सदस्य चर्चा:ज/जुनी चर्चा २

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) [संपादन]

चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) [संपादन]

२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1) १७ जानेवारी २०११ पर्यंत
चर्चा २ (Archive 1) ,
चर्चा ३ (Archive 1) ,



   स्वागत ज/जुनी चर्चा २, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन ज/जुनी चर्चा २, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१३४ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प


J क्षमा असावी,मी आपल्या चर्चा पानावर आपल्या पुर्वपरवानगी शिवाय ढवळा-ढवळ केली. आपल्या चर्चा पानावरील चर्चा आपल्या सुविधेकरिता सदस्य चर्चा:J/जुनी चर्चा १ येथे हलवली आहे . माहितगार २०:३१, १७ जानेवारी २०११ (UTC)

प्रणाम[संपादन]

नमस्कार जे,आपण मराठी भाषादिनानिमित्त संपादने करून उत्साहाने सहभाग नोंदवलात,आपले केवळ धन्यवाद व्यक्त करून आपण येथे घेत आलेल्या मेहनतीन आम्ही आणि भावी पिढ्या उतराई होऊ शकणार नाहीत,आपले आशिर्वाद आमच्या पाठीशी सदैव रहाणार याचा विश्वास आहे, आपणास सादर प्रणाम, आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा.माहितगार १९:२४, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

दुरुस्त्या[संपादन]

J , तुम्ही केलेल्या प्र. के. घाणेकर या लेखातील दुरुस्त्या (?) पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मला काही दुरुस्त्या योग्य वाटत नाहीत. तरी त्या का केल्या याचे समर्थन करावे ही विनंती -

१. "किल्ले पाहू या" - असे कुठलेही पुस्तक अस्तित्वात नाही. "किल्ले पाहूया" हेच पुस्तकाचे नाव आहे आणि मी ते वाचले आहे. लेखकाने बारसे केलेल्या नावाचे आपण का परत बारसे करता? २. ते विभाग प्रमुख आणि "व्याख्याता" म्हणून काम करत आहेत. त्यांना "प्राध्यापक" तुम्ही का बनवले? ३. == आजवर मिळालेले मानसन्मान व पुरस्कार ==यातील "मानसन्मान" हा शब्द योग्य नाही कारण त्यांनी तसे कुठल्याही पुस्तकात म्हटलेले नाही. ( पण हे मी कदाचित मान्य करू शकतो) ४. 'प्रा.जीन्सीवाले' पेक्षा 'प्रा.जिन्सीवाले" हा शब्द योग्य आहे आणि तो पुस्तकात पण आहे.

मला आशा आहे की तुम्ही वरील बदल परत लेखामध्ये कराल म्हणजे मला अजून वेगळे चांगले काम करता येईल...... मंदार कुलकर्णी सदस्य:mvkulkarni23

ग्रामरचा गूगली[संपादन]

आदरणीय जे अभिव्यक्ती लेखात तिन्ही फळ्या चीत करत विकेट घेतलीत ,तुमच्या ग्रामरचा गूगली गरीब बिचार्‍या माहितगाराच्या डोक्यावरून बाऊन्सर सारखा गेला,माहितगार आऊट होण्या आधीच मैदान सोडून पळाला, पण मग आता त्या अभिव्यक्ती लेखाच्या पिचवर बॅटींग करण्यास लगेचतरी कुणी धजावेल असे नाही, त्यामुळे तुम्हीच फलंदाजीला यावे हि नम्र विनंती माहितगार २०:१०, २२ मार्च २०११ (UTC)

लेख मुळात चांगला आहे. काही किरकोळ दोष आहेत ते दुरुस्त करता येतील. -- J १६:५१, २३ मार्च २०११ (UTC)

पक्षी लेखातील छोटा बदल[संपादन]

नमस्कार, तुम्ही पक्षी विषयात योगदान दिलेत याबद्दल आनंद झाला. मला बरेचदा काम अर्धवट सोडून अन्यत्र जावे लागत असल्याने लेखात काही चुका राहून जाऊ शकतात. तुम्ही केलेले बदल, विशेषतः व्याकरणातील, आवडले. फक्त एक सांगावेसे वाटते की, पक्ष्यांबद्दल सांगतांना त्यांची लांबी (length) किती असे नसून एखादा पक्षी इतर पक्ष्यांच्या तुलनेत आकाराने केवढा आहे असे त्यांच्या आकाराबद्दल (size) बोलले जाते. यासाठी मी मराठीसह इतर काही भाषेतील पुस्तके पुनः पुन्हा तपासली आहेत (उदा. मारुती चितमपल्ली यांचा पक्षिकोश) आणि माझी खात्री झाल्यावरच मी याबद्दल लिहीत आहे. तुम्ही पक्षी लेखात आकार ऐवजी लांबी असे केलेले बदल पुन्हा पूर्वीसारखे कराल का? फारतर आकार इतके सें. मी. किंवा इंच असे करा. त्या शब्दाला प्रत्यय लावण्याची गरज नाही. gypsypkd (चर्चा) ०३:५९, २६ एप्रिल २०११ (UTC)


साइझ्=आकारमान[संपादन]

मराठी‍त साइझकरिता आकारमान हा शब्द आहे, आकार नव्हे. आकार म्हणजे इंग्रजीत शेप. पक्ष्याचा आकार म्हटले की चौकोनी, गोल, वर्तुळाकार आदी शब्द डोळ्यासमोर उभे राहतात. पक्ष्याचे आकारमान म्हणणे कसेसेच वाटते, म्हणून मी लांबी असा बदल केला. हे वाचूनही आपल्याला आकार म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी. मी परत लांबीचे आकार करीन.--J ०६:२०, २६ एप्रिल २०११ (UTC)

पक्षी[संपादन]

नमस्कार, तुमचे म्हणणे बरोबरच आहे. मी या विषयी आणखी काही ठिकाणी विचारणा केली. त्यावरून असे कळले की, पक्ष्यांचे आकार हे सामान्यपणे ज्ञात असलेल्या इतर पक्ष्यांशी तुलना करण्यासाठीच योग्य आहे. W.I.I. Dehradun येथील मित्र तसेच इतर मित्रांकडून असे कळले की, शास्त्रज्ञांनी लांबी मोजतांना पक्षी मृत होते. त्यांना आडवे ठेऊन (थोडे स्ट्रेच करून) त्यांची लांबी मोजण्यात आली, ती चोच ते पायाच्या बोटांपर्यंत धरण्यात येते. त्यामुळे लांबी हा शब्द प्रयोग बरोबर आहे. (पण पक्षी जिवंत असतांना जमिनीपासून डोक्यापर्यंत त्याची उंची मोजण्यात येते.) यात थोडा फरक पडतो. त्यामुळे आपण लेखात पक्ष्याची ज्ञात असलेल्या इतर सामान्य पक्ष्यांशी तुलना करावी (तेथे या पक्ष्याच्या आकार चिमणी / बुलबुल एवढा आहे) आणि कंसात त्याची लांबी लिहावी (लांबी की उंची असे न लिहिता). असे केल्याने सगळ्या लेखात सारखेपणा येईल आणि मोठ्या पक्ष्यांच्या बाबतीत (उदा. माळढोक, सारस वगैरे) त्यांची उंचीही लिहिता येईल. तुम्हाला काय वाटते? बाकी घाईने कोणतेच बदल न केल्याने बरे झाले. gypsypkd (चर्चा) १४:०४, २६ एप्रिल २०११ (UTC)

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर‎[संपादन]

कोणती माहितीशी जुळत नाही? जन्म इचलकरंजी जवळ चंदूर ही का? तसे असेल तर ' इचलकरंजी जवळ चंदूर ' हेच बरोबर आहे. -- . Shlok talk . १९:१९, ६ मे २०११ (UTC)-------


चंदूर इचलकरंजीजवळ की अमरावतीजवळ हा मुख्य फरक होता, तो प्रश्न तुम्ही सोडवलात. इतरही काही किरकोळ फरक दिसले आहेत, ते नीट तुलना करून शोधीन....J १९:३३, ६ मे २०११ (UTC)

रामदास भटकळ मध्ये बदल केला आहे. कृपया पहावा.

इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेसचा पत्ता कृपया येथे पहा.[१] संतोष दहिवळ १८:३०, ९ मे २०११ (UTC)

पुरातत्त्व[संपादन]

पुरातत्त्व, पुरातत्त्वीय हे बरोबर असेल तर पुरातत्त्वशास्त्र या पानाखाली दिसणारा वर्ग पुरातत्वशास्त्र बरोबर आहे का? संतोष दहिवळ २०:१९, १३ मे २०११ (UTC)

अर्थात नाही[संपादन]

संस्कृतमधून मराठीत आलेले सत्त्व, तत्त्व, महत्त्व, व्यक्तिमत्त्व, हे शब्द अनुक्रमे सत्‌, तत्‌, महत्‌‌, आणि व्यक्तिमत्‌ या शब्दांना त्व हा प्रत्यय लागून बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या लिखाणात ’त्व’ न येता त्त्व(त्‍त्व) येतो.

वक्तृत्व, नेतृत्व, पटुत्व, जडत्व, गुरुत्व, स्त्रीत्व, पुरुषत्व आदी शब्दांत ’त्व’ असतो, ’त्त्व’ नाही. याच कारणाने पाश्चात्त्य, पश्चात्ताप, वृत्त, वृत्ती, परावृत्त वगैरे शब्दांत आधीच्या भागांत ’त्‌’ असल्याने एकूण शब्दांत ’त्त’ येतो. पाश्चिमात्य, पौर्वात्य, या शब्दांत एकेरी ’त्य’ आहे, (त्‍त्‍य)त्त्य नाही.

अनावृत(न झाकलेले, जाहीर) मध्ये एक ’त’, आणि अनावृत्त(आवृत्ती न काढलेले, पुन्हा न घडलेले) मध्ये (त्‍त)त्त असतो.

साहजिकच पुरातत्त्वमध्ये दुहेरी त पाहिजे....J ०५:२०, १४ मे २०११ (UTC)

धन्यवाद![संपादन]

नियतकालिक‎ लेखात महत्त्वाची भर घातल्या बद्दल धन्यवाद! निनाद ०५:११, १७ मे २०११ (UTC)

साचा:लंबकोनी निर्देशक प्रणाली मधील दुरुस्त्या[संपादन]

आपण लंबचौकोनी निर्देशक प्रणाली साच्यात केलेले बदल पाहीले
इथे जोडलेला दुवा पाहा. http://www.marathibhasha.com/php/option.php?koshid=6&kosh=ganitshastra
तेथून पीडीएफ फाइल असून ती डाउनलोड करून पहावी.
आतापर्यंत
system = प्रणाली
Co-ordinate= निर्देशक
अशा लिहिण्याचा प्रघात आहे. शाळांमधून सुद्धा निर्देशक हा शब्द वापरला जातो. तसेच पद्धतीसाठी इंग्लिश्मध्ये method हा शब्द वापरला जातो system नव्हे.
त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये -ian हा उपसर्ग नामाचे विशेषनामात रुपांतर करायला वापरतात
Cartesian हा शब्द फ्रेंच गणिती देकार्त - (Des)Cartes च्या नावावरून तयार झाला आहे. आपल्याकडे -ian ह्या उपसर्गासाठी ईकारान्त प्रत्यय लावला जातो. अशा वेळी कार्टेशियन ऐवजी कार्टेशी असा शब्दप्रयोग करायला हवा. त्या पीडीएफ फाईलमध्ये तोच प्रयोग करण्यात आला आहे.
आपले काय मत?
अनिरुद्ध परांजपे १२:००, २० मे २०११ (UTC)


गणितशास्त्र परिभाषा कोश[संपादन]

कोश उघडून वाचला. त्याच्या प्रस्तावनेतच शुद्धलेखनाच्या डझनभर चुका आहेत. त्यांतल्या काही अशा :

  • तत(?) तर(?) * तज्ञ(x), तज्ज्ञ * तत्वज्ञान(x), तत्त्वज्ञान * प्रसिद्ध(x), प्रसिद्ध * महत्वाचे(x), महत्त्वाचे * मुद्रितांच्या टप्यावर(x), मुद्रणाच्या टप्प्यावर * स्वरुपात(x), स्वरूपात * अभ्यासु(x), अभ्यासू* रुढ(x), रूढ वगैरे. प्रत्यक्ष कोशात किती चुका असतील ते अजून बघितले नाही

'ian' हा उपसर्ग(prefix) नाही तो प्रत्यय(suffix) आहे. ’ian’ लावून नामाचे विशेषनाम बनत नाही. कार्टेशियनचा अर्थ - रेने द कार्टने सुचवलेले.. सामान्य नामापासून विशेषनाम बनवण्यासाठी लागणारा एखादा प्रत्यय असल्याचे स्मरणात नाही.

`ian' हा मूळ ‘ianus’ या लॅटिन प्रत्ययापासून फ़्रेन्चमार्गे इंग्रजीत आलेला प्रत्यय आहे. त्याचे अर्थ (१) चा असणे (२) चा रहिवासी (३) च्यामध्ये रस असणारा (४) च्यासारखा असणारा (५) चे काम करणारा वगैरे. उदा० रिपब्लिकन, इटालिअन, म्यूझिशिअन, गांधियन, लायब्रेरिअयन वगैरे. ‘ian'साठी मराठीत ई हा फारसी प्रत्यय लागेलच याची खात्री नाही. अमेरिका=ई=अमेरिकी, पण शिवसेना+ई=?, गांधी+ई=? ग्रंथालय+ई=? ....J १७:५३, २० मे २०११ (UTC)

>>तर, सध्या मराठीत प्राथमिकरीत्या संगणकावर टंकीत करताना शुद्धलेखनाच्या चूका होतात. पण आपण चूका काढण्यापेक्षा चांगले ते घेउन, चुकलेले शब्द विकसित करणे अधिक योग्य ठरेल??....
>>ई साधारणत: अकारान्त शब्दांना लागू पडताना दिसून येते. अनिरुद्ध परांजपे १८:३१, २० मे २०११ (UTC)

माझे मत[संपादन]

मी ज्या सुधारणा केल्या त्या विचारपूर्वक केल्या होत्या. आता याबाबत मतभेद असू शकतात. एका इंग्रजी शब्दासाठी एकाहून अधिक मराठी शब्द सापडू शकतील. निर्देशक म्हणजे Indicator (किंवा signal. हिंदीत दिग्दर्शक किंवा संचालक.)- दाखवणारे. जे ऑर्डिनेट्‌स जोडीने(Co) असतात, ते सहनिर्देशक, म्हणजे COÖRDINATES. एकाच Coördinates या शब्दासाठी सहनिर्देशक(गणित), सहबद्ध Coördinate bonds(बंध)(रसायनशास्त्र) आणि Coördinationसाठी समन्वय असे शब्द योजावे लागतील. म्हणजे एकाच इंग्रजी शब्दाला गर्भितार्थानुसार तीन वेगवेगळे शब्द वापरणे आवश्यक असते, हे दिसून यावे.

आता प्रणालीबाबत. प्रणालीतली ‘आली’ म्हणजे रांग.(दिवाळी म्हणजे दिव्यांची रांग). जेव्हा एखाद्या गणिती किंवा अन्य विषयामध्ये रांगेत किंवा एकाखाली एक लिहिलेली अशी पायरीपायरीची मांडणी असते, (किंवा एकामागून एक अशी पाळायची रीत असते) तिला प्रणाली म्हणावे. Coördinate Systemमध्ये अशा पायर्‍या नाहीत. Systemसाठी संहति(Music system; set of connected parts), रचना(system of pulleys), रीत, रीति,(One's system of working; method), पद्धत, पद्धती, व्यवस्था(Organisation), group of parts working together(पचनसंस्था, Digestive system), पर्वत समूह (Mountain system), Dressing System(तर्‍हा), Governing System(यंत्रणा) वगैरे वगैरे चाळीस विविध शब्द वापरावे लागतात. System साठी एकच मराठी शब्द वापरून चालणार नाही.

त्यामुळे, प्रणाली हा शब्द फक्त ordered set of ideas साठीच वापरला पाहिजे. कोऑर्डिनेट सिस्टिमसाठी प्रणाली चालणार नाही.

इंग्रजांनी जेव्हा भारतीय नावांचे इंग्रजीकरण केले तेव्हा एक पथ्य पाळले. स्पेलिंग करताना विकृत, असभ्य किंवा अश्लील अर्थ होऊ नये याची काळजी घेतली. Ahmedabadचे madabad, Gauhati(गोहत्ती)चे गुवाहाटी, उस्मानाबादसाठी अस्मानाबाद(Usmanabad) वगैरे स्पेलिंगे करणे टाळले. याच कारणासाठी कार्टेशियन साठी कार्टे-शी हा शब्द वापरू नये....J १५:१९, २० मे २०११ (UTC)

coordinate आणि cartesian संदर्भ सोडून बाकीचे मुद्दे पटले. मुळातच coordinate लिहिले तरी तेथे सहनिर्देशन काय आहे? आपण नवे शब्द वापरताना शब्दश: भाषांतर करायलाच पाहिजे असे नाही. त्याचप्रमाणे आपण विकिवर शक्यतो प्रचलित शब्द वापरण्याची काळजी घेतो. जर coordinate साठी प्रचलित शब्द निर्देशक असेल तर ते वापरायला काय हरकत आहे? मुळातच "सह" म्हणयला तेथे काहीच मुद्दा नाही.
आता cartesian बद्दल. इंग्रजांनी भारतीय नावांचे इंग्रजीकरण करताना विकृतीकरण केले नाही हे मत पूर्णत: खरे नाही, आणि त्याचा प्रस्तुत मुद्द्याची संबंध नाही. मुळातच विशेषनामांचे भाषांतर होत नाही. येथे cartesian ह शब्द cartes वरून साधित आहे तर cartes वरून मराठीत कार्टेशचे ह्यासाठी कार्टेशी असे होउ शकते. ह्यात काहीही विकृतीकरण होत नाहीये. जर मूळ नाव decartes घेतले तर देकार्त म्हटले पाहिजे. देकार्टेस नव्हे. उदाहरणादाखल

newtonचे ह्यासाठी काय म्हणाल न्यूटनी की न्यूटनियन? अनिरुद्ध परांजपे १८:३१, २० मे २०११ (UTC)


ऑर्डिनेट म्हणजे क्ष अक्षावर आलेखावरील बिंदूपासून टाकलेला लंब किंवा त्याची लांबी. कोऑर्डिनेटला निर्देर्शक म्हणतात हे ऐकिवात नाही. अ‍ॅब्सिसा आणि ऑर्डिनेट या दोघांना मिळून कोऑर्डिनेट्‌स म्हणतात. (नकाशावरील स्थानाच्या बाबतीत या भौगोलिक कोऑर्डिनेट्‍सना मराठी विकीवर अन्यत्र गणंग म्हटले आहे, त्याचा खरे तर निषेध व्हायला पाहिजे!) ऑपरेटिव्ह सोसायटी आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी यांत जो फरक आहे तोच निर्देशक आणि सहनिर्देशक यांत आहे. जर ‘सह’ नसेल तर अर्थ स्पष्ट होत नाही.
>>hmm..... खरेतर मराठी माध्यमातून शिकताना मला निर्देशक वाचल्याचे आठवते. म्हणूनच इंग्लिश माध्यमातून शिकताना मी को-ऑर्डिनेट वाचल्याने गोंधळात पडलेलो. वेल, आणि नंतर मला कळले की ’क्ष’ अक्षाला अ‍ॅब्सिसा हा समानार्थी शब्द वापरला जातो. पण तुमच्या स्पष्टीकरणानंतर सगळे स्पष्ट झाले. सत्य (माझ्यादृष्टीने) हे आहे की ऑर्डिनेट आणि अ‍ॅब्सिसा ने कोऑर्डिनेट तयार होत असले तरी मराठीत ऑर्डिनेट आणि अ‍ॅब्सिसा नाहीत. त्याऐवजी क्ष आणि य अक्ष आहेत. "आलेखातील मुख्य आडवी रेषा म्हणजे क्ष अक्ष आणि मुख्य उभी रेषा म्हणजे य अक्ष होय. आणि हे अक्ष मिळून कार्टेशियन निर्देशक पद्धती बनते" मला असे पाठ्यक्रमात वाचल्याचे काहीसे आठवते. म्हणूनच कदाचित आपल्याकडे सहनिर्देशक ऐवजी निर्देशक वापरले असावे. काही ठिकाणी ह्यास कार्टेशियन निर्देशक पद्धती किंवा कार्टेशियन अक्ष पद्धती वाचल्याचे आठवते. परंतु आपल्याकडे बर्‍याचदा पाठ्यक्रमात गोंधळ होऊन ती बर्‍याचदा बदलली जातात त्यामुळे कदाचित आपण ऐकले नसावे. सध्या साच्यात बदल करावे काय? मी नंतर दुवा मिळवून देतो.
>>आपण ह्या आधी एका इंग्लिश शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द दिले त्यावरून असे लक्षात येते की ह्या बद्दल तुम्हाला बरीच माहिती असावी किंवा तुमच्याकडे एखादा स्त्रोत असावा. जर एखादा स्त्रोत असेल तर त्याबद्दल मला सांगाल का? म्हणजे मला त्याचा उपयोग होईल. नवे शब्द बनवायला तर मूळीच उपयोग होईल.
अनिरुद्ध परांजपे १५:०४, २१ मे २०११ (UTC)
’क्ष’ अक्षाला अ‍ॅब्सिसा हा समानार्थी शब्द वापरला जातो << माझे असे म्हणणे होते की माझी तशी समजूत झाली होती. परंतु तुमच्या स्पष्टीकरणानंतर मला ह्याबद्दल नीट समजले (आधीचा परिच्छेद संदर्भ: तुमच्या स्पष्टीकरणानंतर सगळे स्पष्ट झाले). तरिही तुम्ही बरीच महत्त्वाची माहिती दिलीत, भुजा, कोटि आदी. आदी.
पर्यायी शब्दांसाठी मराठी कोश बाजारात मिळत असावेत. माझ्याकडचे स्रोत(स्त्रोत नाही!) एकोणिसाव्या शतकातील आहेत.<<ठीक आहे मी माहिती संदर्भात आपल्याला विचारत जाईन... तुम्ही विक्शनरीवर बर्‍याच शब्दांची भर का टाकत नाहीत?? १९ व्या शतकातले स्त्रोत जरी असले तरी ते मराठीतले आहेत हे महत्त्वाचे. त्यावेळी बरेच परकी विशेषत: युरोपीय शब्द आपल्याकडे शिरले नव्हते. सध्या माहित्गारांबरोबरच्या चर्चेनंतर मी परिभाषिक शब्दांसाठी तात्पुरते - गरजांपुरते दालन आणि पाने बनविणार आहे, त्यासाठी आपली मदत होऊ शकेल का? विशेषत: उपसर्ग आणि प्रत्यय यांवर पाने बनविण्यात??
>>आलेखातील मुख्य आडवी रेषा म्हणजे क्ष अक्ष आणि मुख्य उभी रेषा म्हणजे य अक्ष होय. आणि हे अक्ष मिळून कार्टेशियन सहनिर्देशक पद्धती किंवा कार्टेशियन अक्ष पद्धती बनते.<<. हे अगदी बरोबर. नुसत्या ’निर्देशक’ला अनेक अर्थ असल्याने दरवेळी सहनिर्देशक म्हटले की गोंधळ होण्याची शक्यता कमी.<< मग निर्देशक हा शब्द वापरायचा का?
>>यालाच भास्कराचार्य भुजा म्हणतात. मराठीत क्ष अक्षांक. पण हा मराठी शब्द फार वापरात नाही. त्याच बिंदूपासून, क्ष-अक्षावर आणि अक्षापर्यंत असलेल्या लंबाच्या लांबीला ordinate आणि भास्कराचार्यांच्या भाषेत कोटि(मराठीत य अक्षांक) म्हणतात. काटकोन त्रिकोणाची आडवी बाजू म्हणजे भुजा, उभी कोटि आणि तिरपी कर्ण.<<ह्या संदर्भात आपणांस माहिती कोठून मिळाली?? ह्याचा काही स्त्रोत आहे का? हा पण स्मरणशक्तीवर आधारित असेल तर मला दुसरे पर्यायी स्त्रोत सांगू शकाल का?? ही माहिती खूप महत्त्वाची आहे... ह्याचा त्रिकोणमितीय संज्ञेसंदर्भात उपयोगी आहेत. बहुमूल्य माहितीसाठी धन्यवाद...
अनिरुद्ध परांजपे १६:३६, २१ मे २०११ (UTC)


म्हणजे ५०-५० :)
तरीही मदतीबद्दल आभारी आहे.
अनिरुद्ध परांजपे १७:४१, २१ मे २०११ (UTC)

word for mechanics[संपादन]

mechanics साठी कोणता शब्द सुचवाल? स्थितीगतिकी हे बोजड आणि लांब पल्ल्याचे वाटते. तसेच ते पूर्ण mechanics चा अर्थ स्पष्ट करत नाही. माझ्या मते रचनाशास्त्र ठीक होईल. तरिही भौतिकी ह्या शब्दाप्रमाणे मी रचनिकी असा शब्द तयार केला पण तो अर्थहीन आणि विकृतीकरण केलेला वाटतो. मराठी विश्वकोष मध्ये यामिकी असे म्हटले आहे. त्याबद्दल मला फारसे माहित नाही. हे कितपत योग्य आहे? आणि यामि चा अर्थ काय? अनिरुद्ध परांजपे १८:०३, २१ मे २०११ (UTC)

mechanics साठी कोणता शब्द सुचवाल?

यंत्रगतिशास्त्र, यांत्रिकी, यंत्रशास्त्र हे शब्द योग्यतेचे वाटतात का हे इतरांच्या सल्याने घेणे. Dr.sachin23 १८:१७, २१ मे २०११ (UTC)

यंत्रगतिशास्त्र, यांत्रिकी, यंत्रशास्त्र हे शब्द अभियांत्रीकीच्या शाखेसाठी वापरतात.
meachanics ला इंग्लिशमध्ये २ अर्थ आहेत. १ अभियांत्रिकीचा शाखा आणि २ भौतिकीची शाखा.
पैकी पहिल्या अर्थाने मराठीत यांत्रिकी हा शब्द प्रचलित आहे.
भौतिकीसाठी नव्या परिभाषिक कोषात स्थितीगतिशास्त्र म्हटले आहे तर मराठी विश्वकोशात यामिकी.
पैकी स्थितीगतीशास्त्र हे पूर्णपणे mechanics (phiysics) ला व्यक्त करत नाही वर ते खूपच मोठे होत आहे...
आणि यामिकी बद्दल मला माहिती नाही, म्हणजे तो कसा तयार झाला असावा ह्याबद्दल.
अनिरुद्ध परांजपे ०३:१७, २२ मे २०११ (UTC)
मी दुवा दिलेल्या ३५ कोशांची साइट उघडून पाहिली का? साइट अगदी वाईट नाही आहे>> तर? आवर्जून बघितला. तेथेच यामिकी (आणि स्थितीगतिशास्त्र) हा शब्द वापरलेला आहे. भौतिकीतील mechanics हे motion, movement and force ची संबंधित आहे. अभियांत्रिकीतील mechanics हे engineering, science of structure etc अर्थाने वापरल्याचे दिसून येते... तर यामिकी हा शब्द योग्यच नाही का?

