Jump to content

साप्ताहिक विवेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विवेक साप्ताहिकाची मुद्रा
विवेक साप्ताहिकाची मुद्रा

साप्ताहिक विवेक मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे एक साप्ताहिक आहे. विवेक लोकजागृती करण्यासाठी प्रकाशित केला जातो. जे समाजहिताचे तेच परखडपणे मांडायचे, ही ‘विवेक’ची भूमिका आजवर राहिलेली आहे. सद्य संपादक दिलीप करंबेळकर हे आहेत. विवेक लोकजागृती करण्यासाठी चालवायचा, हा ‘विवेक’चा उद्देश आहे. []

हे साप्ताहिक हिंदी भाषा भाषेतही प्रकाशित होते.

इतिहास

[संपादन]

या प्रकाशनाची स्थापना इ.स. १९३२ मध्ये झाली. ‘साप्ताहिक विवेक’ ने सप्टेंबर २००७ साली हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले. साप्ताहिक विवेक आधी सुरू झालेली आणि नंतर सुरू झालेली अनेक साप्ताहिके बंद झाली आहेत. हे साप्ताहिक विवेक पूर्वी मोठ्या वृत्तपत्रीय टॅब्लॉईड आकारात आकारात निघत असे. पुढे ते वाचनाच्या व संग्रहाच्या दृष्टीने सुलभ अशा मासिकाच्या आकारात प्रकाशित होऊ लागले. इ.स. १९९६ पर्यंत विवेक साप्ताहिकाची छपाई कृष्णधवल तर प्रसंगी सोन रंगात असे. पूर्वी विवेक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वैचारिक लेखांनी भरलेला असे.

सद्य स्थिती

[संपादन]

आत्ताचे मुखपृष्ठ पूर्णपणे रंगीत असते. साप्ताहिकाच्या स्वरूपात बदल होऊन आता माहिती देणारी आणि रंजन करणारी विविध सदरे साप्ताहिकात अंतर्भूत झालेली दिसून येतात.

या विषयांवर साप्ताहिक विवेक सतत जागृती करत असते.

योगदान

[संपादन]
  • रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात विवेक या साप्ताहिकाने खास प्रकाशने काढली होती. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घटनांची माहिती गोळा करण्याचे काम या कालखंडात ‘केले गेले. यामुळे बाबरी ढाचा कोसळतानाची छायाचित्रे विवेक साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. याच कालखंडात सुरू झालेल्या मंडल आयोग आंदोलनातही निश्चित आणि सुस्पष्ट भूमिका मांडणारे लेखन ‘विवेक’मध्ये प्रकाशित झाले. ‘राखीव जागा- का व कशासाठी?’ आणि ‘मंडल आयोग’ या भि.रा. दाते यांच्या दोन पुस्तिका याच काळात प्रकाशित झाल्या. ‘विवेक’चे संपादक दिलीप करंबेळकर यांची अयोध्या आंदोलनाची मीमांसा करणारी पुस्तिका याच काळात प्रकाशित झाली.
  • इ.स. १९८७ साली महाराष्ट्रात ‘रिडल्स ऑफ राम अँड कृष्ण’ या विषयावरून वादंग उठले. दलित आणि दलितेतर अशी समाजाची विभागणी अधिक तीव्र झाली. साप्ताहिक ‘विवेक’ने समन्वयाची भूमिका घेतली. याच काळात ‘राम विरुद्ध आंबेडकरि समाज पोखरणारा वाद’ ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तसेच ‘विवेक’च्या प्रयत्नांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारे, महाराष्ट्रानेही रिडल्सवादात समाजाला जोडणारी भूमिका घेतली. रिडल्सवादात सन्मानाने जो तोडगा निघाला, त्यात ‘विवेक’ची भूमिका महत्त्वाची ठरली असा दावा केला जातो.
  • या काळात बाळासाहेब गायकवाड यांचे ‘ख्रिस्ती महार’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची मुखपृष्ठकथा ‘विवेक’ने केली होती. या मुखपृष्ठकथेमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ख्रिस्ती महार हा विषय उचलून धरला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय विषयसूचीवर एक वर्ष हा विषय गाजत राहिला. इ.स. १९८७ साली डॉ. गंगाधर पानतावणे समरसता परिषदेला आले म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीने त्यांना बहिष्कृत केले. त्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी ‘विवेक’ने उपलब्ध करून दिली होती.
  • इ.स. १९९० पासून महाराष्ट्रात भटके-विमुक्त विकास परिषदेच्या कामाला सुरुवात झाली. भटके-विमुक्त समाजाचे प्रश्न विविध प्रकारे समाजापुढे आणण्याचे काम ‘विवेक’ने स्वीकारले. इ.स. १९९३ सालापासून दर दिवाळी अंकात एकेका भटक्या-विमुक्त जमातीचा परिचय गिरीश प्रभुणे कथारूपाने करून दिला. या लेखांचे पुढे पालावरचं जिणं या नावाने पुस्तक प्रकाशित झाले. इ.स. १९९५ साली ‘विवेक’चे कार्यकारी संपादक रमेश पतंगे यांचे ‘मी, मनु आणि संघ’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची हिंदी भाषा, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड अशा विविध भाषांत भाषांतरे झाली.
  • भटके-विमुक्त विकास परिषदेच्या कामाला यमगरवाडी प्रकल्पापाठोपाठ सुरुवात होऊन मगरसांगवी, अनसरवाडा, नेरले या गावी आणखी काही प्रमुख प्रकल्प उभे राहिले. विवेकच्या वाचकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी वर्गणीसोबत महिन्याला एक रुपया याप्रमाणे १२/- रुपये प्रकल्पाला दान द्यावेत. या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता दर वर्षी भटके-विमुक्त विकास प्रकल्पासाठी सहा ते सात लाख रुपयांचे आर्थिक मदत या साप्ताहिकामार्फत दिली जाते. पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारून अनन्वित अन्याय आणि अत्याचार होतात. त्यांना वाचा फोडण्याचे काम या साप्ताहिकाने केले आहे. दुर्योधन काळे या पारधी युवकाची पोलिसांनी हत्या केली. या हत्येची पूर्ण बातमी ‘विवेक’मध्ये प्रकाशित झाली. पुढे या हत्याप्रकरणी पोलीस निलंबित झाले. त्यांच्यावर खटला भरला गेला आणि त्यांना शिक्षाही झाली होती.

