सदस्य:Aniruddha22Paranjpye

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
en-2 ही व्यक्ती मध्यम पातळीचे इंग्लिश लेख निर्माण करु शकते.
This user is able to contribute with an intermediate level of English.

साचा:User hi-2

ही व्यक्ती वर्गीकरणासाठी हॉटकॅट वापरते


अनिरुद्ध परांजपे
एक विकिसदस्य.
इ.स. १९९०
पुणे, महाराष्ट्र
निवासस्थान मुंबई/पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण संगणक पदविका, बी. एस्सी. (चालू)
प्रशिक्षणसंस्था फर्ग्युसन कॉलेज (सद्य)
पेशा विकिसदस्य, विद्यार्थी आणि इतरओळख[संपादन]

नमस्कार, हे अनिरुद्ध परांजपे ह्यांचे खाते असून हा एक विकिसंपादक आहे. सदस्य:Aniruddha Paranjpye हे पूर्वाश्रमीचे खाते असून काही तांत्रिक कारणाने ते सध्या बंद ठेवले असून ही दोन्ही खाती एकत्रीकरणाचा विचार चालू आहे. आपणांस काही सूचना करावयाच्या असल्यास संबंधित चर्चा पानास भेट द्यावी.

संपादन बेत[संपादन]

मी विकिवर संपादनासाठी विशिष्ट अमूक विभागाचे संपादन करीत नसून साधारण सर्व विभागात जमेल तेवढे संपादन करतो. मुद्दा इतकाच की वेगवेगळ्या विषयांवरील लेख मराठीत यावेत. काही वेळेस अलीकडील बदल मध्ये आलेल्या नव्या लेखांत थोडी भर घालणे, स्थानिक भाषाउच्चारांनुसार नावे घालणे अथवा चर्चा पानांवर निरिक्षणे नोंदविणे इ गोष्टीही करतो. माझी लेख संपादित करण्याची साधारण पद्धत म्हणजे इंग्लिश विकिवरील काही लेख भाषांतरित/अनुवादित करणे मागून त्यात थोडी थोडी भर घालणे. अर्थात अशा गडबडीत काही शुद्धलेखनाच्या चूका होतात, पण त्या इतर विकिसदस्यांकडून सुधारल्या जातात. इंग्लिश विकिवर भौतिकशास्त्र, गणित, मेक्सिको, मेक्सिकोचा इतिहास, अस्तेक, माया संस्कृती, इंका, कोलंबसपूर्व संस्कृती, अमेरिकेचा इतिहास, युरोप आणि संबंधित देशांचा इतिहास, आशियाई देशांचा इतिहास, लष्कर, लैंगिकता, रतिचित्रण, छायाचित्रण, पुस्तके, कॉमिक्स, कार्टून्स, काल्पनिक जग, चित्रपट आदींवर बरेच लेख आहेत. ते पद्धतशीरपणे मराठीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे, तसे लेख आल्यास मराठी विकि साधारण १ लाख लेखसंख्या पार करेल. त्याचबरोबर लेखांच्या आशयघनतेकडे माझा तेवढाच कटाक्ष आहे. सध्या गणित आणि अस्तेक संस्कृतीवर लेख लिहिण्याचे काम चालू आहेत. फावल्या वेळात १४,००० बिनमजकूरांच्या लेखांना चांगल्या दर्जाप्रत नेण्यासाठी माहितीत थोडीथोडी भर घालण्याचा विचार चालू आहे.

अनिरुद्ध परांजपे १६:३०, २६ जून २०११ (UTC)