Jump to content

अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)
अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस
पक्षाध्यक्ष एन. रंगास्वामी
सचिव एन. रंगास्वामी
स्थापना ७ फेब्रुवारी २०११
मुख्यालय पुडुचेरी
युती राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभेमधील जागा
१ / ५४३
राज्यसभेमधील जागा
० / २४५
राजकीय तत्त्वे सामाजिक लोकशाही
पाण्याचा जग हे एन.आर. काँग्रेसचे निवडणुक चिन्ह आहे

अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस (संक्षेप: एआयएनआरसी; तमिळ: அகில இந்திய நமது ராஜ்ஜியம் காங்கிரஸ்) हा भारत देशामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. दक्षिण भारताच्या तमिळनाडूपुडुचेरी राज्यांमध्ये प्रबळ असलेल्या व द्राविडी पक्षांच्या विचारधारेवर आधारित असलेल्या एन.आर. काँग्रेसची स्थापना पुडुचेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी ह्यांनी २०११ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडून केली.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये एन.आर. काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभाग घेतला व पुडुचेरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. २०१६ पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत मात्र एन.आर. काँग्रेसला सत्ता राखण्यात अपयश आले.

बाह्य दुवे

[संपादन]