पा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Paa (es); পা (bn); Paa (fr); Paa (ms); पा (mr); Paa (de); پدر (fa); پا (ur); పా (te); با (arz); Paa (pl); പാ (ml); Paa (nl); Paa (it); पा (hi); ಪಾ (kn); 파아 (ko); Paa (en); با (ar); پا (ckb); Paa (id) cinta de 2009 dirichita por R. Balki (an); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); film sorti en 2009 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 2009. aasta film, lavastanud R. Balki (et); película de 2009 dirixida por R. Balki (ast); pel·lícula de 2009 dirigida per R. Balki (ca); २०१० साली आर. बाल्की दिग्दर्शित भारतीय चित्रपट (mr); Film von R. Balki (2009) (de); filme de 2009 dirigido por R. Balki (pt); film (sq); فیلم (fa); film út 2009 fan R. Balki (fy); film din 2009 regizat de R. Balki (ro); بھارتی فلم (ur); película india (es); فيلم 2009 (arz); film del 2009 diretto da R. Balki (it); סרט משנת 2009 (he); film uit 2009 van R. Balki (nl); filme de 2009 dirigit per R. Balki (oc); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); 2010 Indian film directed by R. Balki (en); pinicla de 2009 dirigía por R. Balki (ext); filme de 2009 dirixido por R. Balki (gl); فيلم أنتج عام 2009 (ar); film India oleh R. Balki (id); film från 2009 regisserad av R. Balki (sv)
पा 
२०१० साली आर. बाल्की दिग्दर्शित भारतीय चित्रपट
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
  • R. Balki
निर्माता
  • Sunil Manchanda
Performer
वितरण
  • video on demand
चित्रपट दिग्दर्शक
  • R. Balki
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. २००९
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पा हा २००९ सालचा भारतीय हिंदी कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अरुंधती नाग आणि विद्या बालन यांनी अभिनय केलेला.[१] प्रोजेरिया सारख्या एका दुर्मिळ अनुवंशिक रोगावर व एका मुलाच्या त्याच्या पालकांसोबतच्या नात्यावर हा चित्रपट आधारित आहे. खऱ्या आयुष्यात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अनुक्रमे वडील आणि मुलगा आहेत, पण पा चित्रपटा मध्ये त्या दोघांनी अगदी उलट भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट ४ डिसेंबर २००९ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी झाली. भारतीय चित्रपट समीक्षकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असले तरी मेटाक्रिटिक आणि रोटेन टोमॅटो वेबसाइट्सच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाला परदेशी चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यांच्या अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांना ५७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाचवा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार आणि विद्या बालन यांना पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

निर्माण[संपादन]

बऱ्याच भागांचे चित्रीकरण लखनऊमध्ये झाले होते तर चित्रपटाचे काही भाग यूके आणि मलेशियामध्ये चित्रीत करण्यात आले होते. हॉलिवूड कलाकार क्रिस्टीन तिनस्ले आणि डोमिनी टिलने अमिताभ बच्चनचा मेक-अप केला आहे. टिनस्ले कॅटवुमन या चित्रपटासाठी परिचित आहेत आणि टिल हे लॉर्ड ऑफ द रिंग्ज चित्रपटांसाठी ओळखले जातात. अमिताभ बच्चन यांना त्यांचा मेकअप घालण्यात आणि तो काढून टाकण्यास अनेक तास लागयचे. अभिषेक बच्चन हा केवळ पा मधील मुख्य कलाकारांपैकी एक नव्हता तर चित्रपटाचे बजेट, मार्केटींग आणि संपूर्ण चित्रपटाचे मुख्य निर्माता होते.[२][३][४] इलायराजा यांचे संगीत असलेल्या या चित्रपटात शान, सुनिधी चौहान व शिल्पा राव यांनी गाणे गायली आहेत.

पुरस्कार[संपादन]

२००९ मध्ये ५७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार बहाल करण्यात आला. सोबतच अमिताभ बच्चन यांना सर्वोत्तम अभिनेता, अरुंधती नाग यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री व क्रिस्टीन टिनस्ले आणि डोमिनी टिल या जोडीला सर्वोत्तम मेक-अपचा पुरस्कार देण्यात आला.[५] याव्यतिरिक्त, चित्रपटाने पाच स्टार स्क्रीन पुरस्कार, दोन स्टारडस्ट पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार, तीन आयएफएफए पुरस्कार आणि एक अप्सरा फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड अवॉर्ड जिंकले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ H Hooli, Shekhar. "Arundhati Nag's role in Paa gets rave reviews". Oneindia Entertainment. Greynium Information Technologies Pvt. Ltd. Archived from the original on 2014-01-18. 6 April 2012 रोजी पाहिले.
  2. ^ Bollywoodhungama, 24 November 2009
  3. ^ India Today, 1 December 2009.
  4. ^ Bollywoodhungama, 10 December 2009
  5. ^ PTI. "Big B wins National Award for Paa". The Times of India. Bennett, Coleman & Co. Ltd. Archived from the original on 2012-11-03. 6 April 2012 रोजी पाहिले.