सदस्य चर्चा:Aniruddha22Paranjpye
स्वागत | Aniruddha22Paranjpye, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Aniruddha22Paranjpye, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५७७ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
साम्राज्य साचा
[संपादन]नमस्कार,
तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी रास्त आहे. इजिप्तच्या इतिहासातील कालखंडांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते हे बरोबर आहे परंतु नवे राज्य हे संदिग्ध वाटते. नवे राज्य कोणाचे, कोणत्या प्रदेशातील, नवे म्हणजे किती नवे? इतिहासतज्ञांना हे सगळे अगदी पाठ असले तरी सामान्य वाचकाचा गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. तरी इजिप्तचे नवे राज्य, इजिप्तचे जुने राज्य अशा नावांचे लेख केले तर ते निःसंदिग्ध राहतील. त्यासाठी साच्यात योग्य ते बदल करावे.
अभय नातू १४:०५, १८ मे २०११ (UTC)
चावडीवरील सूचनांच्या अनुषंगाने
[संपादन]नमस्कार,
मी मागे साचा:विशिष्ट अर्थ पहा असा एक साचा बनवला तो शब्दानंतर [विशिष्ट अर्थ पहा] असा दिसतो लेखाच्या शेवटी लेखात प्रयूक्त संज्ञा असा विभाग असेल आणि विशिष्ट अर्थ पहा वर टिचकवले असता वाचक "लेखात प्रयूक्त संज्ञा" विभागात पोहोचावा असा उद्देश आहे.काही कारणाने सध्या हा साचा अपेक्षीत काम करत नाही मला स्वतःस त्यावर अधीक वेळ देणे जमले नाही.
- सवड मिळाल्यास विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/साचे आणि विकिपीडिया:Marathi language support tools हि पाने पहावीत माहितगार १९:४०, १८ मे २०११ (UTC)
- कदाचित शुद्धलेखनाकरिता वेगवेगळ्या व्यक्तींनी साचात केलेल्या बदलांमुळे मॅच होत नसण्याची शक्यताही आहे सवडी नुसार तीही पडताळून पहावी माहितगार ०५:२६, १९ मे २०११ (UTC)
सिस्टिम, कार्टेशियन वगैरे
[संपादन]गणितशास्त्र परिभाषा कोश
[संपादन]कोश उघडून वाचला. त्याच्या प्रस्तावनेतच शुद्धलेखनाच्या डझनभर चुका आहेत. त्यांतल्या काही अशा :
- तत(?) तर(?) * तज्ञ(x), तज्ज्ञ * तत्वज्ञान(x), तत्त्वज्ञान * प्रसिद्ध(x), प्रसिद्ध * महत्वाचे(x), महत्त्वाचे * मुद्रितांच्या टप्यावर(x), मुद्रणाच्या टप्प्यावर * स्वरुपात(x), स्वरूपात * अभ्यासु(x), अभ्यासू* रुढ(x), रूढ वगैरे. प्रत्यक्ष कोशात किती चुका असतील ते अजून बघितले नाही.
'ian' हा उपसर्ग(prefix) नाही तो प्रत्यय(suffix) आहे. ’ian’ लावून नामाचे विशेषनाम बनत नाही. कार्टेशियनचा अर्थ - रेने द कार्टने सुचवलेले.. सामान्य नामापासून विशेषनाम बनवण्यासाठी लागणारा एखादा प्रत्यय असल्याचे स्मरणात नाही.
`ian' हा मूळ ‘ianus’ या लॅटिन प्रत्ययापासून फ़्रेन्चमार्गे इंग्रजीत आलेला प्रत्यय आहे. त्याचे अर्थ (१) चा असणे (२) चा रहिवासी (३) च्यामध्ये रस असणारा (४) च्यासारखा असणारा (५) चे काम करणारा (६) ने सुचवलेले वगैरे. उदा० रिपब्लिकन, इटालिअन, म्यूझिशिअन, गांधियन, लायब्रेरिअयन इत्यादी. ‘ian'साठी मराठीत ई हा फारसी प्रत्यय लागेलच याची खात्री नाही. अमेरिका=ई=अमेरिकी, पण शिवसेना+ई=?, गांधी+ई=? ग्रंथालय+ई=?
