कनेक्टिकट
| कनेक्टिकट Connecticut |
|||||||||||
|
|||||||||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
| राजधानी | हार्टफर्ड | ||||||||||
| मोठे शहर | ब्रिजपोर्ट | ||||||||||
| क्षेत्रफळ | अमेरिकेत ४८वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | १४,३५७ किमी² | ||||||||||
| - रुंदी | ११३ किमी | ||||||||||
| - लांबी | १७७ किमी | ||||||||||
| - % पाणी | १२.६ | ||||||||||
| लोकसंख्या | अमेरिकेत २९वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ३५,७४,०९७ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
| - लोकसंख्या घनता | २७१/किमी² (अमेरिकेत ४वा क्रमांक) | ||||||||||
| - सरासरी उत्पन्न | $६८,५९५ | ||||||||||
| संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | ९ जानेवारी १७८८ (५वा क्रमांक) | ||||||||||
| संक्षेप | US-CT | ||||||||||
| संकेतस्थळ | http://www.ct.gov | ||||||||||
कनेक्टिकट (इंग्रजी: Connecticut;
उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने तिसर्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले कनेक्टिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.
कनेक्टिकटच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला न्यू यॉर्क, उत्तरेला मॅसेच्युसेट्स व पूर्वेला र्होड आयलंड ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलिकडे न्यू यॉर्क शहराचे लाँग आयलंड हे बेट आहे. हार्टफर्ड ही कनेक्टिकटची राजधानी तर ब्रिजपोर्ट हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग न्यू यॉर्क महानगरामध्ये गणला जातो.
कनेक्टिकट हे अमेरिकेमधील एक प्रगत व श्रीमंत राज्य आहे. दरडोई उत्पन्न, कौटुंबिक उत्पन्न व मानवी विकास निर्देशांक ह्या बाबतीत कनेक्टिकटचा देशात प्रथम क्रमांक लागतो. परंतु येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीत फार मोठी तफावत आहे. बँकिंग व इतर आर्थिक सेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे.
न्यू इंग्लंडमधील इतर राज्यांप्रमाणे येथे युरोपियन वंशाचे अनेक लोक स्थायिक झाले आहेत.
[संपादन] मोठी शहरे
- ब्रिजपोर्ट - १,४४,२२९
- न्यू हेवन - १,२९,७७९
- हार्टफर्ड - १,२४,५१२
- स्टॅमफर्ड - १,२२,६४३
[संपादन] गॅलरी
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|
||||||||||||||