वाइट नक्कीच नाही, परंतु ते under development मध्ये आहे. काही कोश मी दिलेल्या त्या कोशाच्या दुव्यामधून घेतले आहे. पण ठीक आहे. तुमच्याच शब्दात म्हणायचे तर:- "कोश फार चांगले आहे असे मी म्हणणार नाही, पण अगदीच काम अडले असे होणार नाही"

सुधारणा: एक्स कोऑर्डिनेटसाठी क्ष-निर्देशक हाच योग्य शब्द वाटतो आहे. फक्त नुसता निर्देशक कसासाच वाटतो >> मी विचारत होतो की coordinate systemस निर्देशक पद्धती म्हणून वापरायची का??
तुम्ही मी बनविलेल्या साच्यात केलेल्या सुधारणा पाहिल्या. पटल्या. तुमच्याकडून योग्य शब्द वापरण्यासंदर्भात अशीच मदत मिळो.
अनिरुद्ध परांजपे १६:३३, २२ मे २०११ (UTC)


आणि पिनबॉलला काय शब्द सुचवाल? टाचणीचेंडू? :) मला योग्य शब्द सुचवा. अनिरुद्ध परांजपे १६:५१, २२ मे २०११ (UTC)


integration[संपादन]

integration ही फलांनी जोडण्याची कृती आहे. त्यासाठी सांधन आणि differentiation ला भैदन
ह्याचेच समानार्थी शब्द अनुक्रमे संकलन आणि विकलन होय.
न्यूटन ह्या टिंबाला फ्लक्सियॉन म्हणे.<<टिंबाला नाही, टिंब देण्याच्या ह्या पद्धतीला.
सुधारित आवृत्ती व्याकरणाच्या दृष्टीने योग्य वाटते.
अनिरुद्ध परांजपे १७:००, २२ मे २०११ (UTC)

उ: सापडला नाही[संपादन]

माझ्या संपादन यादीत मी तुम्हाला २० मे रोजी ८ ते ९ च्या दरम्यान लिहीले आणि ते गणित कोश आणि निर्देशन पद्धती संदर्भात होते. अनिरुद्ध परांजपे १७:२०, २२ मे २०११ (UTC)

उ:सुधारित आवृत्ती[संपादन]

सुधारित आवृत्ती तुम्हाला मिळाली? एवढ्या लवकर मला पाठवायची नव्हती, काही सुधारणा बाकी होत्या. आता मी काय लिहिले ते वाचून पाहीन. त्यातले नुसते व्याकरणच नाही तर त्यातली सोपी भाषा जास्त महत्त्वाची आहे. वाचकाला अर्थ सहज समजला पाहिजे, मग वाटल्यास सोबत इंग्रजी शब्दही दिले तरी हरकत नाही. न्यूटन टिंबाच्या पद्धतीला(की टिंबाला) काय म्हणायचा ते मला कुठेतरी वाचून खात्री करून घ्यायला पाहिजे. उगीच न वाचता सुधारणा करणे योग्य नाही.<<बरोबर म्हणून मी अजूनतरी बदल केला नाही. टिंबासंदर्भात तुम्ही इंग्लिश विकीवर माहिती वाचू शकता. calculus, calculus differentialis आणि calculus integralis हे शब्द लिबनिझने वापरले जे आज प्रचलित आहेत. त्याच्या प्रतिस्पर्धी न्यूटन differentiation ला (खरे तर काळ भैदिजला) फ्लक्सियॉन आणि integration ला काहीतरी फ्ल्युएंट म्हणायचा होता. पहा दुवा - हttp://en.wikipedia.org/wiki/Method_of_Fluxions
सांधन शब्द अप्रचलित आहे, माझ्या मते संकलनच पाहिजे. खरे तर फलाचे ‘कलनशास्त्र वापरून केलेले’ संकलन अधिक योग्य ठरेल<<मुळातच विकलन आणि संकलन अजून पूर्ण प्रचलित नाही. आणि इंग्लिशमध्ये असे शब्द नाहीत. त्याऐवजी diiferential (calculus) आणि integral (calculus)वआहे आणि त्यामुळे साधित शब्द बनविता येतात जसे अनुक्रमे derivative, differential, differentiation आणि integral, integration. नाहीतर भैदिक कलन ह्यास जुळणारा integral calculus साठी एखादा शब्द सांगावा.

शून्यलब्धी[संपादन]

कॅलक्य़ुलसचा शोध भास्कराचार्यांनी लावला.<<कबूल. सामान्यत: गणिताचा विस्तार युरोपीयन शास्त्र नी केला आणि तो पसरवला आणि आपल्याकडे आला. सध्याची आवृत्ती त्यांचीच आहे. भास्कराचार्यांची नव्हे. परंतु हेही कबूल केले पाहिजे की आज गणिती क्षेत्रात जेव्ढे न आहे त्यापेक्षा बरेच काही प्राचीन भारतीयांना माहित होते.

जर कलन, संकलन, भीदिक, सांधन वगैरे शब्द जनमान्य नसतील तर सरळ कॅलक्युलस, डिफरन्शियल व इंटिग्रल वगैरे शब्द वापरावेत. सांधन, भैदिक इतकेच काय पण फल हा शब्ददेखील कुणी ऐकलेला नसेल.(मीही नव्हता, अंदाजाने अर्थ लावला. सगळ्यांना ते शक्य नसावे!)<< भाषा जर परस्थितीनुसार बदलत नसेल तर ती कालौघात टिकत नाही तर परभाषेतील शब्द एका मर्यादेपेक्षा जास्त झाले की ती हळूहळू खंगत जाते. त्या भाषेत हळूहळू मिसळत जाते आणि तीचे स्व्तंत्र अस्तित्व फारसे रहात नाही. म्हणून नवे शब्द तयार केले पाहिजे. मुळातच calculus इ शब्दांस मराठी शब्द सध्या तरी प्रचलित नाहीत. अशा वेळी नवा शब्दप्रयोग रूढ करायला हरकत नाही. जर्मन, फ्रेंच इ युरोपियन भाषांनी कालप्रवाहात गरजेनुसार नवे परिभाषिक शब्द तयार केले म्हणून ते अजूनही टिकून आहे.

पण मराठी शब्द जिथे पहिल्यांदा येईल तिथे त्याचे इंग्रजी मूळ द्यायला हवे.<<कबूल. पण ते मुख लेखांत. संदर्भित लेख भैदनातल्या सूत्रांवर आधारित आहे. भैदिक कलन ह्या मुख्य लेखात इंग्लिश मूळ दिलेले आहे.. अनिरुद्ध परांजपे ०१:५७, २३ मे २०११ (UTC)

-पारिभाषिक शब्द कसे असावेत?[संपादन]

  • कुठलीही शंका न येता त्या शब्दाचा अर्थ कळावा.
  • तो शब्द दुसर्‍या अर्थाने वापरात नसावा. Calculus, Differential हे असे शब्द आहेत. शून्यलब्धीही तसाच आहे.
  • कलन, संकलन वगैरे शब्द अन्य अर्थाने वापरात असल्याने बाद.

मूळ इंग्रजी शब्द जर उच्चारायला अवघड नसेल तर तोच ठेवावा. नाहीतर त्याचे मराठीकरण करावे. हिंदीने अ‍ॅकॅडमीचे जसे अकादमी केले आहे तसे, कॅल्क्युलसचे कालकुलस करावे. डिफरन्शियल शब्द तसाच ठेवावा. मराठीत कोणताही घोटाळा होण्याचा प्रश्न नाही.

  • नाहीतर पूर्णत: नवीन शब्द अमलात आणावा. चल+अचल+कलन वरून चलाचलनविद्या=Differential Calculus(=variation in a function after changes in the independent variable) . To differentiate a function with respect to x=फलाचे क्ष दृष्ट्या चलाचलन काढा. differential such as dy= चलाचलनांश किंवा चिचल(चिमुकले व्हेरिअबल). Differential coefficient= चलाचलनांक. Integralसाठी अचलाचल. dy by dx साठी चियस चिक्ष. (चिमुकल्या ‘य’चे चिमुकल्या ‘क्ष’शी प्रमाण!) वगैरे वगैरे. अर्थात ह्या सूचना फक्त, कायकाय करता येईल याची कल्पना येण्यासाठी. प्रत्यक्षात आणणे तितके सोपे नाही....J ०८:४५, २३ मे २०११ (UTC)

माहितीचौकट[संपादन]

जे, आपण जपान लेखात काही बदल केल्याचे पाहिले. माहितीचौकटीमधील नावांत काही बदल केल्यास मूळ साच्यात (व तो साचा वापरला गेला आहे अशा सर्व लेखांमध्ये) हे बदल करणे आवश्यक आहे. क्षेत्रफळ_वर्ग_किमी ऐवजी क्षेत्रफळ_चौरस_किमी हा बदल केल्यामुळे जपानच्या माहितीचौकटीमध्ये क्षेत्रफळ दिसत नाही आहे. तरी कृपया पुन्हा क्षेत्रफळ_वर्ग_किमी हाच शब्द ह्या माहितीचौकटीत वापरावा.
भविष्यात काही बदल केल्यास ते योग्यपणे लागू झाले आहेत की नाही हे तपासून बघावे ही विनंती.
अभिजीत साठे १८:५२, १० जून २०११ (UTC)

स्थानांतर[संपादन]

एखाद्या पान दुसर्‍या मथळ्याखाली कसे स्थानांतर करावे ह्यासंदर्भात माहिती दिल्यास खूप बरे होईल. अनिरुद्ध परांजपे ०५:३८, १७ जून २०११ (UTC)


स्थानांतरण[संपादन]

पानाच्या अग्रभागी ’इतिहास पहा’नंतर, कुटुंबनियोजनासाठी भारतात वापरल्या जाणार्‍या चिन्हासारखा दिसणारा) एक अधरशीर्ष त्रिकोण आहे त्यावर कर्सर ठेवल्यावर स्थानांतरण उघडेल. त्यावर टिचकी मारावी. बाकी काय करायचे ते आपोआप समजेल. जर नवीन नावाचे पान आधीच उपलब्ध असेल तर स्थानांतरण करता येत नाही. त्यासाठी एकतर पहिले पान काढून टाकावे लागेल किंवा नवीन पान जुन्या पानात सम्मीलित करावे लागेल.....J ०६:१०, १७ जून २०११ (UTC)

बहुमूल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अनिरुद्ध परांजपे ०८:३२, १७ जून २०११ (UTC)

पेद्रो मोक्तेसुमा[संपादन]

पेद्रो मोक्तेसुमावर आपण जे बदल केले ते अभिप्रेत असलेला अर्थ व्यक्त करत नाही. कदाचित आधी माझ्याकडून झालेल्या चूकांमुळे असेल. त्यासाठी संबंधित लेखाचे चर्चापान चर्चा:पेद्रो मोक्तेसुमा पाहा. त्यादृष्टीने आपण योग्य अर्थ अभिप्रेत होईल आणि त्यादृष्टीने योग्य ते शुद्धलेखन वापरले तर मला खूपच मोठी मदत होईल.

अनिरुद्ध परांजपे ०३:२५, २२ जून २०११ (UTC)

J, आपण "अलिकडील बदल" ह्या सदरामधील लेखांमध्ये किरकोळ बदल करता. बरेच वेळा आपले संपादन कोणत्या हेतूने केले आहे हे उमगत नाही. एकाने लिहिलेली प्रत्येक गोष्ट दुसर्‍याला बदलाविशी वाटते हे स्वाभाविक आहे पण काही अर्थ नसताना बदल करणे कितपत योग्य आहे? मी किंवा इतर संपादक लेख लिहितात ते आपापल्या शैलीनुसार. जर खरेच संपादनात चूक झाली असेल तर ती दुरुस्त करणे योग्य आहे परंतु उगाच बदल करणे कितपत बरोबर आहे? आपल्या संपादनाने जर त्या लेखाचा दर्जा सुधारत असेल तर काहीच हरकत नाही. पण अनावश्यक संपादने करण्याऐवजी आपण स्वतः काही लेख लिहिलेत/वाढवलेत तर ते जास्त उपयुक्त ठरेल असे मला वाटते.

माझ्या कॉमेंट्सचा आपण विपर्यास करणार नाही अशी आशा बाळगतो.
अभिजीत साठे १९:१६, २३ जून २०११ (UTC)


अनावश्यक बदल[संपादन]

माझ्यामते, मी कोणताच अनावश्यक बदल करीत नाही. आता वर लिहिलेल्या ‘अलिकडील’ मधली लि मी दीर्घ केली असती. अलीकडे, पलीकडे, अलीकडून, अलीकडचा, पाठीमागचा, टेकडीवरील सारख्या शब्दांत प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यानंतर, गरिबांकडीलमध्ये होतात तसे, उपान्त्यपूर्व ईकार र्‍हस्व होत नाहीत. अशा बदलांना अनावश्यक बदल म्हणावे का?

जेव्हा लेखकाची शैली एकच मजकूर असलेली एकापेक्षा अनेक वाक्ये लिहिण्याची असते, तेव्हा मला त्यांची एक सोडून बाकीची वाक्ये पुसून टाकावी लागतात. यालाच शैलीबदल म्हणत असाल तर ते मला मान्य आहे.

मराठी विकिपीडियावरील लेख बहुधा भाषांतरित असतात. थॉमस कॅन्डी(१८०४-१८७७) यांनी भाषांतरित आणि अन्य मराठी लेखनासाठी काही नियम तयार केले होते. भाषांतर करताना मुळातील सर्व विचार मराठीत कसे आणावेत, शब्दश: भाषांतर का टाळावे, अनोळखी शब्दांबद्दल टीपा कशा आणि कुठे द्याव्यात, पारिभाषिक शब्द कसे बनवावेत, दोन भिन्न भाषांतील समास केव्हा टाळावेत, परकीय भाषेतील शब्दांचे मराठीकरण कसे करावे, तसले शब्द मराठीकरण न करता लिहावे लागल्यास त्यांचे शुद्धलेखन काय असावे, मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग कसे केल्याने मूळ उच्चारात किरकोळ बदल झाला, तरी त्या स्पेलिंगनुसार केलेला उच्चार मूळ उच्चाराच्या कसा जवळ पोचतो( उचित स्पेलिंगांची उदाहरणे : Poona, Sion Byculla) वगैरे सांगणारे एक पुस्तक लिहिले होते. माझ्या मते, माझ्या सुधारणा त्या पुस्तकातील नियम पाळून केलेल्या असतात. तत्कालीन मराठी लेखक, वर्तमानपत्रांत लिखाण करणारे विद्वान, व्याकरणकार वगैरे लिहीत असलेल्या मराठी वाक्यरचनेतील शैथिल्य व अनियमितपणा काढून टाकून, भाषेला बंदिस्तपणा आणण्याचे काम कॅन्डीने केले. (कॅन्डीला मराठी विद्वानांनी आयुष्यभर विरोध केला. मात्र, शेवटी त्याच्या मृत्यूनंतर त्याच विद्वान ब्राह्मणांनी, आपला जवळचा नातेवाईक गेला असे समजून, त्याच्यासाठी सुतक पाळले!) मराठी विकिपीडियावर काही सदस्य लेख मोठा व्हावा म्हणून अनावश्यक वाक्यांची भरताड करीत असतात; इंग्रजी शब्दांचे मराठी स्पेलिंग करताना चूक करत असतात. त्यांच्यात कॅन्डी पद्धतीने सुधारणा कराव्या लागतात....J ०५:४३, २४ जून २०११ (UTC)

नामकरण पद्धत[संपादन]

अलीकडील बदल मध्ये पाहिल्यावर असे आढळले तुम्ही काही व्यकित्नामे स्थानांतरित केलीत किंवा सुधारणा करताना व्यक्तिनामानंतर पहिला, दुसरा इ येथे ते काढून सुरवातीस आणता. उदा. मोक्तेसुमा, दुसरा असल्यास दुसरा मोक्तेसुमा असे करणे. माझ्या मते दुसरी पद्धत वापरल्यास गोंधळ होणार नाही का? दुसरा म्हणजे दुसरा कोणी एक असे वाटते. आणि मी पाहिलेल्या बर्‍याच प्रचलित पुस्तकांत पहिली पद्धत वापरल्याचे आढळते उदा. बाजीराव, दुसरा किंवा बाजीराव, द्वितीय.

पोस्ट करताना तुम्ही अभिजीत साठेंना दिलेले उत्तर दिसले-वाचले. मला ह्या थॉमस कॅन्डींबद्दल, विशेषत: त्याच्या पुस्तकाबद्दल माहिती मिळेल का?

अनिरुद्ध परांजपे १६:४६, २६ जून २०११ (UTC)


मी वाचलेल्या बहुतेक पुस्तकांत पहिला बाजीराव, दुसरा पेशवा असेच वाचले आहे. आणि असेच असले पाहिजे. इंग्रजीत आणि मराठीत हा एक फरक आहे. मराठीत इसवी सनाच्या अमुक‍अमुक वर्षात असे तर इंग्रजीत in xxxx A.D किंवा in xxxx CE अशी शब्दरचना असते. ‘मंथ ऑफ़ डिसेंबर’ आणि ‘डिसेंबर महिन्यात’ यांवरून या शब्दरचना स्पष्ट व्हाव्यात. उदा० पंचम जॉर्ज हे मराठीत तर George the 5th, असे इंग्रजीत लिहितात. मराठीत संख्यावाचक विशेषण हे नेहमीच नामाच्या आधी असते हे सर्वज्ञात आहे. सूची करताना नाव चटकन सापडावे म्हणून बाजीराव, पहिला असे नाइलाजाने लिहावे लागते. सूची नसेल तर तसे लिहिणे उचित नाही

थॉमस कॅन्डी यांच्यावर वर्तमानपत्रांतून अनेक लेख आलेले आहेत. त्यांपैकी सर्वोत्कृष्ट लेख एका भोसले नावाच्या लेखकाचा होता. हे लेखक पुण्याला शिवाजीनगर स्टेशनजवळ असलेल्या कॉर्पोरेशन बँकेत काम करतात. त्यांना भेटणे मला अजून शक्य झालेले नाही. कॅन्डीच्या पुस्तकाची नावे देता येतील, पण त्यांतील अचूक मजकूर मला उद्‌धृत करता येणार नाही, कारण ती सर्वच्या सर्व पुस्तके माझ्याकडे नाहीत, आणि दुर्मीळ असल्याने बाहेरही मिळण्यासारखी नाहीत. .....J १७:५१, २६ जून २०११ (UTC)

विनंती[संपादन]

तुम्ही भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११ लेखात केलेल्या सुधारणा पाहिल्या, एक विनंती आहे की जर spelling correct केले तर existing page नविन पानाकडे स्थानांतररीत करावे किंवा नविन पान जुन्या पानाकडे पुनर्निर्देशीत करावे.

Maihudon ०४:१८, २८ जून २०११ (UTC)

माझा मुद्दा शुध्दलेखनाच्या बाबतीत नव्हता, शुध्दलेखनानंतर जर निळा दुवा , लाल झाला तर जुने पान, नविन दुव्या कडे स्थानांतरीत करावे. उदाहरणासाठी फिडेल एड्वर्ड्स - फिडेल एडवर्ड्‌ज.
मी वेस्ट ईंडीझ चे वेस्ट इंडीज बदल केलेला आहे.
Maihudon ०८:१८, २९ जून २०११ (UTC)

"गोपीनाथ पांडुरंग मुंडे" या लेखास शुद्धलेखन, व्याकरण तपासणीची विनंती. लेखावर आणखी एक हात फिरविण्याची गरज आहे असे माझे मत आहे. कृपया तपासावे ही विनंती. "गोपीनाथ पांडुरंग मुंडे" या लेखास उद्देशून काही मुद्दे मांडले आहेत पुराव्या दाखल काही संदर्भ पण जोडले आहेत. आपल्या सवडी नुसार एक नजर टाकावी हि विनंती. शुद्धलेखना बरोबरच इतरही काही सूचना असल्यास सुचवाव्यात. यासाठी मदत करावी. कृपया आपला निष्णात हात फिरवावा ही सादर विनंती.

Also please add picture of “Gopinath Munde” धन्यवाद - सदस्य: nmisal

सादर नमस्कार[संपादन]

मध्यंतरी मी विकीवर संपादनांसाठी अनुपलब्ध होतो.तरीही काय चालले आहे ते बघण्यासाठी घाईत एक नजर टाकतच होतो.आपला परिचय नाही.सबब, तो व्हावा म्हणुन हा पत्रप्रपंच.आपण अतिशय बारकाईने काम करीत आहात हे बघुन फारच चांगले वाटले.शुद्धलेखनावर पण आपले प्रभुत्व दिसते.आपल्या भविष्यातील कामासाठी शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:३०, २ जुलै २०११ (UTC)

धन्यवाद[संपादन]

शुद्धलेखन सुधारण्यासाठी मला बारकाईने काम करावे लागत नाही. सहज वाचतावाचता ज्या चुका नजरेला खुपतात तेवढ्याच मला सुधारायला मिळतात. शुद्धलेखनापेक्षा व्याकरणावर काम करताना अधिक बारकाईने काम करावे लागते. भोंगळ शब्दरचना केलेली आणि एकच आशय सांगणारी अनेक वाक्ये बदलून, कमीतकमी शब्दांत तोच भावार्थ व्यक्त करणारे एखादेच वाक्य ठेवताना माझी खरी कसोटी लागते. ते काम जसे मला जमेल, तसे करण्याचा माझा प्रयत्न असतो. विकिपीडिया ज्ञानकोश असल्याने त्यात अघळपघळ विधानांना स्थान असू नये असे मला वाटते. अमराठी शब्द मराठीत लिहिताना कोणती तथ्ये पाळावीत हे सांगण्यासाठी आपल्या पूर्वसूरींनी विशद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पुरेपूर पालन कसे होईल, इकडे माझा कटाक्ष असतो.

आपल्या शुभेच्छांबद्दल आभार....J १४:२८, २ जुलै २०११ (UTC)

नेहमी होणार्‍या शुद्धलेखन चुका[संपादन]

नमस्कार जे,

तुम्ही मराठी विकिपीडियावरील लेखांत शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या दुरुस्त्या सातत्याने करत असता, त्यानिमित्ताने तुम्हांला एक विनंती करायची आहे - मराठी विकिपीडियावर आढळणार्‍या लेखांत अधिक प्रमाणात/सर्रास आढळणार्‍या आणि तसे म्हटले तर अगदी सोप्या अथवा ढोबळ म्हणता येतील अश्या चुकांची सूची बनवू शकता काय ? उदा., बर्‍याच संपादकांकडून म्हणुन, सुरूवात, ऐतिहासीक, करुन, ठेऊन, देवून अशी चुकीची लेखने लिहिली जातात; तर अश्या ढोबळ व सर्रास आढळणार्‍या चुकांची सूची (शक्यतो नामांच्या रूपांची एक व क्रियापदांच्या रूपांची एक, अश्या दोन अकारविल्हे याद्या) करता येईल. अश्या शुद्धलेखनदुरुस्त्या सुधारायला विकिपीडिया:AutoWikiBrowser/Typos येथील रेगेक्स स्ट्रिंग तंत्र वापरून अर्ध-स्वयंचलित पद्धतीने (अधिक माहिती इंग्लिश विकिपीडियावर) शुद्धलेखन दुरुस्त्या करता येतील.

या कामातील आपले सातत्य ठाऊक असल्यामुळे आपले सहाय्य अपेक्षित आहे. आपले मत कळवावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२०, २ जुलै २०११ (UTC)

सादर नमस्कार[संपादन]

कृपया हे पान बघावे.यातील Latin नावात आपण भर घालु शकत असल्यास ते बरे होईल.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:३४, ७ जुलै २०११ (UTC) येथे आपल्यास सोयीचे व्हावे म्हणुन खाणे आखुन दिले आहेत. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:२७, ८ जुलै २०११ (UTC)

मौलिक मदत[संपादन]

नमस्कार जे

जसेकी आपण जाणताच की मराठी पिविवर चर्चा बरीच होते पण त्या चर्चेस मूर्त रूप देणारी व्यवस्था येथे नाही. बरेचदा त्यामुळे एकाच विषयावर अनेकदा काही कालांतराने पुन्हा पुन्हा चर्चा होते. उदा. व्यक्तिगत नावे मराठीत कशी लिहावीत ह्या विषयावर आपणच एकच मुद्दा अनेकदा समजवला आहे. तेव्हा एकदा काही चर्चा विशिष्ट निर्णयाप्रत आली की त्याचे नियमांन मध्ये रूपांतरण करणे आणि भविष्यात त्यानियमांना आधाभूत मानून काम करणे, गरजेनुसार नियमांचे समीक्षण, परिवर्तन आदी साठी चावडी (ध्येय आणि धोरणे) बाबत मी थोडी आग्रही भूमिका घेतली आहे.

सादर चावडी हि चावडीच्या थोडी पुढे जाऊन नियम/निर्णय बनवणारे व्यासपीठ असावे जेणे करून निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल. कामाला थोडे आधारभूत (लोशाही पद्धतीने बनवलेले ) नियम आणि शिस्त येईल असे वाटते. आज जेथे सरासरी महिन्या काठी २०-२५ सदस्य योगदान देतात त्या विपीस उद्या अनेक सदस्यांना हाताळण्या साठी अशा संरचनेची गरज आहे असे वाटते.

आपण जर ह्या विचारांशी (प्रयोग म्हणून जरी ) सहमत असाल तर मी आपणास विनंती करतो कि आपण ह्या विषयाच्या समर्थनार्थ जर चावडी ध्येय आणि धोरणे बाबत आपले सकारात्मक विचार चावडीवर मांडले तर लोकशाही पद्धतीने सदर चावडी निर्माण करण्याच्या कामात मौलिक मदत होईल. आपणाकडून सदर व्यासपीठाच्या निर्मिती, मार्गदर्शन आणि संरचनेच्या कामात आपल्या जेष्ठतेची, अनुभवाची आणि विचारांची नितांत गरज आहे असे मला वाटते.

धन्यवाद

राहुल देशमुख १७:३८, ८ जुलै २०११ (UTC)

चावडी चावडीच रहावी[संपादन]

माझे मत एवढेच आहे की चावडी ही चावडीच रहावी. तिच्यावर कुणाही सदस्याला किंवा अ-सदस्याला काहीही लिहायची परवानगी हवी. तिथे लिहिण्यासाठी कुठलेही नियम किंबा बंधने असता कामा नयेत. नियम बनवणारे आणि निर्णय घेणारे व्यासपीठ वेगळे हवे. चावडीवरच्या एखाद्या चर्चेतून जर खरोखरच काही नियम बनण्याची शक्यता जाणवली तर तेवढी चर्चा ‘त्या’ व्यासपीठावर नकलवावी. चावडीला ध्येय आणि धोरणे यांच्या मुसक्या बांधू नयेत....J १७:५५, ८ जुलै २०११ (UTC)

  • ' चावडी चावडीच राहिल - ' मी आपल्या मताशी १००% सहमत आहे. आणि म्हणूनच चावडीला कोणत्याही बंधनात नबांधता सदर गंभीर चर्चेसाठी वेगळा व्यासपीठ चावडी (ध्येय आणि धोरणे ) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. हि दोन्ही वेगवेळी व्यासपीठे असतील.[१], केवळ चावडी हे नाम साम्य आहे कारण मूळ विषयाचा उगम हा मुख्य चावडी पासूनच हेणार आहे आणि जर खरोखरच काही नियम बनण्याची शक्यता जाणवली तर तेवढी चर्चा चावडी (ध्येय आणि धोरणे ) वर निर्णया पर्यंत चर्चिली जाईल.[२]


मला असे वाटते कि आता आपणास ह्या विषया बाबत असलेला संभ्रम दूर झाला असेल आणि आपणा कडून 'चावडीवर सकारात्मक प्रतिक्रियाची मला अपेक्षा करण्यास हरकत नसावी.
राहुल देशमुख ०९:५४, ९ जुलै २०११ (UTC)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ विकिपीडिया:चावडी १२.संकीर्ण माहिती आणि नम्र आवाहन...! मुद्दा क्र. १ (हे पान का पाहिजे. आत्ता असलेली पाने (चावडी, चावडी/प्रगती, विविध कौलपाने, इ) का पुरेशी नाहीत.
  2. ^ विकिपीडिया:चावडी १२.संकीर्ण माहिती आणि नम्र आवाहन...! मुद्दा क्र. ६ ( ..... सदर चावडीचे संबंधित टिपणे मुख्य चावडीत प्रदर्शित करावे.)


