indianapolis) ही अमेरिकेच्या इंडियाना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इंडियाना राज्याच्या मध्यभागात एका सपाट पठारावरील ९६३.५ वर्ग किमी जागेवर वसले आहे. २०१० साली ८.३९ लाख शहरी व १७.५६ लाख महानगरी लोकसंख्या असलेले इंडियानापोलिस मिड-वेस्ट भौगोलिक प्रदेशामधील दुसर्या क्रमांकाचे (शिकागोखालोखाल) तर अमेरिकेमधील बाराव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तसेच इंडियानापोलिस महानगर अमेरिकेमधील सर्वात वेगाने वाढणार्या भागंपैकी एक आहे.
इंडियानापोलिसची स्थापना इ.स. १८२१मध्ये नवीन इंडियाना राज्याची राजधानी ह्या हेतूने करण्यात आली. राज्याच्या मधोमध असल्यामुळे हा भाग राजधानीसाठी निवडला गेला. स्थापनेनंतर लवकरच अत्यंत मोक्याच्या स्थानावर असल्यामुळे ह्या शहराचे एक वाहतूक केंद्र असे महत्त्व वाढू लागले. आजच्या घडीला इंडियानापोलिस मिडवेस्ट भागामधील एक मोठे औद्योगिक शहर असून निवासाकरिता अमेरिकेमधील सर्वोत्तम स्थानांपैकी एक मानले गेले आहे.
[संपादन] अर्थव्यवस्था
[संपादन] जनसांख्यिकी
द अमॅच्युअर स्पोर्ट्स कॅपिटल ऑफ द वर्ल्ड व रेसिंग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड ह्या नावांनी प्रसिद्ध असलेले इंडियानापोलिस अमेरिकेमधील एक मोठे क्रीडा केंद्र आहे. नॅशनल कॉलेजियेट अॅथलेटिक असोसिएशन (NCAA) ह्या अमेरिकेमधील कॉलेजीय खेळांचे आयोजन करणार्या संस्थेचे मुख्यालय येथेच आहे. तसेच हे शहर येथील वाहन शर्यतींसाठी प्रसिद्ध आहे. इंडियानापोलिस मोटर स्पीडवे येथे १९११ सालापासून इंडियानापोलिस ५०० ही मोटार शर्यत खेळवली गेली आहे. फॉर्म्युला वन खेळामधील युनायटेड स्टेट्स ग्रांप्री ह्याच ट्रॅकवर २००० ते २००७ दरम्यान भरवली गेली. ह्या व्यतिरिक्त येथे अनेक लोकप्रिय वाहन शर्यती होतात.
खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ इंडियानापोलिसमध्ये स्थित आहेत. २०१२ सालचा सुपर बोल सामना येथील लुकास ऑईल स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
[संपादन] बाह्य दुवे