महर्षी अरविंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महर्षी अरविंद (जन्म : १५ ऑगस्ट १८७२; मृत्यू : ५ डिसेंबर १९५०) यांना सारे जग एक श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे ‘सावित्री’. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. मराठीतला अनुवाद डाॅ. ग.ना. जोशी यांनी केला आहे.

महर्षी अरविंद यांनी इंग्लंडमध्ये १४ वर्षे शिक्षणासाठी वास्तव्य केल्यानंतर ते भारतात परतले. देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी त्यांनी काही काळ क्रांतिकारक म्हणून लढा दिला. त्यासाठी नियतकालिक काढून जहाल असे लेखनही केले. परंतु त्यानंतर योगाभ्यासाकडे वळून ते महायोगी बनले. क्रांतिकार्याबद्दल काही दिवस कारावास भोगल्यानंतर ते भारतातील फ्रेंच वसाहत असलेल्या पॉंडिचेरी शहरात कायमच्या वास्तव्यासाठी गेले. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानावर विपुल लेखन केले आहे.

महर्षी अरविंद यांची इंग्रजी पुस्तके[संपादन]

  • इंटिग्रल योग (पूर्ण योग)
  • लाइफ डिव्हाइन
  • वेद-उपनिषदे आणि गीतेवरील महाकाव्ये
  • सावित्री (महाकाव्य)
  • सिंथेसिस ऑफ योग