- J १७:५३, २० मे २०११ (UTC)
माझे मत
[संपादन]मी ज्या सुधारणा केल्या त्या विचारपूर्वक केल्या होत्या. आता याबाबत मतभेद असू शकतात. एका इंग्रजी शब्दासाठी एकाहून अधिक मराठी शब्द सापडू शकतील. निर्देशक म्हणजे Indicator (किंवा signal. हिंदीत दिग्दर्शक किंवा संचालक.)- दाखवणारे. जे ऑर्डिनेट्स जोडीने(Co) असतात, ते सहनिर्देशक, म्हणजे COÖRDINATES. एकाच Coördinates या शब्दासाठी सहनिर्देशक(गणित), सहबद्ध Coördinate bonds(बंध)(रसायनशास्त्र) आणि Coördinationसाठी समन्वय असे शब्द योजावे लागतील. म्हणजे एकाच इंग्रजी शब्दाला गर्भितार्थानुसार तीन वेगवेगळे शब्द वापरणे आवश्यक असते, हे दिसून यावे.
आता प्रणालीबाबत. प्रणालीतली ‘आली’ म्हणजे रांग.(दिवाळी म्हणजे दिव्यांची रांग). जेव्हा एखाद्या गणिती किंवा अन्य विषयामध्ये रांगेत किंवा एकाखाली एक लिहिलेली अशी पायरीपायरीची मांडणी असते, (किंवा एकामागून एक अशी पाळायची रीत असते) तिला प्रणाली म्हणावे. Coördinate Systemमध्ये अशा पायर्या नाहीत. Systemसाठी संहति(Music system; set of connected parts), रचना(system of pulleys), रीत, रीति,(One's system of working; method), पद्धत, पद्धती, व्यवस्था(Organisation), group of parts working together(पचनसंस्था, Digestive system), पर्वत समूह (Mountain system), Dressing System(तर्हा), Governing System(यंत्रणा) वगैरे वगैरे चाळीस विविध शब्द वापरावे लागतात. System साठी एकच मराठी शब्द वापरून चालणार नाही.
त्यामुळे, प्रणाली हा शब्द फक्त ordered set of ideasसाठीच वापरला पाहिजे. कोऑर्डिनेट सिस्टिमसाठी प्रणाली चालणार नाही.
इंग्रजांनी जेव्हा भारतीय नावांचे इंग्रजीकरण केले तेव्हा एक पथ्य पाळले. स्पेलिंग करताना विकृत, असभ्य किंवा अश्लील अर्थ होऊ नये याची काळजी घेतली. Ahmedabadचे madabad, Gauhati(गोहत्ती)चे गुवाहाटी, उस्मानाबादसाठी अस्मानाबाद(Usmanabad) वगैरे स्पेलिंगे करणे टाळले. याच कारणासाठी कार्टेशियन साठी कार्टे-शी हा शब्द वापरू नये....J १५:१९, २० मे २०११ (UTC)
coordinate आणि cartesian संदर्भ सोडून बाकीचे मुद्दे पटले. मुळातच coordinate लिहिले तरी तेथे सहनिर्देशन काय आहे? आपण नवे शब्द वापरताना शब्दश: भाषांतर करायलाच पाहिजे असे नाही. त्याचप्रमाणे आपण विकिवर शक्यतो प्रचलित शब्द वापरण्याची काळजी घेतो. जर coordinate साठी प्रचलित शब्द निर्देशक असेल तर ते वापरायला काय हरकत आहे? मुळातच "सह" म्हणयला तेथे काहीच मुद्दा नाही.
आता cartesian बद्दल. इंग्रजांनी भारतीय नावांचे इंग्रजीकरण करताना आणि त्याचा प्रस्तुत मुद्द्याची संबंध नाही. मुळातच विशेषनामांचे भाषांतर होत नाही. येथे cartesian ह शब्द cartes वरून साधित आहे तर cartes वरून मराठीत कार्टेशचे ह्यासाठी कार्टेशी असे होउ शकते. ह्यात काहीही विकृतीकरण होत नाहीये. जर मूळ नाव decartes घेतले तर देकार्त म्हटले पाहिजे. देकार्टेस नव्हे. उदाहरणादाखल
newtonचे ह्यासाठी काय म्हणाल न्यूटनी की न्यूटनियन? अनिरुद्ध परांजपे १८:३१, २० मे २०११ (UTC)
ऑर्डिनेट म्हणजे क्ष अक्षावर आलेखावरील बिंदूपासून टाकलेला लंब किंवा त्याची लांबी. कोऑर्डिनेटला निर्देर्शक म्हणतात हे ऐकिवात नाही. अॅब्सिसा आणि ऑर्डिनेट या दोघांना मिळून कोऑर्डिनेट्स म्हणतात. (नकाशावरील स्थानाच्या बाबतीत या भौगोलिक कोऑर्डिनेट्सना मराठी विकीवर अन्यत्र गणंग म्हटले आहे, त्याचा खरे तर निषेध व्हायला पाहिजे!) ऑपरेटिव्ह सोसायटी आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी यांत जो फरक आहे तोच निर्देशक आणि सहनिर्देशक यांत आहे. जर ‘सह’ नसेल तर अर्थ स्पष्ट होत नाही.
