पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार (पुस्तक)
Appearance
अतिमानस ही श्रीअरविंद प्रणीत एक संकल्पना आहे. अतिमानसाचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. श्रीअरविंद यांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरीस लिहिलेले शेवटचे ८ गद्य लेख म्हणजे 'द सुप्रामेंटल मॅनिफेस्टेशन अपॉन अर्थ' [१]हे पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सेनापती बापट यांनी केला आहे.
पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार | |
लेखक | श्रीअरविंद |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | The supramental manifestation upon earth |
अनुवादक | सेनापती पां. म. बापट |
भाषा | इंग्रजी-मराठी |
साहित्य प्रकार | तत्त्वज्ञानपर साहित्य |
प्रकाशन संस्था | श्रीअरविंद आश्रम, पॉंडिचेरी |
प्रथमावृत्ती | १५ ऑगस्ट १९६५ |
विषय | पृथ्वी चेतना, अतिमानसाचे कार्य |
पृष्ठसंख्या | १३० |
पुस्तकाची मांडणी
[संपादन]या पुस्तकातील लेख हे प्रामुख्याने 'बुलेटिन ऑफ फिजिकल एज्युकेशन'साठी लिहिण्यात आले होते. याचे नंतरचे नाव बुलेटिन ऑफ श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन असे आहे.
यामध्ये पुढील लेख समाविष्ट आहेत.
- संदेश
- शरीराची पूर्णता
- दिव्य शरीर
- अतिमानस आणि दिव्य जीवन
- अतिमानस आणि मानवता
- अतिमानस आणि विकासक्रमातील त्याचे स्थान
- प्रकाशमय मन
- अतिमानस आणि प्रकाशमय मन
संदर्भ
[संपादन]- ^ Sri Aurobindo (1971). SIU AUROBINDO BIRTH CENTENARY LIBRARY. 16. Pondicherry: Sri Aurobiodo Ashram.