चिकित्सा विनंती[संपादन]

जे, आपण कुपया Idea lab साठी मराठीत शब्द सुचवावा तसेच वेळ मिळाल्यास विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/संकीर्ण ह्या पानास भेट देऊन तेथे केलेल्या भाषांतराची चिकित्सा पण करून दिल्यास मोठी मदत होईल. अग्रिम धन्यवाद . राहुल देशमुख २०:३९, ९ जुलै २०११ (UTC)

गौरव[संपादन]

नमस्कार जे,

आपण आज मराठी विकिपीडियावर ३३३३ संपादनांचा टप्पा पार केला त्या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ...!

मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल सर्व विकिपिडीयन्सतर्फे हा बार्नस्टार .

पुन्हा एकदा अभिनंदन.

राहुल देशमुख ००:३७, ११ जुलै २०११ (UTC)

  • नमस्कार जे
आपण दि १२ जानेवारी २००७ ला पहिले संपादन केले तर आपले सदस्य पान हे २२ जानेवारीस (२००७ ला) अस्तिवात आले. तेव्हा पासून आजपर्यंतचा इतिहास पहिला असता त्यावर तारे सापडले नाहीत म्हणून आपले विदागार चर्चा तपासली तर त्या मध्ये हि दोन रत्ने सापडली. मी ती आपल्या सदस्य पानावर संदेशासकट स्थानांतरीत करीत आहोत. पुनश्य अभिनंदन.
(जे मला आता तुमच्या कडून ( १ +२ ) = ३ पार्ट्या हव्यात ..!!!)
राहुल देशमुख ०५:३८, ११ जुलै २०११ (UTC)
  • जे मी फक्त स्थानांतरण केले आहे. आपण आपल्या विदागार चर्चात पाहू शकता. वेगवेगळ्या उप्लाब्धींसाठी प्रत्येकी एक बर्नस्टार ह्या प्रमाणे सदस्यांनी अनेक बर्नस्टार मिळवावे असे अपेक्षित असावे.
ज्ञानेश्वरांनी म्हटल्या प्रमाणे "चंद्र तेथे चंद्रिका, शक्ती तिथे अंबिका".(... आणि आपल्या भोवती चंद्रिका गोळा झाल्यास नवल नसावे.)

राहुल देशमुख ०७:१६, ११ जुलै २०११ (UTC)

  • नमस्कार जे
आपल्या बार्नस्टार बाबतच्या माहितीवरून मी पुढे शोधाशोध केली असता मला बार्नस्टारचा खजिना सापडला. आपणही येथे भेट देऊन आपला बार्नस्टार शोधू शकाल.
राहुल देशमुख १८:२३, १२ जुलै २०११ (UTC)

चटक चांदणी[संपादन]

  • जे आपण बार्नस्टारला पण चटक चांदणी .असे नामांतर सुचवायचे का ? जरा अपिलिंग वाटेल !!!

राहुल देशमुख ०५:५२, ११ जुलै २०११ (UTC)

तुंबा[संपादन]

हे नाव मी 'वनौषधी गुणादर्श'- लेखक.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे यांच्या पुस्तकातुन उचलले आहे.त्यांच्या यावरील अधिकाराबद्दल कोणासच वाद नसावा असे वाटते.किंबहुना, आधुनिक आयुर्वेद शास्त्राची अनेक पुस्तके यावरुनच लिहिल्या गेली असतील असे माझे मत आहे.कृपया अगस्ता हा लेखही बघावा.त्यात व इतर लेखात ते मी नमुद केले आहे.

वनौषधी गुणादर्श- ले.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर) (हिंदी) इंडियन मेडिसिनल प्लांट्स (खंड ४) (इंग्लिश) वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:१४, ११ जुलै २०११ (UTC)

पदेशास्त्री[संपादन]

वनस्पती/यादी या पानावरील मजकूर हा त्यांच्या पुस्तकावरच आधारीत आहे.त्यात तुंबा हे नाव आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:४९, १३ जुलै २०११ (UTC)


आमंत्रण[संपादन]

नमस्कार जे,

आपण चावडी ध्येय आणि धोरणे मध्ये वैयक्तिक नावांचा मराठीत वापर करण्याचे काही नियम/निर्देश मांडावेत आणि त्यावरील चर्चेस योग्य दिशा देऊन काही मुलभूत नियम/निर्देश (माहितीगार सुचवतात त्याप्रमाणे संकेत ) बनवावेत अशी आपणास विनती आहे.

ह्या पूर्वीच्या चर्चांचा आधार घेऊन आपण निर्देशांची सूची देऊनच सुरवात करावी बाकी सदस्य त्यावर त्याच्या प्रतिक्रिया/बदल देतीलच. आपण अंतिम केलेल्या शिफारशी आपण संकेत क्रमांकने जतन करून भविष्यातील सदस्यांसाठी एक उपयुक्त संदर्भ निर्माण करूया.

माझ्या कडून काही मदत लागल्यास कळवावे.

धन्यवाद

राहुल देशमुख ११:०८, १७ जुलै २०११ (UTC)

विलीनीकरण[संपादन]

नमस्कार, जे,

कृपया, लेखनाव ’तुंबा’ व ’तुंबी’ यांचे, तसेच लेखनाव ’नारळ’-’श्रीफळ’-’शहाळे’ यांचे विलीनीकरण व्हावे.

यूट्यूब[संपादन]

नमस्कार जे,

आपण यूट्यूब लेखात केलेले बदल पहिलेत पण त्यामुळे थोडे वेगळा अर्थ निघतो असे मला वाटते मी काही इंग्रजी ड्राफ्ट देत आहे, आपण पुन्हा तपासुन पहिले तर बरे होईल असे वाटते. आणखी एक, हि सुविधा मुळतहाकोल्याबरेटीव आणि शेअरिंग ह्या तत्वावर आधारलेली आहे तेव्हा त्याला पण अंतर्भूत कसे करायचे ते पहावे.

Most of the content on YouTube has been uploaded by individuals, although media corporations and other organizations offer some of their material via the site, as part of the YouTube partnership program.

धान्यवाद

राहुल देशमुख १७:५१, १९ जुलै २०११ (UTC)

पटले. लिखाणात थोडा बदल करावा लागेल. दुर्दैवाने मराठीत ‘मीडिया’ला सुयोग्य शब्द नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमे असा काहीसा शब्द वापरणे भाग आहे. त्यामुळे"जरी प्रसारमाध्यमे चालवणार्‍या काही व्यापारी आणि इतर संस्था, यूट्यूबच्या भागीदारीने या स्थळावर चलचित्रे टाकत असल्या, तरी इथल्या बहुतेक चित्रफिती मुख्यत्वे, सदस्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांनी चढवल्या जात असतात." हे चालेल? मुळात इंग्रजीचे भाषांतर करण्यापेक्षा, यूट्यूबवर काय असते हे आपल्याला नक्की माहीत असले की, आपल्या मर्जीने हवी तशी वाक्यरचना केली की काम झाले. मला जर हा लेख लिहायचा असता तर तर मी इंग्रजीत काय लिहिले आहे ते कधीच पाहिले नसते. मला जी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवायची आहे ती शब्दबद्ध केली असती. संपूर्ण मजकूर माझ्या शब्दांत लिहिला असता. ज्याला यूट्यूब म्हणजे काय हे माहीत नाही त्यानेच इंग्रजीच्या भाषांतराच्या फंदात पडावे....J १८:५८, १९ जुलै २०११ (UTC)


जे, आपण जीमेल लेखात इमेल ला निरोप संबोधले आहे पण महाजालावर निरोप म्हणजे मेसेज साठी वेगळी सुविधा आहे त्यास मेसेंजर म्हणतात जीटॉक (गूगल टॉक)हि सुविधा गुगल त्यासाठी देते. तेव्हा पत्र (मेल) हा शब्द प्रयोगच करावा का ? मी इपत्र हा शब्द वापरला होता. राहुल देशमुख १७:५९, १९ जुलै २०११ (UTC)

मान्य! विरोपाऐवजी विपत्र म्हणावे. मराठीत ई-मेलसाठी विरोप आणि विपत्र हे दोन्ही शब्द वापरले जातात...J १८:५८, १९ जुलै २०११ (UTC)


जे आपण Google Docks लेखात "सादरीकरण करण्यापूर्वी तयार केलेले निवेदनाचे कच्चे आराखडे" हा वाक्यप्रयोग Presentations साठी केला आहे तो पण थोडा बदलवता येइल का ?

कसा बदलवणार? spread sheets म्हणजे आकडेवारीचे तक्ते; store म्हणजे जतन करणे किंवा सांभाळून ठेवणे; Presentations म्हणजे सादरीकरण; आणि documents and data म्हणजे दस्तावेज आणि विदा. त्या लेखात संस्करणपूर्व असा शब्द होता, म्हणून कच्चे आराखडे म्हटले. सर्व पारिभाषिक शब्दांचे मराठीकरण केले, ते माझ्या मते बरोबर असावे. हो, अजून एक वाक्य टाकता येईल. गूगलच्या ज्या खातेदारांना कार्यालयच नाही त्यांना, किंवा कार्यालये असणार्‍यांनाही, असली कामे गूगल डॉक्सवर घरबसल्या करता येतात....J १८:५८, १९ जुलै २०११ (UTC)


Actually the service google docks is used to 'store 'spread sheets, Presentations, documents and data so that even you did not have office you can open it and work online. राहुल देशमुख १८:१०, १९ जुलै २०११ (UTC)

>>>>>>>>

  • नमस्कार जे,

>>>मुळात इंग्रजीचे भाषांतर करण्यापेक्षा, यूट्यूबवर काय असते हे आपल्याला नक्की माहीत असले की, आपल्या मर्जीने हवी तशी वाक्यरचना केली की काम झाले.

  1. On Youtube users can upload, share and view videos ह्या मधील share हा महत्वाचा मुद्दा आहे पण तो कसा काय मांडायचा ते जमले नाही. भागीदारी, सहयोग मध्ये मतितार्थ कळत नाही. आपण सुचवावे.
  2. मला असे वाटते कि फक्त 'सादरीकरणे' एवढेच म्हणावे "करण्यापूर्वी तयार केलेले निवेदनाचे कच्चे आराखडे" असे म्हणणे योग्य नाही कारण ते सादरी करणा नंतरही आणि पक्या स्व्ररुपात पण असू शकतात. पहा आपणास कसे योग्य वाटते ते.
  3. लेखात संस्करणपूर्व असा शब्द होता ->>> मला 'डेटा 'ला योग्य शब्द मिळत नव्हता काही शब्द कोशांनी त्यास संस्करणपूर्व माहिती असे संबोधले म्हणून मी पण तो वापरला. 'विदा 'हा चागला शब्द आहे भविष्यात मी पण वापरेन. 'did not have office ' This is related to the office software (eg. Ms office, Open office, libra office etc.) on your local PC or for hand held devices (like mobile, pads, pams). त्यामुळे >>>गूगलच्या ज्या खातेदारांना कार्यालयच नाही त्यांना, किंवा कार्यालये असणार्‍यांनाही, असली कामे गूगल डॉक्सवर घरबसल्या करता येतात ---हेही वाढवू नये असे वाटते.

जे, मला अजून Online, interactive, sharing, webbased ह्या शब्दांना मराठी शब्द मिळत नाही तेपण सागितले तर मदत होईल.

राहुल देशमुख २०:१२, १९ जुलै २०११ (UTC)


मेसेंजर आणि मेसेजर[संपादन]

इंग्रजीत मेसेज हे जसे नाम आहे तसे क्रियापदही आहे. त्या क्रियापदापासून Messager बनते, अर्थ, निरोप पाठवणारा. आणखी एक नाम होते ते Messenger, अर्थ - निरोप घेऊन जाणारा, निरोप्या, हरकारा, जासूद, दूत वगैरे. गूगलवर जी-टॉक आहे, त्यावर बोलता येते, लेखी गप्पा(चॅट) मारता येतात, आणि दुसरी व्यक्ती हजर नसेल लिखित किवा तोंडी त्रोटक निरोप(व्हॉइस मेल) ठेवता येतो. म्हणून जीटॉक हा Messenger आहे, Messager नाही.

ई-मेलने जो आपण पाठवतो तो त्रोटक नसून पुरेसा मोठा संदेश किंवा निरोप असतो. ते पत्र नसते, कारण त्यात मायना(ती. राजमान्य राजेश्री अमुकतमुक यांना बालके फलाण्याफलाण्याचा शिरसाष्टांग प्रणिपात), किंवा अशाच काही औपचारिक गोष्टींना थारा नसतो. त्याला फारतर चिठ्ठी-चपाटी म्हणता येईल. त्यामुळे ई-मेलला ई-पत्र(विपत्र) म्हणण्यापेक्षा विरोप म्हणणे अधिक योग्य आहे.

आपण मराठी विकीवर जे लिहितो ते इंग्रजी विपीतल्या मजकुराचे भाषांतरच का असावे. मी आजवर जेवढे लेख लिहिले त्यांतला एकही भाषांतरित नव्हता. उलट मी दिलेली माहिती काही जणांनी इंग्रजी विकीवर ठेवली आहे. इंग्रजी विकी तरी भरंवशाचा आहे का? विकीवरचे मराठी भाषाविषक लेख किंवा दीनानाथ मंगेशकरांवरचा लेख यांसारखे सत्त्याचा अपलाप करून केवळ बदनामीसाठी लिहिले आहेत. इंग्रजी विकीवर जेजे आहे ते त्रिकालाबाधित सत्य आहे असे कुणीही समजू नये. म्हणून निव्वळ भाषांतर न करता स्वतंत्र लेख लिहिणे अधिक चांगले.

Online, interactive, sharing, यांचे भाषांतर एकाच इंग्रजी शब्दात झाले पाहिजे हा आग्रह सोडला तर पर्यायी शब्द-रचना सुचू शकतात. मराठीतल्या कित्येक शब्दांवे इंग्रजी रूपांतर करायला एकाहून अधिक शब्द वापरावे लागतात. खोक, ठेच, टेंगूळ भाचेजावई, साडू यांचे इंग्रजी भाषांतर एका शब्दात करता येईल? ऑनलाइन= (आंतर)जालावर असता(असता)नाच; संकेतस्थळावर जाऊन/राहून(अर्ज भरणे वगैरे); (विजेचा, पाण्याचा)प्रवाह चालू असताना; यंत्रावरची कामाची साखळी सुरू असताना वगैरे वगैरे. शेअरिंग=दोघांनी(किंवा अनेकांनी/सर्वांनी) मिळून, सहभागाने(सहकार्याने आणि सहभागाने यांच्या अर्थच्छटा थोड्या वेगळ्या आहेत.). webbased = जालावर असलेला, जालस्थित, जालप्रविष्ट, जालाधारित वगैरे....J ०७:१४, २० जुलै २०११ (UTC)


  • नमस्कार जे,
मेसेंजर आणि मेसेजर तर कळले.
>>>ते पत्र नसते, कारण त्यात मायना(ती. राजमान्य राजेश्री अमुकतमुक यांना बालके फलाण्याफलाण्याचा शिरसाष्टांग प्रणिपात), किंवा अशाच काही औपचारिक गोष्टींना थारा नसतो. त्याला फारतर चिठ्ठी-चपाटी म्हणता येईल. त्यामुळे ई-मेलला ई-पत्र(विपत्र) म्हणण्यापेक्षा विरोप म्हणणे अधिक योग्य आहे.
येथे मात्र थोडी शंका आहे. सब्जेक्ट लिहिणे, वर डियर, लिहिणे, सीसी, बीसीसी आदी. ह्या नवीन प्रकारच्या साधनाच्या औपचारिक गोष्टीं (अमेरिकन पद्धतीच्या) आहेत त्यात फक्त राजमान्य राजेश्री, कळावे लोभ असावा अशा वाक्याच्या अनुपस्थितीने त्यास निरोपाचा दर्जा देणे योग्य नाही. सरकारी कामकाजात आणि न्याय व्यवस्थेत पण आज इमेलला पत्राच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त आहे मग आपणच का त्याचे अवमूल्यन निरोप म्हणून करावे? तेव्हा पत्र ह्या शब्दाच्या प्रयोजनाचा विचार जरूर व्हावा.
  • आपण मराठी विकीवर जे लिहितो ते इंग्रजी विपीतल्या मजकुराचे भाषांतरच का असावे?
मान्य ! पण संदर्भ म्हणून त्यास पाहण्यास काही हरकत नसावी. काही मुद्दे माहिती नसले/ विसरले असले तर मदतच होते पण शब्दशः भाषांतर असू नये याचाशी सहमत आहे.
  • >>>भाषांतर एकाच इंग्रजी शब्दात झाले पाहिजे हा आग्रह सोडला तर पर्यायी शब्द-रचना सुचू शकतात.
जे मराठीला आपणास ज्ञान भाषा करायची असेल तर अशे शब्द बनवायला आणि वापरायला सुरुवात कशी करायची (सुरुवातीस कंसा मध्ये मूळ शब्द पण लिहू) ? विक्शनरी प्रकल्पाचा आधार घ्यावा का ? पण शब्द वाढले पाहिजेत " माझिया मराठीची गोडी अमृताशी ..." मग आम्ही मागे का. शब्दांना लोकाश्रय मिळायला वेळ लागेल हे मी जाणतो पण केल्याने होत आहेरे ...आधी केलेची पाहिजे प्रमाणे सुरुवात व्हावी हीच अपेक्षा.
राहुल देशमुख १०:१३, २१ जुलै २०११ (UTC)

रिठा/रिंगणी[संपादन]

सादर नमस्कार ! रिठा- हा एक वृक्ष आहे. याची पाने उंबराच्या पानासारखी असतात.यास इंग्रजीत सोप बेरी/सोप नट असे म्हणतात.याचे संस्कृतातील नाव फेनिल आहे.[फेन=फेस (काढणारा)] याची उंची निलगिरी ईतकीही राहु शकते.बाजारात जो रिठा मिळतो तो याचे बी होय. बाया यास शिकेकाईत टाकतात.(डोक्यास लावावयाचे उकळलेले द्रावण) कारण याने साबणागत फेस येतो. हा विषघ्न आहे.लॅटीन नाव-Sapindus trifoliatus.


रिंगणी-लॅटीन नाव-Solanum Jacquini. हे एक क्षुप(झुडुपागत)असते.यात दोन प्रकार आहेत. एक- उभे झाड व दुसरे जमिनीवर पसरणारे.(गुजरातीत- उभी भोरिंगणी-बेठी भोरिंगणी) याचे संस्कृत नाव कंटकारी आहे.फारसीत यास बार्दजान जंगली म्हणतात.यास फुलांवरुनही भेद आहेत- एक काळसर निळ्या फुलांची व दुसरी पांढर्‍या फुलांची.पांढर्‍या रिंगणीस लक्ष्मणा असे म्हणतात.ही दुर्मिळ / फार कष्टाने सापडते.आयुर्वेदिक औषधात याचे बहुतकरुन मुळ वापरतात.(रिंगणमूळ)याची फळे साधारणतः सुपारीएवढी असतात.

माझ्या मते लॅटीन नाव हे त्या वनस्पतीस अनुरुप असेलच असे नाही. ते देणार्‍याचा अनुभव व ज्ञान जमेस धरले जावे असे माझे मत आहे.आपल्या वनस्पतींचे साधर्म्य तेथिल वनस्पतींशी ताडुन मग ते नाव दिले जाते. जबरद्स्तीने साच्यात बसविल्यागत.असो. हे माझे वैयक्तिक मत आहे.

आपण लिहिलेल्या काही नावात दुरुस्ती करणे आहेत.(किरकोळ). त्या यथावकाश करीलच.काही ठिकाणी स्पेलिंग चुकले आहेत. मी वनस्पतीशास्त्रिय नावांबद्दल खात्री देउ शकत नव्हतो म्हणुन आपणास विनंती केली होती.

आपण केलेल्या मदतीबद्दल असंख्य धन्यवाद.चुक भूल माफ.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:२०, २६ जुलै २०११ (UTC)

गरजच कळल्या नाही तर उपाय कशे सापडणार ..[संपादन]

नमस्कार जे, युनिकोड च्या चौकटीत राहून जे काही करता येईल ते सर्व शक्य आहे पण ज्या गोष्टींना युनिकोडच सपोर्ट करत नसेल तेथे मर्यादा आहेत. पण आपण सर्व प्रकारची गरज सांगा आपण शक्य तितक्या गोष्टी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू कारण जर गरजच कळल्या नाही तर उपाय कशे सापडणार. राहुल देशमुख १८:३९, २६ जुलै २०११ (UTC)


मग काहीच शक्य नाही[संपादन]

युनिकोडवर पूर्वी अ‍ॅ, र्‍य आणि र्‍ह ही मराठी अक्षरे नव्हती. पुढे फारच आरडाओरडा झाल्याने त्यांना या अक्षरांची सोय करावी लागली. तरीसुद्धा बहुतेक देवनागरी फ़ॉन्टांत ही अक्षरे नसल्याने ती टंकता येतीलच अशी खात्री नाही. युनिकोडने मराठीत कधीही न लागणारे र्‍हस्व एकार-ओकार-ऐकारांच्या मात्रा दिल्या आहेत. या फक्त दाक्षिणात्य भाषांना लागतात. नुक्ता असलेली य़, ऱ आणि न ही अक्षरे दिली आहेत. यांतली पहिली दोन नेपाळीसाठी आणि शेवटचे फक्त तमिळसाठी लागते. त्र आणि श्र ही हिंदी मुळाक्षरे आहेत, त्यांची सोय युनिकोडने केली आहे. नुक्ता असलेली क़, ख़, ग़, ड़, ढ़, युनिकोड देते, पण मराठीत लागणारी च़, झ़ यांची सोय नाही. अक्षरावर काढायची चंद्रकोर ही मल्याळीत अतिर्‍हस्व उ काढण्याकरिता लागते, ती दिली आहे, पण मल्याळीत असते तशी तिरपी. थोडक्यात काय, तर युनिकोड मराठीसाठी नाही, त्यापेक्षा आन्सी बरे होते. आन्सीत मराठीतली सर्व अक्षरे छापता येतात. उदा० रफार असलेली अ, आ. उ, ए, ऐ आणि ऋ. अशी अक्षरे हविर्‌अन्न, कुर्‌आन, पुनर्‌उच्चार, पुनर्‌ऐक्य आणि नैर्‌ऋत्य हे शब्द टंकण्यासाठी लागतात. पाऊण य नाही, त्यामुळे ट्य, ड्य, छ्य ही अक्षरे टंकायची सोय ठेवलेली नाही. विकीवर आन्सीची सोय ठेवली तर ही अक्षरे टाइप करता येतील. मराठी छापखानावाले आणि पुस्तक प्रकाशक आन्सी का वापरतात याचा विचार करावा. ..J १९:०३, २६ जुलै २०११ (UTC)


टिपणी[संपादन]

नमस्कार जे,

माहितीगाराने चावडी ध्येय आणि धोरणेवर आपल्याला उद्देशून काही मुद्दे मांडले आहेत पुराव्या दाखल काही संदर्भ पण जोडले आहेत. चर्चा पुढे नेण्यासाठी आपण टिपणी देऊन चर्चेला दिशा द्यावी हि विनंती. राहुल देशमुख १४:०३, २८ जुलै २०११ (UTC)

धमाल[संपादन]

हि चर्चा आणि यात दिलेल्या चर्चेच्या दुव्यातील चर्चा नजरे खालून घालावी. राहुल देशमुख २१:०१, २९ जुलै २०११ (UTC)

सहकार्याची विनंती[संपादन]

विकिपीडिया:कौल पानावर मागे मराठी विकिपीडियामधील सध्याच्या मराठी लेखन प्रणालीची विस्तारीत अंमलबजावणी प्रस्ताव मांडला होता ज्यात आपण पण भाग घेतलात. संबधित पानावर आणि इतरत्र मध्यंतरी पुन्हा चर्चा विखुरलेल्या ठिकाणी झाल्यामुळे तसेच ज्या गोष्टी युनिकोडाच्या परिघात सध्या शक्य आहेत आणि ज्यास युनिकोड कंसोर्टीयम पर्यंत जाऊन प्रयास करावयाचे अथवा युनिकोडाच्या बाहेरच जायचे अशा विलंब लागणार्‍या चर्चेशी सरमिसळ झाल्यामुळे अमलबजावणीकरता काँसंट्रेट करणे आणि एक-एक प्रश्न धसास लावणे यात विलंब होतो.
वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होते आहे माहित असले तरी चर्चेत सहभागी होणे आणि काँसंट्रेट करणे होतेच असे नाही त्यामुळे आता पर्यंत झालेल्या चर्चेच्या बळावर सहमती झालेल्या आणि लगेच शक्य असलेल्या भागाची सुट सुट पुर्नमांडणी विकिपीडिया:कौल पानावर करून देण्यात आपण सहकार्य देऊ केल्यास एक-एक प्रश्न धसास लावता येईल या दृष्टीने हि नम्र विनंती माहितगार ०९:५४, १० ऑगस्ट २०११ (UTC)

आमंत्रण[संपादन]

नमस्कार, विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे सदस्य होण्यासाठी आपल्या आमंत्रण आहे! विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म/सदस्य येथे सदस्य सूची मध्ये आपले नाव वाचण्यास उत्सुक आहे. निनाद ११:२३, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011[संपादन]


Hi ज,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

po·grom शब्दाचा अर्थ[संपादन]

नमस्कार, दंगल या लेखातील शब्दार्थांच्या संबधाने po·grom/ˈpōgrəm/ (Noun: An organized massacre of a particular ethnic group ) असा डिक्शनरी मिनींग येतो आपण कार्यक्रम हा शब्द नजरचुकीने नोंदवला असावा असे वाटते. नरसंहार किंवा वंशसंहार असाकाही मराठी शब्द सुयोग्य ठरेल किंवा कसे ते कळावे.
आपला नम्र
माहितगार १३:१४, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

मला संशय आला होता, की हा काहीतरी वेगळा शब्द आहे.Programme नसावा. मी कधी ऐकला नसल्याने प्रतिशब्द सुचवणे कठीण आहे. पण वंशसंहार जास्त योग्य असावा....J १३:५७, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

हो माझाही या शब्दाचा परिचय तसा अलिकडचाच. इंग्लिश विकिपीडियावर यावर en:Pogrom येथे वेगळा लेख आहे. शब्दाच्या उपयोगाबद्दल तिथे माहिती दिसते.माहितगार १६:५५, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

अर्थात खूप फरक पडत आहे[संपादन]

शुद्धलेखनात आपण करत असलेल्या सक्रीय मदती बद्दल खूप खूप धन्यवाद. पूर्वनियोजीत दंगली विभागत आपण वाक्यांची सुटसुटीतपणा यावा म्हणून तसेच व्याक्रणाच्या दृष्टीने पुर्नरचना केल्याचे दिसते , माझी वाक्यांची पुर्नरचना करण्यास हरकत नाही पण परिच्छेदातून अभिव्य्क्त होणार्‍या अर्थात काही ठिकाणी फारच फरक पडतो आहे.