>>coordinate साठी प्रचलित शब्द निर्देशक असेल तर ते वापरायला काय हरकत आहे?<< हा शब्द खरोखर प्रचलित आहे? मला माहीत नाही. प्रचलित असल्यास बदलायला हवा.
>>cartes वरून मराठीत कार्टेश झाला. शक्य आहे. माझा कार्टेशीच्या अर्थाला विरोध नाही, तो शब्द असभ्य वाटतो ह्याला आहे. इतर चांगले शब्द असताना विकृत अर्थाचा भासणारा शब्द मुद्दाम का स्वीकारावा?
न्यूटनीय हे न्यूटनपासून बनलेले विशेषण ऐकले आहे. पण ते फारसे वापरात नाही. न्य़ूटनचे गति(विषयक) नियम, न्यूटनची तबकडी, न्यूटनचा थंड होण्याचा नियम, न्यूटनचे प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका इत्यादी इत्यादी. पण न्यूटनीसुद्धा जर रूढ असेल तर चालावे. पण गरज नाही.
>>विकृतीकरण केले नाही हे मत पूर्णत: खरे नाही<< विकृतीकरण कशाला म्हणावे याबद्दल एखाद्याचे मत वेगळे असू शकेल. पण ब्रिटिशांनी केलेली ग्रामनामांची स्पेलिंगे बदलून आपण नांवांचे विकृतीकरण केले आहे याबद्दल दुमत असू नये. पुणेचे स्पेलिंग प्यून करणे, मुंबईचे मम्!बाई करणे, कोचीनचे कोच्चि, पालघाटचे पळ्हक्कड, पॉन्डिचरीचे पुद्दुच्चेरी, गौहत्तीचे गुवाहाटी हे विकृतीकरण नाही? मराठीत ऐकारार्थी शब्द नाहीत, आता हा चेन्नै कसा चालवायचा ते भल्याभल्या वैयाकरणांना जमणार नाही. बंगळूरुमधला कोणता उकार र्हस्व, कोणता दीर्घ की दोन्ही/कुठलाही र्हस्व/दीर्घ हे नक्की सांगता येईल? प्रत्ययापूर्वी अंत्याक्षराचा उकार दीर्घ करायचा की नाही? हे पूर्वी नसलेले नवीन प्रश्न उपटले आहेत.
>>विशेषनामांचे भाषांतर होत नाही.<< हा निव्वळ गैरसमज. येशू ख्रिस्त हिंदीत ईसा मसाही असतो, इंग्रजीत जीजस् क्राइस्ट् असतो. अन्य देशांत आणखीही काही असेल. चीनला, चीनमध्ये चीन किंवा चायना म्हणत नाहीत, जपान जपानमध्ये जपान नसतो, रशिया भारताबाहेर रशिया नसतो, जर्मनी जर्मनी नसतो, स्पेन स्पेन नसतो. उत्तरेतला राम दक्षिणेत रामा असतो, मराठीतले सारेगमप हिंदीत सारेगामापा होते, ही भाषांतरे नाहीत? फार काय मुंबईतला गेट ऑफ् इंडिया गुजराथीत पालवा बंदर असतो आणि इंग्रजीत अपोलो बंदर..J १०:२४, २१ मे २०११ (UTC)
थोडे स्पष्टीकरण
