भारतीय प्रौद्योगिकी संस्थाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय तंत्रज्ञान संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय प्रौद्योगिकी संस्थाने is located in भारत
मद्रास
दिल्ली
गुवाहाटी
कानपूर
खरगपूर
मुंबई
रूडकी
वाराणसी
भुवनेश्वर
गांधीनगर
हैदराबाद
इंदूर
जोधपूर
मंडी
पाटणा
रोपड
पालक्काड
पणजी
भिलाई
तिरुपती
जम्मू
धारवाड
धनबाद
आय.आय.टी. असलेली २३ शहरे.

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (इंग्रजी: Indian Institutes of Technology; संक्षेप: आय.आय.टी.) ह्या भारत देशामधील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आय.आय.टी. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानल्या जातात. आजच्या घडीला देशात एकूण २३ आय.आय.टी. कार्यरत आहेत.

आय.आय.टी.च्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्झॅमिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक विद्द्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) ही परीक्षा द्यावी लागते.

बाह्य दुवे[संपादन]