षोडशोपचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदू धर्मामध्ये पूजा करताना सोळा प्रकारचे उपचार केले जातात.त्यांना षोडशोपचार असे म्हणतात.

शब्दाची उत्पत्ती[संपादन]

षोडश हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सोळा(१६) असा आहे. यात सोळा प्रकारचे उपचार असल्यामुळे याला षोडशोपचार असे म्हणतात.

पूजा== षोडशोपचार ==

षोडशोपचार हे खालील प्रमाणे आहेत-

१.आवाहन- मूर्तीमध्ये स्वत: परमात्मा अतिथीरूपाने आला आहे अशा भावनेने देवतेचे स्वागत.

२.आसन- देवतेला बसण्यासाठी आसन

३.पाद्य-मूर्तीच्या चरणांवर पाणी घालून तिचे पाय धुणे.

४.अर्ध्य-देवतेविषयी आदर व्यक्त करण्यासाठी पळी वा शंखात गंध,अक्षता ,फुल घालून ते पाणी देवतेला अर्पण करतात.

५.आचमन-देवतेला पिण्यासाठी पाणी मूर्तीच्या मुखाजवळ अर्पण करतात.

६.स्नान व अभिषेक- देवतेवर सतत पाण्याची संततधार अर्पण करणे.

७.वस्त्र-देवतेला कार्पासवस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र अर्पण करणे.

८.उपवस्त्र-उपरणे किंवा कंचुकी म्हणून अर्पण केले जाते.

९. गंध-सुगंधासाठी देवतेला चंदन लावले जाते.अत्तर लावले जाते.

१०.पुष्प-फुले व पत्री देवाकडे देठ करून अर्पण करणे.

११.धूप-नैसर्गिक सुगंधी द्रव्याने तयार केलेली उदबत्ती अर्पण करणे.

१२.दीप-तूपाचे निरांजन देवाला अर्पण करणे व देवतेतील त्जाच्या अंशाला ओवाळणे.

१३.नैवेद्य-ल्घुनैवेद्य,प्रसाद नैवेद्य व महानैवेद्य असे तीन प्रकार यात येतात.

१४.प्रदक्षिणा-स्वत:च्या उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे फिरून देवतेला प्रदक्षिणा घालणे.

१५.नमस्कार- देवतेला नमस्कार करणे.

१६.मंत्रपुष्प-पूजेत काही न्यून राहिल्यास त्याचे प्रतीक म्हणून अक्षता व फुले देवाला अर्पण करणे.
[१]

या सोळा प्रकारच्या उपचारांना एकत्रितपणे षोडशोपचार असे म्हणतात.

पुरुषसूक्त व श्रीसूक्त यातील एक-एक ऋचेने किवा पुराणोक्त मंत्राने एक-एक उपचार केला जातो.

आवाहनामध्ये मुख्य दैवताला पूजा स्वीकारण्यासाठी येण्याची विनंती केली जाते. आवाहनाला मान देवून पूजास्थानी आलेल्या देवाला बसायला आसन देणे, पाय धुवायला पाणी देणे, हात धुवायला पाणी देणे, प्यायला पाणी देणे असे हे उपचार असतात. स्नान घालताना अभिषेक केला जातो त्यावेळी त्या देवतेशी संबंधित स्तोत्र अथवा सूक्त म्हणण्याची पद्धती आहे असे मानले जाते.उदा. गणपतीचे पूजन असेल तर ाअथर्वशीर्ष म्हणून अभिषेक केला जातो. शंकरासाठी रुद्र सूक्त, विष्णूसाठी पुरुषसूक्त तर देवीसाठी श्रीसूक्त म्हटले जाते व अभिषेक केला जातो.तेला वस्त्र आणि पुरुष देवता असेल तर जानवे घातले जाते.आणि पुठील उपचार केले जातात. पूजेत काही न्यून राहिले असेल तर त्याचे प्रतीक म्हणून अक्षता आणि फुले यांचे मंत्रपुष्प वाहिले जाते.

  1. ^ शास्त्र असे सांगते-वेदवाणी प्रकाशन