[संपादन]>>hmm..... खरेतर मराठी माध्यमातून शिकताना मला निर्देशक वाचल्याचे आठवते. म्हणूनच इंग्लिश माध्यमातून शिकताना मी को-ऑर्डिनेट वाचल्याने गोंधळात पडलेलो. वेल, आणि नंतर मला कळले की ’क्ष’ अक्षाला अॅब्सिसा हा समानार्थी शब्द वापरला जातो. पण तुमच्या स्पष्टीकरणानंतर सगळे स्पष्ट झाले. सत्य (माझ्यादृष्टीने) हे आहे की ऑर्डिनेट आणि अॅब्सिसा ने कोऑर्डिनेट तयार होत असले तरी मराठीत ऑर्डिनेट आणि अॅब्सिसा नाहीत. त्याऐवजी क्ष आणि य अक्ष आहेत. "आलेखातील मुख्य आडवी रेषा म्हणजे क्ष अक्ष आणि मुख्य उभी रेषा म्हणजे य अक्ष होय. आणि हे अक्ष मिळून कार्टेशियन निर्देशक पद्धती बनते" मला असे पाठ्यक्रमात वाचल्याचे काहीसे आठवते. म्हणूनच कदाचित आपल्याकडे सहनिर्देशक ऐवजी निर्देशक वापरले असावे. काही ठिकाणी ह्यास कार्टेशियन निर्देशक पद्धती किंवा कार्टेशियन अक्ष पद्धती वाचल्याचे आठवते. परंतु आपल्याकडे बर्याचदा पाठ्यक्रमात गोंधळ होऊन ती बर्याचदा बदलली जातात त्यामुळे कदाचित आपण ऐकले नसावे. सध्या साच्यात बदल करावे काय? मी नंतर दुवा मिळवून देतो. >>आपण ह्या आधी एका इंग्लिश शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द दिले त्यावरून असे लक्षात येते की ह्या बद्दल तुम्हाला बरीच माहिती असावी किंवा तुमच्याकडे एखादा स्त्रोत असावा. जर एखादा स्त्रोत असेल तर त्याबद्दल मला सांगाल का? म्हणजे मला त्याचा उपयोग होईल. नवे शब्द बनवायला तर मूळीच उपयोग होईल. अनिरुद्ध परांजपे १५:०४, २१ मे २०११ (UTC)
>>क्ष’ अक्षाला अॅब्सिसा हा समानार्थी शब्द वापरला जातो<< नेमके बोलायचे तर तसे नाही. काटकोनी अक्ष असलेल्या आलेख कागदावरील एखाद्या बिंदूवरून य-अक्षावर टाकलेल्या व त्या अक्षाला मिळेपर्यंत असलेल्या लंबाची लांबी म्हणजे abscissa. यालाच भास्कराचार्य भुजा म्हणतात. मराठीत क्ष अक्षांक. पण हा मराठी शब्द फार वापरात नाही. त्याच बिंदूपासून, क्ष-अक्षावर आणि अक्षापर्यंत असलेल्या लंबाच्या लांबीला ordinate आणि भास्कराचार्यांच्या भाषेत कोटि(मराठीत य अक्षांक) म्हणतात. काटकोन त्रिकोणाची आडवी बाजू म्हणजे भुजा, उभी कोटि आणि तिरपी कर्ण. ह्या abscissaचे मोजमाप बहुधा क्ष-सहनिर्देशक(x-coordinate) असतो, आणि ordinateचे मोजमाप य-सहनिर्देशक..
>>..मराठीत ऑर्डिनेट आणि अॅब्सिसा नाहीत<< वर लिहिल्याप्रमाणे आहेत. पण फार लागत नसल्याने ते शब्द वापरात नाहीत.
>>आलेखातील मुख्य आडवी रेषा म्हणजे क्ष अक्ष आणि मुख्य उभी रेषा म्हणजे य अक्ष होय. आणि हे अक्ष मिळून कार्टेशियन सहनिर्देशक पद्धती किंवा कार्टेशियन अक्ष पद्धती बनते.<<. हे अगदी बरोबर. नुसत्या ’निर्देशक’ला अनेक अर्थ असल्याने दरवेळी सहनिर्देशक म्हटले की गोंधळ होण्याची शक्यता कमी.
