Jump to content

२०१४ लोकसभा निवडणुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१४ लोकसभा निवडणूक या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१९ भारतीय सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक
भारत

लोकसभेच्या ५४५ पैकी ५४३ जागा
बहुमतासाठी २७२ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
नेता नरेंद्र मोदी राहुल गांधी
पक्ष भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील जागा ११६ २०६
जागांवर विजय २८२ ४४
बदल १६६ १६२

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान

मनमोहन सिंग

निर्वाचित पंतप्रधान

नरेंद्र मोदी

before_party       = भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी map =

२०१४ लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका आहेत. ७ एप्रिल ते १२ मे, २०१४ दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून सोळाव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. १६ मे २०१४ रोजी मतमोजणी करण्यात आली.

भारतीय निवडणूक आयोगानुसार २०१४ साली भारतामधील पात्र मतदारांची संख्या जगामध्ये सर्वाधिक - ८१.४५ कोटी इतकी आहे. २०१४ सालच्या निवडणुका भारताच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक व सर्वाधिक काळ चालणाऱ्या होत्या. ह्या निवडणुकांवर अंदाजे भारतीय रूपया ३,५०० कोटी इतका सरकारी खर्च तर सर्व पक्ष व त्यांचे उमेदवार ह्यांच्या प्रचारासाठी भारतीय रूपया ३०,५०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

वेळापत्रक

[संपादन]
भारतामधील २०१४ लोकसभा निवडणुकांच्या फेऱ्या व तारखा
राज्य/प्रदेश एकूण मतदारसंघ तारीख व मतदारसंघ[]
फेरी १
7 एप्रिल
फेरी २
9 एप्रिल
फेरी ३
10 एप्रिल
फेरी ४
12 एप्रिल
फेरी ५
17 एप्रिल
फेरी ६
24 एप्रिल
फेरी ७
30 एप्रिल
फेरी ८
7 मे
फेरी ९
12 मे
आंध्र प्रदेश 42 - - - - - - 17 25 -
अरुणाचल प्रदेश 2 - 2 - - - - - - -
आसाम 14 5 - - 3 - 6 - - -
बिहार 40 - - 6 - 7 7 7 7 6
छत्तीसगड 11 - - 1 - 3 7 - - -
गोवा 2 - - - 2 - - - - -
गुजरात 26 - - - - - - 26 - -
हरयाणा 10 - - 10 - - - - - -
हिमाचल प्रदेश 4 - - - - - - - 4 -
जम्मू आणि काश्मीर 6 - - 1 - 1 1 1 2 -
झारखंड 14 - - 4 - 6 4 - - -
कर्नाटक 28 - - - - 28 - - - -
केरळ 20 - - 20 - - - - - -
मध्य प्रदेश 29 - - 9 - 10 10 - - -
महाराष्ट्र 48 (यादी) - - 10 - 19 19 - - -
मणिपूर 2 - 1 - - 1 - - - -
मेघालय 2 - 2 - - - - - - -
मिझोरम 1 - 1 - - - - - - -
नागालँड 1 - 1 - - - - - - -
ओडिशा 21 - - 10 - 11 - - - -
पंजाब 13 - - - - - - 13 - -
राजस्थान 25 - - - - 20 5 - - -
सिक्कीम 1 - - - 1 - - - - -
तामिळ नाडू 39 - - - - - 39 - - -
त्रिपुरा 2 1 - - 1 - - - - -
उत्तर प्रदेश 80 - - 10 - 11 12 14 15 18
उत्तराखंड 5 - - - - - - - 5 -
पश्चिम बंगाल 42 - - - - 4 6 9 6 17
अंदमान आणि निकोबार 1 - - 1 - - - - - -
चंदीगड 1 - - 1 - - - - - -
दादरा आणि नगर-हवेली 1 - - - - - - 1 - -
दमण आणि दीव 1 - - - - - - 1 - -
लक्षद्वीप 1 - - 1 - - - - - -
दिल्ली 7 - - 7 - - - - - -
पुडुचेरी 1 - - - - - 1 - - -
एकूण जागा 543 6 7 91 7 121 117 89 64 41

पक्ष व आघाड्या

[संपादन]

या निवडणुकीत तीन मुख्य आघाड्या व इतर पक्ष सामील आहेत.

यू.पी.ए.

[संपादन]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुख्य घटक असलेली ही आघाडी १५व्या लोकसभेतील सत्ताधारी पक्ष आहे.

एन.डी.ए. (रा.लो.आ.)

[संपादन]

भारतीय जनता पक्ष मुख्य घटक असलेली ही आघाडी १५व्या लोकसभेतील मुख्य विरोधी पक्ष आहे. यातील इतर पक्ष व ते लढवीत असलेल्या जागा --

तिसरी आघाडी

[संपादन]

चौदा छोटे व प्रादेशिक पक्ष असलेली ही आघाडी तुरळक जागांवरून या निवडणुका लढवीत आहे.

इतर पक्ष

[संपादन]

निकाल

[संपादन]

सोळा मे रोजी मतमोजणी झाल्यावर भाजप आणि मित्रपक्षांना ३३६ जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना ६० जागा तर इतर पक्षांना १४७ जागा मिळाल्या. इतिहासात प्रथमच रालोआच्या रूपात देशात पूर्ण बहुमताने निवडून येणारे गैरकॉग्रेस सरकार स्थापना झाले.तर जयललिता यांच्या अद्रमुकला तिसरे स्थान मिळाले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "General Elections - 2014 : Schedule of Elections" (PDF). 5 March 2014. 5 March 2014 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]