भिगवणस्टेशन
| ?भिगवण महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | बारामती |
| जिल्हा | पुणे जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• MH 42 |
भिगवण हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव महत्त्वाचे आहे. इंदापूर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ व जवळपास सर्वच सुविधा असलेल्या या गावातील लोकसंख्या ही इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक असून पर्यटन क्षेत्र व मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सर्वाधिक प्रमाणात अग्रेसर असणारे गाव आहे. भिगवण गाव शेजारीच काही अंतरावर असणारे भिगवण रेल्वे स्टेशन सुद्धा तेवढेच मोलाचे असून यामुळे करमाळा, जेऊर, जिंती, पारवडी, सोलापूर, विजापूर, हैदराबाद, तिरुपती व दक्षिणेकडील रेल्वे प्रवास करता येतो.
भिगवण गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वसलेले आहे. सोलापूरच्या दिशेला १५० किमी अंतरावर तर पुण्यापासुन १०० किमी आहे. भिगवण हे पुणे- सोलापूर महामार्गावरील प्रमुख व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. भिगवण हे मुळात पुनर्वसित गाव आहे. उजनी धरणाचा पाणीफुगवता गावालगत आहे. तर तसे पाहायला गेले तर उजनी धरण पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत भिगवण या गावाचा जुना आराखडा व त्याची भौगोलिक रचना अजूनही स्पष्ट रूपात जुने गाव किंवा जुने भैरवनाथाचे मंदिर या ठिकाणी दिसत आहे. भैरवनाथाचे मंदिर हे या गावाचे वैशिष्ट्य व ओळख आहे. कारण नाथबाबाची यात्रा ही या गावाची ओळख आहे तर ती दर वर्षी अष्टमी यात्रा म्हणून साजरी केली जाते.
भौगोलिक स्थान
[संपादन]भिगवण हे भीमा नदीच्या किनारी वसलेले एक महत्त्वाचे स्थान आहे जसे कि मोठी बाजारपेठ,कृषि बाजारपेठ व उच्च प्रतीचे भाजीपाला कि जो ताजा व स्वच्छ अगदी माफक दरात उपलब्ध असतो. भिगवणबदद्ल आणखीन सांगायचे झाल्यास इथे असणारे मासे ते अगदी सहज उपलब्ध होतात त्यामुळे इथले मच्छि खानावळ खुपच लोकप्रिय आहेत. अगदी लांब लांबून खवय्ये खाण्यासाठी येतात. भिगवण या गावामुळे कमीत कमी १० ते १५ किलोमीटर अंतरावरील असलेल्या गावांमध्ये देवान -घेवान होतं असते. भिगवण हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे इथे अगदी प्राथमिक शिक्षण ते इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. भिगवण हे पुणे, सोलापूर व अहिलयानगर ( अहमदनगर) तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले गाव आहे. भिगवण हे फ्लोमिंगो पक्षी व पक्षी अभयारण्य यामुळे प्रसिद्ध आहे. जर आपण येथे फ्लोमिंगो पक्षी बघायला गेलो तर तिथे बोटींमघुन प्रवास करायला विसरू नका. कारण याची मजाच वेगळी असते. फ्लोमिंगो पक्ष्याचे हे माहेरघर मानले जाते.
हवामान
[संपादन]येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]भिगवण गावातील लोक आपल्या विविधतेने समृद्ध आहेत. वेगवेगळ्या जाती व जमाती या गावात गुण्यागोविंदाने राहतात. त्यांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास या गावातील मंदिरे, मस्जिद, जैन मंदिरे व बौद्ध मंदिर या गावांमध्ये पाहायला मिळतील. सर्व धार्मिक विधी आणि परंपरा सर्वजण एकत्र येऊन साजरे करतात हे या गावाची मुख्य वैशिष्ट्य आहे.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]- भिगवण पक्षी अभयारणय
- हवाई मल्लिनाथ मठ
- कुंभार वळण - रोहित पक्षी पर्यटन केंद्र
- खानोटा -रोहित पक्षी पर्यटन
- भैरवनाथ मंदिर जुने
- भैरवनाथ मंदिर नवे
वाह्तूक सुविधा
[संपादन]भिगवण या गावातुन
राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने रस्ते वाहतूक विकसित झालेली आहे. रस्ते वाहतुकीमुळे भिगवण गाव अहमदनगर, पुणे, सोलापूर, बारामती,राशिन, कर्जत, इंदापूर ठिकाणांना जोङलेले आहे. भिगवण गावातुन अहमदनगर- कोल्हापूर राज्य महामार्ग जातो.
या ठिकाणाहून हैदराबाद, पुणे, अहमदनगर ,सोलापूर, विजापूर,पंढरपूर ,मुंबई, शिर्डी, या ठिकाणी जाता येते. तसेच भिगवण रेल्वे स्थानक असल्यामुळे येथून पुणे, सोलापूर, चेन्नई ,हैदराबाद, रेल्वे मार्गावरील शहरांना जाता येते.
शहरांना जाता येते.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]लोणी देवकर,पळसदेव, डाळज, खानोटा, डिकसळ कुंभारगाव, मदनवाडी, निंबोडी, पारवडी, राजेगाव पिंपळे, कळस, चांदगाव स्वामी चिंचोली,