अभीप्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
ऑक्टोबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

पूर्णयोगी श्री. अरविंदांनी Aspiration ला अभीप्सा हा शब्द दिला आहे. अरविंदांच्या मते अभीप्सा म्हणजे ईशशक्तीला केलेले आवाहन. सर्वोच्च शक्तीने आपल्यापर्यंत यावे म्हणून हे आवाहन असते. ती दिव्यतेला दिलेली साद आहे. यामुळे जाणिवा बाधक न होता साधक होतात. उत्कट अनुभूतीचा ध्यास लागतो. सर्वागीण परिवर्तनाची जाण वाढते. अंतरात्मा जागा होतो. तो आपला प्राणिक भाग (Vital) शुद्ध करतो. तो अंतरात्म्याच्या आज्ञेत वागतो. मुळात आपला शारीरिक भाग जड असतो. त्याला शुद्ध करावे लागते. त्यासाठी मनातही कळकळ सांभाळून राहिले पाहिजे. तरच ईश्वरकृपेचे साहाय्य मिळते. अज्ञानाचा निरास होतो. वरवरचे मोह सतत फसवितात. शुद्ध मन अशा मोहापासून जाणीवपूर्वक लांब राहते. मनाची कल्पकता शरीराच्या इच्छाशक्तीत मिसळवून टाकली की देहशुद्धी उत्तम होते. इच्छाशक्तीची तीव्रता आध्यात्मिक अभीप्सेत परिणत होते. अभीप्सेला श्रद्धेचे पाठबळ मिळाले ईशकृपेला उशीर नसतो. अभीप्सा ही स्थिर, अखंड, दक्ष आणि नित्य दिव्यासारखी प्रकाशित हवी. तिला बुद्धी आणि भावना यांची सोबत हवी. बुद्धीने अभीप्सा ज्ञानमार्गी बनते. भावनेने अभीप्सा भक्तिमार्गी होते. बुद्धीने सतत व्यष्टीला आणि समष्टीला शोधीत राहावे. स्वभावाला आणि अभ्यासाला यत्नशील राखण्यात बुद्धी हे ईश्वरी वरदान आहे. त्यामुळे अकारण क्षुद्र ताठरपणा आपल्यात येत नाही. समृद्ध अभीप्सा अध्यात्म विकासाला पोषक ठरते. अभीप्सेचे वैशिष्टय असे आहे; अभीप्सा शब्दांवर अवलंबून नसते. शब्दांच्या साहाय्याशिवाय अभीप्सा कार्य करते. अभीप्सा मौनातही खुलते आणि बोलण्यातून व्यक्त होते. मात्र अभीप्सेचे श्रद्धेवाचून अडत नाही. अश्रद्ध अभीप्सा बाळगू शकतात. ईश्वरावर श्रद्धा नसलेले जगाच्या कल्याणाकरिता झटतात. त्यांच्या तळमळीत श्रद्धा असते. म्हणून ते जरी देवाला विसरले तरी देव त्यांना विसरत नाही. या साऱ्यात अभीप्सा अंतज्र्योतीसारखी आहे. निसर्गालासुद्धा अभीप्सा आहे. मात्र एक निश्चित, अभीप्सा प्रयत्नांनी मिळवावी लागते.