पूर्वनियोजीत दंगली +

आधूनिक काळात आर्थिक,सामरीक अथवा आतंरराष्ट्रीय राजकारणातील हितसंबंध जपण्याच्या दृष्टीने इतर राष्ट्रातील नको असलेल्या राजवटी उलथवणे अथवा शत्रूराष्ट्रात अंतर्गत कलह माजवण्याच्या दृष्टीने इतर हिंसक मार्गांसोबतच गुप्तपणे दंगलींना प्रोत्साहन देणे अथवा तशी आर्थिक परिस्थिती संबधीत राष्ट्रात निर्माण कशी करता येईल याचेही प्रयत्न वेळोवेळी झाल्याचे अथवा तसे संशय व्यक्त केले गेल्याचे आढळून येते.


आधुनिक काळात आर्थिक, सामरिक अथवा आंतरराष्ट्रीय राजकारणातील हितसंबंध जपण्याच्या दृष्टीने, इतर राष्ट्रातील नको असलेल्या राजवटी उलथवणे, अथवा शत्रूराष्ट्रात अंतर्गत कलह माजवण्याच्या दृष्टीने इतर हिंसक मार्गांसोबतच गुप्तपणे दंगलींना प्रोत्साहन देणे, अथवा त्या राष्ट्रात तशी आर्थिक परिस्थिती निर्माण करून दंगल होईल असे पाहणे असे प्रयत्न वेळोवेळी झाल्याचे अथवा तसा संशय व्यक्त केला गेल्याचे आढळून येते.


मी ठळक केलेल्या वाक्यात आपण जो बदल केला त्यामुळे वाक्य सुटसुटीत दिसत असले तरी आरोप फारच स्पष्ट स्वरूपाचा होतो आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी हि पुरावे उपलब्ध न होण्या इत्पत गोपनीयच असते, असे नाही तर खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळी असणारी असते.आपला उद्देश दंगल घडवण्याचा आहे अशी कबूली कोणतही राष्ट्र देत नाही एवढ उघडपणे केल तर जनतेच्या लक्षात येते आणि जनता सर्कारच समर्थन करते आणि सरकार आधिकच बळकट झाल्याचा उलटा अनुभव येतो अथवा उशीराने अशा राष्ट्रा बद्दल असंतोष निर्माण होतो या बाबत आमेरिकेचा पनासच्या दशकात इरानमधे केलेला हस्तक्षेप ८०च्या दशकात अमेरीकेस अचानक भोवला.भारताने अलिकडच्या काळात नेपाळमध्ये राजेशाही ढिली होऊन लोकशाही यावी म्हणुन केलेली नेपाळची आर्थिक नाकेबंदी आठवत असेल तर त्या ठिकाणी उद्देश केवळ मर्यादीत अस्थैर्य आणण्याचा होता प्रत्यक्ष दंगल घडावी असा उद्देश नव्हता पण अशा परिस्थितीची परिणती दंगलीत पण होऊ शकली असती.



- काही वेळा -रस्तारुंदीकरणात स्वतःच्या दुकांनांची जागा जाऊ नये म्हणून, हवी असलेली मोठी कंत्राटे हातची जाऊ नये अथवा मिळावीत अशा प्रकारचे आणि तत्सम- आर्थिक हितसंबध जपण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्ग नोकरशाहीतील किंवा सत्तेतील नको असलेल्या व्यक्तींवर अकार्यक्षमतेचा ठपका येऊन दुर व्हाव्यात शिवाय झालेल्या अथवा तसे दाखवलेगेलेल्या अर्थिक हानीच्या बदल्यात विमा संस्थाकडून भरपाईच्या नावाने कमाई व्हावी या दृष्टीने, तर स्वतःच्याच राजकीय पक्षातील नको असलेल्या गटाच्या हातातून सत्ता जाउन आपल्या गटाच्या हाती यावी- याही बाबतीत व्यापारीवर्गाशी साटे लोटे असल्याचे आरोप होतात-. अथवा स्वतःच्या राजकीय पक्षास विशिष्ट गटाची मते मिळावीत या करता मतांचे ध्रूवीकरण घडवणे याकरिता दगंली घडवल्या जात असल्याचे आरोप होतात हे निदर्शनास येते.


काही वेळा रस्तारुंदीकरणात स्वतःच्या दुकांनांची जागा जाऊ नये म्हणून दंगली होतात. हवी असलेली मोठी कंत्राटे मिळावीत आणि मिळालेली हातची जाऊ नये यासाठी वा तत्सम आर्थिक हितसंबध जपण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्ग नोकरशाहीतील किंवा सत्तेतील नको असलेल्या व्यक्तींवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून दंगली घडवून आणतो. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्याच राजकीय पक्षातील नको असलेल्या गटाच्या हातातून सत्ता जाऊन आपल्या गटाच्या हाती यावी यासाठीही व्यापारीवर्ग दंगली घडवून आणतो. स्वतःच्या राजकीय पक्षास विशिष्ट गटाची मते मिळावीत याकरता मतांचे ध्रुवीकरण घडवण्यासाठीही दंगलीचा मार्ग अवलंबिला जातो.

इथे अर्थात फारच जास्त फरक पडत आहे.अनधिकृत झोपडपट्टी पाडली जाते तेव्हा होणार्‍या दंगली दुखावल्या जाणार्‍या जनतेचा उघड सहभाग असलेल्या असु शकतात. आपण "रस्तारुंदीकरणात स्वतःच्या दुकांनांची जागा जाऊ नये म्हणून दंगली होतात." असा जो बदल केला तसा व्यापारी वर्ग दंगलीत उघड सहभाग घेत नाही अप्रत्यक्ष पडद्या मागे गोष्टी घडतात.बर्‍याच व्पार्‍यांच्या जागा स्वतःच्य नसातता पागडीवर खूप पूर्वीच्या काळात नगण्य भाड्यावर चालू राहीलेल्या असतात.शिवाय ती जागा जाऊन नवीन मिळणार्‍या जागेत तेवढाच धंदा होईल का नाही याची शास्वती नस्ते त्यामुळे उद्देश काल हरणाचा असतो. एकदा मास्टरपालमध्ये आपली जागा जाणार असे लक्षात आले की संबंधीत रस्त्या काठच्या सर्वच धर्मांच्या धार्मिक स्थांनाना अचानक उर्जीतावस्था येते अथव जी मंदीरे कधीच नव्हती ति दिसू लागतात कारण संबंधीत व्यापारी वर्ग त्यावर पैसा खर्च करू लागतो आणि स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरतो आधी तथाकथीत संबंधीत ..... पुढार्‍यांतर्फे ती धार्मिक स्थाने पुरातन वगैरे आहेत असे सांगून अर्ज विनंत्यात मग कोर्ट कचेर्‍या होतात आधिकारी वर्ग ऐकण्यात आहे तो पर्यंत काही प्रॉब्लेम नसतो. कारवाईकरणारा आधिकारी आला की व्यापारी समोर नसतो इतरांच्याच भावना अचानक उचंबळून येतात.
दुसरा बदल जो तुम्ही केला आहेत त्यात क्रोनॉलॉजीत मोठा फरक आहे, अकार्यक्षमतेचा ठपका आधि ठेवला जातो आणि मग दंगल घडवली जाते असे नाही, तर आधी जनक्षोभ घडवला जातो अर्थात यत व्यापारी वर्ग समोर कधिच उभा नसतो जनतेला समोर दिसणारी राजकीय/धार्मिक इत्यादी माणसे वेगळीच असातात , मग या हा अधिकारी/नेता जनक्षोभ वेळीच शांत करण्यात अयशस्वीझाला असा ठपका नंतर ठेवला जातो व तो अधिकारावरून पाय उतार होईल अस पाहील जात.

अभिप्रेत असलेला अर्थ[संपादन]

परत आणता येईल अशी वाक्यरचना करावी लागेल. पण ती फारच विचारपूर्वक करावी लागेल. वाक्ये सुटसुटीत पण ठेवावी लागतील. हे काम थोडे अवघड आहे, प्रयत्न करीन. सहज शक्य असेल तर आपण बदल केलेत तरी चालतील....J १८:३६, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

सावकाश झाले तरी हरकत नाही. तसे त्या विभागत मला अजून दोन एक परिच्छेदांचे लेखन करावयाचे आहे त्यासोबतही याचा पुन्हा विचार करता येईल. माहितगार १८:४७, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:०७, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

बोली भाषा[संपादन]

नमस्कार जे,

बोली भाषा कि प्रमाण भाषा ह्यावर चावडीवर चर्चा सुरु आहे. आपणही आपले मत मांडावे असे वाटते. राहुल देशमुख ०६:३६, २६ ऑगस्ट २०११ (UTC)

धूळपाटी[संपादन]

नमस्कार जे,

आपण धूळपाटी नावाच्या लेखांचे संपादन करू नये. कारण धूळपाटी ह्याचा अर्थ हे काम प्रायोगिक कारणास्तव आहे (स्क्र्याच प्याड). सर्वसाधारणतः धूळपाटी येथे प्रयोग करून ते यशस्वी झाले तर विपित ते संस्थापित करण्यात येतात. कामा नंतर धूळपाटी पाने मिटवून टाकण्यात येतात. धूळपाट्या ह्या विपी लेख म्हणून ग्राह्य धरत नाहीत, ती सराव अथवा प्रयोगाची सुविधा आहे. तेव्हा त्याचे संपादन करू नये. या आधीपण आपण धूळपाटीचे संपादन केलेले मी पहिले आहे तेव्हाही मला थोडे आश्चर्य वाटले होते, पण आपणास कदाचित हे माहित नसल्याने तसे झाले असावे असे मला वाटते. आपली मेहनत आणि वेळ उगाच वाया जातो. राहुल देशमुख १७:२७, २७ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिपीडिया:प्रमाणपत्र[संपादन]

बार्नस्टारच्याच धर्तीवर पण इतर काही उद्दीष्ट्ये साधण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:प्रमाणपत्र नावाचे पान मागेच मी सुरू केले होते शिवाय स्ट्रॅटेजी विकिवर सविस्तर प्रस्तावही मांडला होता.स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडीयाकरता प्रस्ताव अमलात यावा म्हणून व्यवस्थित दिसणार्‍या सर्टीफिकेट टेम्प्लेटची आवश्यकता होती ते काम राहूल देशमुखांनी चांगलेच पार पाडले आहे.त्यांनी बनवलेल टेम्प्लेट आणि संबधीत चर्चा विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र नमूद केली आहे विकिपीडिया:प्रमाणपत्र स्ट्रॅटेजी विकिवर मांडलेला प्रस्ताव तसेच विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र चर्चा सविस्तर पाहून घेऊन विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र#प्रमाणपत्र झलक येथे आपली सविस्तर प्रतिसाद नोंदवावा तसेच काही शुद्धलेखन किंवा इतर सुधारणा नोंदवायच्या असल्यास त्या देखिल नोंदवाव्यात. या प्रकल्पात सध्याच्या सक्रीय सदस्यातून राहूल शिवाय निनाद,मनोज हे ऑन लाईन तर मंदार आणि अभिजीत सुर्यवंशीना फिल्ड मध्ये म्हणजे पुण्यातील विकिभेटी आणि एजूकेशन प्रोग्रमच्या माध्यमातून आणि कार्यशाळातून पोहोचवण्याच्या दृष्टीने सामिल करून घ्यावे असा मानस आहे. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असेनमाहितगार ०६:२१, २९ ऑगस्ट २०११ (UTC)

निष्णात हात[संपादन]

विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक/प्रतिसादpreload‎ येथे कृपया आपला निष्णात हात फिरवावा ही सादर विनंती.तेथे शुद्धलेखन आवश्यक आहे. मी तेथे भाषांतर केले आहे तेही कृपया तपासावे व त्यात आवश्यक ते बदल करावेत ही पुनश्च विनंती. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:१८, १ सप्टेंबर २०११ (UTC)

होय मी सुद्धा हिच विनंती घेऊन आलो होतो नरसिकरजींनी विनंती केलीच आहे मी फक्त मम म्हणून दुजोरा देतो. माहितगार १५:५६, १ सप्टेंबर २०११ (UTC)

--- विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमूवर थोडेफार काम केले आहे, कसे वाटते ते लिहावे....J १७:२४, १ सप्टेंबर २०११ (UTC)

  • अप्रतिम.म्ह्णुन तर निष्णात हात म्हणत होतो.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०७:५६, २ सप्टेंबर २०११ (UTC)

विकिपीडिया:सजगता[संपादन]

विकिपीडिया:सजगता च्या सुरक्षा पातळीत तात्पूरता बदल केला आहे आपल्याला स्वतःला आणि (दाखल झालेल्या सदस्यांना) आता सरळ बदल करता येतीलतुमचे काम संपल्या नंतर एखाद आठवड्याने पुन्हा सुरक्षीत करेन. माहितगार १४:१८, ४ सप्टेंबर २०११ (UTC)

मध्य प्रदेशातील जिल्हे[संपादन]

सादर नमस्कार! शिवपुरी जिल्हाशिवपुर जिल्हा तसेच होशंगाबाद कि हुशंगाबाद याचा तपास करुन कृपया आवश्यक ते बदल करावेत ही विनंती.मी या नावांबद्दल खात्रीलायकरित्या सांगु शकत नाही.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:५७, ९ सप्टेंबर २०११ (UTC)

विद्यार्थी[संपादन]

आदरणिय जे! माझ्या ज्ञानात बरीच मोलाची भर पडली.'मनुष्य हा जन्मभर विद्यार्थीच असतो' या उक्तिशी मी सहमत आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:५८, ९ सप्टेंबर २०११ (UTC)

ही राणी पद्मिनी नावाची नटी जेव्हा हिंदी चित्रपटांत कामे करायची तेव्हा तिचे नाव 'पद्मिनी' होते, असे मला वाटते. राज कपूरच्या 'जिस देस में गंगा बहती हैं' मध्ये नायिका पद्मिनी होती. तिच्या बहिणीचे नावही रागिणी होते. तीच जर ही मल्याळम नटी 'राणी पद्मिनी' असेल तर पानाचे शीर्षक नुसते 'पद्मिनी' करायला पाहिजे. आणि शिवाय पद्मिणीतला णी निखालस चुकीचा आहे. ...J ०६:०८, १३ सप्टेंबर २०११ (UTC)

राणी पद्मिनी[संपादन]

I think we should explicitly mention the word actress, (अभिनेत्री) to the राणी पद्मिनी Article, as राणी पद्मिनी can refer to Rani Padmini of Chittor which should be the preffered for राणी पद्मिनी title.

प्रबोध ०६:०१, १३ सप्टेंबर २०११ (UTC)

अॅ विषयी[संपादन]

नमस्ते. मी ज्यावेळेस अॅ टंकीत करतो त्यावेळेस असाच येतो आपला अ ॅ असा येत नाही. अ आणि ॅ यामध्ये जी एक मोकळी जागा आहे ती काढल्यास परत तो अॅ होतो आपल्या अ ॅ मध्ये हि मोकळी जागा येत नाही. असे का होते याचा खुलासा करावा. किंवा तुमच्यासारखा अॅ कसा टंकीत करु याचे मार्गदर्शन करावे. संतोष दहिवळ १७:४७, १९ सप्टेंबर २०११ (UTC)


विकिपीडिया कॉन्फरन्स[संपादन]

नमस्कार जे,

विकिपीडिया कॉन्फरन्स बाबत आपण चावडीवर वाचलेच असेल. आपण त्यास उपस्थित राहणार आहेत का ? सदर कार्यक्रमात मराठी विकिपीडिया साठी काय काय आणि कसे करावे असे आपणास वाटते ? कळवावे राहुल देशमुख ११:३५, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

संपर्क[संपादन]

जे नमस्कार, आपल्याशी संपर्क साधण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. काय आपण marathiwikipedia@gmail.com वर विपत्र देऊ शकता. जेणे करून संवाद साधणे सोपे जाईल. धन्यवाद राहुल देशमुख २०:४७, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

Marathi Track[संपादन]

नमस्कार जे,

विकी संमेलनातील मराठी track ला मराठीत नेमके काय संबोधावे ? तसेच आपण विकिपीडिया:चावडी/विकिसंमेलन भारत २०११ येथील पानांचे पण शुद्ध लेखन चिकित्सा करून द्यावी हि विनंती. राहुल देशमुख १६:३५, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

  • मराठी साहित्य संमेलने वैगरे ठिकाणी अनेक प्यारेलल ट्रॅक चालतात त्यांना काय नावाने संबोधतात, आणि जसे आपण नेहमी सुचवतात एकाच शब्दाचा हट्ट सोडला तर परिचत/रूढ काही शब्द आढळल्यास सांगावे. पर्यायी योग्य शब्द मला माहित नसल्याने बर्याच ठिकाणी मी सत्रे असे लिहित आहे पण त्यांनी पूर्ण अर्थ बोध होत नाही.
मार्गिका शब्द छान आहे. पण थोडा अपरिचित वाटतो अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. राहुल देशमुख १७:३७, २७ सप्टेंबर २०११ (UTC)
  • जे, मराठी सदर असे काही महाजालावर सापडले पण ह्याचा आर्थ चपखल बसतो का ते सांगावे. राहुल देशमुख १८:०१, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

मास्टर कृष्णराव - पुनर्निर्देशन[संपादन]

नमस्कार जे,, कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर हे पान मास्टर कृष्णराव मथळ्याखाली स्थानांतरित केले हे तुम्ही अगदी योग्यच केले. मी पण विचार करत होतो की "कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर" या नावाच्या जागी "मास्टर कृष्णराव" हेच लेख शीर्षक असावे. बालगंधर्व, सवाई गंधर्व आणि अशा अनेक लेखांसाठी पण आपण असेच करावे का?.... आदेशाच्या प्रतीक्षेत !!!मंदार कुलकर्णी १४:३८, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

गौरव[संपादन]

उप-संपादकाचा बार्नस्टार
J, मराठी विकिपीडियावरील लेखांमधल्या चुका सुधारून लेख दर्जेदार बनवण्यामधील तुमच्या कामगिरीची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने हा गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.


अभय नातू ०४:३१, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)

ऑपरेशन चॅस्टाईज[संपादन]

नमस्कार जे, लेखात आपण केलेल्या दुरुस्त्यांबद्दल धन्यवाद. पण लेखात आपण राईसच्या विमानातील बॉम्ब धरणाच्या पाण्यात पडला असा बदल केला. पण तो बॉम्ब धरणात नव्हे तर जर्मनीत घुसण्यापूर्वीच समुद्रात पडला.

राम गबाले[संपादन]

धन्यवाद, राम गबालेंबद्दल इंग्रजी विकिपीडियावर लेख यावा म्हणून SNDTच्या एक विकिपीडिया संपादन प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी en:User:Shreyeah/Ram Gabale येथे लेख लिहून ठेवला आहे पण त्यांनी दिलेले सध्याचे संदर्भ पुरेसे सबळ नाहीत असे कारण देऊन मुख्य लेख नामविश्वात तो लेख येऊ शकलेला नाही. राम गबालेंबद्दल आपल्याकडे अधिक माहिती असल्यास en:User:Shreyeah/Ram Gabale लेखाच्या सुधारणेत त्यांना जमेल ते सहाय्य करावे ही नम्र विनंती माहितगार १५:५६, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)

कवींची नावे[संपादन]

J,

मराठी विकिपीडियावरील संकेतांनुसार कवी, लेखक, इ. बद्दलचे लेख पूर्ण नावाखाली असतात आणि त्यांच्या तखल्लुस/टोपणनावांकडून पुनर्निर्देशन असते, तरी तुम्ही पुनर्निर्देशित केलेले लेख पुन्हा मूळ शीर्षकाकडे हलवावेत ही विनंती.

अभय नातू १८:१९, १८ ऑक्टोबर २०११ (UTC)


लेख लिहिताना तो सर्वपरिचित नावाने लिहावा आणि नंतर तो पूर्ण नावाखाली पुननिर्देशित करावा. असे केले तरच विकीचा वापर करणार्‍याला तो लेख सापडू शकेल. जर आधीच मूळ लेखाचा मथळा बहुधा अपरिचित अशा पूर्ण नावाने असला, तर नाईलाजाने तो टोपण किंवा व्यावहारिक नावाखाली बदलणे भाग आहे.

आधीच लेख नारायण सूर्याजी ठोसर-कुलकर्णी या शीर्षकाचा असेल तर तो उघडून वाचायचे कुणाच्यातरी डोक्यात येईल का?...J १८:१९, १९ ऑक्टोबर २०११ (UTC)

लेख लिहिताना तो सर्वपरिचित नावाने लिहावा आणि नंतर तो पूर्ण नावाखाली पुननिर्देशित करावा. असे केले तरच विकीचा वापर करणार्‍याला तो लेख सापडू शकेल.
नाही. पुनर्निर्देशनाची सोय असताना व वापरली असताना तुम्ही म्हणता तसे होणार नाही. नारायण सूर्याजी ठोसर असे शोधले असता वाचक/लेखक समर्थ रामदास स्वामी येथे आपोआपच जाईल.
अभय नातू १९:०४, १९ ऑक्टोबर २०११ (UTC)
जसे वाचक नारायण सूर्याजी ठोसरकडून समर्थ रामदास स्वामीकडे आपोआप जातो तसेच समर्थ रामदास स्वामी शोधले असता तो/ती नारायण सूर्याजी ठोसरकडेही आपोआपच जाईल. माधव जुलियन म्हणजे माधव त्रिंबक पटवर्धन हे कितींना माहिती असेल? :-) आणि आरती प्रभू म्हणजेच चिंतामणी त्र्यंबक खानोलकर हे ही अशा पुनर्निर्देशनाने स्पष्ट होते!!
मला वाटते लेख-शीर्षक A वरून B कडे नेले की ते पुनःपुनर्निर्देशित करून A कडे नेता येत नसावे. A नावाचा लेख आधीच अस्तित्वात आहे, त्यामुळे पुनर्निदेशन होणार नाही असे काहीसे येते
पुनर्निर्देशन असताना ते उलटवता येते(अ->ब असताना ब->अ). असे करताना मध्ये जे पान येते तो फक्त इशारा असतो की आधीच पुनर्निर्देशन असताना नक्की उलटवायचे आहे ना. तेथील चेकबॉक्सवर क्लिक करुन पुन्हा प्रयत्न केला असता पुनर्निर्देशन उलटते.
असो. शीर्षक अ (पूर्ण नाव) असावे कि ब (टोपणनाव) यावर पूर्वी बरीच साधकबाधक चर्चा झाली होती आणि त्यानंतर आपण अ शीर्षक असावे असा संकेत ठरवला. तो जर बदलायचा असेल तर पूर्वीची चर्चाही शोधून त्यातील मते बघावी व गरज वाटल्यास पुन्हा त्याबद्दलची मते मागवावी.
धन्यवाद.
अभय नातू १७:५६, २० ऑक्टोबर २०११ (UTC)

संपादा .. ???[संपादन]

>>*"... संपादा" : याऐवजी "... संपादित करा" किंवा "... या संचिकेचे संपादन करा" असे अधिक योग्य होईल. << कबूल. संपादा हे चुकीचे नाही, पण संपादित किंवा संपादन करा असा बदल करायला हरकत नाही.

>>*"सुचना" : "सूचना" असे शुद्धलेखन असल्याचे स्मरते.<< नक्की. सूचना हेच सुयोग्य लिखाण आहे.

>>अशा पानांमधे / मेसेजेसमधे बदल कसा करावा हे मला माहिती नसल्याने मदतीची अपेक्षा.... :)<<

बदल करण्यासाठी प्रशासकांनी संपादनासाठी ते पान मुक्त करायला हवे, तसे केले नसेल तर आपण बदल करू शकत नाही. प्रशासकांशी मदत घ्यावी लागेल....J १८:३०, १९ ऑक्टोबर २०११ (UTC)

एरबस, एअर बस[संपादन]

गुगलवर शोधल्यावर एरबसची ४,३९० पाने मिळाली, एअरबसची २,७६०, एयरबसची ३२,६००(सगळी हिंदी), एयर बसची ३८,३००(सगळी हिंदी) आणि एअर बसची ३४,३०० पाने सापडली. त्यामुळे "एअर बस" हेच प्रचलित मराठी लिखाण आहे, असे अनुमान काढायला हरकत नाही.....J १०:०६, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)

J,
हे आकडे शोधून काढल्याबद्दल धन्यवाद. परंतु --
१. वरील एअर बस लिहिलेल्या ३४,३०० पानांपैकी किती पाने मराठी होती आणि किती हिंदी/नेपाळी/फिजी हिंदी/इ ?
२. पूर्वी आपण चर्चिल्याप्रमाणे इतर ठिकाणी अशुद्धलेखन आढळण्याची शक्यता मोठी आहे, विशेषतः दैनिके, नियतकालिके आणि इतर संकेतस्थळांवर अशा चुका सर्रास आढळून येतात. :गूगलमहाराज चूक किंवा बरोबरची शहानिशा करीत नाहीत तर फक्त असलेल्या शब्दांची जंत्री देतात.
३. एअर बसमध्ये प्रथमदर्शनीच चूक आहे कारण या कंपनीचे नाव Airbus असे आहे, Air Bus किंवा Air bus नाही.
तरी गूगलवर जास्त आढळल्यामुळे एअर बस हेच बरोबर हा तुमचा युक्तिवाद मुळीच पटत नाही.
अभय नातू १७:५०, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)

अपेक्षा[संपादन]

बर्याच दिवसांनी आपल्याला इथे पाहून परत उत्साह वाढला आहे. अनेक लेख आपला हात फिरवण्याची वाट पाहत आहेत. तूर्तास एवढेच. संतोष दहिवळ १६:२३, २३ नोव्हेंबर २०११ (UTC)

एअर इंडिया[संपादन]

एअर इंडिया हा शब्द खुद्द एअर इंडिया विमान कंपनी असाच लिहिते.

एर इंडिया कंपनी मराठीत लिहीत नाही.

