विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विकिपीडिया:प्रमाणपत्र[संपादन]

राहुल विकिपीडिया:प्रमाणपत्र या प्रकल्पात प्रमाणपत्र बनवण्यात तुमचा सहभाग हवा आहे.बाकी सुद्धा या प्रकल्पाच्या प्रगतीकरता काही वेळ देता आलातर स्वागतच आहे.माहितगार ११:००, २० ऑगस्ट २०११ (UTC)
जसे शाळेत विद्यार्थ्यांना सहभाग घेतल्याबद्दल एखादे प्रमाणपत्र किंवा सर्टीफिकेट दिले जाते तसेच बनवून हवे आहे. शक्यतो मराठी विकिपीडियावरच नाव गाव टाईप करता येईल असा साचा प्रिफरेबल शिवाय A4 साईज कागदावर सहज प्रिंटेबल आणि दिसावयास चांगले असावे.
मी स्टॅटेजी विकिवर येथे बरेच सविस्तर लिहिले आहे. त्याचे चर्चा पानही पहावे.माहितगार ११:३८, २० ऑगस्ट २०११ (UTC)

>> (लोगो, चिन्ह , आदी.) काही ब्र्याड रंग (असल्यास ) बाबदची माहिती द्यावी

विकिपीडियाचा लोगो वापरू नये त्या साठी विकिमीडिया फाऊंडेशनची परवानगी लागते (तेही भविष्यात त्यांची परवानगी घेउन करण्यास हरकत नाही). मराठी आणि महाराष्ट्र या संदर्भाने आणि विकिपीडियाशी संबधीत आहे या दोन्ही गोष्टी दाखवणारा एखादी नवीन लोगो संकल्पना सुद्धा चालेल किंवा नविन काही सुचे पर्यंत सध्याचा महाराष्ट्र बार्नस्टारचित्र तसेच ठेवले तरी चालेल. रंग इंटरनेट आणि प्रिंटींग मध्ये दोन्हीकडे व्यवस्थीत येणारा कोणताही चालेल.

>>मसुदा आणि इतर माहिती

मसुदे मुख्य प्रकार दोन

१) विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे

२) विकिपीडिया ज्ञानकोशातील ज्ञानाचा सुयोग्य वापर करून आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून मराठी भाषिकांना मुक्तपणे वापरण्याकरता उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे

सोबत "अशा जगाचा विचार करा, जिथे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला अखिल मानवी ज्ञानाभांडारात मु्क्त विहरता येईल." हे विकिपीडियाचे ब्रीदवाक्य माहितगार २०:०१, २० ऑगस्ट २०११ (UTC)

>>>माहितीगार,आपण विकिपीडिया च्या लोगो वापर संबंधी परवानगी साठी त्वरित हालचाल करावयास हवी (मान्यता येईल तेव्हा येईल पण सुरुवात करून द्यावी )कारण विकिपीडियाच्या ब्र्यांड व्ह्यालूचा आपणास फायदा घेता येईल असे वाटते.

अशा कार्यक्रमास विकिमीडिया इंडिया चॅप्टर, इंडिया प्रोग्राम्स आणि सरते शेवटी विकिमीडिया फाऊंडेशनची अधिकृत मान्यता लागेल.येत्या विकिकॉफरन्स (नव्हेंबरातल्या) मध्ये कुणी हा मुद्दा रेटला तर काही प्रगतीची शक्यता आहे.पण त्या करता मराठी विकिपीडियास जे उपयूक्त आहे ते करण्याकरता थांबून रहावयाचे का असा मुळात प्रश्न आहे उलट आपण आपला कार्यक्रम स्वतंत्र पणे रेटावा त्याच यश इतरांना सिद्ध करून दाखवाव आणि पाठींबा मागावा याचा फायदा आप्ल्या कृती आपल्याला चालू करता येतात इतरांवर विसंबून रहावयास लागत नाही.

काही मुद्दे

>>>विकिपीडियाचा यु आर एल द्यावा का

प्रमाणपत्रात यु आर एल असलेला बरा.


>>>आपणास जे जे ठावे ..... मराठी विपी चे (अनधिकृत/अधिकृत) घोष वाक्य लिहावे का

विकिमीडिया फाऊंडेशनच "Imagine a world in which every single human being can freely share in the sum of all knowledge. That's our commitment." हे घोष वाक्यच मराठी विकिपीडियासही लागू होत.ते अधिक सर्वसमावेशक आहे.
आपणास जे जे ठावे हे बऱ्याच लोकात लोकप्रिय आहे हे खरे असले तरी "शहाणे करून सोडावे सकळ जन" एका अर्थाने त्या वाक्यास दोन अर्थ छाटा आहेत,त्यातील एक अर्थ छटा ह विकिपीडियाच्या व्हॅल्यूज मध्ये परफेक्टली बसत नाही.कारण विकिपीडिया वाचकाला विवेक आहे यावर विश्वास ठेवत इतरांना शहाण करून सोडा म्हटल्या नंतर मला माझ व्यक्तिगत मत मांडण्याची मोकळीक अपेक्षीत होते ती विकिपीडियाच्या परिघात बसत नाही. त्यामुळे या बद्दल आग्रह धरू नये असे माझे प्रांजळ मत आहे.

>>>प्रमाण पत्रावर सही राहणार आहे का (~~)

बेसिकली मूळ कसेप्ट बार्नस्टार सारखाच कुणिही कुणालाही देण्याचे स्वातंत्र्य त्यामुळे ऑनलाईन सही पुरेशी ठरावी सोबत हवेतर प्रिंटेड सर्टीफिकेटवर सही करण्याकरता एखाद ओळीची जागा ठेवावी.

>>>तारीख /कालावधी वैगरे

कालावधीची आवश्यकता नाही तारीख प्रमाणपत्र देण्याची प्रिंटकरताना आपोआप त्यावेळची येईल अशी व्यवस्था केल्यास कसे असेल .

>>>हा साचा असावा असे आपण म्हणता मग तो कोणीहि लावला/वापरला तर ? त्याचे वापराचे तंत्र कसे असावे.

असे कुणी सहसा वपरणार नाही आणि वापरले तर वापरू द्या बार्नस्टारचा पर्याय आहे, नुक्सान होण्या सारखे काही आहे असे वाटत नाही.

>>>बंधू प्रकल्प वा इतर काही विपिशी निगडीत गोष्टी जाहिरातीसाठी द्यावे का

बंधूप्रकल्पावर जरी असे काम केले तरी असे प्रमाणपत्र देता आले पाहिजे.
"जाहिरातीसाठी द्यावे का" हे समजले नाही माहितगार २२:०२, २० ऑगस्ट २०११ (UTC)
ओके, तसे....या बंधूप्रकल्पाकरिता सूद्धा अशाच स्वरूपाची प्रेझेंटेशन्स बनवून देण्याचे आवाहन करून किंवा दुवा देण्यास हरकत नाहीमाहितगार २३:३२, २० ऑगस्ट २०११ (UTC)

प्रमाणपत्र झलक[संपादन]

नमस्कार माहितीगार, मागे आपण सांगितल्या प्रमाणे प्रमाणपत्रासाठी साचा बनवला आहे. आपणास पुरवावलोकना साठी येथे देत आहोत. वापरास अत्यंत सोपा आणि छापता येण्यासारखा बनवण्याचा प्रयत्न आहे.

  • संकल्पना : तीमिरातुनी तेजा कडे
  • अर्थबोध : सदर चित्रात मराठी भाषेचा प्रवास भूतकाळापासून उज्वल भविष्या कडे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा तळाशी तिमिर म्हणजे काळा रंग वापरण्यात आला आहे ज्यात भूतकाळ असेपण अभिप्रेत आहे त्यासाठी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी घेतली आहे जसे बुरुज, किल्ले आणि काळा प्रमाणे आधुनिक गगनचुंबी इमारती ह्या प्रकाशात दाखवल्या आहेत सोबत भगवा झेंडा, राजमुद्रा आणि छत्रपती सम प्रतिमा ह्या मराठीस असलेला राजाश्रय आणि लोकाश्रय दाखवतात. तुतारी फुंकणारे प्रमाण पत्राची इतमानाने करण्यात येणाऱ्या घोषणेचे प्रतिक आहेत.

सूचनांचे स्वागत आहे. राहुल देशमुख ०३:०४, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

Cer12.PNG प्रमाणपत्र
नमस्कार,

प्रमाणपत्र


विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे.


धन्यवाद

निनावीवाईट मराठी[संपादन]

>> "नमस्कार,

प्रमाणपत्र

विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे. धन्यवाद"<<

चांगले मराठी[संपादन]

  • नमस्कार नको.
  • विकिपीडियावर संपादन कसे करावे या विषयावर आपण मराठीतून चांगला नमुना सादर केल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे आपणास हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे.
  • धन्यवाद नको, धन्यवाद प्रमाणपत्र घेणार्‍याने द्यायचे, देणार्‍याने नाही.
  • खाली सही जर असलीच तर तारीख आणि सही करणाऱ्याच्या पदाचे नाव पाहिजे. सही नसली तरीही पदाचे नाव हवेच....J १४:५०, २९ ऑगस्ट २०११ (UTC)

presentation ला सादरीकरण म्हणता येईल काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:१६, २९ ऑगस्ट २०११ (UTC)