प्रकाशने

[संपादन]

गेली दहा वर्षे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथनिर्मितीच्या कामात ‘विवेक’ गुंतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख प्रचारकांचा तसेच संस्थांचा धावता इतिहास ग्रंथबद्ध करण्याचे काम या साप्ताहिकाने केले आहे.

  • विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी गावोगावी प्रवास करून त्याची माहिती संकलित करून या साप्ताहिकाने वेळोवेळी प्रकाशित केली आहे.
  • पाण्याच्या प्रश्नावर माधवराव चितळे यांचे ‘भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे’ हे पुस्तकच ‘प्रकाशित केले आहे.
  • भारतात धार्मिक लोकसंख्येचे संतुलन बिघडून हिंदू समाज अल्पसंख्य होण्याच्या मार्गावर आहे. या विषयावरील जनजागृती करणारा ‘तुमचा नातु हिंदू राहील का?’ हा विशेषांक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजला. याच विषयावरील ‘हिंदू अल्पसंख्य होणार का?’ हे पुस्तक ‘विवेक’ने प्रकाशित केले.

आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेली पुस्तके

[संपादन]
  • अमृतपथ
  • राष्ट्रसाधना
  • संघगंगोत्री
  • राष्ट्ररत्न अटलजी
  • राष्ट्र-ऋषी श्रीगुरुजी
  • भाजपा-ध्येयपथावरील पंचवीस वर्षे
  • कृतिरूप समरसता
  • समाजसंघटक दामुअण्णा शिवराय
  • तेलंग स्मृतिगंध

या ग्रंथांमुळे अभ्यासकांना संदर्भासाठी लिखित साहित्य उपलब्ध झाले आहे. राष्ट्रीय विषयावरील आणखी काही महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन ‘विवेक’ने सातत्याने केले आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणी मधे ज्यांचा विविध क्षेत्रात गेल्या २०० वर्षात सहभाग होता , त्या मान्यवरांच्या बद्दल माहिती असलेले स्त्री-पुरुषांचा परिचय करून देणारे बारा खंड प्रकाशित आहेत. विषयानुरूप त्यांची मांडणी अशी आहे. १) इतिहास खंड :- ्संपादक डॉ. मोरवंचीकर , कार्यकारी संपादक :- दिपक जेवणे ,लेखात्मक स्वरूपाचा. जून २००९ मधे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२) साहित्य खंड :- संपादक डॉ. सुभाष भेंडे, कार्यकारी संपादक :- सुपर्णा कुलकर्णी , कोशात्मक स्वरूपाचा, ५५० साहित्यिकांची चरीत्रे एकत्र असलेला खंड आहे.( २०१० मधे प्रसिद्ध झाला आहे.)
६) दृष्यकला खंड : - संपादन :- सुहास बहूलकर, घारे,साधना बहूलकर, सहसंपादिका सुपर्णा कुलकर्णी :- या खंडामधे दृश्यकले अंतर्गत- चित्रकला, उपयोजित चित्रकला , मुर्तीकला या मधे ज्या मान्यवरांनी योग दान दिले, त्यांची चरित्रात्मक माहिती देण्यात आलेली आहे. दिनांक ४ मे २०१३ रोजी या खंडाचे प्रकाशन पार पडले.या प्रकाशन समारंभाप्रसंगी, रजनी दांडेकर , श्रीराम दांडेकर, सुभाष दांडेकर, ( कॅम्लिन समुहाचे) आणि दृष्यकला क्षेत्रातिल बरेच मान्य्वर उपस्तित होते.

टीका

[संपादन]

साप्ताहिक विवेक एका विशिष्ट विचारसरणीचाच प्रचार करते अशी अनाठाई टीका या साप्ताहिकावर केली जाते. परंतु भारताचा आणि भारतीयत्वाचा प्रचार ही विचारसरणी योग्यच आहे असा दावा या साप्ताहिकाद्वारे केला जातो.

हे ही पाहा

[संपादन]

अधिक माहिती

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-13 रोजी पाहिले.