Jump to content

योग समन्वय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

योग-समन्वय या ग्रंथामध्ये श्रीअरविंद यांनी भारतीय योगपरंपरेतील प्रमुख सर्व योगांचा विचार केला आहे, आणि त्याचा समन्वय केला आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यांचा विस्तृत विचार यामध्ये समाविष्ट आहे. तंत्रमार्ग, हठयोग, राजयोग यांचाही धांडोळा यात घेण्यात आला आहे. हा सर्व विचार पार्श्वभूमी स्वरूपात मांडल्यानंतर श्रीअरविंद यांनी त्यांच्या योगाची म्हणजे पूर्णयोगाच्या तत्त्वज्ञानाची विस्तृत मांडणी या ग्रंथात केली आहे. म्हणून पूर्णयोगाचे आकलन करण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वपूर्ण मानला जातो.[]

योग-समन्वय
लेखक श्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) The Synthesis of Yoga
अनुवादक सेनापती पां.म.बापट
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार वैचारिक ग्रंथ
प्रकाशन संस्था श्रीअरविंद आश्रम, प्रकाशन विभाग
प्रथमावृत्ती १९९७
विषय श्रीअरविंद आणि त्यांचे तत्त्वज्ञान
पृष्ठसंख्या ११२०
आय.एस.बी.एन. 81-7058-379-9

पुस्तकाची मांडणी

[संपादन]

प्रास्ताविक:

[संपादन]

या भागामध्ये समन्वयाची आवश्यक पूर्वपीठिका मांडण्यात आली आहे. यामध्ये ०५ प्रकरणांचा समावेश आहे.

भाग पहिला: दिव्य-कर्म योग

[संपादन]

यामध्ये १३ प्रकरणांचा समावेश आहे.

भाग दुसरा: पूर्ण-ज्ञान योग

[संपादन]

यामध्ये २८ प्रकरणांचा समावेश आहे.

भाग तिसरा: भक्तियोग - दिव्य प्रेमाचा योग

[संपादन]

यामध्ये ०८ प्रकरणांचा समावेश आहे.

भाग चौथा: आत्म-पूर्णत्व योग

[संपादन]

यामध्ये २५ प्रकरणांचा समावेश आहे. यामध्ये श्रीअरविंद प्रणीत पूर्णयोगाची मांडणी करण्यात आली आहे.

पूरक वाचन

[संपादन]

प्रकरणश: सारांश (इंग्रजीमधून)

बाह्य दुवा

[संपादन]

योग-समन्वय (संपूर्ण ग्रंथ pdf स्वरुपात उपलब्ध)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "SABDA - The Synthesis of Yoga". www.sabda.in. 2024-02-03 रोजी पाहिले.