विकिपीडिया:सहकार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी विकिपीडिया व त्याच्या विक्शनरी, विकिबुक्स,विकि॑क्वोट,विकिस्रोत इत्यादी सहप्रकल्पांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने सदस्यांकडुन खालील प्रकारचे सहकार्य मीळणे खूप उपयुक्त ठरू शकते.

संगणकीय उपकरणे[संपादन]

 • कृपया तज्ज्ञांनी शक्यातीथे ब्रँडचे नाव न लिहीता मिनीमम स्पेक्स काय असावेत याचे मार्गदर्शन चर्चा पानावरच करावे.

खालील संगणकीय उपकरणे उपलब्ध असल्यास ती स्वतः वापरावीत शक्य तेव्हा इतर मराठी विकिकरांना तिच्या मुकत वापरा करता पाचारण करावे. आणि अर्थिक संसाधने उपलब्ध असल्यास अशी उपकरणे बाळगण्यास प्राधान्य द्यावे. या उपकरणांचे विकिपीडिया संदर्भातील उपयोग पुढील विभागात आढळतीलच

 1. डिजीटल कॅमेरा
 2. स्कॅनर
 3. विकिपीडियास उपयूक्त ठरू शकेल अशी ध्वनीमुद्रण व्यवस्था.
 4. प्रिंटर
 5. पॉवरपॉईंट सादरीकरणांकरिता लॅपटॉप्स आणि प्रॉजेक्टर्स

इतर संसाधने[संपादन]

आपल्याकडे आर्थीक संसाधने उपलब्ध असल्यास खालील प्रकारची संसाधने बाळगून शक्य असेल तेव्हा इतर मराठी विकिकरांना मुक्त स्वरूपात उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा.

 1. मराठी भाषेतील विवीध संदर्भ ग्रंथ, ग्रंथसुची, प्रताधिकारमुक्त साहीत्य.
 2. विवीध पारिभाषिक शब्दकोश, मराठी व्याकरणकोश
 3. विवीध विश्वकोश
 4. गव्हर्नमेंट गझेटीयर्स
 5. शब्द व्युत्पत्ती बद्दल मराठी संस्कृत हिंदी व महाराष्ट्राच्या शेजारील भाषांचे व्युत्पत्तीकोश

सहकार्य[संपादन]

सध्या खालील सहकार्याची / योगदानाची मराठी विकिपीडियास विशेषत्वाने प्रतीक्षा आहे.

 1. सर्वप्रकारची प्रताधिकार मुकत चित्रे /छायाचित्रे
 2. मराठी आणि बोलीभाषेतील अक्षरे,शब्द,वाक्ये उच्चारणांची व्याकरण विभागास सोयीची होतील अशी ध्वनीमुद्रणे
 3. मराठी विकिपीडियातील चांगल्या लेखांचे प्रींट काढून तज्ञांचे अभिप्राय मागवून लेखात सुयोग्य सुधारणा घडवणे.
 4. सर्व दृष्टीने परीपूर्ण लेखांचे -महाविद्यालयांची वार्षीक अंक किंवा इतर -विवीध माध्यमात मुद्रीत, ध्वनीमुद्रीत, पीडीएफ इमेल अटॅचमेंट्स प्रकाराने मुक्त वितरण करणे .

तज्ञ[संपादन]

खरेतर मराठी विकिपीडियास प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांच्या सतत लेखन योगदानाची सहकार्याची गरज आहेच.खास करून आपण स्वतः प्रताधिकार कायदा, मराठी व्याकरण, मराठी शुद्धलेखन, आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती, नकाशेशास्त्रातीतल तज्ञ

तांत्रीक सहकार्याच्या आवश्यकता[संपादन]

मुख्यलेख विकिपीडिया:सहकार्य/तांत्रीक
 1. इंटरनेटवर मराठीत संगणक टंकलेखन कसे करावे याबद्दल नवागतांना मार्गदर्शनाची फारमोठी गरज सतत लागते. खूपच थोडे लोक कोणतीही गोष्ट स्वतःच्या बळावर करण्यास समर्थ असतात.बहूसंख्य लोकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन अधिक सुलभ वाटते. यादृष्टीने नेटवर्क इंजीनिअर्सनी कँप्स किंवा भेट आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन अशा स्वरूपाच्या सहकार्याबाबतसुद्धा विचार करावा.
 2. बॉट्स सांगकाम्या कसे लिहावेत आणि वापरावेत याचे मार्गदर्शन
 3. विकिपिडिया:मशिन ट्रान्सलेशन
 4. मिडियाविकि संगणक प्रणाली कशी वापरावी याचे मार्गदर्शन
 5. OCR तंत्रज्ञान विकास

पारितोषिक[संपादन]

 1. विकिपीडियावर संपादन कसे करावे व उपयोग कसा करावा या संबधात प्रबोधन पर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स/कार्टून मिडिया/व्हीडियो मिडिया कॅटेगरी स्पर्धेकरिता पारितोषिकास आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करा.
 2. विकिपीडियातील सुयोग्य मजकुर प्रभावीपणे सामान्य जनते पर्यंत पोहचवणार्‍या व्यक्ति किंवा संस्थांकरिता सन्मानार्थ पारितोषिकास आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करा.

स्वयंसेवक[संपादन]

स्वयंसेवकांनी वेळ देण्या सारखे फिल्डवर्क

 1. विवीध महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थानां त्याच्या विषयासंदर्भतील मराठीत विकिपीडियात योगदान करण्याचे आवाहनपर परिपत्रके पाठवणे.
 2. प्रताधिकार मुक्तिकरिता विनंती पत्रे पाठवणे व मान्य विनंत्यांचा पत्रव्यवहार सुयोग्य पद्धतीने सांभाळणे
 3. ज्या संपर्क माध्यमातून मराठी विकिपीडियाचा माहिती प्रसार झाला नाही तो घडवण्यात सहकार्य करणे
 4. तज्ञ लोकांकडून लेख तपासून घेणे. लेखातील संदर्भ प्रत्य्क्ष पुस्तकात तपासणे.

हेसुद्धा पहा[संपादन]

येथेसुद्धा सहकार्य हवे आहे