सॉल्ट लेक सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॉल्ट लेक सिटी हे अमेरिकेच्या युटा राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहरास अनेकदा सॉल्ट लेक किंवा एस.एल.सी. या नावांनेही ओळखण्यात येते. याची स्थापना १८४७मध्ये ग्रेट सॉल्ट लेक सिटी या नावाने झाली. ब्रिगहॅम यंगच्या नेतृत्त्वाखाली मॉर्मोन धर्मीय व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली.

इ.स. २००६च्या अंदाजानुसार सॉल्ट लेक सिटीची वस्ती १,७८,८५८ होती.

मोर्मोन चर्चचे मुख्यालय या शहरात आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.