>>..तुमच्याकडे एखादा स्त्रोत असावा.<< पर्यायी शब्दांसाठी मराठी कोश बाजारात मिळत असावेत. माझ्याकडचे स्रोत(स्त्रोत नाही!) एकोणिसाव्या शतकातील आहेत. ते पहायलाही मिळण्याची शक्यता नाही. माझा भर बहुधा स्मरणशक्तीवर असतो. भाषेत एकाच तंतोतंत अर्थाचे दोन शब्द अगदी क्वचित असतात. दोन समानार्थी भासणार्या शब्दांमध्ये बहुधा भिन्न अर्थच्छटा असते, वाक्यांतले उपयोग भिन्न असतात किंवा त्यांतल्या एका शब्दाचे सर्व आणि तेवढेच अर्थ दुसर्या शब्दाचे नसतात. भास्कर, रवी, दिनकर, दिवाकर, प्रभाकर आदी शब्दांतील भिन्न अर्थच्छटा पाहिल्यावर माझा मुद्दा स्पष्ट होईल...J १६:१४, २१ मे २०११ (UTC)
जालावरचे ३५ कोश
[संपादन]जालावरचे ३५ कोश एकाच वेळी पहायचे असतील तर http://www.manogat.com/pari/search ला जा. कोश फार चांगले आहे असे मी म्हणणार नाही, पण अगदीच काम अडले असे होणार नाही. ..J १७:१९, २१ मे २०११ (UTC)
Mechanics
[संपादन]>>ई साधारणत: अकारान्त शब्दांना लागू पडताना दिसून येते.<< ई हा फारसी प्रत्यय संस्कृत सोडून अन्य शब्दांना लागू शकेल. अमेरिकी, आशियाई, चिनी, इत्यादी. संस्कृत शब्दांना इन् प्रत्यय लागून शब्दाचे प्रथमेचे रूप ई प्रत्यय लावल्यासारखे होते. उदा० यंत्र--यंत्रिन्--यंत्री, तसेच तंत्री, वैद्यकी, यामिकी वगैरे.
यम् आणि यंत्र् हे दोन्ही धातू संस्कृत आहेत. दोघांचा अर्थ नियमन करणे, त्यामुळे यांत्रिकीसाठी यामिकी सुचवला असावा. पण त्याचा ‘यमक’शी संबंध असल्यासारखे वाटते, म्हणून पटला नाही.
इंग्रजी मशीनसाठी मराठीत यंत्र. त्यावरून बनलेले शब्द : यंत्रवत्, यांत्रिक, यंत्रशास्त्र, यंत्रशास्त्रज्ञ, यंत्रशास्त्री, यंत्रकारागीर, यंत्रकारागिरी, यंत्रकर्म, यंत्रकर्मी, यंत्रण(मशिनिंग), यंत्रणा, यंत्रचालन, यंत्रचालक, यंत्रशाळा, यांत्रिकी, यंत्रसामग्री, यंत्रभाषा, यंत्रसंकेताली(मशीन कोड), यंत्राची कूट भाषा, यंत्राचे भाग, हत्यार, अवजार, यंत्रोपकरण(टूल) वगैरे. हे विविध शब्द असल्यावर स्थितिगतिशास्त्र, यंत्रगतिशास्त्र हे वापरायची गरज पडू नये. यमनं त्रायते(नियम लावायचा किंवा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करते ते) यंत्र, त्याच धर्तीवर गमनं त्रायते गंत्र:(इलेक्ट्रिक मोटर), रूपित्र(शेपिंग मशीन) वगैरे शब्द बनले आहेत.
सुधारणा: एक्स कोऑर्डिनेटसाठी क्ष-निर्देशक हाच योग्य शब्द वाटतो आहे. फक्त नुसता निर्देशक कसासाच वाटतो
मी दुवा दिलेल्या ३५ कोशांची साइट उघडून पाहिली का? साइट अगदी वाईट नाही आहे....J १५:१०, २२ मे २०११ (UTC)
सापडला नाही
[संपादन]तुम्ही २० मे रोजी रात्री दहाच्या(IST) लिहिलेला संदेश सापडला नाही. बहुधा तो mechanics या विषयावर मी जे लिहिले त्याला प्रत्युत्तरादाखल असावा...J १७:०५, २२ मे २०११ (UTC)
सुधारित आवृत्ती?
[संपादन]सुधारित आवृत्ती तुम्हाला मिळाली? एवढ्या लवकर मला पाठवायची नव्हती, काही सुधारणा बाकी होत्या. आता मी काय लिहिले ते वाचून पाहीन. त्यातले नुसते व्याकरणच नाही तर त्यातली सोपी भाषा जास्त महत्त्वाची आहे. वाचकाला अर्थ सहज समजला पाहिजे, मग वाटल्यास सोबत इंग्रजी शब्दही दिले तरी हरकत नाही. न्यूटन टिंबाच्या पद्धतीला(की टिंबाला) काय म्हणायचा ते मला कुठेतरी वाचून खात्री करून घ्यायला पाहिजे. उगीच न वाचता सुधारणा करणे योग्य नाही.
कोऑर्डिनेट सिस्टिमसाठी सहनिर्देशक पद्धती हाच शब्द मला योग्य वाटतो. नुसते निर्देशन पद्धत म्हटले तर इन्डिकेटिंग सिस्टिम असा अर्थ होण्याचा धोका आहे.
