फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार
award | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चित्रपट पुरस्कार श्रेणी, सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीचा पुरस्कार, Filmfare Critics Awards | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
| |||
फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी हिंदी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो जे विजेता ठरवतात.
१९९१ सालापासून हा पुरस्कार दिला जात असला तरी १९९७ पर्यंत पुरुष व महिला अभिनेत्यांमध्ये मिळून एकच विजेता ठरवला जात असे. १९९२ मध्ये डिंपल कापडियाला तिच्या गोविंद निहलानी दिग्दर्शित दृष्टी चित्रपटातील कामगिरीसाठी पहिला पुरस्कार मिळाला. सर्वात अलीकडील पुरस्कार २०२४ मध्ये राणी मुखर्जी आणि शेफाली शाह यांना त्यांच्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे आणि थ्री ऑफ अस या चित्रपटांसाठी संयुक्तपणे प्रदान करण्यात आला आहे. तब्बूच्या नावावर या श्रेणीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आहे कारण तिने पाच वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
इतिहास
[संपादन]१९९१ मध्ये फिल्मफेर पुरस्कारांनी सर्वोत्तम अभिनयासाठी समीक्षकांचा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. त्या वेळी ह्याला "गैर-व्यावसायिक चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी" असे ह्याचे नाव होते. पहिला पुरस्कार हा १९९१ मध्ये अनुपम खेरला दिला गेला व १९९२ मध्ये डिंपल कापडिया पहिली विजेता अभिनेत्री ठरली. १९९३ पासून ह्याचे नाव "उत्कृष्ट कामगिरीसाठी समीक्षक पुरस्कार" असे झाले. पुढे १९९८ पासून अभिनेते व अभिनेत्री असे वेगळे गट झाले. १९९१ ते १९९७ पर्यंत या सात वर्षात फक्त २ वेळा हा पुरस्कार अभिनेत्याला दिला गेला.[१] २०१८ पासून या श्रेणीतील नामांकन देखील जाहिर करण्यास सुरुवात झाली.
विजेते
[संपादन]अनेक पुरस्कार
[संपादन]तब्बूने या श्रेणीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम ५ वेळा केला आहे (१९९८, २०००, २००१, २००८ आणि २०२३) मध्ये. त्यानंतर मनीषा कोईराला (१९९६, १९९७ आणि २००३) आणि राणी मुखर्जी (२००३, २००६ आणि २०२४)) यांचा क्रमांक लागतो ज्यांनी प्रत्येकी ३ वेळा पुरस्कार जिंकला आहे. सलग वर्षात ३ अभिनेत्रींनी पुरस्कार पटकावला आहे; कालक्रमानुसार, डिंपल कपाडिया (१९९२-९३), मनीषा कोईराला (१९९६-९७) आणि तब्बू (२०००-०१).
नीना गुप्ता या वयाच्या ५९ व्या वर्षी २०१९ मध्ये बधाई हो चित्रपटासाठी पुरस्कार जिंकणाऱ्या सर्वात ज्येष्ठ आहेत आणि झायरा वसीम ही वयाच्या १७ व्या वर्षी २०१८ मध्ये सिक्रेट सुपरस्टार चित्रपटासाठी पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण प्राप्तकर्ता आहे.[२]
इतर माहिती
[संपादन]- फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार सोबत तुलना
असे एकदाच झाले आहे की २००६ मध्ये राणी मुखर्जीला तिच्या ब्लॅक चित्रपटातील कामासाठी दोन्ही सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक व सर्वोत्तम अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले होते.
१९९७ मध्ये जव्हा मनीषा कोईरालाला चित्रपट खामोशी: द म्युझिकल साठी पुरस्कार मिळाला, तेव्हा तिला फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्काराचे देखील नामांकन मिळाले होते. असे परत अनेक वेळा झाले; १९९८ मध्ये तब्बू (विरासत), २००० मध्ये तब्बू (हु तू तू), २००३ मध्ये राणी मुखर्जी (साथिया), २००४ मध्ये उर्मिला मातोंडकर (भूत), २००७ मध्ये करीना कपूर (ओंकारा), २०११ मध्ये विद्या बालन (इश्किया), २०१२ मध्ये प्रियांका चोप्रा (७ खून माफ), २०१५ मध्ये आलिया भट्ट (हायवे), २०१६ मध्ये कंगना राणावत (तनु वेड्स मनू रिटर्न्स), २०१७ मध्ये सोनम कपूर (नीरजा), २०१८ मध्ये झायरा वसीम (सिक्रेट सुपरस्टार), २०१९ मध्ये नीना गुप्ता (बधाई हो), २०२२ मध्ये विद्या बालन (शेरनी), २०२३ मध्ये दोघी भूमी पेडणेकर (बधाई दो) व तब्बू (भूल भुलैया २), आणि २०२४ मध्ये राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे).
अनेक वेळा असे झाले आहे की अभिनेत्रीला तिच्या कामासाठी सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्काराचे विजेते न होता फक्त नामांकन मिळाले आहे पण सर्वोत्तम अभिनेत्रीच्या श्रेणीत विजय मिळाला आहे जसे की; २०१८ मध्ये विद्या बालन (तुम्हारी सुलू), २०१९ मध्ये आलिया भट्ट (राझी)। आणि २०२१ मध्ये तापसी पन्नू (थप्पड).
२०१८ पासून असे अनेक वेळा झाले की अभिनेत्रील दोन्ही सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक व सर्वोत्तम अभिनेत्रीचे नामांकन मिळाले पण दोन्ही पुरस्कार मिळू शकले नाही जसे की; २०१८ मध्ये श्रीदेवी (मॉम), २०१९ मध्ये तब्बू (अंधाधुन), आणि २०२१ मध्ये विद्या बालन (शकुंतला देवी).
१९९९ मध्ये जव्हा शेफाली शहाला चित्रपट सत्या साठी पुरस्कार मिळाला, तेव्हा तिला फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराचे देखील नामांकन मिळाले होते. असे परत २००९ मध्ये झाले शहाना गोस्वामी (रॉक ऑन!!).
संदर्भ
[संपादन]- ^ "Filmfare Nominees and Winners" (PDF). 2009-06-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2024-03-29 रोजी पाहिले.
- ^ "Critics Best Actor in Leading Role Female 2017 Nominees | Filmfare Awards". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-20 रोजी पाहिले.