अभय नातू १६:४६, २३ नोव्हेंबर २०११ (UTC)

>>एर इंडिया कंपनी मराठीत लिहीत नाही.<< का लिहीत नाही? एअर इंडियाच्या मराठी जाहिराती नसतात?
एर इंडियाच्या जाहिराती मराठी असल्या तर त्यातील मजकूर लिहिणारा व्याकरणपंडित आहे असे तुम्ही गृहीत धरत आहात. छापील आणि दूरचित्रवाणी माध्यमांतून मराठीचा रोज कसा खून होतो हे सुविदित आहेच. तरी तेथील मजकूर आधार धरुन केलेला युक्तिवाद पांगळाच ठरतो.
शिवा जी लिहिणारे नक्की मराठी नसतात, शिवाजी लिहिणारे मराठ्येतर असू शकतात. त्याच धर्तीवर, एर इंडिया लिहिणारे खचित मराठी नसतात, एअर इंडिया लिहिणारे अन्यभाषक असू शकतात. लता मंगेशकरांना लता जी म्हणणारे निश्चित अमराठी असतात, व्यक्तिनामाआधी मा. लावणारे खात्रीने गल्लीबोळातले किंवा हमसडकेवरचे राजकीय पुढारी असतात. मा. न लावणारे इतरही असू शकतात...
मराठी माणसे शिवा जी, लता जी लिहू शकत नाहीत? गचाळ मराठी शुद्धलेखन आणि व्याकरण हे फक्त अमराठी व्यक्तींचे क्षेत्र नाही. मराठी पत्रकार, जाहीरातकार सुद्धा त्यात महापराक्रम गाजवू शकतात. एअर इंडिया हे त्यातलेच. अमराठी (विशेषतः हिंदी) शब्द मराठीत (मराठी असल्यासारखे) घुसडले जाण्यात या महारथींचे अज्ञान किंवा आळशीपणा हे कारणीभूत आहे. यांचा आधार घेउन व्याकरण चालवू नये असे माझे नम्र मत आहे.
अभय नातू १९:१९, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)
नमस्कार, मला या चर्चेबद्दल अजून माहिती मिळेल का? एर कि एअर या बद्दल मी माझं मत (उगाच) मांडण्यापूर्वी चर्चेचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल. :) - प्रबोध (चर्चा) १८:१८, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)


जयंत साळगावकर[संपादन]

नमस्कार j मी जयंत साळगावकर या लेखावर काम करीत आहे. जमेल त्या मार्गाने मी माहिती गोळा करण्याचे काम करत आहे. थोडा वेळ कमी आहे म्हणून लवकरात लवकर माहिती भरत आहे. शुध्लेखनाकडे जरा लक्ष दिले तर बरे होईल धन्यवाद ! सागर:मराठी सेवक १७:२४, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

मी अजून माहिती गोळा करत आहे. थोडा लक्ष असुद्या म्हणजे झाले. साळगावकर यांना व्यक्तीत भेटून अजून माहिती घेण्याचा माझा प्रयन्त आहे. अजून काही मुद्दे सुचवले तर बरे होईल त्याप्रमाणे माहिती घेण्यास मदत होईल सागर:मराठी सेवक १७:३५, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

स्थानांतरण[संपादन]

J,

पतियाला, जलंधर, इ वरुन आपली अनेकदा चर्चा झालेली आहे. कृपया ही पाने स्थानांतरित करण्याआधी संबंधित चर्चा पानांवर नोंद करावी.

इतरही पानांवर आपली चर्चा झालेली आहे (एअर, इ) आणि त्या चर्चेचा मान राखून मी (किंवा इतर कोणी) तुम्ही स्थानांतरित केलेली पाने परत स्थानांतरित केलेली नाहीत. तरी तुम्हीसुद्धा हेच धोरण ठेवावे ही नम्र विनंती.

अभय नातू

प्रश्नच उद्भवत नाही. मी केलेल्या दुरुस्त्या मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी परंपरेला धरून आहेत....
कोणती परंपरा? ती बरोबर कि चूक? या वरुनच चर्चा चाललेली असताना असे बदल करू नयेत. नाहीतर बदलाबदलीतच वेळ जायचा.
अभय नातू १७:५२, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

J , मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे. आपण मला mvkulkarni23@gmail.com वर तुमचा फोन आणि पत्ता दिलात तर बरे होईल... मंदार कुलकर्णी

J,
तुम्ही शस्त्रक्रिया करून घेणार असल्याचे मंदारच्या चर्चापानावरुन कळले.
तुम्ही लवकरच यातून पार पडून चांगले ठणठणीत होउन पुन्हा ताजेतवाने व्हाल ही आशा आणि अपेक्षा.
अभय नातू १९:५४, ३ डिसेंबर २०११ (UTC)
नमस्कार,

तुम्ही शस्त्रक्रिया पार पडून झालेले दिसत आहात. मला अशा आहे की सर्व काही व्यवस्थित झाले असेल. तुमचा इ मेल आणि मोबाइल क्रमांक जर दिलात तर बरे होईल. फार त्रास देणार नाही याची खात्री असावी. हे आपण marathiwikipedia@gmail.com वर दिले तरी चालेल..... मंदार कुलकर्णी

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, ज/जुनी चर्चा २

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)



सुस्वागतम्[संपादन]

जे नमस्कार,

आता प्रकुर्ती कशी आहे ? शस्त्रक्रिया झाली का ? खूप दिवसांनी आपणास पाहून आनंद वाटला. - राहुल देशमुख ०२:४५, २७ डिसेंबर २०११ (UTC)

खूप दिवसांनी आपणास पाहून आनंद वाटला.
+१
अभय नातू १८:२८, २७ डिसेंबर २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी[संपादन]

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०९, १ जानेवारी २०१२ (UTC)

स्तंभ[संपादन]

नमस्कार,

विकीपत्रीकेचा अंक आपण वाचलाच असेल.

एकंदरीत पत्रिकेतील लेख/माहितीची दिशा याबाबत काही सूचना/कल्पना असल्यास सुचवाव्यात. तसेच काही नियमित स्तंभ सुरु करावेत असे वाटते, जसे सांख्यिकी, प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम, पुढील महिन्यातील आयोजित कार्यक्रम आणि इतरही (सुचवावे ) ... त्यासाठी रंजक/आकर्षित स्तंभ नावे सुचवावीत हि विनंती. राहुल देशमुख ०४:३७, ४ जानेवारी २०१२ (UTC)

पंचवार्षिक[संपादन]

नमस्कार,

आज आपल्या मराठी विकिपीडियावरील पहिल्या संपादनाला तब्बल पाच वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आपल्याला शुभेच्छा.

आपल्या पहिल्या संपादनाची संपादीत झलक खाली देत आहे.



nirmeetee should be changed to nirmitee.

nirmeeteet not correct. Make it nirmiteet.

samrudhda should be samruddha dha to be written in the socket of da. J 18:42, 12 जानेवारी 2007 (UTC)

ता.क. वरील झलकीत मुद्दाम त्याच वेळचा स्वागत साचा ठेवला आहे जेणेकरून आपले पहिलेच संपादन कशासाठी होते ते सहजच लक्षात यावे. आपल्या पहिल्या संपादनाची आठवण व विरंगुळा म्हणून ही सर्व उठाठेव. बाकी यातून दुसरा कोणताही उद्देश नाही. आपणाकडून असेच मराठी विकिपीडियावर योगदान घडत राहो.

-संतोष दहिवळ १६:०९, १२ जानेवारी २०१२ (UTC)

शैली मार्गदर्शक[संपादन]

नमस्कार ! नाटकविषयक लेखांमध्ये आपण माहिती भरत आहात; तेव्हा आपल्याला उपयुक्त ठरेल असे विकिपीडिया:शैली मार्गदर्शक हे पान जरूर न्याहाळावे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:१८, २६ जानेवारी २०१२ (UTC)

आशा पोतदार या लेखाचे विकिकरण व पुनर्लेखन व्हायला हवे, असे आढळते. विकिपीडिया:शैली मार्गदर्शक या पानानुसार योग्य ते बदल करावेत.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १९:४८, १५ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

मुखपृष्ठ लेख[संपादन]

J, मुखपृष्ठ लेखावर आणखी एक हात फिरविण्याची गरज आहे असे माझे मत आहे.कृपया तपासावे ही विनंती. Can you pls. have a look in this..... Mandar वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:४१, १ फेब्रुवारी २०१२ (UTC)

मराठी विकिपीडिया गौरव समितीचे दालन[संपादन]

नमस्कार जे,

मराठी विकिपीडिया गौरव समितीचे दालन विकिपीडिया:गौरव समिती येथे तयार केले आहे. आपल्या सवडी नुसार एक नजर टाकावी हि विनंती. शुद्धलेखना बरोबरच इतरही काही सूचना असल्यास सुचवाव्यात. राहुल देशमुख ००:४१, ६ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान[संपादन]

J, आपण वरील अनेक पाने स्थानांतरित केलेली पाहिली. परंतु प्रत्येक लेखामध्ये देखील हे बदल करायला हवेत. शिवाय साचा:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हा सुद्धा आपण अर्धवटच बदलला आहे. मी पुष्कळ वेळ खर्चुन ही पाने व साचा बनवला होता परंतु आपण विनाकारण (व अर्धवट) स्थानांतर केले हे फारसे रुचले नाही. स्थानांतर करण्यापूर्वी चर्चा केलीत तर बरे होईल असे वाटते. - अभिजीत साठे २१:०४, ८ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]


अर्धा र[संपादन]

र + ् + य = र्य ऱ + ् + य = ऱ्य

In phonetic typing mode,

rya = र्य rrya = ऱ्य

In inscript mode, jd/ = र्य Jd/ = ऱ्य

आपणास अजून काही शुद्धलेखनाच्या दुरुस्त्या सुचवायच्या असतील तर कळवावे.

आपले मार्गदर्शन[संपादन]

आपण आपटे लेखक द्वयांबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केलेत या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद. विकिपीडिया:चावडी/तांत्रिक_प्रश्न#Bugs_in_the_IME येथेसुद्धा जरा आपले मत माहित करून हवे आहे .माहितगार (चर्चा) १०:१३, १० मार्च २०१२ (IST)[reply]

ह.ना आणि ना.ह. आपटे

विकीपानावरील ह.ना.आपट्यांची पुस्तके योग्य होती, नाहंमध्ये, हनांची तीन पुस्तके गेली होती, ती काढून टाकली. गंमत म्हणजे ज्या ग्रंथालयांतून ही माहिती घेतली होती, तिथेही त्या पुस्तकांची नोंद ना.ह.आपटे या नावाखाली झाली होती. म्हणजे चूक खूप पूर्वी घडली होती. ...J (चर्चा) १६:११, १० मार्च २०१२ (IST)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)[संपादन]

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी[संपादन]

नमस्कार J, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:३७, ११ मार्च २०१२ (IST)[reply]

नमस्कार J, "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" या प्रकल्प अंतर्गत काही कामे भरली आहेत. विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे. यात अजून काही भर घालायची असेल तर अवश्य करावी. आपले सध्या असलेले योगदान असेच चालू राहूदे. मी सुद्धा आता जमेल तशी भर घालत आहे. आपले काही मार्ग दर्शन यासाठी झाले तर बरे होईल....मंदार कुलकर्णी (चर्चा) १५:४५, १७ मार्च २०१२ (IST)[reply]
नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:५६, २७ मार्च २०१२ (IST)[reply]

वर्ग:पुणे निवासी[संपादन]

पुणे निवासी असा वर्ग आसणे मला आयोग्य वाटते. आपले मत हावे.-- . Shlok talk . ०९:००, २५ मार्च २०१२ (IST)[reply]

मलापण! ‘पुणे निवासी’ असा वर्ग केला तर जगात जेवढी गावे आहेत त्या प्रत्येकाचा निवासी वर्ग करावा अशी मागणी भविष्यात होऊ शकते. आंतरजालावर कोण कुठल्या गावाचा रहिवासी आहे याला काहीच महत्त्व नाही. इथला प्‍रत्येकजण ’हे विश्वचि माझे घर’ या वृत्तीचा असला पाहिजे. ...J (चर्चा) १८:२६, २५ मार्च २०१२ (IST)[reply]

साचात बदल[संपादन]

नमस्कार, आपले योगदान धुमधडाक्यात चालू आहे. असो, कृपया साच्यात दुरूस्ती करताना थोडिशी काळजी घेत जावी ही विनंती.

-संतोष दहिवळ (चर्चा) १३:२७, २१ एप्रिल २०१२ (IST)[reply]

Article requests[संपादन]

Hi! Do you do article requests in Marathi? I would like someone to write a short article on en:Peel District School Board in Marathi. There is a Marathi website at http://www.peelschools.org/marathi/home/

Thanks WhisperToMe (चर्चा) ०१:४७, २२ एप्रिल २०१२ (IST)[reply]

नदी प्रकल्प[संपादन]

नदी प्रकल्प[संपादन]

Anna4u ji, नदी प्रकल्प चालू करणे ही खूपच चांगली कल्पना आहे. मी मराठी विकिपीडिया ला खूपच नवीन आहे. तुम्ही प्रकल्प चालू केला तर मी नक्कीच माझा खारीचा वाट उचलीन. त्या मध्ये "धरणे" पण घेता येतील.... SSK999 (चर्चा) १५:४२, १६ एप्रिल २०१२ (IST)[reply]

अण्णा, धरणे आणि तलाव हे तसे वेगळे विषय आहेत. "माहितीचौकट धरणे" हा साचा तलावाला लावणे बरोबर वाटत नाही. पाहिजे असल्यास तज्ञांकडून "माहितीचौकट तलाव" बनवून घेता येईल. तसेच नवीन लेखातील लिखाण धरणाला धरून आहे. तलावाला नाही. तरी तातडीने दुरुस्त करावे. तसेच छोट्या छोट्या तलावाचे प्रकल्प असतीलच असे नाही. तेही दुरुस्त करावे. SSK999 (चर्चा) २२:०४, २२ एप्रिल २०१२ (IST)[reply]

शुद्धलेखन, व्याकरण तपासणीची विनंती[संपादन]

J,

कृपया सदस्य चर्चा:अभय नातू/नो ओपन प्रॉक्सीझ या पानातील शुद्धलेखन व्याकरणातील दुरुस्त्या सुचवाव्यात तसेच इंग्लिश तांत्रिक शब्दांना मराठी शब्द सुचवावे ही विनंती.

अभय नातू (चर्चा) ११:१८, २६ एप्रिल २०१२ (IST)[reply]

पुन्हा एकदा आठवण.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:५४, २ मे २०१२ (IST)[reply]

नमस्कार J,

मराठीकरण नाही तरी व्याकरण व शुद्धलेखन तपासता आले तर आभारी राहेन.

अभय नातू (चर्चा) ११:१२, ३ मे २०१२ (IST)[reply]

चुका दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद! मूळ मजकूर लवकरच बदलून काढतो.
अभय नातू (चर्चा) २०:४८, ३ मे २०१२ (IST)[reply]

TERMINAL मराठी प्रतिशब्द[संपादन]

Terminal (टर्मिनल)ला मराठी प्रतिशब्द कोणता?

-संतोष दहिवळ (चर्चा) २३:५५, ५ मे २०१२ (IST)[reply]

षड्रिपूंचा महापूर[संपादन]

माननीय महोदय, मराठी विकिपीडियातील एका आपण लिहिलेले वाक्य वाचले "महाराष्ट्राबाहेरच्या बहुसंख्य भारतीयांनी छत्रपती शिवाजीचे चरित्र कधीच वाचलेले नसले आणि शिवाजीच्या आयुष्यातील घडलेल्या अनेक घटनांच्या बाबतीत ते अनभिज्ञ असले तरी, शिवाजी हा फार मोठा माणूस होऊन गेला असे भारतातील अनेकांना मान्य आहे."

आपण इश्वरावर विश्वास ठेवता का अथवा आपली अध्यात्माची रुची माहित नाही , पण जगातील बहुसंख्य लोक इश्वर कधीही न पहाता अथवा अध्यात्म न वाचताही इश्वर आहे हे मान्य करतात श्रद्धा ठेवतात आणि बऱ्याच भारतीय विचारधारा व्यक्तीपुजाच मान्यतर करतातच , सोबतच जिथे श्रद्धा तेथे इश्वर असा उदार दृष्टीकोण ठेवतात .
षड्रिपूंचा कुठेतरी महापूर आल्यासारखे दिसते. इश्वर आपल्याला आणि सर्वांना स्वत:तील षड्रिपू पासून मुक्तता मिळवण्याचे विचार, धैर्य, आणि कृतीशीलता देवो हि शुभेच्छा परमहंस (चर्चा) १९:५४, ६ मे २०१२ (IST)[reply]

==एअर इंडिया== (स्थळप्रत)

पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण एर इंडियाने त्यांच्या लोगोवर हिंदीमध्ये लिहिलेले आहे. त्यांनी air या इंग्लिश शब्दाचा हिंदी उच्चार लिहिलेला आहे...अभय नातू

साफ चूक. हिंदीत Air, Fare, Care आदी शब्द अनुक्रमे एयर, फ़ेयर, केयर असे लिहितात. एअर इंडिया ही मूळ टाटांची कंपनी मुंबईत स्थापन झाली होती. त्यांनी अर्थातच मराठी लिखाणाचे नियम स्वीकारले. अगदी स्थापनेच्या दिवसापासून आजपर्यंत कंपनीचे नाव हिंदी, मराठी आणि अन्य भारतीय लिप्यांमध्ये 'एअर' असेच लिहिले जात आले आहे....J

मराठी भाषा ही उच्चारानुसारी लिहिल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने परभाषेतले शब्द मराठीत लिहिताना ते, मराठी विद्वान माणसे आजवर जसे लिहीत आलेले आहेत तसेच लिहिले गेले पाहिजेत, भले ते लिखाण अप्रमाण का असेना....प्रबोध

संस्कृत सोडली तर जगातली कुठलीही भाषा उच्चाराप्रमाणे लिहिली जात नाही. संस्कृतमध्ये 'अ', 'इ', 'उ', 'ऋ' आदी स्वरांचे प्रत्येकी १८ आणि बाकीच्या (ए, ऐ, ओ, औ, ऌ) स्वरांचे प्रत्येकी १२ उच्चार आहेत, हे सर्व उच्चार स्वतंत्रपणे लिहून दाखवण्याची परिपूर्ण सोय संस्कृत लिपीत आहे. याचा अर्थ एवढाच की, संस्कृत लिपीत लिहिलेल्या प्रत्येक संस्कृत शब्दाचा एकमेव उच्चार होतो, आणि एका उच्चाराचे एकमेव रीतीचे लिखाण होते.. . तरीसुद्धा, संस्कृत लिपीत उर्दू शब्द लिहिता येतीलच असे नाही, अर्थात इंग्रजीही नाही.

मराठी लिपीचे तसेच आहे. मराठी भाषा (अगदी)उच्चारानुसारी लिहिली जाते असे म्हणणे तितकेसे योग्य नाही. गवsत् हा बोली शब्द मराठीत गवत असा लिहिला जातो, हौंस हा शब्द हंस असा, संय्यम हा शब्द संयम असा, तर उत्छ़व् (छ़ चा उच्चार दंततालव्य-- च़छ़ज़झ़ञ या मालिकेप्रमाणे) हा बोली शब्द, उत्सव असा लिहिला जातो. केलs गेलs मेलs हे शब्द, केलं, गेलं, मेलं असे लिहिले जातात. आराsम् हा उच्चार लिहिताना आराम असा लिहितात. वगैरे वगैरे. तरीसुद्धा, मराठी आणि अन्यभाषी शब्द मराठी लिपीत कसे लिहावेत याबद्दल रूढ संकेत आहेत. त्यामुळे Air हा शब्द मराठीत लिहिताना एअर असाच लिहिला गेला पाहिजे, कारण तसा संकेत आहे..

महाराष्ट्रात इंग्रजी शब्दांच्या मराठी उच्चारासाठी ऑक्सफर्डच्या कोशाचा आधार घेतला जातो, तर दक्षिणी भारतात केंब्रिजचा कोश प्रमाण मानला जातो. (उत्तरी भारतांत कोणता ते माहीत नाही!) साहजिकच दाक्षिणात्यांचे इंग्रजी उच्चार महाराष्ट्रीयांच्या इंग्रजी शब्दांच्या उच्चारांपेक्षा वेगळे असतात. कोण चूक कोण बरोबर हा प्रश्न उद्भवतच नाही. कॅनेडियन उच्चार आयरिशांपेक्षा आणि ऑस्ट्रेलियींपेक्षा वेगळे असणार हे गृहीत धरलेले असते. तसे ते असायला शब्दकोशांची कोणतीच आडकाठी नसते. मात्र, या सर्व लोकांचे इंग्रजी लिखाण अगदी समान आणि प्रमाण असते. मराठीतही एअर हे लिखाण प्रमाण आहे, याबद्दल कुठलीही शंका बाळगायचे कारण नाही..

ऑक्सफर्ड कोशात Air चा उच्चार एअs (eə*) असा दिला आहे. डॅनियल जोन्सच्या कोशातही तसाच..मग अमेरिकनांनी हा एर उच्चार कुठून आणला?....J

त्यामुळे air हा शब्द मराठी भाषेत कसा उच्चारला जातो ते विचारात घ्यायचे कारण नाही; तो शब्द कसा लिहिला जात आला आहे आणि सध्या कसा लिहिला जात आहे हे महत्त्वाचे. विकिपीडिया हे लिखित माध्यम आहे, येथे लिहिलेला शब्द कसा उच्चारतात याला फारसे महत्त्व नाही. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात इंग्रजी शब्दांचे उच्चार ' दक्षिणी लंडनच्या शैक्षणिक संस्था असलेल्या उपविभागात जसे उच्चारले जातात तसे दिले आहेत.' अशी माहिती असते. याचा अर्थ दक्षिणी लंडनच्या अन्य उपविभागांत, किंवा इंग्लंडच्या अन्य भागांत किंवा जगात अन्य देशांत उच्चार वेगळे असू शकतात हे मान्य करण्यात आलेले आहे. इंग्लंद, इंग्लैंड, लंदन एयर, केयर, फ़ेयर हे हिंदी लिखाण मराठी विकिपीडियावर जसे चालणार नाही तसे, एर, केर्, फेर्, बेर्, टेर्, हेर, मेर असले अमेरिकी पद्धतीचे लिखाण मराठी विकीवर असता कामा नये. ..J (चर्चा) १५:५६, १४ मे २०१२ (IST)

मी याच्याशी अगदी असहमत आहे. ...बहुतांश विद्वान लिहिताना/बोलताना/वाचताना किमान आठवीपर्यंत मराठी शिकलेले नसावे हे अगदी स्पष्ट दिसून येते. ...एअर, फेअर हे उच्चार इंग्लिशमधून व्हाया हिंदी आला असल्याचे माझे ठाम मत आहे...अभय नातू

एअर, फेअर हे हे हिंदी उच्चार नाहीत हे वरती स्पष्ट केलेच आहे. मराठीतले विद्वान आठवीपर्यंतही शिकलेले नसतात हे विधान आपणां सर्वांच्या बाबतीत अपमानास्पद आहे. इंग्रजी शब्द मराठी लिपीत कसे लिहावेत आणि मराठी विशेष नामांचे इंग्रजी स्पेलिंग कसे करावे याचे धडे मराठी विद्वानांना थॉमस कॅन्डीने १९या शतकांत देऊन ठेवले आहेत. दुर्दैवाने हिंदीत थॉमस कॅन्डी नव्हता, म्हणून हिंदीभाषकांना एअर हा शब्द एयर असा, आणि बँक हा शब्द बैंक असा लिहावा लागतो...J (चर्चा) १५:५६, १४ मे २०१२ (IST)

. बाबाजीराजे भोसले , मालोजी भोसले[संपादन]

या दोन व्यक्ती एकच का वेगवेगळ्या .एकच असतील तर प्रमाण ऐतिहासिक दस्तएवजांचे नेमके संदर्भ कोणते ? व्यक्ती वेगवेगळ्या असतील तर बाबाजीराजे भोसले लेख पान मालोजी भोसले लेखाकडे स्थानांतरीत करण्या मागील भूमिका समजून घेण्यास आवडेल. आपला माहितगार (चर्चा) १५:४६, २१ मे २०१२ (IST)[reply]


दोन्ही व्यक्ती एक नाहीतच एक पिता आणि एक पुत्र. लेखातला संपूर्ण मजकूर मालोजींबद्दल आहे. बाबाजींचे नाव फक्त पिता म्हणून आले आहे. मूळ लेखात बाबाजींबद्दल - युद्धबुद्धिवान प्रशासक -वगैरे शब्द असणारे एक वाक्य होते, ते बाकीच्या मजकुराशी विसंगत होते. तेच वाक्य मालोजींबद्दल अन्य एक लेखात आहे. बाबाजींबद्दल अन्य कसलीही माहिती नसणाऱ्या लेखाला बाबाजीराजे हे नाव द्यायलाच नको होते, म्हणून ते बदलून ज्या विषयावरचा लेख आहे ते दिले....J (चर्चा) १७:०२, २१ मे २०१२ (IST)[reply]

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०६:५४, ११ जून २०१२ (IST)[reply]

IPs are human too[संपादन]

Analysis of 248 edits to English-language Wikipedia articles from 04:43 to 04:46 UTC on 18 Feb 2007 (Source): Many users believe that unregistered users' sole contributions to Wikipedia are to cause disruption to articles and that they have fewer rights as editors compared with registered users. Studies in 2004 and 2007 found that while most vandalism (80%) is generated by IP editors, over 80% of edits by unregistered users were not vandalism.[1] As current policy stands, unregistered users have exactly the same rights as registered users to participate in the writing of Wikipedia.

Because of these misconceptions, edits by unregistered users are mistakenly reverted and their contributions to talk pages discounted. This practice is against the philosophy of Wikipedia and founding principles of all Wikimedia projects. When dealing with unregistered contributors, the rule to remember is: IPs are human too.

You are an IP too. See here if you don't think so. The only difference between you and an IP contributor is that your IP address is hidden. When you registered for Wikipedia your IP address became hidden behind a user name. Unregistered users are often called anonymous editors. In fact, because your IP address is hidden, it is you that are more anonymous. (Your IP address is still recorded by the software. It is simply not visible to most users.)

Remember this when dealing with unregistered users. They are not a lower category of users. They are not a special subset that we tolerate. They are not locust swarms intent on destroying your article. They are individuals, the same as you – only they have just not registered for an account. Just as you deserve to be treated with civility and good faith, the edits of unregistered users deserve civility and good faith from you. As your contributions to talk pages deserve to be heard and counted when forming consensus, so too do the contributions of unregistered users. Our readers are IPs too

Our readers are IPs too. Virtually none of our readers are registered users. When an unregistered user makes an edit to an article or posts a comment on a talk page, these are the views of one of our readers. That doesn't necessarily mean that their view should be given greater weight. It means that we should not discriminate against their view just because they don't have an account.

  • Common misconceptions


Many users misconceive that policy and guidelines only apply to registered users. Not so. Policy and guidelines affect all users, registered and unregistered, equally.

Comments by unregistered users on talk pages don't count: Yes they do. The purpose of talk page discussion is to build consensus. Contributions from unregistered users are just as important in determining consensus as contributions from registered users. Unregistered users edit here too. Almost all of our readers are unregistered users. Comment on the contribution, not the contributor. Never disregard a contribution just because it was made by someone who has not registered for an account.


Unregistered users are more likely to vandalise articles: This is true; by contrast, the greater proportion of their contributions are non-vandalism edits. In a February 2007 study of 248 edits, 80.2% of vandalism was done by unregistered editors. But 81.9% of edits by unregistered users were not vandalism. Non-vandalism edits by unregistered users accounted for 29.4% of all article edits. Of the article edits, only 6.5% were vandalism by unregistered users; in contrast, unregistered users reverted over a quarter (28.5%) of all vandalism. 91.9% of the edits to Wikipedia articles were constructive and unregistered users accounted for nearly a third of those.[1] Another study carried out by IBM found "no clear connection between anonymity and vandalism"; in addition, the research group found anonymous users provide significant and substantial positive contributions.[2]

Unregistered users are more likely to be sock puppets: This doesn't even make sense. Unregistered users cannot be sock puppets. You would need to register for an account in order to have a sock puppet account. Disreputable registered users can sign out of their accounts and contribute under their IP address for disruptive or deceptive purposes (e.g. ballot stuffing). In that event, it is not an unregistered user behaving disreputably, it is a registered user. Unless you see signs of sock puppetry, assume good faith. Otherwise request a CheckUser to confirm if they are actually sock puppets.