सांधन शब्द अप्रचलित आहे, माझ्या मते संकलनच पाहिजे. खरे तर फलाचे ‘कलनशास्त्र वापरून केलेले’ संकलन अधिक योग्य ठरेल.....J १७:२०, २२ मे २०११ (UTC)
शून्यलब्धी
[संपादन]कॅलक्य़ुलसचा शोध भास्कराचार्यांनी लावला. या शास्त्राला ते शून्यलब्धि म्हणत असत. म्हणजे शून्याच्या जवळ पोचणार्या संख्याफलांचे गणित. जर कलन, संकलन, भीदिक, सांधन वगैरे शब्द जनमान्य नसतील तर सरळ कॅलक्युलस, डिफरन्शियल व इंटिग्रल वगैरे शब्द वापरावेत. सांधन, भैदिक इतकेच काय पण फल हा शब्ददेखील कुणी ऐकलेला नसेल.(मीही नव्हता, अंदाजाने अर्थ लावला. सगळ्यांना ते शक्य नसावे!) ...J १८:०९, २२ मे २०११ (UTC)
चांगले शब्द
[संपादन]त्यांतल्या त्यांत कलन, विकलन आणि संकलन हेच शब्द चांगले आहेत. भैदिक, सांधन हे शब्द रूढ होण्याची सुतराम शक्यता नाही. पण मराठी शब्द जिथे पहिल्यांदा येईल तिथे त्याचे इंग्रजी मूळ द्यायला हवे.
शून्यलब्धी हा शब्द मी अगदी लहानपणी ऐकला-वाचला होता. तेव्हा तो रूढ असावा. त्यावेळी कॅलक्युलस माहीत नव्हते ...J १८:४३, २२ मे २०११ (UTC).
स्थानांतरण
[संपादन]पानाच्या अग्रभागी ’इतिहास पहा’नंतर, कुटुंबनियोजनासाठी भारतात वापरल्या जाणार्या चिन्हासारखा दिसणारा एक अधरशीर्ष त्रिकोण आहे त्यावर कर्सर ठेवल्यावर स्थानांतरण उघडेल. त्यावर टिचकी मारावी. बाकी काय करायचे ते आपोआप समजेल. जर नवीन नावाचे पान आधीच उपलब्ध असेल तर स्थानांतरण करता येत नाही. त्यासाठी एकतर पहिले पान काढून टाकावे लागेल किंवा नवीन पान जुन्या पानात सम्मीलित करावे लागेल.....J ०६:१०, १७ जून २०११ (UTC)
- विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि नि:संदिग्धीकरण प्रकल्प पहावा माहितगार ०८:२१, १७ जून २०११ (UTC)
पहिला बाजीराव
[संपादन]मी वाचलेल्या बहुतेक पुस्तकांत पहिला बाजीराव, दुसरा पेशवा असेच वाचले आहे. आणि असेच असले पाहिजे. इंग्रजीत आणि मराठीत हा एक फरक आहे. मराठीत इसवी सनाच्या अमुकअमुक वर्षात असे तर इंग्रजीत in xxxx A.D किंवा in xxxx CE अशी शब्दरचना असते. ‘मंथ ऑफ़ डिसेंबर’ आणि ‘डिसेंबर महिन्यात’ यांवरून या शब्दरचना स्पष्ट व्हाव्यात. उदा० पंचम जॉर्ज हे मराठीत तर George the 5th, असे इंग्रजीत लिहितात. मराठीत संख्यावाचक विशेषण हे नेहमीच नामाच्या आधी असते हे सर्वज्ञात आहे. सूची करताना नाव चटकन सापडावे म्हणून बाजीराव, पहिला असे नाइलाजाने लिहावे लागते. सूची नसेल तर तसे लिहिणे उचित नाही
थॉमस कॅन्डी यांच्यावर वर्तमानपत्रांतून अनेक लेख आलेले आहेत. त्यांपैकी सर्वोत्कृष्ट लेख एका भोसले नावाच्या लेखकाचा होता. हे लेखक पुण्याला शिवाजीनगर स्टेशनजवळ असलेल्या कॉर्पोरेशन बँकेत काम करतात. त्यांना भेटणे मला अजून शक्य झालेले नाही. कॅन्डीच्या पुस्तकाची नावे देता येतील, पण त्यांतील अचूक मजकूर मला उद्धृत करता येणार नाही, कारण ती सर्वच्या सर्व पुस्तके माझ्याकडे नाहीत, आणि दुर्मीळ असल्याने बाहेरही मिळण्यासारखी नाहीत. .....J १७:५१, २६ जून २०११ (UTC)
नावबदल
[संपादन]अभिजीत साठेंप्रमाणेच तुमचे नाव बदलल्यास वैश्विक खात्यात बदल होण्याची संभावना आहे. तरीही बदल केल्यास चालेल का?
