र्होड आयलंड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| र्होड आयलंड Rhode Island |
|||||||||||
|
|||||||||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
| राजधानी | प्रॉव्हिडन्स | ||||||||||
| मोठे शहर | प्रॉव्हिडन्स | ||||||||||
| क्षेत्रफळ | अमेरिकेत ५०वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ३,१४० किमी² | ||||||||||
| - रुंदी | ७१० किमी | ||||||||||
| - लांबी | १९५ किमी | ||||||||||
| - % पाणी | १३.९ | ||||||||||
| लोकसंख्या | अमेरिकेत ४३वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | १०,५३,२०९ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
| - लोकसंख्या घनता | ३९०.८/किमी² (अमेरिकेत २वा क्रमांक) | ||||||||||
| - सरासरी उत्पन्न | $५४,६१९ | ||||||||||
| संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २९ मे १७९० (१३वा क्रमांक) | ||||||||||
| संक्षेप | US-RI | ||||||||||
| संकेतस्थळ | www.ri.gov | ||||||||||
र्होड आयलंड (इंग्लिश: Rhode Island;
उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले र्होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसर्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.
र्होड आयलंडच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला कनेक्टिकट, उत्तरेला व पूर्वेला मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. राज्याच्या नैऋत्येला खाडीपलिकडे न्यू यॉर्क शहराचे लाँग आयलंड हे बेट आहे. प्रॉव्हिडन्स ही र्होड आयलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. र्होड आयलंडच्या एकुण क्षेत्रफळाच्या १४ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.
मोठी शहरे[संपादन]
- प्रॉव्हिडन्स - १,७८,०४२
- वॉरविक - ८२,६७२
- क्रॅन्स्टन - ८०,३८७
गॅलरी[संपादन]
-
१७६४ सालापासून कार्यरत असलेले ब्राउन विद्यापीठ हे न्यू इंग्लंडमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे.
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|
||||||||||||||