Unregistered users don't know/understand policy: Maybe. Some of them. Often, neither do registered users. An unregistered user may be a one-off contributor or a first-time editor (it's just more difficult to tell). Bear that in mind and remember: don't be a dick and don't bite the newcomer.

Policy doesn't apply to unregistered users (e.g. assume good faith): Policy applies to you. You need to assume good faith. You need to behave in a civil fashion. You need to engage in discussion. It doesn't matter whether you are dealing with an unregistered user or not. It is you that needs to follow policy.

They should register for an account (e.g. if they want to participate): No. You need to accept their contributions, heed their suggestions and participate in consensus building with them. There is no requirement for anyone to register for an account before they can participate in the building of this encyclopedia. There is, however, a requirement on you that you behave.

TimedMediaHandler developer?[संपादन]

Hi. I was wondering if you are the same J that is working on TimedMediaHandler. There are a few open issues for it on translatewiki.net and I'm trying to get in touch with the developer. Please respond at translatewiki. Thanks. --Siebrand (चर्चा) १९:३०, १२ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]


No. I am not that J.......२३:०२, १२ ऑगस्ट २०१२ (IST)

आदरणिय जे ! बरेच दिवसानंतर येथे येणे झाले. मी अण्णाभाऊ साठे या लेखाचे मथळ्यात बदल केले आहेत. अण्णा भाउ साठे असे लिहिण्याने कोणास ( येथे नविन येणार्‍यास किंवा वाचकास) भाउ हे त्यांचे वडिलांचे नाव असावे असे वाटण्याची शक्यता आहे. सबब हा बदल केला आहे.आपला विनाकारण गैरसमज होउ नये म्हणुन हा लेखनप्रपंच. धन्यवादासहित आपला वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:२९, २८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०[संपादन]

Dear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.

Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have stron objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this above contribution of ip 213.251.189.203 and asking the sysops to ban this ip immidiately.

I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:२३, २३ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

धन्यवाद[संपादन]

आपल्या विजय गोखले या लेखातील सुधारणांबद्दल धन्यवाद.Sopan Patil (चर्चा) २३:३७, २७ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

महात्मा गांधी[संपादन]

महात्मा गांधी या लेखातील शुद्धलेखनाबद्दल धन्यवाद -- आभिजीत १३:४९, २ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

चलनगतिकी[संपादन]

आपण साचा:चलनगतिकी हा साचा साचा:चलनगतिशास्त्र वर स्थानांतरित केलेला पाहिला. भौतिकशास्त्र, उष्मगतिशास्त्र, प्रकाशशास्त्र, गतिशास्त्र इ शास्त्र शाखांना "शास्त्र" हा प्रत्यय लावल्याने ते विनाकारण लांबलचक होतात आणि काहीसे बोजड बनतात, म्हणून अलीकडेच ई हा प्रत्यय लावला जाताना दिसतो - जो प्रयोग मी माझ्या लेखांत केलाय - जसे: भौतिकी, उष्मगतिकी, गतिकी, प्रकाशकी इ. आपले काय मत आहे?? अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १४:१५, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

आपल्या म्हणण्यात तथ्य आहे... जेथे की प्रत्यय लावून शब्दाची ताल-लय बिघडणार नाही आणि छोटा होउ शकत असेल तर वापरण्यास हरकत नाही असे मला वाटते. तथापि, आपण मला आंतरजालावरचे कोश दाखविलेत आणि मराठी भाषेतील परिभाषा निर्मिती वाल्यांनी त्यांच्या कोशात "की" प्रत्यय वापरलेला आढळतो.. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १४:४६, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

मी म्हटल्याप्रमाणे सगळीकडेच "की" हा प्रत्यय वापरलेला नाही, तर जेथे जेथे शब्द लांबलचक आहेत तेथे वापरलेला आहे (हे माझे निरिक्षण आहे. ह्याच तत्वांवर त्यांनी शब्दरचना केली आहे का ह्याची मला कल्पना नाही.) जर गतिशास्त्रावरून गतिकी कडे पुनर्निर्देशन केले तर ज्याला गतिशास्त्र हा शब्द माहिती आहे त्याला गतिकी हे पान सापडण्यास हरकत नाही. :) अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १५:३१, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

आपल्याची पूर्ण सहमत. :) अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १६:४३, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

:) खरंय. मग द्वयार्थी शब्द होतील. आपण निसंधिग्धकरण पाने वापरू शकू. तथापि, गतिकी हा शब्द नवाच आहे. तसा रूढही नाही. तेव्हा ह्याचे लेखन सध्याच्या प्रवाहाप्रमाणे जाउ द्या. भविष्यात गरज पडेल तशी पुनर्निर्देशने, शुद्धलेखन, पुर्स्थापना करू. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १६:५५, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

मी तिथेच मत दिलेले आहे. आपल्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १७:१२, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

कॉमिक्स[संपादन]

कार्टून आणि कॉमिक ह्यासाठी आपण एखादा मराठी शब्द सुचवू शकाल का? व्यंगचित्र हा रूढ शब्द बरोबर बसत नाही... मी विनोदिका हा शब्द वापरण्याचा विचार करत होतो. दोन्ही शब्दांसाठी वेगवेगळे पण सुयोग्य असा शब्द आपण सांगू शकाल का? ह्या दोन इंग्लिश शब्दांचे अर्थ न व्युत्पत्ती इंग्लिश विक्शनरीवर येथे - कार्टून कॉमिक - संकीर्णपणे दिलेली आहे. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) ०९:३०, १९ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

हं कॉमिक लाही चित्रकथा हा शब्द प्रचलित आहे खरे. तथापि, साहित्यप्रकारातील एक प्रकार - ग्राफिक नॉव्हेल ला कदाचित हा शब्द लागू पडेल. कॉमिक आणि चित्रकथा ह्यांचे शब्दशः अर्थ भिन्न आहेत. व्यंगचित्र आणि विडंबनचित्र हे नकारात्मक अंगाने दाखवितात. ते शब्द मग संदर्भानुसार वापरण्यास हरकत नाही. मग जे निर्मळ निखळ आहे अश्या कार्टून्सना मग हास्यचित्रे म्हणावे लागेल. पण मूळ अर्थ - विनोदी असलेला अशा अर्थाने एखादा छोटा शब्द सुचवू शकाल का? हास्यचित्र हे लांबलचक वाटते. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) २०:२२, १९ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

स्थानांतरीत करताना..[संपादन]

पाने स्थानांतरीत करताना ते असणाऱ्या संबंधीत साच्यामध्ये त्या अनुरूप बदल करावे जेणेकरून त्या संबंधीत पानावर गेल्यावर साच्यात काळ्या रंगात दिसेल. ही विनंती सचिन ०७:२४, ८ नोव्हेंबर २०१२ (IST)

नमस्कार,
आपली अलिकडील काही शीर्षकनाव स्थानांतरणे पहाण्यात आली. आपण शिर्षक लेखन संकेताबद्दल सजग आहात हि आनंदाची गोष्ट आहे.
नावांपुढे शीर्षकात पद/पदव्या लिहू नयेत असा संकेत आहे जसे की,शिल्पकार करमरकर असे शीर्षकाचे नाव असू नये ते विनायक पांडुरंग करमरकर असे असणे अभिप्रेत आहे. तसेच छत्रपती हे पद सहसा शीर्षकात यावयास नको पण एखादे पद पदवी विशेषनामाचा भाग असेल तर ते घ्यावे लागेल. उदाहरणार्थ पंडीत जवाहरलाल नेहरू मधील पंडीत शब्द शीर्षकातून टाळावयास हवा ,पण एखाद्याचे पहिले नावच पंडित किंवा छत्रपती असेल तर विशेष नामाचा भाग असल्या कारणाने शिर्षक नामातून टाळता येणार नाही. "अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ" मध्ये हा अखिल भारतीय हे शब्द मराठी साहित्य महामंडळाच्या अधिकृत नावाचा भाग आहेत अशी माझी कल्पना होती,कदाचीत मी चूकत असेन तर लक्षात आणून द्यावे. अखिल भारतीय हे शब्द मराठी साहित्य महामंडळाच्या अधिकृत नावाचा अजूनही भाग असतील तर शीर्षकातून टाळू नयेत असे मला वाटते.
चु.भू.दे.घे.आपल्या आवडीचे लेखन वाचन घडत नेहमी प्रमाणे घडत राहो हि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०९, २० फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]
माझा मुख्य प्रयत्न आपली भूमीका समजून घेण्याचा होता, आपल्या प्रतिसादातून आपण तो बऱ्यापैकी पार पाडलात या बद्दल धन्यवाद. चीन देशाचे अधिकृत नाव Chin Zhonghua Renmin Gonghe Guo असे आहे. त्या नावाचे मराठी लिप्यंतर करून लेखाचे शीर्षक द्यावे का? या आपल्या प्रश्नाने स्मीत हास्य निर्मितीचा उद्देश यशस्वी पणे पूर्ण केला. तरी सुध्दा ज्ञानकोशाने वाचकाभिमूख सुविधा द्यावी , लोकाचार किंवा लोकप्रीयतेच्या आहारी जाऊ नये ,तसे केल्याने आपण वाचकांवर अन्यायच करत असतो या गोष्टीशी आपण बहुधा सहमत असाल.
एखाद्या व्यक्तिचे अधिकृत संपूर्ण नाव मी ज्ञानकोशात नाहीतर अजून कुठे शोधावे ? आ.ह.साळुंखे यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतीक धोरण तयार केले गेले त्यात म्हटले आहे ....नावांचे संक्षेप न वापरता ती नावे पूर्णपणे वापरली जातील, याविषयी दक्षता घेतली जाईल. हा उद्देश सफल होण्‍याच्‍या दृष्‍टीने अशा प्रकारची नावे देताना ती अनेक पदव्‍या वगैरेसह लांबलचक न होता सुटसुटीत असावीत, असा प्रयत्‍न राहील.[१] आणि गमतीची गोष्ट स्वत: आ.ह.साळुंखेंना सारा महाराष्ट्र आ.ह.साळुंखे म्हणूनच ओळखतो. मराठी विकिपीडियावर वाचकांना परिचीत नावाने शोधूद्यात शोधलेले परिचीत नावाचे पुर्ननिर्देशन पूर्ण आणि अधिकृत नावाकडेच असणे ज्ञानकोशीय संस्कृतीत अधिक सयूक्तिक ठरते. बाँबे शोधणारा वाचक माणूस मुंबई पानावर, मद्रासचा शोध घेणारा चेन्नई पानावर ,आ.ह. साळुंखे शोधणारा आण्णासाहेब हरी साळुंखे पानावर, शिल्पकार करमरकर शोधणारा ’विनायक पांडुरंग करमरकर’ पानावर पोहोचावा. चीन शोधणारा आपण म्हणता तसे लिप्यंतर करून Chin Zhonghua Renmin Gonghe Guo पोहोचावा आणि H.G. Wells शोधणारा Herbert George Wells लेखावर पोहोचावा, माझे मत असेच आहे.
किमान पक्षी अधिकृत नावाची सुस्पष्ट आणि ठळक नोंद लेखात असावी आणि आपण तशी काळजी घेत आहातच , त्या मुळे वादाची गोष्ट आहे असे काही नाही , या निमीत्ताने एकमेकांच्या भूमीका समजून घेता येतात आल्या.धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५२, २१ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

आपल्या चर्चेत मध्येच घुसत आहे, माफ करा. मात्र मराठी विकिवर लेख नामकरणांबद्दल दोन वेगवेगळे मतप्रवाह मला आढळून आले.
* व्यक्तीचे पूर्ण नाव लेखनाव म्हणून वापरावे. त्यात पदव्या व इतर उल्लेख टाळावेत.
* व्यक्तीचे टोपणनाव जर लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध असेल तरे ते वापरावे.
माझे मत दुसऱ्या पर्यायाला आहे. जे नाव जास्त प्रचलित असेल तेच लेखनाव असावे व इतर नावांनी पुनर्निर्देशन व्हावे.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०१:४८, २७ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

वर्गीकरण[संपादन]

नमस्कार J,
आपल्या नजिकच्या लेखांमध्ये मला आढळून आले की आपण त्यांचे वर्गीकरण करीत नाही आहात. (उदा. संमेलनांवरील लेख)
एक विकिपीडियाचे जाणते सदस्य म्हणून आपणांस वर्गीकरणाचे महत्व माहितच आहे.
मी जमेल तसे त्यांचे वर्गीकरण करत आहे. कृपया आपणही करावे.
धन्यवाद. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०१:४०, २७ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

रु ऱ्हस्व[संपादन]

आपल्याला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. अधिक माहिती सांगावी.


आपण एक नवीन पान बनवू शकतात का ज्या ठिकाणी खालील प्रमाणे माहिती असेल

सत्पुरूष - सत्पुरुष

<चुकीचा शब्द><space>-<space><बरोबर शब्द>

<चुकीचा शब्द><space>-<space><बरोबर शब्द>

<चुकीचा शब्द><space>-<space><बरोबर शब्द>

<चुकीचा शब्द><space>-<space><बरोबर शब्द>

मराठीत नसलेले (नित्याच्या वापरातले) हिंदी शब्द हवेत[संपादन]

नमस्कार,

अनवधानाने बऱ्याच वेळा हिंदी लेखन अथवा शब्द प्रयोग होताना दिसतात.ते टाळले जाण्याच्या स्वयमेव सूचना देण्याकरीता, मराठी विकिपीडियावरील या संबंधी संपादन गाळणीच्या माध्यमातून चाळणी सुदृढ व्हावी म्हणून; मराठीत नसलेले (महाष्ट्रीय लोकांच्या तोंडी सहज न आढळणारे) हिंदीत( नित्याच्या वापरातले) शब्द हवे आहेत.

  • शक्यतो उपसर्गात अथवा प्रत्ययात अक्षर/रे आल्यास विशेष नाम अथवा मराठी शब्द तयार होत असल्याचे लक्षात आल्यास असे शब्द शक्यतोवर टाळावेत.

धन्यवाद


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५८, २ एप्रिल २०१३ (IST)[reply]

अक्षरांचे उच्चार दाखविणारी आंतरराष्ट्रीय पद्धती[संपादन]

नमस्कार, अक्षरांचे उच्चार दाखविणारी आंतरराष्ट्रीय पद्धती या विषयाकडे कुणी लक्ष देते आहे पाहून खरेच बरे वाटले. मला त्यातले खूप कळते असे नाही पण मराठी विकिप्रकल्पांची गरज म्हणून तो लेख मी मराठी विकिपीडियावर आणला होता.

माझ्या इंप्रेशननुसार (जे कि चूकीच ही असू शकत), अक्षरांचे उच्चार दाखविणा ऱ्या आंतरराष्ट्रीय पद्धती एक पेक्षा अधिक असाव्यात आणि त्यातील एक विशीष्ट प्रमाणित पद्धत म्हणजे en:International Phonetic Alphabet

Phonetic च शासकीय शब्दकोशातून मराठी पर्याय "उच्चारनिष्ठ/स्वनिक पद्धति/ध्वनिपद्धति" असे दिसतात ज्याच शब्दश: अनुवाद मी उच्चारानुरुप असा केला होता. आपण केलेल्या बदलास माझा मोठा आक्षेप आहे अशातला भाग नाही ,पण सर्व प्रमाण अक्षरांचे उच्चार दाखविणा ऱ्या आंतरराष्ट्रीय पद्धती ना गरजेचे असलेले समुह नाम आणि विशीष्ट प्रमाणित पद्धत म्हणजे en:International Phonetic Alphabet ला गरजेचे असलेले अनुवादीत विशीष्ट नाव यांची गल्लत होण्याची शक्यातातर नाही ना या बद्दल मनात शंका उद्भवली बहूधा आपण त्याबद्दल विचार केला असेलच पण मन स्वस्थ बसू न देणारी गोष्ट आहे म्हणून सहज पृच्छा करत आहे त्यातून मलाही नवीन काही शिकावयास मिळेल या आशेने.

आपल्या मराठी विकिपिडियावरील नियमीत योगदानाबद्दल धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३०, २१ एप्रिल २०१३ (IST)[reply]


  • >>शब्दकोशकर्ते उच्चारदर्शक खुणांची वेगवेगळी पद्धत अवलंबत असत<<
माझ्या आंदाजानुसार यात निव्वळ transliteration (en:Wikipedia:Indic transliteration scheme ) च्या उद्देशाने केलेले रोमनायझेशन आणि en:Phonetic transcription असे दोन भाग आहेत.
जगं जिंकणे/व्यापारा करिता अथवा धर्मप्रसारा करिता निघालेल्या युरोपीय लोकांनी वेळोवेळी व्यक्तिगत पातळीवर स्थानिक लिपींचे रोमनायझेशचे प्रयत्न केले असणार,याच स्वरूप मुख्यत्वे en:Transliteration च असाव. रोमनायझेशचे /Transliteration (या प्रोसेसच ?)च स्टॅंडर्डायझेशन en:List of ISO romanizations च्या पद्धती ने झाल ?
Transliteration मध्ये एका लिपीत जे लिहिल ते दुसऱ्या लिपीत दाखवतात इथेही उच्चार दाखवण्याकरिता वेगवेगळ्या चिन्हांचा उपयोग होतो पण काय लिहिल आहे त्याला प्राधान्य आहे ॲक्ट्युअल उच्चाराला Phonetic transcription देत तेवढ प्राधान्य नसाव.Phonetic transcription ॲक्ट्युअल उच्चारावरून मग लेखन असा वेगळ्या प्रवासाचा मार्ग अपेक्षीत आहे (?)
Phonetic transcription मध्ये मुख्य स्टॅंडर्ड IPAचच दिसत पण en:Americanist phonetic notation (en:Category:Phonetic alphabets) आणि सिव्हील एव्हीएश क्षेत्रात ओरल कम्युनीकेशन करताही काही स्टॅंडर्ड आहेत जसे की en:NATO phonetic alphabet.
  • >>International Phonetic Alphabet साठी आंतरराष्ट्रीय ध्वनिवर्णमाला हे योग्य भाषांतर होईल. मात्र हे भाषांतर तशा प्रकारच्या सर्व आंतरराष्ट्रीय पद्धतींना(असल्याच तर) लागू पडेल,<<
Phonetic alphabets करिता 'ध्वनिवर्णमाला' हा शब्द आवडला. International Phonetic Alphabet साठी आंतरराष्ट्रीय ध्वनिवर्णमाला आपण म्हणतातसे ॲप्रोप्रीएट(चपखल) आहेच पण प्रॉपर नाऊन चे स्वरूप देण्या करिता; "आयपीए आंतरराष्ट्रीय ध्वनिवर्णमाला" अथवा "आंतरराष्ट्रीय ध्वनिवर्णमाला (आयपीए)" अशा काही पर्यायाचा विचार करणे शक्य होईल किंवा कसे .
इन एनी केस ,आपण केलेला अक्षरांचे उच्चार दाखविणारी आंतरराष्ट्रीय पद्धती हा बदल सुद्धा स्विकारावयास अगदीच हरकत आहे असे काही नाही. (माझा) आंबे खाण्याशी मतलब, (बॉटल) साल बदलल्याने (माझा) आंब्याच्या चवीत काही फरक पडत नाही. :)
तळटीप प्रश्नचिन्हे आपणास प्रश्न विचारण्या करता नव्हे माझ्या स्वत:च्या अज्ञानामुळे आहेत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३०, २२ एप्रिल २०१३ (IST)[reply]
    • आवांतर
  • लिप्यांतरणाचे (Transliteration) संगणकीय काळात इतरही उपयोग आहेत जसे कि एखादी भाषा येते पण लिपी येत नाही (जसे कि उर्दू ) अशा भाषांचे वाचन, एकाच भाषेकरिता अनेक लिपी वापरणे (माझ्या माहिती नुसार जसे कि चायनिज विकिपीडिया करिता केले जाते आणि अशा स्वरूपाचा प्रस्ताव भविष्यात संस्कृत विकिपीडिया करिता आहे कि ज्यामुळे तमिळ,मल्याळम,तेलुगु,कन्नड बंगाली भाषिक सध्या संस्कृत आपापल्या लिपीतूनही शिकतात वापरतात त्यांना सरळ संस्कृत विकिपीडिया वापरता आला पाहीजे.).अशाच प्रकारे हैदराबादच्या/ तंजावुरच्या आणि इज्राएल मधल्या मराठी माणसाला मराठी विकिपीडिया तिथल्या स्क्रिप्ट मधून वापरता आला पाहिजे (सध्या तरी एक दिवा स्वप्न)

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३९, २२ एप्रिल २०१३ (IST)[reply]

आपणाकडून खूप नेहमीच चांगली माहिती मिळते,याही वेळी माहितीपूर्ण प्रतिसादा करता आभारी आहे. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:४९, २३ एप्रिल २०१३ (IST)[reply]

विनंती[संपादन]

आदरणिय जे, माफ करा ! पण आपण लिहिलेल्या अनेक नविन लेखात त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही. सबब, त्यात {{वर्ग}} हा साचा मी लावत आहे जेणेकरुन नंतर त्याची वर्गवारी करता येउ शकेल.आपणास सवड मिळेल त्यानुसार ते करावे अशी मी आपणांस अत्यंत आदरपुर्वक व नम्रतापुर्वक विनंती करतो.धन्यवाद.

सादर.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:५०, २१ एप्रिल २०१३ (IST)[reply]

धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:४७, २२ एप्रिल २०१३ (IST)[reply]

इथे शुद्धलेखन तपासून हवे आहे[संपादन]

नमस्कार,

साचा:दहावा वर्धापनदिन गौरवनिशाण येथे शुद्धलेखन दुरूस्त्या सुधारणा करून हव्या आहेत. सहकर्याची नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३०, २३ एप्रिल २०१३ (IST)[reply]
लगेच करून दिल्या बद्दल धन्यवाद माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२७, २३ एप्रिल २०१३ (IST)[reply]

साचा:मराठी संगीत रंगभूमी[संपादन]

साचा:मराठी संगीत रंगभूमी या वरील आपले संपादन तपासावे.-- . Shlok talk . १८:१८, ६ मे २०१३ (IST)[reply]

आपला ६मे संध्याकाळचा हा बदल पहावा आधी {{·w}}[[राजसंन्यास]] असे व्यवस्थीत होते, आपल्या सायंकाळच्या संपादनातील एक बदल {{·w}[[राजसंन्यास]] असा {{·w}} मधील उजवीकडचा महिरपी कंस खाणारा {{·w} असा झाला त्यामुळे, साचा रचना तुटली आहे.ती दुरूस्त केल्यास साचा पुन्हा व्यवस्थीत दिसेल.
मी सुद्धा दुरूस्ती करू शकतो पण आपण स्वत: करून पाहिल्यास आपला साचे हाताळण्यावरील विश्वास वाढण्यास मदत होईल म्हणून केले नाही. शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:४२, ६ मे २०१३ (IST)[reply]

धन्यवाद[संपादन]

शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या मदतीबद्दल धन्यवाद. -- Sopan Patil (चर्चा) ००:४७, ९ मे २०१३ (IST)[reply]

हिंदी शुद्धलेखन विनंती[संपादन]

नमस्कार,

मिडियाविकी:मराठी अनिवार्यता येथील हिंदी संदेशाचे शुद्धलेखन विषयक सूचना हव्या आहेत. मिडियाविकी चर्चा:मराठी अनिवार्यता येथे अथवा माझ्या चर्चा पानावर नोंदवल्या तरी चालतील.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:१४, १५ मे २०१३ (IST)[reply]

हिंदी शुद्धलेखन सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१६, १६ मे २०१३ (IST)[reply]

… ह्या लेखाला इथून वगळण्यात यावे ह्या साठी काय करावे लागेल? मला इथल्या पद्धती माहित नसून तुम्हीच त्या साठी उचित ते केले तर बरे होइल. इंग्रजी विकिपीडिया वर जोशी हे नोटेबल नाहीत म्हणून तेथून त्यांचा लेख वगळण्यात आला आहे. तसेच Wikiquote, Wikiversity वर पण तेच करण्यात आले आहे. Wikiquote, Wikiversity, English Wiki. धर्माध्यक्ष (चर्चा) १३:३९, १० जून २०१३ (IST)[reply]

उपरोक्त मुद्दा चर्चा:केदार जोशी येथे अधीक चर्चेकरीता वर्ग केला.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:४५, १० जून २०१३ (IST)[reply]

अनुष्टुभ छंद[संपादन]

आदरणीय जे ! संस्कृत व मराठीत येणार्‍या 'अनुष्टुभ छंद' व तत्सम इतर छंदांबद्दल जर आपणास माहिती असेल तर विकिवर लिहावे अशी मी आपणास नम्रतापूर्वक विनंती करतो.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २१:३०, २५ जून २०१३ (IST)[reply]

मराठी क्रियापदांची यादी हवी आहे[संपादन]

नमस्कार,

मराठी विकिपीडीयातील काही सहाय्यभूत भावी कामाच्या द्र्ष्टीने मराठी क्रियापदांची यादी हवी आहे.तसेच मराठीत वापरल्या जाणाऱ्या केवल प्रयोगी अव्ययांची यादी सुद्धा उपलब्ध झाल्यास पहावे हि नम्र विनंती.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१६, २६ जून २०१३ (IST)[reply]

लगोलग वेळ देण्या बद्दल खूप खूप धन्यवाद.आपण उपलब्ध केलेल्याके.प्र. अव्यय यादीमुळे माझा आधीचा संग्रह किती मर्यादीत होता याची कल्पना आली.आपण उपलब्ध केलेल्या यादीनुसार काम चालू केले आहे.
क्रियापद/धातूंची यादी मलाही आंतरजालावर सापडली नव्हती.सध्या एका ओळीत कॉमा लावून सुद्धा यादी चालू शकेल.धातूंची संख्या मोठी असल्यामुळे काम मोठे आहे हे खरे, त्या दृष्टीने आपण इतर याद्या आंतरजालावरून बनवतानाच आंतरजालावरील उपयोगातील क्रियापद/धातू नकल/डकव पद्धतीने केले तरी चालेल म्हणजे शब्दकोशातून उरलेले तेवढेच टंकावे लागतील.
एकदा यादी बनवणे सुरू झाले म्हणजे इतर लोकही अद्ययावत करण्याकरता सावकाशीने सहभागी होतील.अद्ययावत झाल्या नंतर धातू विषयक याद्या बंधूप्रकल्प विक्शनरी येथे सूची हे विशेष नामविश्वात कालांतराने स्थानांतरीत करता येईल.मराठी विकिपीडियावरील व्याकरण विषयक परिच्छेद लेखनात काही प्राध्यापक मंडळींना सहभागी होण्याची विनंती करण्याचाही मानस आहे.
पुन्हा एकदा आपल्या अमूल्य सहकार्या बद्दल धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२९, २७ जून २०१३ (IST)[reply]

ष्ट आणि ष्ठ[संपादन]

J,

तुमचे ष्ट आणि ष्ठ वरचे विवेचन वाचले. त्यातून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की ष्टने अंत होणाऱ्या (संस्कृतोद्भव आणि इतरही) शब्दांमध्ये काही समान धागा आहे का? जसे सुष्ट, रुष्ट, अनिष्ट, इ.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:०८, २८ जून २०१३ (IST)[reply]


सर्व ’ष्ठ’ संपले की मी ’ष्ट’कडे येणारच आहे. त्यावेळी आपल्या प्रश्नाला बहुधा उत्तर मिळेल, न मिळाल्यास पटेल असे वेगळे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन....J (चर्चा) २१:५५, २८ जून २०१३ (IST)[reply]

'क्रिटीकल थिंकींग' करता चपखल मराठी शब्द हवा[संपादन]

नमस्कार,

Critical Thinking या विषयावर सध्या लेखन चालू आहे. क्रिटीकल थिंकींग करता सध्या विवेचनात्मक विचार हा शब्दप्रयोग सरकारी शब्दकोशानुसार केला आहे.पण चिकीत्सात्मक विचार आणि टिकात्मक विचार असे पर्यायी शब्द वापरल्याचे एक एक उदाहरण आंतरजालावर आढळले.