अभय नातू ०१:४२, २९ जून २०११ (UTC)
चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण | ||
नमस्कार, Aniruddha22Paranjpye
|
मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा
[संपादन]- मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा या बाबत आपण मागे रस दाखवला आहे . इंग्रजी विकिपीडियावरील नवीन खाते उघडणार्या लोकांना en:MediaWiki:Welcomecreation या मिडियाविकी संदेशाने स्वागत होते. तेथे नवीन सदस्यांना जसे मार्गदर्शन उपलब्ध होते तसे मराठी विकिपीडियावर मिडियाविकी:Welcomecreation च्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. त्यात मराठी विकिपीडीयावरील सध्याच्या स्वागत साचातील माहिती सुयोग्य पद्धतीने आंतर्भूत करून द्यावी असा मानस आहे.
- स्वागत बॉट सुद्धा उपयोगात आणण्यास हरकत नाही, त्यावर काम करून ठेवावे , पण कदाचित मिडियाविकी:Welcomecreation मधील बदल अधिक उपयूक्त ठरल्यास , बॉट दहा आणि पन्नास संपादने पार पाडणार्या संपादकांना टप्पेवार सहाय्य साचे लावण्याकरता सुद्धा वापरता आला तर दुधात साखर घातल्या सारखे असेल.
- en:MediaWiki:Welcomecreation आणि साचा:स्वागत ला अनुसरून मिडियाविकी:Welcomecreation करिता सुधारणा करण्यात आपण, मंदार कुलकर्णी,प्रबोध,मनोज आणि अजून एक दोन सदस्य मिळून हे काम तडीस नेण्यास सवड देउ शकाल का ते पहावे हि नम्र विनंती माहितगार ०८:२३, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)
क हा संस्कृत + ई हा उर्दू प्रत्यय लावल्याने शब्द लहान होतो ही गोष्ट खरी असली तरी, मराठीत मुळातच ’शास्त्र’, ज्ञान, हा शब्द जोडून समास करायची रीत आहे. उदा० भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान, संगणकशास्त्र, अध्यात्मशास्त्र वगैरे. या शब्दांऐवजी आपण भाषिकी, तात्विकी, सांगणिकी, आध्यात्मकी म्हटले तर कानाला गोड लागत नाही. ’की’ प्रत्यय मराठीमध्ये, संस्कृत नसलेल्या शब्दांना लावतात. उदा० मास्तरकी, महारकी, वगैरे. अर्थात, मराठी शब्दकोशांनी आणि शैक्षणिक पुस्तकांनी स्वीकारले असल्यास ’की’ प्रत्ययान्त शब्द वापरणे सुरू करण्यास माझी तशी हरकत नाही.
हे ’की’ प्रत्ययान्त शब्द रघुवीर यांनी प्रथम त्यांच्या शब्दकोशाद्वारे हिंदीत प्रचारात आणले. मराठीत ते काल-परवापर्यंत तरी रूढ झाले नव्हते. त्यामुळे भौतिकी, औद्भिज्जिकी(Botany-वनस्पतिशास्त्र), हे शब्द मराठीने एके काळी तरी स्वीकारले नव्हते. गतिकी बरोबर की गातिकी हेही ठरवायला पाहिजे भूतपासून भौतिकी, मग गतिपासून गातिकी का नको?....J (चर्चा) १४:४०, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)
मी मनोगतवरच्या कोशात Dynamics पाहिला. गणितशास्त्रासाठी(गणितकी नाही!) गतिशास्त्र, भौतिकशास्त्रासाठी(भौतिकी नाही!) गतिकी आणि गतिशास्त्र हे दोन्ही आणि अन्य शास्त्रांसाठी १ गतितत्त्व (न.), २ गतिविज्ञान (न.), ३ गतिकी (स्त्री.), ४ गतिशास्त्र(न.) हे चारही शब्द कोशात दिले आहेत. तेव्हा गतिकी वापरायला हरकत नसावी. फक्त त्याचे व्याकरण चुकीचे वाटते. यज्ञ पासून याज्ञिकी, वल्मीक(=वारूळ)पासून वाल्मिकी, संगीतपासून सांगीतिकी, मग गतिपासून गातिकी का केले नाही? जाऊ द्या. मी जिथेजिथे गतिशास्त्र केले आहे तिथेतिथे गतिकी करीन. मात्र ज्याला गतिशास्त्र हाच शब्द माहीत आहे, त्याला ते पान सापडणार नाही....J (चर्चा) १५:२६, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)
