दीपिका रसंगिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दीपिका रसंगिका (१३ डिसेंबर, १९८३:कोलंबो, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकेच्या महिला क्रिकेट संघाकडून २००८ ते २०१४ दरम्यान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. तिने २०२२ मध्ये बहरैनचा ध्वज बहरैनतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. ती डाव्या हाताने फलंदाजी करते.

२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक स्पर्धेत सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात दीपिकाने नाबाद १६१ धावा करून इतिहास रचला. महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा केल्या तसेच महिला ट्वेंटी२० सामन्यात १५० पेक्षा धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेट खेळाडू ठरली.