मला चिकीत्सात्मक विचार हा शब्द अधिक जवळचा वाटतो आहे. पण आपले मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२५, ६ जुलै २०१३ (IST)[reply]

प्रतिसादा करीता मन:पुर्वक धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०९, ८ जुलै २०१३ (IST)[reply]

अप्रतीम[संपादन]

कळफलकबाबत, आपण अभयला लिहीलेले पत्र वाचले. ते अत्यंत अभ्यासपूर्ण व अप्रतिम आहे.रहावले नाही म्हणुन हा अभिप्राय. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:३९, १३ जुलै २०१३ (IST)[reply]

कळफलक[संपादन]

नमस्कार,

तुमचा संदेश वाचला. त्यातील काही गोष्टी पटल्या. एक ध्यानात ठेवण्याजोगे म्हणजे कळफलक आणि दिसणारी अक्षरे, यांत संबंध असला तरी तो थेट नाही. कळफलकावरून तुम्हास कोणते अक्षर/वर्ण पाहिजे ते तुम्ही सांगता. त्याचे interpretation प्रत्येक फाँट वेगळ्या तऱ्हेने करतो व त्यानुसार अक्षरे उमटवतो. तरी सगळा दोष कळफलकाला देउन उपयोगन नाही. तुम्ही लिहिलेल्या अनेक गोष्टी विशिष्ट फाँट (जो मनोगत्यादी संकेतस्थळ वापरतात) वापरून त्याच कळांद्वारे उमटवता येतात. कोणता फाँट वापरावा हा निराळा संवाद आहे.

असो. या कळफलकाबद्दल माहितगार काही प्रयत्न करीत आहेत असे दिसते तरी आपण माहितगारांना तुमची प्रतिक्रिया कळवली असेलच.

क.लो.अ.

अभय नातू (चर्चा) १२:३४, १६ जुलै २०१३ (IST)[reply]


माहितगारांनी लिहिलेला मजकूर वाचला. त्याला उत्तर म्हणून माझ्या संगणकाच्या पडद्यावर मी लिहिलेला दोन पानी मजकूर दुर्दैवाने विस्कळीत झाला. पेजरॅप करून सुधारण्याच्या प्रयत्नात तो पूर्णपणे पुसला गेला. आता परत नोटपॅडवर जुळवाजुळवी केलेला मजकूर थोडा थोडा सेव्ह करीत आहे. पूर्ण उत्तर देण्यास काही काळ लागेल. तरीसुद्धा, मराठी विकीवर विशिष्ट ब्राउझर, त्याची विशिष्ट आवृत्ती, विशिष्ट फॉन्ट्‌स आणि विशिष्ट कळफलक मुक्रर केला तर कोणत्याही सदस्याने टंकित केलेल्या मजकुरातील अक्षरे दुसऱ्या सदस्याला जशीच्या तशी वाचता येतील.. हे कितपत शक्य होईल.मालामाहीत नाही,पण प्रयत्न करून पाहायला हरकत नसावी.....J (चर्चा) १६:०३, १६ जुलै २०१३ (IST)[reply]

अक्षर चित्रे[संपादन]

  • संगणकावर स्क्रिनशॉट घेऊन त्याचे चित्र कसे बनवावे या बद्दलची माहिती या लेखात आहे.चित्र डोळ्यासमोर आल्या शिवाय बऱ्याच गोष्टींचा उद्बोध होत नाही.अक्षरांची चित्रे बनवणे आणि चढवणे प्रत्यक्षात तेवढे अवघड नाही.चर्चेतील बरेच मुद्यांची चर्चा प्रत्यक्षात चित्रे दिसल्याशिवाय पुढे जाणे कठीण असेल.
  • त्या शिवाय सर्व मुद्दांची सर मिसळ होत असल्यामुळेच आपल्याला या विषयावर प्रतिसाद मिलण्यास विलंब होत असावा म्हणून विकिपीडिया:धूळपाटी/हवे असलेले कळफलक बदल येथे मुद्दे वेगवेगळे लिहीण्याचा प्रयत्ना केला आहे.क्रमाने एका वेळी एक मुद्दा घेऊन चर्चा पानावर चर्चा केल्यास बरे पडेल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:०५, १६ जुलै २०१३ (IST)[reply]

उ:हे काय आहे[संपादन]

तुम्हाला आलेला संदेश हा मेटावरील पॉलिसीचे भाषांतर करण्यासाठीचे आवाहन आहे. गुजराती विकिपीडियावर कोणीतरी ते केलेले आहे असे दिसते. आपण यावर विचार करुन मराठी विकिपीडियावर काय पॉलिसी असावी याबद्दल आपले मत द्यावे.

अभय नातू (चर्चा) ०५:५९, १८ जुलै २०१३ (IST)[reply]

देवनागरी मराठी अक्षर विषयक लेख[संपादन]

नमस्कार,

वर्णाक्षर विषयक विश्वकोशीय लेखात संगणक लेखन समस्या जरी मांडता येत नसल्या तरी असे लेख चित्रांची जुळवा जुळव होण्यास आणि इतर माहिती सुविहीत पद्धतीने लिहिली जाण्यात सहाय्यभूत होतील इतर लेखकांचाही सहभाग कालौघात लाभतो. विस्कळीत माहितीवर काम करणे संगणक तज्ञांना अवघड जाते हे लक्षात घेऊन हे अक्षर विषयक विश्वकोशीय लेखांचे लेखन चालू केले. आपणही त्याय लेखन योगदान केल्यास आपल्या अक्षर लेखन विषयक इच्छित गोष्टींना हातभारच लागेल. कॉमन्सवर काही प्रमाणात देवनागरी अक्षरचित्रे आधीच उअपलब्ध आहेत तीही वापरण्याचा विचार करावा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३८, १९ जुलै २०१३ (IST)[reply]


आपल्या चालू असल्या चर्चेच्या अनुषंगाने बाराखडी,जोडाक्षरे,नुक्ता,उम्लाउट या लेखांची सुरवात/भर घातली आहे. आपल्या सवडी नुसार या लेखांना सुद्धा आपला हातभार लागावा हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:२५, १९ जुलै २०१३ (IST)[reply]

संपादन गाळणी[संपादन]

नमस्कार,

उपरोक्त विषयास अनुसरूनच या संपादन गाळणीची रचना केली आहे.

  • "श्रृ|ऍ|उणीवयुक्त अक्षरलेखन३|उणीवयुक्त अक्षरलेखन४" अशी यादी बनवून दिल्यास त्यांची पडताळणी करून संपादन गाळणीस जोडता येईल.

धन्यवाद माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१८, २० जुलै २०१३ (IST)[reply]

गाळणीत टाकावयाच्या विचारार्थ (यातील सर्वच गाळणीत जोडता येतील असे नाही पण जेवढी गाळणीतंत्रात जमतील तेवढी) काही अशुद्धलेखन प्रकार आपल्या सहज नजरेत रहावीत म्हणून आपल्या चर्चा पानावर येथेच यादी करत आहे. यातील उणीवयुक्त लेखन हे औणीवयुक्त अथवा अशुद्धलेखन अक्षर अथवा शब्दाने आपणही बदलू शकता.

  • "श्रृ|ऍ|उणीवयुक्त अक्षरलेखन३|उणीवयुक्त अक्षरलेखन४"
  • "ध्द|अबकड जोडाक्षरी उणीवयुक्त लेखन"
  • "(खा|गा|घे|जा|दे|धू|पी|ये)वून|अबकड उणीवयुक्त लेखन"
  • "पारंपारिक|तत्कालिक|सहजरित्या|प्रतिष्ठाण|अबकड उणीवयुक्त लेखन"

पहिली नोंद[संपादन]

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:००, २२ जुलै २०१३ (IST)[reply]

आपसूक विल्हेवारी[संपादन]

आपसूक विल्हेवारी या शब्द समुहाचे ऱ्हस्व दीर्घ बरोबर असल्याची खात्री करून हवी आहे. DEFAULTSORT या विकिपीडिया संज्ञेकरता आपण आपसूक विल्हेवारी हा शब्द उपयोग केला आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१७, २१ जुलै २०१३ (IST)[reply]


Defaultsort[संपादन]

जुन्या शब्दकोशांत आपसुख हा शब्द दिला आहे. काही थोड्यांनी आपसुक हाही बरोबर मानला आहे. हल्लीचे शुद्धलेखनतज्ज्ञ ’आपसूक’ बरोबर समजतात. मला वाटते बहुसंख्यांना मान्य असलेला आपसुख वापरावा. पण आपसूक चुकीचा नाही. आपसुख म्हणजे automatic, आपखुशीने, स्वतःहून, स्वयमिच्छित. हे खरे. पण आपसुख हा शब्द Defaultसाठी कितपत योग्य आहे, ते माहीत नाही. संगणक शब्दावलीतील Default म्हटले की आपल्याला A value or setting or method automatically assigned by an operating system, program etc असे काहीतरी जाणवते. जे घडते आहे ते आपसुख घडते आहे, या दृष्टिकोणातून ’आपसुख’ बरोबर आहे. परंतु By default असलेली गोष्ट खरोखर automatic आहे का? की कुणीतरी अगोदरच set करून ठेवली आहे? तसे समजले तर तर पूर्वसिद्ध, पूर्वरचित, सुनिश्चित असे काहीतरी डोळ्यासमोर येते.

विल्हेवारी हा शब्द छान आहे, पण त्याऐवजी वर्गवारीसुद्धा चालेल.

संस्कृतोत्पन्‍न शब्द हवा असेल तर ’पूर्वसिद्ध वर्गवारी’ हा वापरावा, अर्थात आपण निवडलेला ’आपसूक विल्हेवारी’ देखील चालेल....J (चर्चा) २०:१२, २१ जुलै २०१३ (IST)[reply]

विकिपीडीयावरील DEFAULTSORT मध्ये , 'defaultsorting होताना त्याकरीता आपण निर्देशीत केलेल्या शब्दांनुसार(किवर्ड)अनुसार by default क्रमवारी लावण्याची कृती' असे काहीसे अभिप्रेत आहे.....action by default या अर्थछटेमुळे आपसूक हा शब्द उपयोगात आणण्याचा विचार केला.

DEFAULTSORT करता यापुर्वी अविचलवर्ग:, अविचलवर्गकळ:, अविचलवर्गवर्गीकरण: असे शब्द उपयोगात आणले आहेत पण मराठी विकिपीडियावर ते फारसे प्रचलीत होऊन वापरात आले नाहीत.वर्गीकरण शब्द एकदा वापरून होत असल्यामुळे आणि सॉर्टला जवळचा असल्यामुळे दुसऱ्यांदा अनुवाद करताना आपसूक विल्हेवारी असा केला. पण DEFAULTSORT हि बाब मी स्वत: फारशी वापरत नसल्यामुळे चावडीवर वापरणाऱ्यांना उपयोगात आणण्यास कोणता अधीक सहजसुलभ आहे ते विचारावे लागेल असे दिसते.

आपसूकची आपसुख हि व्युत्पत्ती माहित नव्हती. मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२७, २२ जुलै २०१३ (IST)[reply]

अनुवाद विनंती[संपादन]

  • साचा:{{शुलेचि}} [ शुद्धलेखन?] करीता खालील वाक्याचा अनुवाद करून हवा आहे. शुद्धलेखन संबंधी संदेशातच शुद्धलेखन त्रुटी आहे असे माझ्याकडून व्हावयास नको म्हणून आपणास विनंती.

The material in the vicinity of this tag needs gramatical correction with spell check to complete the sentence in accordance with marathi language grammer rules.

लगोलग करून दिल्या बद्दल धन्यवाद. बाळापुर किल्ला लेखात हेहीदरवाजे असा काही शब्द आला आहे तेथे मी हा टॅग लावण्याचे धाडस केले आहे. हेहीदरवाजे बरोबर असल्यास टॅग काढून टाकण्यास हरकत नाही.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:०२, २३ जुलै २०१३ (IST)[reply]

टॅग ला 'खूणपताका' हा शब्द मी योजिला आहे.बरोबर असल्यास वापरण्यास हरकत नाही.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:५८, ४ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

यथादृश्यसंपादक[संपादन]

नमस्कार,

अधून मधून परिक्षण संपादने करून पहाण्यास सुरवात करण्याच्या दृष्टीने, नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक ही संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. (अधून मधून कारण अजून चाचणी अवस्थेत आहे आणि अद्याप त्रुटी आहेत)

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०३, ८ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

कृपया निष्णात हात फिरवा[संपादन]

  • मी सदस्य चर्चा:अभय नातू/टर्म्स ऑफ यूझ (२०१२)येथे त्याचे मराठी भाषांतर करीत आहे.जेथे आपण काम करतो तेथील कायदे माहित असावेत,आपल्या भाषेत असावेत, म्हणून हा एक प्रयत्न आहे. मी शुद्धलेखनात बराच कच्चा आहे. आपणास सवड मिळेल तेंव्हा, मी तर म्हणेन विशेष सवड काढून,तेथील शुद्धलेखन जरूर तपासावे ही अत्यंत आग्रहाची व नम्र विनंती.ते अद्याप अपूर्ण आहे. पूर्वीच मागणी नोंदवित आहे.
  • दुसरे असे कि, आपल्या जुन्या चर्चा दप्तरदाखल करू काय.करावयाच्या असल्यास कोणत्या तारखेपर्यंत? होकार असल्यास कृपया कळवावे. आपल्या चर्चापानावर पानाचे शेवटी जाण्यास बरेच सायास पडतात म्हणून ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:१३, २५ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

सुरक्षीत लेखातील बदल[संपादन]

एखादा लेख प्रचालकांनी सुरक्षीत केला असेल आणि लेख मजकुरात बदल हवा असेल तर संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर तो नमुद करावा.विश्वकोशीय उल्लेखनियता असल्यास सुयोग्य मजकुर लेखात स्थानांतरीत करण्यात प्रचालक साहाय्य करू शकतात.विश्वकोशीयता उल्लेखनीयता चर्चा आणि आणि संवादांना फाटा देता येऊ शकत नाही.

लेख सुरक्षीत आहे म्हणून वेगळा लेखाचा शॉर्टकट/वळसा घालणे चुकीचा पायंडा पाडणारे, म्हणून स्विकार्य होऊ शकत नसल्या मुळे, आपले अलिकडील एक लेख पान वगळावे लागले त्या बद्दल क्षमस्व.

आपल्या आवडीच्या वाचन आणि लेखना बद्दल शुभेच्छा माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०५, ७ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

महत्वाचे[संपादन]

आज वाचलेला एक लेख मला फार महत्वाचा वाटला.त्याचा एक दुवा देत आहे. मला वाटते ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी असावी.कृपया तो जरुर बघावा ही विनंती.[२]

सामान्य ज्ञान म्हणून माहितीची विनंती[संपादन]

नमस्कार,

अलिकडील एका लेखात "घालमोड्या दादा" असा शब्द वाचला.मोल्सवर्थ इत्यादी ऑनलाईन शब्दकोशात शब्द दिसला नाही. माझ्या स्वत:च्या सामान्य ज्ञानात भर आणि, केवळ व्यक्तिगत कुतुहल म्हणून या शब्दाचे अर्थ आणि संदर्भ(काँटेक्स्ट) जाणून घ्यावयास आवडेल. हाकामारी ह्या शब्द छटे बद्दल अंधूक कल्पना आहे, पण हाही शब्द ऑनलाईन शब्दकोशाततरी आढळला नाही.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१३, २१ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

माहिती आणि अभ्यासपूर्ण प्रतिसादा बद्दल आभारी आहे. "हाकमारी" , "हाकामारी" शब्दाचा हल्ली न आढळणाऱ्या भूताटकी किंवा तत्सम "अदृश्यता" विषयक अंधश्रद्धेशी संबंध असावा , "हाकमारी" तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात किंवा आवाज बदलून वगैरे हाक मारते अशी काही अंधश्रद्धा महाराष्ट्राच्या काही भागात दोन तीन पिढ्यांपुर्वी होती असे वाटते .
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४१, २१ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]
ओके, 'ओ' दिली की हाकामारी प्रमाणे धरतात :) असा तो नदाफांच्या वाक्याचा अर्थ होत असावा .माहिती करता धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५६, २१ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

गीता रहस्यच्या ऑनलाईन आवृत्तीची खात्रईकरून हवी[संपादन]

नमस्कार,


  • गीता रहस्य ग्रंथाचे अधिकृत नाव श्रीमद्भभगवद्गीतारहस्य असे आहे का ?(द्+गी हे मला खालील दुव्यावरील ग्रंथात लिहिल्या प्रमाणे टंकता आले नाही.)
  • अर्काइव्ह डॉट ऑर्गवरील मूळ प्रतीचे १९२४चे पुनर्मुद्रण या दुव्यावर गीतारहस्य ग्रंथ दिसतो आहे पण पृष्ठ संख्या कमी आहे का हा गीता रहस्याशी संबंधीत ग्रंथ आहे का सुयोग्य आवृत्ती आहे याची खात्री करून हवी आहे.कारण प्रथम पृष्ठावर ह्या ग्रंथाचा शेवटील भाग असा उल्लेख दिसतो आहे.
    • उपरोक्त ग्रंथाच्या प्रथमपृष्ठावर "कर्मविपाकसिद्धांत" असा ग्रंथ नामोल्लेख दिसत नाही मग तो कुठून येतो ?
    • गीता रहस्यचे किती खंड होते ? एकच का अधिक ?


धन्यवान माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:०९, २५ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

मी दिलेला दुवा आणि आपण दिलेले दोन्ही दुवे मराठी मधील दुसराच भाग उपलब्ध करताहेत.त्यात मराठीतील पहिला भाग नाही मिळाला.
जर असा काही दुवा कधी उपलब्ध झाल्यास जरूर द्यावा हि नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२१, २५ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

"प्रसिद्ध" लेखात योगदानाची विनंती[संपादन]

नमस्कार,

मराठी विक्शनरीवर लिहिलेल्या wikt:प्रसिद्ध लेखात, आपल्या सवडीनुसार सुधारणा करण्याबाबत साहाय्य विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२६, २९ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

स्थानांतरण[संपादन]

जे, एखादे पान स्थानांतरित करताना त्याला जोडलेले साचे, पुनर्निर्देशित पाने इत्यादीमध्ये देखील बदल करणे आवश्यक आहे. हे करणे जर जमत नसेल तर कृपया पाने स्थानांतरित करू नयेत. - अभिजीत साठे (चर्चा) १५:३४, १८ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

बदल कराल काय?[संपादन]

नमस्कार “J”,

इ.चौथी, प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ चे पाठ्यपुस्तक शिक्षण खात्याचा मंजुरी क्रमांक प्राशिसं/२००९-२०१०/मंजुरी ५०५(३४) दिनांक ०६/०४/२००९ शासन मान्य पुस्तक सर्व महाराष्ट्रात शिकवले जाते. सदर पुस्तकाची pdf link मी आपणास देत आहे. आम्हा शिक्षकांना इतिहासात पुढील नावात बदल करण्यासंबंधी सुचवले आहे. शाहिस्ते खान नव्हे तर शायिस्ता खान, नेताजी पालकर नव्हे नेतोजी पालकर, दादोजी कोंडदेव नव्हे दादाजी कोंडदेव , आपण हा बदल स्विकारून शिर्षकांत बदल कराल काय? ( http://www.balbharati.in/index1.htm) (http://www.balbharati.in/downloadbooks/4th-History-Mar.pdf) -साळवे रामप्रसाद


निश्चित नाही. बालभारतीच्या पुस्तकांत हजारोंनी चुका असतात हे जगजाहीर आहे. त्यामुळे शिक्षणखात्याच्या आदेशांना त्यांच्या पुस्तकांबाहेर कसलीही किंमत नाही. विशेषनामे कशी लिहायची यावर कोणीही हुकुमनामा काढू शकत नाही. महाराष्ट्राच्या बालभारतीने एक आदेश काढला तर त्याच्या उलट आदेश दुसऱ्या एखाद्या राज्याचे कुमारभारती काढू शकेल. हुशंगाबाद, भोपाळ, खांडवा असल्या अनेक गावांच्या नावांचे लिखाण मध्य प्रदेशात होशंगाबाद, भोपाल, खंडवा किंवा खंडुआ असे होते. ते लिखाण तसेच करावे असा अध्यादेश जर मध्यप्रदेशाच्या बालकभारतीने काढला तर आपण तो मानू? जी नावे परंपरागत पद्धतीने जशी लिहिली जात आहेत तशीच ती लिहिली गेली पाहिजेत, त्यात बळजबरीने बदल करता येत नाही. मी हिंदीत लंदन, इंग्लंद किंवा इंग्लैंड असे लिहीन, आणि मराठीत अनुक्रमे लंडन आणि इंग्लंड. विशेषनामांचे लिखाण कसे करावे याबद्दल थॉमस कॅन्डीने एकोणिसाव्या शतकात जे नियम घालून दिले आहेत, आणि जे आत्तापर्यंत तमाम मराठी लेखक अनवधानाने पाळीत आले आहेत, ते तसेच पाळले जावेत, या मताचा मी आहे. नामांतराच्या चळवळीने रिपब्लिकन पक्ष संपला हे माहीत नाही का? अशा वारंवार करीत असलेल्या नामबदलाने महाराष्ट्राचीच नव्हे तर साऱ्या देशाची काय वाट लागली आहे, ते सर्वज्ञात आहे..समजा, उद्या बालभारतीत वेगळे अधिकारी आले आणि त्यांनी तिसराच आदेश काढला तर तुम्हां शिक्षकांचे काय होईल?..J (चर्चा) २३:३१, २२ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]


पण त्याला वेळ लागतो.[संपादन]

बालभारतीचे पुस्तक तपासुनच लागू केले जाते.आपणास माहित असेल की इतिहास संपादन मंडळात कुळकर्णी वगैरे तत्सम सदाशीव पेठी तज्ज्ञ (?) मंडळीचाच जास्त भरणा असतो. पण सदर बाब तपासून संशोधन करुन बदलली आहे हे नक्की सदर इतिहासात दादू कोंडदेवाला त्यांच्या पायरीवरच(सेवक,शिपाई पहा पान क्र.25) ठेवले आहे. नामांतरण ही हक्काची व आस्मितेची लढाई होती ती रस्त्याला पथ म्हणा पुरती पुणेरी नक्कीच नव्हती. “नामांतराच्या चळवळीने रिपब्लिकन पक्ष संपला” हा आपला जावई शोध रिपब्लिकन पक्षास दखल घेण्यायोग्य आहे. सदर नावामध्ये अंशतः बदल करण्याचे संशोधन मराठीत व महाराष्ट्रात झाले आहे.ते मध्यप्रदेशातील इति.संशोधक मंडळाचे संशोधन नव्हे.बालभारतीचा अभ्यासक्रमावर अधारीत पुस्तकाचे लेखन अधिकारी नव्हे तर अभ्यास मंडळ तयार करते. हे आपणास माहित असायला हवे. केवळ अधिका-याच्या आदेशाने बदलण्या इतकी सोपी गोष्ट नव्हे. सदर बदल विद्यार्थी स्विकारत आहेतच..तो बदल दृश्य असेल.पण सरकारी आदेश कोणत्याही सरकारचा त्या राज्यात काढला तरी बाँम्बेला ओरीसा मधील वृतपत्रात मुंबईच छापतील. आपला आग्रह मराठी विकी पुरताच “जी नावे परंपरागत पद्धतीने जशी लिहिली जात आहेत तशीच ती लिहिली गेली पाहिजेत, त्यात बळजबरीने बदल करता येत नाही” असला तरी आपणास ओरिसाचे ओडीशा वेळ आल्यावर मान्य करणे भागच आहे पण त्याला वेळ लागतो. साळवे रामप्रसाद ०८:३१, २३ ऑक्टोबर २०१३ (IST)salveramprasadसाळवे रामप्रसाद ०८:३१, २३ ऑक्टोबर २०१३ (IST)

सत्यकथा[संपादन]

नमस्कार,

सत्यकथा (मासिक) मराठी साहित्यातील महत्वाचा टप्पा आहे. अनंत अंतरकर श्री.पु.भागवत राम पटवर्धन आणि इतरही संबंधीत नाव आहेत.मी इतरही सदस्यांना या संदर्भाने मराठी विकिपीडियावर लेखनाची विनंती करणार आहे.आपल्या सवडी प्रमाणे आपण वेळ देऊ शकल्यास स्वागत आहे. इतर लेखना सोबतच चरित्रात्मक लेखनाची समीक्षा करणारा ह्या दुव्यावरील लेखन आपल्या सवडीनुसार अभ्यासून मराठी विकिपीडियावर सुयोग्य मुद्द्यांचा आंतर्भाव करता आल्यास स्वागतच असेल.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:४३, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

विकिपीडिया संदर्भीकरण[संपादन]

नमस्कार,

विकिपीडियामधील संदर्भीकरण सुलभ व्हावे म्हणून एकएककरून बऱ्याच सुविधा उपलब्ध होत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता हे पान बनवले आहे. त्यातील संदेश एका वेळी एक असे अविशीष्ट क्रमाने दिसतात.ते उदाहरणा दाखल खाली दाखवले आहे. विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता येथे लेखन सुधारणेतही स्वागत असेल. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४७, २६ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]


<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भविहीन लेखनाने/विधानांनी लिहिलेल्या माहितीच्या विश्वासार्हतेविषयी इतर वाचक/संपादक/उपयोजक सांशक होतात. कृपया आपल्या चढवलेल्या माहितीचा संदर्भ द्या.विकिपीडियात संदर्भ देणे सोपे जावे म्हणून विवीध पद्धतीचे साहाय्य आणि साहाय्य साचे उपलब्ध आहेत.



वैदिक सामस्वर "र‍" म्हणजे नेमके काय, कुठे, केव्हा, वापरले जाते ?[संपादन]

नमस्कार,

या युनिकोड कंसोर्टीयमच्या दुव्यावर एका वेगळ्या "र‍"चा नेहमी च्या "र" पेक्षा वेगळा युनिकोड संकेतांक दिलेला दिसतो आहे.त्याचे अल्प वर्णन वैदिक सामस्वर "र‍" असे दिलेले दिसते. या वेगळ्या "र‍" बद्दल काही माहिती असल्यास जसे, नेमके काय, कुठे, केव्हा वापरले जाते ? कळवावे हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२५, ३ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

  • "विचारलेली माहिती वैदिक सामस्वरासंबंधी आहे, समस्वरासंबंधी नाही. सामवेदातील ऋचा लिहिताना अक्षराच्या शेजारी किंवा डोक्यावर ज्या खुणा लिहाव्या लागतात, त्यांपैकी ’वैदिक सामस्वर र’ ही एक खूण असावी." या अभ्यासपूर्ण माहिती बद्दल नितांत अभारी आहे.
अधिक माहिती आली तर स्वागतच आहे.कदाचित सामवेद या लेखात विश्वकोशीय माहितीची भर घालता येईल. तोपर्यंत संस्कृत विकिप्रकल्पांना ते अक्षर डोक्यावर दिसावे म्हणून काय करावे याची माहिती घेतो.
पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३७, ३ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

दौंड तालुका[संपादन]

हा लेख केडगाव(दौंड) ला हलविण्याचे प्रयोजन समजले नाही. त्यामागे काय विचार आहे?हे कृपया सांगावे ही विनंती. --वि. नरसीकर १०:५३, ८ डिसेंबर २०१३ (IST)

नमस्कार, याच लेखात आपल्या या संपादनान्वये लेखातील {{बदल}}हा साचा,प्रथमदर्शनी बहुधा अनवधानाने वगळला गेल्याची शक्यता वाटते.


