अंबुलाल पुराणी
अंबुलाल पुराणी | |
---|---|
जन्म नाव | अंबुलाल बाळकृष्ण पुराणी |
जन्म |
२६ मे १८९४ सुरत |
मृत्यू |
११ डिसेंबर १९६५ पाँडिचेरी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | गुजराती |
प्रभाव | श्रीअरविंद |
अंबुलाल बाळकृष्ण पुराणी (२६ मे १८९४ - ११ डिसेंबर १९६५) हे भारतीय लेखक होते. ते श्रीअरविंद यांचे निकटवर्ती शिष्य आणि चरित्रकार होते.
जीवन आणि कार्य
[संपादन]पुराणी यांचा जन्म २६ मे १८९४ रोजी सुरत (आता गुजरात, भारत) येथे झाला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्यकर्ता म्हणून काम केले. १९२३ मध्ये ते श्रीअरविंद आश्रमात सामील झाले. ते १९३८ पासून श्रीअरविंद यांच्या समाधीपर्यंत म्हणजे १९५० पर्यंत श्रीअरविंद यांचे वैयक्तिक परिचर होते. [१][२]
पुराणी लिखित द लाइफ ऑफ श्री अरबिंदो [३] आणि इव्हनिंग टॉक्स विथ श्री अरबिंदो, [२] ही दोन पुस्तके श्रीअरविंद यांच्या जीवनावरील मुख्य स्त्रोतांपैकी एक आहेत. १९६२ मध्ये युनायटेड स्टेट्सला भेट देऊन श्रीअरविंद यांच्या योगशास्त्रावरील व्याख्याने देण्यासाठी त्यांनी बराच प्रवास केला. काही व्याख्याने पुस्तकरूपात उपलब्ध आहेत. यामध्ये सावित्री आणि 'लाइफ डिव्हाईन' वरील व्याख्यानांचा समावेश आहे.
त्यांनी मणिलाल द्विवेदी यांचे मणिलाल द्विवेदीनु जीवनचरित्र (१९५१) नावाचे चरित्र लिहिले. [४]
पुराणी यांचे ११ डिसेंबर १९६५ रोजी पाँडिचेरी, भारत येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. [५]
ग्रंथसंपदा
[संपादन]- मणिलाल द्विवेदीनु जीवनचरित्र (१९५१)
- द लाईफ ऑफ श्रीऑरोबिंदो, पाँडिचेरी: श्रीअरबिंदो आश्रम, १९५८.
- इव्हनिंग टॉक्स विथ श्री अरबिंदो,पाँडिचेरी: श्रीअरबिंदो आश्रम, १९५९.
- लेक्चर्स ऑन सावित्री: युनायटेड स्टेट्समध्ये व्याख्याने . पाँडिचेरी: श्री अरबिंदो आश्रम, १९६७
- श्रीऑरोबिंदो : सम अस्पेक्ट्स ऑफ हिज व्हिजन
- श्रीऑरोबिंदोज लाईफ डिव्हाईन : लेक्चर्स
- श्रीऑरोबिंदोज सावित्री : ॲन ॲप्रोच अँड अ स्टडी [२]
संदर्भ
[संपादन]- ^ Author bio at Vedic books
- ^ a b c Aurobindo; A. B. Purani (1 January 1982). Evening Talks with Sri Aurobindo. Lotus Press (WI). p. 23. ISBN 978-81-7060-093-0. 4 March 2012 रोजी पाहिले.
- ^ A. B. Purani (1 June 1987). The Life of Sri Aurobindo. Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 17. ISBN 978-81-7058-080-5. 4 March 2012 रोजी पाहिले.
- ^ Stanley Schab; George Simson (1997). Life Writing from the Pacific Rim: Essays from Japan, China, Indonesia, India, and Siam, With a Psychological Overview. Hawai'i: University of Hawaii Press. p. 54. ISBN 978-0-8248-1970-5.
- ^ Shah, Chinubhai; Trivedi, Chimanlal (1999). Thaker, Dhirubhai (ed.). ગુજરાતી વિશ્વકોશ [Gujarati Encyclopedia] (गुजराती भाषेत). XI (1st ed.). Ahmedabad: Gujarati Vishwakosh Trust. pp. 450–451. OCLC 313489194.
पूरक वाचन
[संपादन]- Parikh, Rasiklal Chhotalal; Acharya, Jayantilal (1969). Shri Ambubhai Purani Smritigranth [Shri Ambubhai Purani commemoration volume]. Gujarat Vyayam Pracharak Mandal. OCLC 22497326.
बाह्य दुवे
[संपादन]- Works by Ambalal Balkrishna Purani at Google Books
- Ambulal Purani in Gujarati Vishwakosh.