फिलाडेल्फिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिलाडेल्फिया
Philadelphia

Philadelhpia Montage by Jleon 0310.jpg
फिलाडेल्फिया is located in पेन्सिल्व्हेनिया
फिलाडेल्फिया
फिलाडेल्फियाचे पेन्सिल्व्हेनियामधील स्थान
फिलाडेल्फिया is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
फिलाडेल्फिया
फिलाडेल्फियाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°57′12″N 75°10′12″W / 39.95333, -75.17

देश Flag of the United States अमेरिका
राज्य पेन्सिल्व्हेनिया
स्थापना वर्ष ऑक्टोबर २५, इ.स. १७०१
महापौर मायकेल नटर
क्षेत्रफळ ३६९.३ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १,११७ फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १५,२६,००६
  - घनता ४,४०५.४ प्रति वर्ग किमी
  - महानगर ५९,५५,३४३
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
phila.gov


फिलाडेल्फिया हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील सर्वात मोठे शहर असून लोकसंख्येनुसार अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. फिलाडेल्फिया पेनसिल्व्हेनिया राज्याच्या आग्नेय कोपर्‍यात न्यू जर्सी राज्याच्या सीमेवर डेलावेर नदीच्या काठावर वसले असून ते न्यू यॉर्क शहराच्या नैऋत्येला ९० मैल अंतरावर तर वॉशिंग्टन डी.सी.च्या ईशान्येला १४० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली फिलाडेल्फियाची लोकसंख्या १५.२६ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ६० लाख होती.

ऑक्टोबर २७, इ.स. १६८२ रोजी विल्यम पेन ह्या ब्रिटिश व्यापार्‍याने स्थापन केलेल्या फिलाडेल्फियाला अमेरिकेच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. जुलै ४, इ.स. १७७६ रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा येथेच लिहिला गेला. वॉशिंग्टन डी.सी. पुर्वी अमेरिकेची राजधानी फिलाडेल्फिया येथे होती.


अनुक्रमणिका

[संपादन] खेळ

खालील चार प्रमुख व्यावसायिक संघ फिलाडेल्फिया महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले फिलाडेल्फिया हे १२ पैकी एक शहर आहे.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
फिलाडेल्फिया ईगल्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग लिंकन फायनान्शियल फील्ड १९३३
फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन वेल्स फार्गो सेंटर १९६३
फिलाडेल्फिया फ्लायर्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग वेल्स फार्गो सेंटर १९६७
फिलाडेल्फिया फिलीज बेसबॉल मेजर लीग बेसबॉल सिटिझन्ज बँक पार्क १८८३

[संपादन] शहर रचना

फिलाडेल्फियाचे चित्र

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये