Jump to content

विकिपीडिया:शैली मार्गदर्शक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शैली मार्गदर्शक हे पान मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये संपादने करताना नेमकी रचना, विश्वकोशीय भाषा, तसेच मजकुराची एकसंध, दर्जेदार मांडणी या पैलूंविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आहे.

लेखाची मांडणी

लेखाची सुरुवात प्रस्तावनात्मक परिच्छेदाने(/परिच्छेदांनी) करावी. त्यासाठी स्वतंत्र विभागाचा मथळा वापरू नये. प्रस्तावनेनंतर उर्वरित मजकुराची विभागणी विभाग-उपविभागांच्या उतरंडीच्या स्वरूपात करावी. प्रत्येक विभागास किंवा उपविभागास त्या-त्या स्तरानुसार मथळा द्यावा. लेखाच्या शेवटी लेखाचे वर्गीकरण करावे.

लेखाची आदर्शवत मांडणी खाली दिलेल्या तक्त्यानुसार असावी :

क्रम विभाग वर्णन/टिप्पणी
माहितीचौकट साचा संबंधित माहितीचौकट साचा उपलब्ध असल्यास.
प्रस्तावना अनिवार्य. किमान तीन-चार वाक्यांत किंवा एखाद्या परिच्छेदात लेखाच्या प्रधान विषयाबद्दल प्रस्तावना लिहावी.यात लेखाचा थोडक्यात सारांश असावा.
अन्य विभाग/उपविभाग तर्कसंगत पद्धतीने माहितीची विभाग-उपविभागांत रचना करावी.
संदर्भ विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण येथे दिल्याप्रमाणे सर्व संदर्भांचे संकलन गोळा करण्यासाठीचा विभाग.
हे ही पहा विकिपीडियामधील अन्य संबंधीत लेखांचे दुवे
बाह्य दुवे लेखाच्या विषयाशी संबंधित अधिकृत संकेतस्थळे, अन्य माहितीपूर्ण संकेतस्थळांवरील दुव्यांचे संकलन गोळा करण्यासाठीचा विभाग.
वर्गीकरण सहाय्य:वर्ग येथे वर्णिल्याप्रमाणे लेखाचे वर्गीकरण संबंधित वर्गांमध्ये करण्यासाठीचा विभाग.

माहितीचौकट साचा

वर्ग:माहितीचौकट साचे येथे सर्व माहितीचौकट साच्यांचे संकलन उपलब्ध आहे. लेखाच्या प्रधानविषयाशी संबंधित माहितीचौकट साचा उपलब्ध असल्यास तो साचा लेखाच्या प्रारंभी वापरावा.

  • लेखाचा विषय व्यक्तिकेंद्रित असल्यास माहितीचौकटीच्या शीर्षभागी व्यक्तीचे मूळ नावच लिहावे; सन्मानवाचक किताब/पदव्या/हुद्दे लिहू नयेत.

प्रस्तावना

लेखाच्या मुख्य विषयाचे सुस्पष्ट वर्णन करणारी प्रस्तावना लेखाच्या आरंभी असावी.

  • पहिल्या वाक्यात लेखाचे शीर्षक ठळक केलेले असावे. लेखाचा विषय व/किंवा शीर्षक मराठी भाषेखेरीज अन्य भाषेतील असल्यास, मूळ भाषेतील/लिपीतील लेखन त्याच वाक्यात ठळक अक्षरांकित केलेल्या शीर्षकापाठोपाठ कंस घालून त्यात नोंदवावे.
  • व्यक्तिवाचक लेखांमध्ये व्यक्तीचे मूळ नाव पहिल्या वाक्यात ठळक अक्षरांत लिहावे. व्यक्तीचे सन्मानवाचक किताब/पदव्या/हुद्दे ठळक अक्षरांत लिहू नयेत; त्यासाठी इटालिक टाइप वापरावा.

लेखाचे शीर्षक, विभागांचे व उपविभागांचे मथळे

लेखाचे शीर्षक शीर्षकलेखन संकेतांना अनुसरून असावे. लेखाचे शीर्षक प्रस्तुत विषयाची ओळख सांगणारे, सहज वाटणारे, नेमके, आटोपशीर व अस्तित्वात असलेल्या तत्संबंधित अन्य लेखांच्या शीर्षकांस सुसंगत असावे. यांतील काही निकष परस्परविरोधी असल्यास सर्व निकषांचा साधकबाधक विचार करून शीर्षक ठरवावे.

मथळे

लेखाची सुरुवात प्रस्तावनात्मक परिच्छेदाने(/परिच्छेदांनी) करावी. त्यासाठी स्वतंत्र विभागाचा मथळा वापरू नये. प्रस्तावनेनंतर उर्वरीत मजकुराची विभागणी विभाग-उपविभागांच्या उतरंडीच्या स्वरूपात करावी. प्रत्येक विभागास किंवा उपविभागास त्या-त्या स्तरानुसार मथळा द्यावा.

प्रमाणभाषा

मराठी विकिपीडियावर "प्रमाण" मराठी भाषेतील व्याकरणानुसार व शुद्धलेखन नियमांनुसार लेखन करावे, असा संकेत आहे (अधिक माहितीसाठी पाहा : शुद्धलेखनाचे नियम). उदा.: "त्यानं असं केलं" अशी बोलीभाषेच्या ढंगातील वाक्यरचनेऐवजी मराठी व्याकरण व शुद्धलेखनानुसार "त्याने असे केले" अशी वाक्यरचना करावी.

एखाद्या व्यक्तीच्या तोंडच्या बोली वाक्यांचे अवतरण लिहिताना किंवा पुस्तके, चित्रपट, नाटके इत्यादी ललित माध्यमांतील कलाकृतींची मूळ शीर्षके बोली ढंगात असल्यास, केवळ याच बाबींमध्ये संकेतास अपवाद करावा.

अंक व संख्या

लेखातील वाचनीय मजकुरात, तसेच लेखांच्या किंवा वर्गांच्या शीर्षकांत अंक किंवा संख्या लिहिताना देवनागरी लिपीतील अंकांचाच वापर करावा. उदा.: "300 कि.मी.", "इ.स. 1960" असे न लिहिता "३०० कि.मी." व "इ.स. १९६०" असे लिहावे.

दिनांक व वेळा

दिनांक

ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार

  • ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार इसवी सनांमधील पूर्ण दिनांक लिहावयास १ मे, इ.स. २००३ किंवा मे १, इ.स. २००३ किंवा १ मे इ.स. २००३ यांपैकी कोणतीही एक पद्धत वापरावी. लेखात अगोदर भरलेल्या मजकुरात इसवी सनातील दिनांक नोंदण्याची जी पद्धत वापरण्यात आली असेल, त्या पद्धतीशी सुसंगत पद्धतीने इसवी सनातील दिनांक नोंदवावेत.
  • ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार इसवी सनपूर्व काळातील पूर्ण दिनांक लिहावयास १ मे, इ.स.पू. ५० किंवा मे १, इ.स.पू. ५० किंवा १ मे इ.स.पू. ५० यांपैकी कोणतीही एक पद्धत वापरावी. लेखात अगोदर भरलेल्या मजकुरात इसवी सनपूर्व काळातील दिनांक नोंदण्याची जी पद्धत वापरण्यात आली असेल, त्या पद्धतीशी सुसंगत पद्धतीने इसवी सनपूर्व काळातील दिनांक नोंदवावेत.

शालिवाहन शकानुसार

वेळ

दिवसातील वेळ १२-तासांच्या किंवा २४-तासांच्या घड्याळानुसार लिहिता येऊ शकते.

  • १२-तासांच्या घड्याळानुसार वेळ लिहिताना "सायंकाळी ८:३० वाजता" किंवा "सकाळी ८:३० वाजता" असे लिहावे.
  • २४-तासांच्या घड्याळानुसार वेळ लिहिताना "०८:३० वाजता" किंवा "२०:३० वाजता" असे लिहावे. वेळेच्या आकड्यांआधी "सकाळी", "सायंकाळी" हे शब्द लिहिण्याची येथे आवश्यकता नाही.
  • वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने वेळ लिहिताना नेमका कालविभागदेखील नोंदणे अत्यावश्यक आहे. उदा.: "भारतीय प्रमाणवेळेनुसार १४:२० वाजता".

दुवे (लिंक्स)

विकी दुवे

फक्त ते दुवे बनवा जेथे ते संबंधित आणि संबंधित संदर्भात उपयुक्त आहेत: हायपरलिंकचे अत्यधिक वापर वाचकांना विचलित करू शकतात. हे वाचन करताना वाचकाची गती मंदावू शकते. चांगल्या मूल्य दुवे जे योग्य आहे ते स्पष्टपणे दिसून येते.

विभागांना दुवा साधने: योग्य शीर्षकापुढे हॅश चिन्ह (#) एका लेखाच्या संबंधित भागाकडे नेईल. उधारण [[कुर्ला#ठिकाणे]] आपल्याला कुर्ला लेखातील ठिकाण भागाकडे नेईल.

दुवे तपासा: अनेक दुवे आपल्याला निःसंदिग्धीकरण पानावर नेतो, त्यामुळे दुवा जोडल्यावर त्याची खात्री करून घेतली पाहिजे.

बाह्य दुवे

बाह्य दुवे साधारणपणे एका लेखाच्या भागामध्ये वापरले जाऊ नये. तर लेखात शेवटी बाह्य दुवे समाविष्ट करावे, ज्यामुळे स्त्रोत उद्धृत करण्यापेक्षा विकिपीडियाच्या बाहेर अधिक माहिती दिली जाऊ शकते. मानक स्वरूप == बाह्य दुवे == असा एक नवीन विभाग बनवून दुव्यांस बुलेट केलेली यादी तयार करा. दुवा ओळखा आणि थोडक्यात लेख त्याच्या संदर्भाप्रमाणे असावे.

उदाहरण:

  • * [http://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://118388b1674b91386283f88fedc1b352 बृ.मुं.म.न.पा. चे प्रतिकचिन्ह व प्रतिकात्मक इमारत]
  • * [http://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlmumbaimap मुंबई आकडेवारी आणि नकाशे]

याचे परिणाम:

सद्विवेकबुद्धीने बाह्य दुवे जोडा. विकिपीडिया हा दुवा भांडार नाही.