मथळ्यात एकदा गतिकीचे गतिशास्त्र केले की ते परत उलटवणे सोपे नसते. त्याला मार्ग म्हणजे रूढ शब्दाने पान उघडणे आणि ते आपल्याला हव्या असलेल्या शब्दाकडे पुनर्निर्देशित करणे. लेखकाचे किंवा व्यक्तीचे लोकांना माहीत असलेल्या नावाचे पान,हे अपरिचित पण खऱ्या नावाच्या पानाकडे पाठवावे लागतेच. ..J (चर्चा) १६:३२, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)
गतिकी आणि अगतिकी
[संपादन]मराठीत अगतिक(helpless) आणि अगतिकी(helplessness) हे दोन्ही शब्द व्यवहारात आहेत. त्यामुळे गतिशास्त्र हा शब्द बदलून गतिकी करण्याच्या बाबतीत मी अगतिक आहे. माझी अगतिकी आपण समजून घ्याल अशी आशा आहे....J (चर्चा) १६:४४, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)
पुन:स्थापना
[संपादन]रेषीय-परिभ्रमी साधर्म्यचे चर्चा पान वाचावे. आणि आपले मत द्यावे....J (चर्चा) १७:००, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)
कार्टून आणि कॉमिक्स
[संपादन]कार्टूनसाठी मराठीत व्यंग्यचित्र, विडंबनचित्र, हास्यचित्र आणि अर्कचित्र असे चार शब्द आहेत. संदर्भाप्रमाणे योग्य तो शब्द वापरता येईल. व्यंग्यचित्र हा शब्द (चुकीने) व्यंगचित्र असा लिहिण्याचा प्रकार आता मराठीत रूढ झाला आहे.
कॉमिक स्ट्रिपला हास्यचित्र-पट्टिका किंवा हास्यचित्र-पट्टी म्हणतात. कॉमिक्सला चित्रकथा हा वापरातला शब्द आहे. हिंदी-मराठी आणि अन्य भारतीय भाषांत प्रकाशित होणारी ‘अमर चित्रकथा’ प्रसिद्ध आहे.....J (चर्चा) १४:१८, १९ ऑक्टोबर २०१२ (IST)
प्रत्येक इंग्रजी शब्दाचे भाषांतर एकाच मराठी शब्दात करणे किंवा या उलट हे नेहमीच शक्य नसते. उदा० भाचेजावई सारख्या शब्दाचे एकाच इंग्रजी शब्दात भाषांतर करणे शक्य आहे? त्यामुळे कॉमिक किंवा कार्टून या शब्दांचे अचूक भाषांतर एका शब्दात करणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे राजकीय व्यंग्यचित्र, विडंबनचित्र, हास्यकथा, हास्यचित्र, हास्यचित्रपट, हास्यपट्टिका, चित्रकथा, चित्रमाला, चित्रमालिका, अर्कचित्र, कुचेष्टाचित्र यांपेक्षा काही वेगळे शब्द मिळतील असे वाटत नाही. ...J (चर्चा) २०:४८, १९ ऑक्टोबर २०१२ (IST)
लेखांचा विस्तार
[संपादन]- कृ. चावडी प्रचालक निवेदनवरील पाने काढा विनंती पहावी. ज्या लेखांचा नजीकच्या काळात विस्तार करणे शक्य आहे ते कळवावेत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२४, ९ एप्रिल २०१३ (IST)
- दोन परिच्छेद विश्वकोशीय लेखनास दोन एक तास सहज जाउ शकतात त्यामूळे आपली वेळेच्या उपलब्धतेची अडचण समजता येते. आपल्या सहकार्याबद्दल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.आपल्या आवडीचे लेखन वाचन होत रहावे हि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१०, १६ एप्रिल २०१३ (IST)
- थॅंक्स.आपल्या लेखनाचे स्वागत आहे.कुणी मागे लागल्यामुळे पहाता पहाता काही लेखन होऊन जाते.अशातच इंग्रजी विकिपिडियावर माझ्याही पाठीशी कुणीतरी लागले आणि en:Legal awareness हा लेख पहाता पहाता त्या निमीत्ताने होऊन गेला.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४४, १७ एप्रिल २०१३ (IST)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.