Jump to content

मदर इंडिया (मासिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्थापना

[संपादन]

मदर इंडिया हे श्रीअरविंद आश्रम यांच्यातर्फे प्रकाशित होणारे पाक्षिक, आता मासिक या स्वरुपात प्रकाशित होते. फेब्रुवारी १९५२ साली त्याचे मासिकात रुपांतर झाले. यामध्ये सांस्कृतिक समीक्षा समाविष्ट असते.

हे पाक्षिक २१ फेब्रुवारी १९४८ मध्ये सुरू झाले, या पाक्षिकाची मूळ संकल्पना श्री.के.आर.पोद्दार ऊर्फ नवजात यांची होती. श्रीमाताजी यांच्या अनुमतीने संपादकपदी के.डी. सेठना (अमल किरण) यांची नियुक्ती करण्यात आली. ते पन्नास वर्षांहून अधिक काळ संपादक म्हणून कार्यरत होते.

मदर इंडिया
प्रकार मासिक
विषय अर्ध-राजकीय पाक्षिक, सांस्कृतिक समीक्षा
भाषा इंग्रजी
संस्थापक संपादक के.डी. सेठना (अमल किरण)
स्थापना २१ फेब्रुवारी १९४८
पहिला अंक
कंपनी श्रीअरविंद आश्रम
देश भारत
मुख्यालय पाँन्डिचेरी
संकेतस्थळ https://www.sriaurobindoashram.org/journals/motherindia/

श्रीअरविंद यांचे मार्गदर्शन

[संपादन]

मदर इंडिया हे अर्ध-राजकीय पाक्षिक म्हणून सुरू झाले आणि त्यातील साहित्य प्रकाशित करण्यापूर्वी श्रीअरविंद यांची अनुमती घेतली जात असे. श्रीअरविंदांनी स्वतः मदर इंडियामध्ये कधी लिहिले नसले तरी, त्यावेळच्या महत्त्वाच्या समस्यांबद्दलची त्यांची आस्था, पाक्षिकाच्या संपादकांच्या म्हणजे अमल किरण यांच्या लेखनातून दिसून येत असे. उदाहरणार्थ, कोरियावरील त्यांचा संदेश, मूलतः अमल किरण यांना खाजगीरित्या पाठविला गेला होता आणि पुढे तो एका संपादकीयाचा आधार बनला.

सर्व संपादकीय लेख श्रीअरविंद यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येत असत. ते बहुतेक वेळी निर्दोष असत, पण काही प्रसंगी मात्र लहान परंतु महत्त्वपूर्ण बदल केले गेले होते.

श्रीअरविंद यांनी एकदा के.डी. सेठना यांना लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख केला होता की, '' मदर इंडिया हे माझे वृत्तपत्र आहे.''

श्रीअरविंद यांनी देह ठेवल्यानंतर श्रीमाताजी मदर इंडिया मधील संपादकीय वाचून मंजूर करत असत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "मदर इंडिया".