सोबतच कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर लेखातील {{पुनर्लेखन}}साचाही आपल्या या संपादनान्वये प्रथमदर्शनी बहुधा अनवधानाने वगळला गेल्याची शक्यता वाटते.


आपण आपले संपादनातील बदल पुन्हा अभ्यासून, काही विशीष्ट भूमिका नसल्यास,संबंधित साचे पुर्नस्थापित करता आल्यास पहावे, अशी नम्र विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:२३, १० डिसेंबर २०१३ (IST)[reply]

साचा:प्रमाणेतरमराठीओळ[संपादन]

विशीष्ट कारणाने एखाद्या ओळीत उदाहरणा दाखल प्रमाणेतर मराठी वापरली असल्यास वापरण्या करता साचा:प्रमाणेतरमराठीओळ [ प्रमाणेतरमराठीठेवा ] बनवला आहे.त्यात सुयोग्य सुधारणा करण्यात आपले सहकार्य मिळावे ही विनंती आहे. अशाच पद्धतीने परिच्छेदाच्या वर लावण्याचा साचापण बनवता येऊ शकेल.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३८, १३ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

भारतातील उष्ण पाण्याचे झरे[संपादन]

--वि. नरसीकर १८:५०, १३ डिसेंबर २०१३ (IST)

पुन:संधारण व रासायनिक सूत्र[संपादन]

दोन्ही बद्दल धन्यवाद.सकाळी श्री कट्यारे यांचे लेखात रासायनिक सूत्र बघितले व त्याचे लिखाणासाठी लगोलग संबंधित साचा आयात केला.ते लिहीण्याचा धोपट मार्ग आहेच. तो साचा वापरायचा नसेल तर काय करावे हे साच्याच्या पानातच दिले आहे. असो. तो ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.लेखात बरोबर दिसण्याशी मतलब.कोणीही साच्याचे पान गरजेविना तसे विशेषत्वाने बघत नाही. कोणाच्याही थोड्याश्या मेहनतीने वाटचाल सुकर होते.सर्वांना त्याचा फायदा होतो.म्हणून हा उपद्व्याप.

दुसरे असे कि,आपल्यास उत्तर देतांना अंमळ भितीच वाटते.'शुद्धलेखन' कच्चे आहे म्हणून.पुन्हा मनःपूर्वक आभार.

--वि. नरसीकर १५:५६, १७ जानेवारी २०१४ (IST)

एक शंका विचारायची आहे. कोणतेही दुसऱ्या भाषेतील लिखाण अथवा 'quote' (जसे-वऱ्हाडी,देवनागरी,हिंदी संस्कृत इत्यादी.-थोडक्यात म्हणजे मराठीशी साधर्म्य असणाऱ्या भाषा, बहुतेक सारखी लिपी असणाऱ्या भाषा) हे शुद्धलेखनाचे दृष्टीने मराठीत कसे लिहावे?ते जसेच्या तसे उतरवावे कि त्यावर मराठी शुद्धलेखनाचे संस्कार करून. आपल्यासवडीनूसार कळवावे ही नम्र विनंती.

माझ्या ज्ञानसंवर्धनाबाबत तसेच, आपल्या मनापासून दिलेल्या क्र.९/१च्या अभिप्रायाबाबत शतशः धन्यवाद.--वि. नरसीकर ०९:३६, १८ जानेवारी २०१४ (IST)[reply]

गोल्डन राईस[संपादन]

`गोल्डन राईस'विषयी लेख लिहिण्यासाठी लेखाचे शीर्षक काय असावे? मला `सोनेरी तांदूळ' किंवा `पिवळा तांदूळ' असे काहिसे सूचते आहे. योग्य आणि चपखल शीर्षकाविषयी तुमचे मत कळवावे. संतोष दहिवळ (चर्चा) १२:५२, १८ जानेवारी २०१४ (IST)[reply]

ता.क. मला सुचलेले आणखी एक `सुवर्ण तांदूळ' -- संतोष दहिवळ (चर्चा) १३:४५, १८ जानेवारी २०१४ (IST)[reply]

वैश्विक भाषा वरणित्र[संपादन]

'माझ्या पसंती'तील 'सदस्य व्यक्तिरेखे'त जाउन यूनिव्हर्सल लॅग्वेज सिलेक्टरला 'चेक' करा व पुन्हा मांडणी बदला.नुकतेच मी अभिजितला तसे सुचबिले व त्याचे काम झाले. प्रणालीतील काहीतरी गडबडीमुळे असे होउ शकते. बघा. जमते काय?

--वि. नरसीकर ११:५५, २२ जानेवारी २०१४ (IST)

खरेच झाले![संपादन]

जमले, सर्व काही पूर्ववत झाले. इयक्या लवकर आणि इतक्या सहज मराठी माझ्या संगणकावरची टंकलेखनातील बिघडलेली मराठी अक्षरे दुरुस्त होतील असे वाटले नव्हते. तुमच्या सूचनेबद्दल मनापासून आभार. दुरुस्ती जमली नसती तर टंकलेखनातला आनंदच गमावला असता. ...J (चर्चा) १२:१३, २२ जानेवारी २०१४ (IST)[reply]

अबबब[संपादन]

आपल्या सर्वांच्या वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे व माझ्या विषयीच्या स्नेहामुळे हे सर्व घडले आहे.आपल्या सर्वांचे प्रोत्साहनही त्यास कारणीभूत आहे असे मी समजतो.--वि. नरसीकर १२:०६, २२ जानेवारी २०१४ (IST)

टंक (फाँट)[संपादन]

आपण 'Lohit marathi' हा टंक वापरता असे दिसते. कसे कोणजाणे, तो 'प्रणालीतील(सिस्टिम) टंक' निवडल्या गेला. त्यामुळे ही गडबड झाली असे वाटते. रात्रीत मी केलेले काही बदलही उलटवलेत.त्यामुळेही ते शक्य झाले असेल. देवच जाणे.--वि. नरसीकर १२:२५, २२ जानेवारी २०१४ (IST)

  • दुसरे असे कि आपले चर्चापान बरेच मोठे झाले आहे.आपली परवानगी असेल तर, आपल्या जून्या चर्चा दप्तरदाखल करतो.--वि. नरसीकर १२:३३, २२ जानेवारी २०१४ (IST)

मनोगत[संपादन]

नमस्कार जे, मनोगत व्यवस्थितपणे कार्यान्वित आहे. बंद झालेले नाही... फार काळापूर्वी त्याचे विदागार ढासळले होते पण त्यानंतर त्याचे कार्य चालू आहे असे माझे पाहणे आहे. आवश्यकता भासल्यास वापर करायला हरकत नसावी. निनाद ०३:४७, २३ जानेवारी २०१४ (IST)[reply]

कंट्रोल एफ ५ दाबून सय रिकामी करून परत प्रयत्न करा. किंवा दुसरेच न्याहाळक वापरून पाहा. आय ई, क्रोम, डॉल्फिन, सी मंकी, सफारी, ऑपेरा वगैरे. मी इतक्यातच पाहिले मनोगत सुरू आहे. निनाद १०:०१, २३ जानेवारी २०१४ (IST)[reply]

दुजोरा[संपादन]

मीही बघितले. 'मनोगत' सध्या सुरू आहे.--वि. नरसीकर (चर्चा) १०:३५, २३ जानेवारी २०१४ (IST)[reply]

गुगल सर्च[संपादन]

I.Expl.च्या ब्राउजरच्या खिडकीत google search टाकून ते उघडा व त्यात manogat टाकून प्रयत्न करून बघा. --वि. नरसीकर (चर्चा) ११:४२, २३ जानेवारी २०१४ (IST)[reply]

+१ हेच सांगायला आलो होतो :) निनाद १४:३८, २३ जानेवारी २०१४ (IST)[reply]

I.E.> Tools >Internet options >Internet zone> Restricted sites मध्ये मनोगत (www.manogat.com) असल्यास ते काढा. बाय द वे आपल्या आय ई ची व्हर्शन काय आहे?--वि. नरसीकर (चर्चा) ११:१८, २४ जानेवारी २०१४ (IST)[reply]

शुद्धलेखन साहाय्य विनंती[संपादन]

नमस्कार

मराठी विकिस्रोत बंधूप्रकल्पाच्या माध्यमातून मूळ दस्तएवजांचे जतन आणि इतरभाषी मूळ दस्तएवजांच्या अनुवादाचे काम होत असते. ज्या प्रकारे टिळकांनी गीतेचा अनुवाद मूळाबरहुकूम करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने विकिस्रोत प्रकल्पातही अनूवाद करता येतो पण अनूवाद खूपसा स्वैर असू शकत नाही मूळाबर हुकूम शक्य तेवढा सरळ शब्दश: केला जातो. एका पेक्षा अधिक अनुवाद पर्यांयांचा वापर करून शब्द योजना वेगवेगळ्या पद्धतीने करून पर्यायी अनुवाद उपलब्ध करून ठेवता येतात.

मराठी विकिस्रोतवरील अनुवादांच्या मालिकेतील लोकमान्य टिळकांच्या दैनिक मराठा मधील इंग्रजी अग्रलेखाचा पहीला अनुवाद करून तयार आहे . काय शिवाजी नॅशनल हिरो नाहीत ? या लेख पानावर आपले शुद्धलेखन साहाय्य हवे आहे.


विकिस्रोत प्रकल्पात साहित्य मूळस्वरूपात जसे आहे तसे जतन केले जात असल्यामुळे अनुवादेतर भागात शुद्धलेखन चिकित्सा टाळावी ही नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२७, ७ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]

रमाई भीमराव आंबेडकर[संपादन]

रमा , रामी, रमू, रामू, इ . नावाने रमाई आंबेडकर ओळखल्या जात असत. स्वतः: बाबासाहेब आंबेडकर त्यांना रामू या नावाने बोलावत असत. पण सर्वत्र त्यांचे रूढ झालेले नाव “रमाई” असेच आहे.त्यांच्या जीवनावर रमाई नावाने चित्रपट निघालेला आहे.तसेच डॉ.यशवंत मनोहर यांनी देखील त्यांच्या जीवनावर रमाई नावानेच पुस्तक लिहिलेले आहे.सर्व आंबेडकरी जनता त्यांना रमा किंवा रमाबाई यापेक्षा “रमाई” या नावानेच ओळखते आहे. साळवे रामप्रसाद २३:३९, १९ मार्च २०१४ (IST)

माझा स्पष्टीकरण[संपादन]

नमस्कार जे,

सर्वात आधी माझा कौतुक आणि त्यासोबत माझा टीका करण्याबद्दल तुमचे आभार.

एका माणूस जेव्हा कुठली नवीन गोष्ट शिकतोय, तेव्हा शिकण्या दरम्यान चुक होणं हे अगदी स्वाभाविक आहे. माझी पण तसंच आहे. मी बंगाली आहे हे तर तुम्हाला आधीच कळलंय. मला भाषे शिकवण्याची आवड आहे म्हणुन मी ह्या भाषेतून विकिपीडियावर लेख लिहिलंय. असं करण्यामुळे मला पण कळलंय की मी किती शिकलो.

माझा लेखनी विषयी बरेच लोकांनी आप-आपले मत जाहीर केलंय. तुम्ही पण केलात. तुम्ही मला "गौडबंगाल" पण म्हणालात (जरी मला नाही माहित हा माहिती तुम्हाला कुठून मेळाला), पण त्यात मला काहीही फरक पडणार नाही. कारण प्रत्येक टीकामुळे मला आत्मविश्वास आणखीन वाढते.

आता माझा लेखाविषयी येतो- Mahitgar साहेबांना माझा लेख विषयी जो गैरसमज झाले, (त्यांना असं वाटते की हा लेख मी मशीन ट्रांस्लेटर वापरून भाषांतर केलेली आहे) ते मी दूर करून देते. संपूर्ण लेख मी Google Input Tools ([[३]]) च्या वापर करून लिहिलंय आणि ते पण मराठीच्या जितकं ज्ञान मला आतापर्यंत लाभलंय, ते वापरून. आणि त्या पद्धतीने लिहिता कदाचित चूक झालेली असेल. पण मूळ इंग्रजी लेख आणि ह्या लेख मध्ये एक तफावत पण आहेत. मूळ लेखात माझा द्वारे टाकलेल्या दोन यादी त्यामध्ये नाही आहे. मराठीतील भाषांतर केलेल्या लेख मुळ इंग्रजी लेखातून वेगळं असावं म्हणून मी ह्या दोन याद्या टाकलंय .

तुम्ही अगदी खरं म्हणाले - "रीटा" आणि "ऋता" मधल्या तफावत मला कळलेलं नाही, पण तरीही मी तुम्हाला वचन देतो - की इथून पुढे मला नक्कीच लक्षात येईल की इतर भाषेत लेख कसे लिहावे आणि कसे नाही.

पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार. आणि हो, शेवटी एक सांगतो - लिहित्या दरम्यान जर ह्या लेख मध्ये देखील तुम्हाला काही चुका सापडलेली असेल, तर मी त्यासाठी आधी पासून माफी मागते.

Souwrit.ray (चर्चा) २०:०१, १४ एप्रिल २०१४ (IST)[reply]

तुम्हाला अॅ बहुदा असा दिसत असावा ऑपरेटिंग सिस्टिम-WindowsXP SP2 ब्राऊजर-Firefox29 windows7/8 वर मात्र व्यवस्थित दिसतो मी पाहिले आहे. त्याचेही चित्र तुम्हाला इतरत्र उपलब्ध करुन देईल. चित्रात दिसतो तसाच अॅ तुम्हाला दिसत असल्यास व अॅ संदर्भात कुठे संदर्भ देण्याची गरज भासल्यास http://prntscr.com/4kucmp ही लिंक वापरावी. --संतोष दहिवळ (चर्चा) १८:१७, ८ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]


http://prntscr.com/4kucmp ही लिंक उघडली, पण तीवरचा अॅ म्हणजे एव्क आयत आणि त्यात आकडे आहेत.. .... J (चर्चा) १३:२५, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

ॲरिस्टॉटल लेखातील ॲ तुम्हाला स्वत:ला लेमके कसे दिसतात ? तुम्च्या वर्णनावरून http://prntscr.com/4kucmp या लिंकेतील छाया चित्रा प्रमाणे दिसत असेल असा संतोष यांचा कयास असावा असे दिसते. किंवा संतोष यांनी त्यांच्या चर्चा पानावर बरीच चित्र उदाहरणे दिलीत. ॲरिस्टॉटल लेखातील ॲ तुम्हाला स्वत:ला http://prntscr.com/4kucmp असे दिसत नसल्यास लेमके कसे दिसतात ? हे नेमके पणाने समजले तर बरे पडेल. धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४६, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

ॲरिस्टॉटल लेखाच्या निमीत्ताने[संपादन]

नमस्कार,

संतोष दहिवळ यांनी त्यांच्या चर्चा पानावर एकच अक्षर आंतरजाल वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या स्वत:च्या ऑपरेटींग सिस्टीम आणि ब्राऊजर नुसार कसं वेगवेगळ दिसू शकत याच चांगल उदाहरण प्रस्तुत केल ते आपण बघीतलच.


१) यातून जो बोध होतो अक्षर प्रत्येकाला आपापल्या संगणकावर कशी दिसतात याच्याशी कळफलकांचा सरळ संबंध नाही. कळफलक विशीष्ट अक्षर टंकण्याचे माध्यम/लेआऊट मात्र आहे.

२ अ) एखाद अक्षर/जोडाक्षर कसं दिसत याच मुख्य काम फाँट करतात. हा संदर्भ आपणास वाचनीय वाटेल - (अर्थात हे काम फाँटानी करण्या पुर्वी संबंधीत अक्षर/जोडाक्षराचा संगणकाशी संवाद साधण्यासाठी लागणारा क्रमांक युनिकोड पुरवत) - प्रत्येक फाँट संच एकच अक्षर/जोडाक्षर वेगवेगळ्या रुपात दाखवू शकतो. (संदर्भ उदाहरण जसे श आणि ल अक्षरे तीच असतील त्यांचे युनिकोड क्रमांक तेच असतील पण प्रत्येक फाँट संचात ते वेगळे दिसतील. चित्र:La_ani_sha_Marathi_options_rendering.png हे चित्र आपल्या संदर्भा पुरते चढवले नंतर वगळले जाईल) म्हणजे श आणि ल चे इंन्स्क्रीप्ट कळफलकावरचे चित्र कसेही असले तरी प्रत्यक्षात त्याचे वेगवेगळे दर्शन फाँटसंचामुळे होते (इनस्क्रीप्ट मुळे नव्हे)

२ ब) असच दुसर उदाहरण तुम्ही अनुभवल ते तत्त्वज्ञ मधील त्त्

३) फाँटसंच कुठे असतात ? मुख्यत्वे तुमच्या संगणकात तुमच्या ऑपरेटींग सिस्टीम सोबत येत असतात. पण अर्थातच आंतरजालावर त्याच दर्शन घडवण्याच काम ब्राऊजर करतात.

४) म्हणजे एखादे अक्षर आपल्या स्क्रीनवर व्यवस्थीत दिसावयाचे म्हणजे फाँटसंच, ऑपरेटींग सिस्टीम आणि ब्राऊजर यांचा ताळमेळ(समन्वय) जमावयास हवा


हि चर्चा नमुद करण्याच कारण आपण हे मुद्दे समजून घेऊ शकाल तेवढी विकिपीडिया:धूळपाटी/हवे असलेले कळफलक बदल येथील जुनी चर्चा पुढे नेणे सोपे जाईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५५, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]


मराठी ल आणि श[संपादन]

महाराष्ट्र सरकारच्या एका (एचटीटीपी दोन टिंबे दोन ऑब्लिक टायनीयूरएल डॉट कॉम/y8pzet3 (परिपत्रकानुसार) दोन गोलाकार असलेला ल आणि शेंडी असलेला श हेच फक्त अधिकृत आहेत, कुबडी घेतलेला ल आणि टक्कल असलेला श नाहीत! मराठी विकिपीडियावर सुयोग्य ल आणि श उमटविण्यासाठी योग्य ते फॉन्ट्‌स उपलब्ध व्हावेत. ’त्र ’ला वाटी जोडून काढलेला क्र आणि ’त्त ’ला वाटी जोडलेला क्त हेच अधिकृत मराठी लिखाण आहे. ट, ठ ड आणि पाऊण य ची अन्य जोडाक्षरेही पहावीत. अशीच जोडाक्षरे लिहिण्याची सोय विकीवर हवी, त्यासाठी वाटल्यास विकीने सभासदाच्या संगणकावर कोणती ऑपरेटिंग सिस्टिम आणि आणि कोणता ब्राउझर असावा याची शिफारस करावी. ....J (चर्चा) १३:५९, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]


>>मराठी विकिपीडियावर सुयोग्य ल आणि श उमटविण्यासाठी योग्य ते फॉन्ट्‌स उपलब्ध व्हावेत.<< कदाचित 'मनोगतामुळे' असेल आपल्या संकल्पनेत नेमकी येथेच गल्लत होते आहे. फाँटसंचात विशीष्ट पणे दिसणारे अक्षर उपलब्ध करण्याची पहिली जबाबदारी फाँट तयार करणाऱ्याची, ते संगणक किंवा स्मार्टफोन इत्यादी उपकरणात स्विकारण्याची जबाबदारी ऑपरेटींग सिस्टीमची, ऑपरेटींग सिस्टीम ला साहाय्य करण्याची जबाबदारी ब्राऊजरची. आपण म्हणतातसे सध्याच्या घडीला अधिकाधीक आदर्श फोंटसंच / ऑपरेटींग सिस्टीम आणि ब्राऊजरचे पर्याय कोणते हे सुचवणे शक्य होऊ शकेल नाही असे नाही. पण याने अथवा मनोगताच्या स्वत:पुरते कण्याच्या स्टाईलने मुख्य प्रश्न व्यवस्थीत सुटत नाही. मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी फाँट संच तयार करणारे, ऑपरेटींग सिस्टीम तयार करणारे आणि ब्राऊजरचे तयार करणारे या सर्वांच्या मागे त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या सरमिसळ न करता दाखवून देणे सातत्याने पाठपुरावा करणे हेच लाँगटर्म सोलूशन असू शकते.

दुसरेतर अक्षरांबद्दल वर्णनात्मकतेच्या मर्यादा समजून घेऊन शक्य त्या प्रत्येक ठिकाणी छायाचित्रांचा उपयोग अत्यंत गरजेचा आहे त्या शिवाय प्रगतीचा वेग मंदावलेलाच राहणार. ल आणि शचे छायाचित्र देऊनही आपल्या पहाण्यात आले नसावे काही फाँटसंचातून तुम्ही म्हणता तसा मराठी श आणि ल बरोबर दिसलेला मी स्वत: अनुभवले आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३३, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

"मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र" संस्थळ[संपादन]

खालील संकेतस्थळास सवडीनुसार भेट देऊन पहावी

http://coe.maharashtra.gov.in/index.php?lang=mr


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:४२, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]


सावरकरी 'र' साठी[संपादन]

र्‍ा हे लेखन चालू शकेल का ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:२९, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]


निश्चित चालेल. ...J (चर्चा) १९:२३, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]


तांत्रीकदृष्ट्या र्‍ा हे सबंध अक्षर नाही. र्‍ आणि ने बनवलेले जोडाक्षर आहे.

सावरकरी र्‍ा ची बाराखडी र्‍ा र्‍ाा र्‍ाि र्‍ाी र्‍ाु र्‍ाू र्‍ाे र्‍ाै र्‍ाो र्‍ाौ र्‍ाृ र्‍ाॣ र्‍ाॅ र्‍ाॉ र्‍ां र्‍ाः अशी दाखवता येईल र्‍ाि अक्षरांतरण पर्याने टंकता आली नाही, इनस्क्रिप्ट वापरून टंकता आले. सावरकरी र्‍ा ने भूर्र् हे लेखन कसे करणार भूर्‍र्‍ा ह्यात अर्‍धा र्‍ आल्याचे निटसे लक्षात येत नाही .

र्‍ा  र्‍ाा र्‍ाि  र्‍ाी  र्‍ाु र्‍ाू र्‍ाे र्‍ाै र्‍ाो र्‍ाौ र्‍ाृ र्‍ाॣ र्‍ाॅ  र्‍ाॉ  र्‍ां र्‍ाः चा फाँटसाईज खूप छोटा घेतला तर ( र्‍ा र्‍ाा र्‍ाि  र्‍ाी  र्‍ाु र्‍ाू र्‍ाे र्‍ाै र्‍ाो र्‍ाौ र्‍ाृ र्‍ाॣ र्‍ाॅ  र्‍ाॉ  र्‍ां र्‍ाः )  चष्मा असलेल्या लोकांना न किंवा च सोबत काही वेळा कन्फ्यूज होण्याची शक्यता वाटते. सावरकरी     र्‍ा     बाकी उदाहरण म्हणून ठिक वाटते.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२१, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]


भूर्र या शब्दात ’र’वर रफार आहे. रफारात ’र’चा उच्चार तीव्र आणि आघातासहित होतो. र्र म्हणजे र्‍र्‍ा नाही. र्र म्हणजे र्‍ा वर आघातयुक्त रफार, तर र्‍र्‍ा मध्ये पहिल्या ’र’चा उच्चार मृदू आहे. मराठीत र्‍य आणि र्‍ह ही जोडाक्षरे समजली जात नाहीत. र्य आणि र्ह ही जोडाक्षरे आहेत. गनिमी काव्याने आणि शाहिरी काव्याने या दोन काव्यांतल्या पहिल्या काव्यात जोडाक्षर नाही, दुसर्‍यात आहे.

देवनागरीतील खछ्ठथफ आणि घझढधभ हे अनुक्रमे कचटतप आणि गजडदब यांचे हकारयुक्त उच्च्चार आहेत. ख म्हणजे क्‍ह नाही. क्‍ह, च्‍ह, त्‍ह प्‍ह, ग्‍ह, ज्‍ह, ब्‍ह ही जोडाक्षरे आहेत, कारण त्यांचा उच्चार करताना अक्षरावर आघात होतो. म्हणूनच आघात न होता उच्चारली जाणारी खछठथफ ही अक्षरे जोडाक्षरे नाहीत. त्याचप्रमाणे र्‍य आणि र्‍ह हे ’र’चे नुक्रमे यकारयुक्त आणि हकारयुक्त उच्चार आहेत, ती जोडाक्षरे नाहीत. याच नियमाने आघात न देता उच्चारता येणारी ह्य(ह्याला), व्य (व्यायाम), ल्य(काल्याचे कीर्तन, वाल्या कोळी), श्य(काश्याची वाटी), व्ह(व्हटाचं डाळिंब फुटलं), ल्ह(अंगाची ल्हाई ल्हाई झाली) यांना जोडाक्षरे म्हणता येत नाही. म्हणूनच IPAमध्ये ख हा उच्चार दाखवताना kh असा न दाखवता kh, असा दाखविलेला असतो.

एकूण काय र्‍र्‍ा (र्‍र) हे अक्षर लिहिण्याचा कधी प्रसंग येणार नाही. रृ हेही अक्षर कधी लागणार नाही मात्र, नैर्ऋत्य लिहिताना र्ऋ लागतो. .... J (चर्चा) २२:२६, १० सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

Wikimedia Consultation in Bangalore[संपादन]

Dear fellow Wikipedian,

I write to you because you're one of the most active Marathi Wikipedians.

The Wikimedia Foundation (the non-profit operating Wikipedia sites) is holding an important community consultation in Bangalore on October 4th-5th about the future of Wikimedia work in India.

All the information is here.

So far, none of the most active Marathi Wikipedians have been nominated to represent the Marathi Wikipedia community, and I think it would be a pity not to have you with us to share your perspective on how we can best support you and promote your work.

Please consider having a discussion on-wiki and coming up with delegates to nominate on the talk page here.

Looking forward to meeting some of you soon!

Asaf Bartov
Wikimedia Foundation
Ijon (चर्चा) ०६:४१, १४ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

शीर्षक लेखन संकेत चर्चा[संपादन]

नमस्कार J,

आपले शीर्षक लेखन संकेतावरील टिप्पणी वाचली. ही चर्चा आता ध्येय धोरणे चावडी वर आहे.

येथे प्रस्ताव मांडलेला आहे. कृपया यावर आपले मत मांडावे.

अभय नातू (चर्चा) ०९:४२, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

दुवे[संपादन]

नमस्कार J,

माझ्या असे लक्षात आले आहे की आपण विकिपीडियावर नवीन पान तयार केल्यानंतर त्यावर दुवे देण्याचे टाळता. तेव्हा विकिपीडियावर दुवे देण्याचे न टाळता नवीन पानांना दुवे देत चला.

पुष्कर पांडे(चर्चा) १६:३८, १७ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

शीर्षक[संपादन]

कृपया येथे आपले मत नोंदवावे ही विनंती. - अभिजीत साठे (चर्चा) ११:४१, ३१ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

य.गि. महाजन[संपादन]

काम झाले. - अभिजीत साठे (चर्चा) २०:०२, २१ डिसेंबर २०१४ (IST)[reply]